• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

दादा, कशाला करताय फुसका वादा!

- मर्मभेद

Nitin Phanse by Nitin Phanse
July 5, 2024
in मर्मभेद
0

आदरणीय दादा,
नमस्कार
‘आदरणीय’ दादा असं म्हटलं आहे म्हणून हुरळून जाऊ नका, गैरसमजही करून घेऊ नका. वयाने मोठ्या माणसांना पत्र लिहिताना आदरणीय असं संबोधन लिहावं, असे संस्कार आहेत, म्हणून लिहिलं… एरवी तुम्हा तिघांबद्दल आदर वाटावा, अशी परिस्थिती नाही. शिवाय, जिव्हाळ्याने तुम्हाला ‘दादा’ म्हणावं, असं प्रेमही तुमच्याबद्दल उरलेलं नाही.
तुम्ही म्हणाल, आम्ही तिघांनी मिळून या आमच्या धाकट्या बहिणीसाठी एवढी मोठी ‘लाडकी बहीण योजना’ आणली आणि तरीही ती आमच्याशी असं कसं बोलते आहे?
ते तुम्हाला बैजवार सांगण्यासाठीच हा पत्रप्रपंच.
दादा, तुम्हा तिघांच्या या कामबिघाडा राजवटीत दरडोई उत्पन्नात देशात कायम पहिल्या नंबरवर असलेला आमचा महाराष्ट्र (‘आपला’ महाराष्ट्र म्हणण्याइतका आपलेपणा तुम्हाला या राज्याबद्दल आहे का?- तुम्ही दिल्लीपुढे मुजरे करून गुजरातला रमणे पाठवणारे पंचहजारी मनसबदार आहात फक्त) तुम्ही सहाव्या नंबरवर आणून बसवलात, देशात कायम आघाडीवर असलेली राज्याच्या विकासाची गती देशाच्या सरासरीवर आणून ठेवलीत. कधीकाळी आमचं राज्य देशाला वैचारिक दिशा दाखवत होतं, या राज्यानं जन्माला घातलेल्या रोजगार हमी योजनेने एकेकाळी देशातल्या गरीबांच्या हाताला काम आणि पोटाला अन्न दिलं. त्या महाराष्ट्राने आता मध्य प्रदेशसारख्या मागास राज्याची सवंग कॉपी करायची? शिवराज सिंग चौहानांनी लाडली बहना योजना आणून लोकसभेत सगळ्या जागा जिंकून दाखवल्या म्हणून तेच इथे करायला निघालात.
मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशात शिवराज मामांविषयी तिथल्या जनतेत, महिलांमध्ये असलेल्या आपुलकीच्या भावनेचा किती वाटा आहे आणि तिथली जनता भाजपच्या भोंदू हिंदुत्वावर भाळल्याचा वाटा किती आहे, याची आम्हाला कल्पना नाही, दादा; पण, तुम्ही तशीच लाडकी बहीण योजना आणाल आणि तिच्यावर खूष होऊन आम्ही तुमच्या पदरांत मतांचं दान टाकू, या भ्रमातून बाहेर या. तुम्ही राज्यातल्या म्हातार्‍या कोतार्‍यांना तीर्थयात्रा घडवून आणण्याचाही उद्योग हाती घेणार आहात म्हणे! त्याने त्या ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहेत का?
ना आमची मतं तुम्हाला मिळणार आहेत, ना त्यांचे आशीर्वाद. कारण त्यासाठी मुळात तुमच्यावर विश्वास असायला हवा.
तुमची विश्वासार्हता काय आहे हो, दादा? एक ईडीच्या भीतीने चोरट्यासारखा घर सोडून दुष्मनाला सामील झाला आणि सिनेमांवर सिनेमे काढून त्याला बंडाचा नैतिक मुलामा देतोय. दुसरा महिन्याभरापूर्वीपर्यंत लाडक्या बहिणीला पाडून लाडक्या बायकोला विजयी करा म्हणून मतं मागत फिरत होता; जो स्वत:च्या बहिणीचा, काकांचा नाही झाला, तो आमचा लाडका दादा होईल? तिसर्‍याची तर तर्‍हाच विचारू नका. आपणच मित्राचा विश्वासघात करायचा, वर त्याचंच घर फोडायचं, एवढं सगळं करून इतरांना अपशकुन करण्यासाठी आपलं नाक कापून घेण्याची, पदावनती स्वीकारण्याची, सुमार वकुबाच्या लोकांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आलीच ना!
