• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

धाकटी पाती : सूर्यकांत

- श्रीराम रानडे (गुण गाईन आवडी)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 6, 2024
in मनोरंजन
0
धाकटी पाती : सूर्यकांत

चंद्र सूर्य जैसे गगनी विसजती
कलांगणी उभय बंधू तैसेची चमकती
राम-लक्ष्मणाची जोडी वर्णिली साहित्यात
ज्यांनी पाहिली प्रत्यक्ष रसिक आम्ही भाग्यवंत।।

काही नावेच अशी गोड असतात की एकाचे नाव घेतले की दुसरे आपोआपच मनी प्रगटते. लता मंगेशकर म्हटले की आपोआपच आशा भोसले, उषा, मीना, हृदयनाथ ही नावे आठवतात. बाबुराव पेंढारकर म्हटले की भालजी येतातच. त्याचप्रमाणे मराठी चित्रसृष्टीत `चंद्रकांत’ म्हटले की `सूर्यकांत’ आणि ‘सूर्यकांत’ म्हटले की ‘चंद्रकांत’ डोळ्यासमोर येतात. बलदंड देहयष्टी, उंचीपुरी मूर्ती, दुसर्‍याच्या काळजाचा ठाव घेणारी भेदक नजर आणि रुबाबदार मर्दानी व्यक्तिमत्वे! दोघे सख्खे बंधू! दोघेही कलावंत! दोघेही उत्तम चित्रकार! दोघेही यशस्वी! आणि दोघेही एकमेकांचा आदर करणारे बंधू! उत्तम माणूस!
वास्तविक चंद्रकांत (गोपाल तुकाराम मांढरे) आणि सूर्यकांत (वामन तुकाराम मांढरे) यांच्या वयात बारा-तेरा वर्षांचे अंतर. चंद्रकांत यांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३चा तर सूर्यकांत हे २ जून १९२६चे. वडील तुकाराम मांढरे आणि आई तामूबाई यांचे उदरी या दोन भावांनी जन्म घेतला. ‘गोपाळ’ आणि ‘वामन’ ही नावे बदलून ‘चंद्रकांत’ आणि ‘सूर्यकांत’ अशी कलासृष्टीला योग्य अशी नावे दिली ती यांच्या कलासृष्टीतील वडिलांनी म्हणजेच भालजी उर्फ बाबा पेंढारकर यांनी! ते सर्व कलावंतांचे ‘पिताश्री’!
सूर्यकांत यांचे शालेय शिक्षण जन्मगावी म्हणजे कोल्हापूर येथेच प्रथम सरस्वती विद्यालय आणि त्यानंतर हरिहर विद्यालय येथे झाले. शालेय अभ्यासापेक्षा चित्रकला, नाटके आणि तालीमखाना यात त्यांना अधिक रस होता. कोल्हापूरच्या तांबड्या मातीत कुस्तीचे डावपेच आणि याहीपेक्षा हार-जीत यांची खंत अथवा घमेंड न मानता ‘खेळत राहा’ हा जीवन संदेश त्यांनी आत्मसात केला. शालेय स्नेहसंमेलनात त्यांनी नाटकात कामे केली, पण त्या काळी त्यांच्या वाट्याला आलेली कामे खलप्रवृत्तीच्या लोकांचीच होती आणि कोल्हापूरचे प्रसिद्ध चित्रकार आबालाल रहमान यांच्याकडून कॅनव्हासवर चित्रे रेखाटणे आणि चारकोल शेडिंगचे धडे गिरवले. या तीनही गोष्टी त्यांच्या पुढील यशस्वी कलाजीवनासाठी `तहान लाडू भूक लाडू’च ठरले. ही उमलत्या वयातली शिदोरी त्यांना जन्मभर पुरली.
वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी भालजी पेंढारकर यांच्या `भक्त धृव’ या बोलपटात त्यांनी भूमिका केली आणि पुढील जीवनात कलाक्षेत्रात `धृवा’सारखेच अढळपद प्राप्त केले. भालजींचाच शिवकाळातील उत्तम गुप्तहेर ‘बहिर्जी नाईक’ या चित्रपटात त्यांनी बालशिवाजी साकारला. हा बोलपट आहे १९४३चा आणि याच सिनेमापासून त्यांचे नवीन नामकरण झाले. सूर्यकांत मांढरे आणि पडद्यावर अक्षरे उमटली ‘सूर्यकांत’! आता चंद्रकांत आणि सूर्यकांत हे दोघे मांढरे बंधू अधिकच जोमाने कलांगणात संचार करू लागले. अशी सूर्यकांत यांची उमेदवारी सुरू असतानाच २६ डिसेंबर १९४७ रोजी त्यांचा सुशीला पिसे यांचेबरोबर विवाह झाला. कलासंसार आणि कुटुंबसंसार अशी दुहेरी भूमिका सूर्यकांत यांनी स्वीकारली आणि या दोन्हीही भूमिका त्यांनी आदर्शपणे निभावल्या.