असे हे तुम्ही तिघे, आज लाडकी बहीण, लाडकी बहीण म्हणून नाचताय, पण गेली दोन वर्षं ताईवरचं हे प्रेम कुठे गेलं होतं? बहिणीच्या सख्ख्या भावांना नोकर्‍या नाहीत, परीक्षा देता येत नाहीत, आरक्षणाच्या नावाखाली त्यांना झुलवत ठेवलंय तुम्ही. बहिणीच्या घरातल्या वृद्धांना, लेकराबाळांना चांगल्या आरोग्याच्या सेवा नाहीत, शेतमालाला भाव नाही, तो द्यायच्या ऐवजी तीर्थयात्रा कसल्या करवताय त्यांना?
आपण लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार रुपये देणार, अशा घोषणा तुम्ही करणार, तुमच्याकडून दिवाळी भेटी घेणारे आणि वर्षाची पॅकेज घेणारे पेपरवाले, चॅनेलवाले ते कौतुकाने छापणार आणि ते पाहून आम्ही खपाखप खपाखप तुमच्या चिन्हांपुढची बटणं दाबणार, असा गैरसमज कसा झाला तुमचा? ही फुटकळ रक्कम मिळण्यासाठी तुम्ही घातलेल्या अटी आणि शर्ती आम्हाला माहितीच नाहीत, असं वाटतं का तुम्हाला? बहिणीच्या सगळ्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न पाहणार, तिला आधी काही लाभ मिळतात का ते पाहणार, मग तुम्ही बहिणीला फुटकळ दीड हजार रुपये महिन्याला (म्हणजे दिवसाला ५० रुपये) देणार, तेही मोठे उपकार करत असल्याच्या थाटात. दादा, गरीबातली गरीब बाई पण एका घरची धुणी भांडी करते तेव्हा यापेक्षा जास्त पैसे मिळतात हो तिला दिवसाचे! तिच्या गरिबीची चेष्टा करताय की तिचं मत विकत घ्यायचं म्हणताय या रकमेत… तुम्हाला मी बहीण म्हणून पक्की ओळखत असेन ना, तर स्टॅम्प पेपरवर लिहून देते की राज्यात तुमच्या अटी आणि निकषांवर दोनपाच लाख महिलांना तुम्ही हा लाभ द्याल, त्यासाठी जेवढी रक्कम खर्च कराल त्याहून अधिक तुम्ही या योजनेचे ढोल वाजवण्यासाठी खर्च कराल… तुमची वृत्तीच आहे पाच पैशाचं काम करून पाच लाखांची जाहिरात करण्याची.
दादा, असल्या भिका घालून ओशाळायला लावू नका बहिणीला. उलट आम्हीच रक्षाबंधनाला तुम्हाला ओवाळणी घातली असं समजा आणि तिघे भाऊ कलर कोऑर्डिनेशन केलेले सूट शिवा, ड्रेस शिवा प्रचारासाठी. नाहीतरी या वर्षअखेरपर्यंत आम्ही तुम्हाला पायउतार करणार आहोतच, त्यानंतर तिघांच्या रिटायरमेंट फंडाच्या उपयोगी पडतेय का पाहा ती रक्कम!
काळ वाईट येणार आहे तुमचा, काळजी घ्या.
तुमचीच,
स्वत:च्या डोक्यावर स्वत:चं धड बाळगणारी
आणि त्याचा वापर करून विचारही करणारी
लाडकी बहीण

Previous Post

व्यॉकनाथाचा स्ट्राइक रेट, भिकवंताची परीक्षा

Next Post

हरवलेला इतिहास जागा केला

Related Posts

मर्मभेद

टूर निघालीऽऽ पुंवाकऽऽ पुक पुकऽऽ…

May 22, 2025
मर्मभेद

‘लष्कर-ए-होयबा’ आवरा!

May 15, 2025
मर्मभेद

धर्म नव्हे, जात विचारणार!

May 8, 2025
मर्मभेद

धडा शिकवा आणि शिकाही!

May 5, 2025
Next Post

हरवलेला इतिहास जागा केला

सामान्यांचा जीवनप्रवास इतका का भकास?

सामान्यांचा जीवनप्रवास इतका का भकास?

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.