प्रभातपासूनचे दिग्दर्शक आणि अभिनेते राजा नेने यांनी १९५०मध्ये `केतकीच्या बनात’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यात `सर्जेराव’ ही भूमिका करण्याची संधी सूर्यकांत यांना मिळाली. पण या चित्रपटाचे अधिक वैशिष्ट्य म्हणजे सेन्सॉरचे `ए’ सर्टिफिकेट म्हणजे ‘फक्त प्रौढांसाठी’ सर्टिफिकेट या चित्रपटाला मिळाले. त्यामुळे माझ्यासारख्याच बालवयातील प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताच आला नाही. `ए’ सर्टिफिकेट मिळालेला हा चित्रपट बघण्याची इच्छा आजही ओंकारेश्वरी गोवर्‍या गेलेल्या रसिक (आंबटशौकीन) म्हातार्‍याच्या मनात अजूनही आहे.
सूर्यकांत यांनी त्यांच्या कला कारकीर्दीमध्ये शंभरपेक्षाही अधिक चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. ऐतिहासिक, पौराणिक, कौटुंबिक, सामाजिक, ग्रामीण आणि तमाशाप्रधान असे चित्रपट आणि त्यातील नायक, सहाय्यक अभिनेता, खलनायक, चरित्र अभिनेता अशा विविध छटांच्या, विविध स्वभावाच्या, विविध ढंगांच्या भूमिका आहेत. त्यांच्या सर्वच चित्रपटांची यादी द्यायची झाली तर एक लांबलचक लेखच तयार होईल, पण सूर्यकांत एक बहुरुपी समर्थ कलाकार होते. यासाठी वानगीदाखल काही चित्रपटांतील भूमिकांवर मी धावती नजर टाकणार आहे.
‘ध्रुव’ (१९३८) या चित्रपटातून त्यांनी भालजी पेंढारकर यांच्या पितृतुल्य मार्गदर्शनाखाली बालवयातच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ‘बहिर्जी नाईक’ या १९४३मध्ये तयार झालेल्या चित्रपटापासून त्यांची ऐतिहासिक चित्रपटांची वाटचाल सुरू झाली. ‘जय भवानी’ (१९४७) या जयशंकर दानवे यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि ‘स्वराज्याचा शिलेदार’ (१९५१) या मा. विठ्ठल यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतही त्यांनी भूमिका रंगवल्या. ‘मोहित्यांची मंजुळा’ (१९६३), ‘धन्य ते संताजी धनाजी’ (१९६६), ‘थोरातांची कमळा’ (१९६३) यात चंद्रकांत शिवाजी आणि सूर्यकांत संभाजी या भूमिकेत होते. यापूर्वी भालजी पेंढारकरांनी दिग्दर्शित केलेल्या ‘थोरातांची कमळा’ या चित्रपटात नटवर्य नानासाहेब फाटक यांनी शिवाजी आणि चंद्रकांत यांनी संभाजीची भूमिका केली होती. `कमळा’ची भूमिका सुमती ग्ाुप्ते यांनी केली होती. देखणे रूप, खणखणीत संवाद, ऐतिहासिक पात्राला साजेल अशी रंगभूषा, वेषभूषा आणि भूमिकेची आदब राखण्याची अभिनयक्षमता या गोष्टींमुळे सूर्यकांत हे प्रेक्षकांना त्या ऐतिहासिक काळाचे दर्शन घडवित. भालजींच्या कडक शिस्तीत ते शिकले होते.
सूर्यकांत यांनी सामाजिक, कौटुंबिक विषय मांडणारे चित्रपटही केले आहेत. `बाळा जो जो रे’ (१९५१) हा दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित चित्रपट अतिशय गाजला. उषा किरण या चित्रपटाच्या नायिका होत्या. वसंत पवार यांचे संगीत आणि कथा, पटकथा, संवाद, गीतरचना ग. दि. माडगुळकर होती. आशा भोसले, सुधीर फडके यांनी गायलेली गीते अजरामर आहेत. `हरवले माझे काही तरी’, `दासांचा हा दास श्रीहरी’ आणि `बाळा जो जो रे’ हे अंगाई गीत कानी पडताच आजही रसिक भारावतात.
`स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ (१९५२) हासुद्धा अतिशय यशस्वी झालेला चित्रपट. सूर्यकांत नायक आणि उषा किरण नायिका. यातील `स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी’ हे हृदय पिळवटून टाकणारे गीत आजही कानी पडल्यावर आपोआपच डोळे भरून येतात. या चित्रपटाची आणखी एक विशेषता म्हणजे १९७६मध्ये मुंबई येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा झाला होता. त्यात हा सिनेमा `वुमन इन इंडिया’ या विभागात दाखवला गेला आणि त्याची प्रशंसा झाली.
`गृहदेवता (१९५७) हा सामाजिक विषय असलेला चित्रपट. ताष्कंद चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला हा पहिला मराठी चित्रपट. शिवाय या चित्रपटाला राष्ट्रपतींचे रौप्यपदकही मिळाले होते.
‘शिकलेली बायको’ हा १९५९मध्ये प्रदर्शित झालेला, सूर्यकांत आणि उषा किरण हे नायक-नायिका असलेला, अत्यंत गाजलेला चित्रपट. सुप्रसिद्ध लेखक नाथमाधव यांच्या ‘डॉक्टर’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता. फारसा न शिकलेला रघुनाथ (सूर्यकांत) आणि सुशिक्षित कमलिनी (उषा किरण) यांचा विवाह होतो. विवाहप्रसंगी कमलिनीच्या मैत्रिणी रघूच्या अडाणीपणा विषयी अत्यंत कुत्सित शब्दात ‘नंदीबैल कसला हत्तीच वाटतो’ ही अशी जहरी टीका करतात. गावकरी मंडळीही त्याची टर उडवतात. रघू पिसाळतो आणि या बायकोबरोबर राहायचे नाही असा निर्णय घेतो. कमलिनी माहेरी परत येते. डॉक्टर होते. योगायोगाने रघुनाथला झालेल्या अपघातामधून त्याला वाचविते. रघुनाथला आपली चूक उमगते व तो ती कबूलही करतो.
दिग्दर्शक माधव शिंदे यांनी अत्यंत कुशलतेने हा चित्रपट हाताळला आहे. सूर्यकांत, उषा किरण, इंदिरा चिटणीस यांची उत्तम अभिनयाची साथ. पी. सावळाराम यांची `आली हासत पहिली रात’, `नयनी गंगा हृदयी काशी’, `प्रेमा काय देऊ तुला’ या गीतांना वसंत प्रभूंनी दिलेले सुमधुर संगीत आणि लता मंगेशकर, आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या गायनामुळे मराठीमधील काही जमलेल्या आणि गाजलेल्या कौटुंबिक चित्रपटांपैकी हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे.
याखेरीज `पहिले प्रेम’ (१९५७), ‘अंतरीचा दिवा’ (१९६४), ‘पंचारती’ (१९६०), ‘कन्यादान’ (१९६०), ‘बायकोचा भाऊ’ (१९६२), ‘भाऊबीज’ (१९५५), ‘बाळ माझं नवसाचं’ (१९५५), ‘सून माझी सावित्री’ (१९५५) या आणि इतर अशा अनेक सामाजिक आशय असलेले नागरी आणि ग्रामीण चित्रपटांमधून सूर्यकांत यशस्वी भूमिका केल्या आहेत.
१९६०-७०च्या दशकात मराठी चित्रपट क्षेत्रात तमाशापटांचं अमाप पीक आलं होतं. दिनकर द. पाटील, ग. दि. माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, जगदीश खेबुडकर, अनंत माने अशा अनेक नामवंतांनी या चित्रपटांसाठी योगदान दिलेले आहे. चंद्रकांत, सूर्यकांत, अरुण सरनाईक, वसंत शिंदे, हंसा वाडकर, जयश्री गडकर, उषा किरण, लीला गांधी, उषा चव्हाण, दादा साळवी, गणपत पाटील अशा अनेक नामवंत कलाकारांचा सहभागही त्यात होताच. सूर्यकांत यांनीही अनेक तमाशापटांत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सांगत्ये ऐका’ (१९५९), ‘प्रीतीसंगम’ (१९५७), ‘पुनवेची रात’ (१९५५), ‘लाखात अशी देखणी’ (१९७१), ‘मल्हारी मार्तंड’ (१९६५) अशी लांबलचक तमाशापटांची नावेच त्यांच्या भूमिकांमध्ये आहेत. वसंत पवार, राम कदम, सुधीर फडके, बाळ पलसुले आणि अनेक संगीत दिग्दर्शकांनी लावणीगीतांवर स्वरसाज चढविला आणि आशा भोसले, लता मंगेशकर, उषा मंगेशकर, पुष्पा पागधरे, उत्तरा केळकर, कृष्णा कल्ले, सुलोचना चव्हाण यांनी उत्कृष्ट आवाजामधून या गीतांना रसिकांपर्यंत पोहोचविले. `बुगडी माझी सांडली गं’, `बाई मी पतंग उडवित होते’, `कसं काय पाटील बरं हाय का?’, `तुझ्या उसाला लागला कोल्हा…’ एक ना दोन-असंख्य लावण्यांचे प्रकार या तमाशापटांतून रसिकांनी मनमुराद ऐकली, उपभोगले, आणि आजही त्याचा आस्वाद घेत आहेत. बैठकीची लावणी, फडाची लावणी, झगडा, सवाल जबाब, छक्कड, किती-किती लोकगीतांचे प्रकार- तमाशापटांनी असे उदंड धन अर्पण केले आहे. ‘अखेर जमलं’ (१९५२), आणि ‘लग्नाला जातो मी’ (१९६०) या प्रकारच्या विनोदी चित्रपटांमध्येही सूर्यकांत यांनी अभिनयाची विविधता प्रगट केली आहे.
‘देहाची तिजोरी’, ‘मला हे दत्तगुरू दिसले’, ही गीते कानावर पडली की ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ (१९६८) हा चित्रपट डोळ्यांसमोर दिसू लागता. सूर्यकांत, धुमाळ आणि गणेश सोलंकी हे तुरुंगातून फरार झालेले वैâदी! त्यांनी आपल्या करामतीच्या जोरावर एका निर्धन कुटुंबाचे उजळलेले भाग्य आणि उरलेली शिक्षा प्रमाणिकपणे भोगण्यासाठी कारावासात जाण्याची तयारी.
`साधी माणसं’चा विषय निघाला की ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, अभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे!’ हे अप्रतिम गीत आणि लोहाराच्या भात्यावर दिसणारी शंकर-पार्वतीची (सूर्यकांत आणि जयश्री) ही लोहाराची जोडी. कोणतीही रंगभूषा नसलेला ‘साधी माणसं’ हा भालजींचा चित्रपट!
`ईर्षा’ हा चित्रपट तयार करून सूर्यकांत यांनी दिग्दर्शन, पटकथा, संवादलेखन याही क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी दोन चंद्रकांत रुपेरी पडद्यावर वेगवेगळ्या भूमिकांमधून आणले. त्यातील एक होते त्यांचे ज्येष्ठ बंधू चंद्रकांत (मांढरे) आणि दुसरे श्रेष्ठ कलाकार होते चंद्रकांत (गोखले).
सूर्यकांत यांनी अभिनयाच्या कारकीर्दीत सर्वाधिक २७ चित्रपट जयश्री गडकर यांच्याबरोबर केले. शिवाय सुलोचना, उषा किरण यांच्याबरोबरही बरेच सिनेमे केले आणि १४ चित्रपट ज्येष्ठ बंधू चंद्रकांत यांच्यासह केले.
चित्रपटांमधून काम करीत असतानाच त्यांनी चित्रकलेचा अत्यंत आवडता छंदही जपला होता. पावडर शेडिंग आणि पोर्ट्रेट यात त्यांचा हातखंडा होता. शिवाय शिल्पकला अवगत होतीच. त्यांच्या या सर्व कलाकृती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील संग्रहालयात रसिकांना पाहण्याची सोय आहे.
सूर्यकांत यांना रोजच्या रोज डायरी लिहिण्याची सवय होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांना आत्मचरित्र लिहण्यासाठी आग्रह केला. आणि यातून निर्माण झालं `धाकटी पाती’ हे त्यांचे उत्कृष्ट आत्मचरित्रपर पुस्तक. त्याला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट ग्रंथाचे परितोषिकही मिळाले. हा पारितोषिक समारंभ पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात साजरा झाला. फेटा बांधलेली, उंची पुरी, बलदंड शरीराची, रुबाबदार, दमदार पावले टाकीत रंगमंचावर टाळ्यांच्या प्रचंड गजरात पारितोषिक स्वीकारायला निघालेली सूर्यकांत यांची ती मर्दानी मूर्ती आजही माझ्या नजरेसमोर आहे. मीही त्या समारंभाला उपस्थित होतो. कारण `सांग सांग भोलेनाथ आणि चार एकांकिका’ या माझ्या पुस्तकाला बाल नाट्यलेखनाचा (१९९०) पुरस्कारही होता.
सूर्यकांत यांनी ‘कोल्हापुरी साज’ आणि ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर (विश्वकर्मा)’ ही पुस्तकेही लिहिली आहेत. उत्कृष्ट वक्ते म्हणूनही त्यांनी नावलौकिक संपादन केला होता. अतिशय कुटुंबवत्सल शिस्तीचा, वेळ काटेकोरपणे पाळणारा वक्तशीर आणि शिस्तप्रिय कलाकार अशी त्यांची ख्याती होती.
रुपेरी पडद्यावर यशस्वी कारकीर्द करीत असतानाच त्यांनी रंगभूमीवरही रसिकांची मने जिंकली. ‘बेबंदशाही’, ‘आग्य्राहून सुटका’, ‘तुझे आहे तुझपाशी’, ‘झुंझारराव’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘लग्नाची बेडी’ अशा पाच ऐतिहासिक, ११ सामाजिक आणि २० ग्रामीण नाटकांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. ‘मल्हारी मार्तंड’ (१९६५) या चित्रपटाला महाराष्ट्र सरकारचे पारितोषिक प्राप्त झाले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री (१९७३) पुरस्कार देऊन गौरविले. ‘कन्यादान’ (१९६०) महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले. कोल्हापूर येथे चित्रनगरी उभारणीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.
चंद्रकांत, सूर्यकांत या बंधूंचे बहुतेक सर्व चित्रपट मी लहानपणापासून बघतो आहे. पण प्रत्यक्ष परिचय मात्र झाला नाही. याची कुठे तरी बोच माझ्या मनात आजवर आहे. अगदीच बादरायण संबंध जोडायचा झाला तर आमच्या थिएटर अकॅडमी या प्रायोगिक नाट्यसंस्थेच्या भरत नाट्यमंदिरात झालेल्या ‘महानिर्वाण’ या नाटकाला ते आले होते. नाटक त्यांना आवडलेही होते. ते स्वत: जरी जुन्या पठडीतले कलावंत होते, तरी नवीन प्रायोगिक रंगभूमीबद्दल त्यांना नक्कीच आपुलकी होती. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी तयार केलेल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ते आवर्जून उपस्थित होते, हे माझ्या आजही स्मरणात आहे. असा हा बलदंड प्रकृतीचा, कलेचा वारसा जपणारा कलाकार वयाच्या ७३व्या वर्षी (२२ ऑगस्ट १९९९) काळाच्या पडद्याआड कायमचा निघून जावा हे दुर्दैव!
पाती धाकटी असो वा थोरली असो ही दोन्हीही पाती (चंद्रकांत, सूर्यकांत) कलाक्षेत्रात तेजाने तळपत होती, तळपत आहेत आणि तळपत राहतील हे त्रिवार सत्य! जोवरी आहेत चंद्रसूर्य नभांगणी तोवर दोघे असतील रसिकांच्या स्मरणी…

Previous Post

सेटवर जुळल्या रेशीमगाठी (भाग २)

Next Post

सोहळा सत्संगाचा… हलवा दुधीभोपळ्याचा!!

Related Posts

मनोरंजन

दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

May 15, 2025
पडद्यावरचा खरा नायक
मनोरंजन

पडद्यावरचा खरा नायक

May 15, 2025
मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
Next Post

सोहळा सत्संगाचा... हलवा दुधीभोपळ्याचा!!

स्क्रीन शेअर झाला अन् दोन लाख रुपये गेले...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.