• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
July 3, 2025
in टपल्या आणि टिचक्या
0

□ फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडालीय – शरद पवारांचा चिमटा.
■ झोप उडणारच! ते केवढे ज्येष्ठ नेते आहेत. सातवाहन, शालिवाहन काळात होते. शिवकाळात होते, पेशवाईत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पण ते होते, आणीबाणीत पण त्यांनी केवढी प्रखर कामगिरी केली. त्यांच्या राजवटीत महाराष्ट्राने इंग्लंड अमेरिकेबरोबर चंद्रालाही मागे टाकण्याइतकी प्रगती केलेली आहे. त्यांची धमकी पवारसाहेब, तुम्ही सिरियसली घेतलीच पाहिजे.

□ शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा भुसा करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली हिंदीसक्तीविरोधात मोर्चाची घोषणा.
■ मुळातच जो भुसा भरलेला, बस म्हटलं की बसणारा, उठ म्हटलं की उठणारा शेंदाड शिपाई आहे, त्याचा वेगळा काय भुसा करणार?

□ शक्तिपीठ महामार्गामुळे राज्याच्या तिजोरीवर आणखी भार पडणार – वित्त विभागाचा राज्य सरकारला इशारा.
■ सरकारची तिजोरी संपवून यांना राष्ट्रीय उद्योगपतीची तिजोरी भरायची आहे. नाव शक्तिपीठ. लोकांना वाटतं धार्मिक कॉरिडॉर आहे. नक्षलवाद संपवण्याच्या नावाखाली आदिवासींना देशोधडीला लावून खनिजसंपन्न प्रदेश मालकांच्या घशात घालण्यासाठी आणि त्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी हे सगळं सुरू आहे, हे जनतेला कळेल तो सुदिन.

□ ७५ टक्के धारावीकरांना घराबाहेर काढणार – केंद्र, राज्य सरकार आणि अदानीची खेळी.
■ ज्या क्षणी यात अडाणी हे नाव आलं, त्या क्षणी हेच होणार हे स्पष्ट होतं. जो देशाचा मालक, तोच मुंबईचा मालक असला पाहिजे, एवढं साधं सूत्र आहे.

□ अहमदाबाद, सुरतमध्ये तिसर्‍या दिवशीही कमरेपर्यंत पाणी.
■ बघा बघा, त्या प्रगत राज्यातली जनता कशी भाग्यवान आहे. त्यांना नदी पाहायला, तिच्यातून पोहायला, तिच्यात बुडून मरायला नदीकाठी राहायला जाण्याची गरज पडत नाही. सरकारने नदीच प्रत्येकाच्या दारात आणून ठेवली आहे. शिवाय आपदा में अवसर शोधणारे तिथे मेक इन इंडिया बनावटीच्या होड्या बनवून विकू शकतातच की!

□ अकरावी प्रवेशाचे वाजले की बारा… यादी अडकली तांत्रिक अडचणीत.
■ शेवटची बातमी हाती आली तेव्हा ती तांत्रिक अडचणींतून मोकळी होऊन प्रवेश सुरू होणार आहेत आता लवकरच. पण एकंदर हा शिक्षण विभाग आणि हे सरकार यांचा बदलौकिक पाहता हुश्श आता चक्रातून सुटका झाली असं पालकांना, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश होईपर्यंत म्हणता येईल, असं वाटत नाही.

□ अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक करणार्‍या अधिकार्‍यांची बदली करा – हायकोर्टाची ठाणे महापालिकेला चपराक.
■ हा हा हा हा! मग कारभार कोण करणार महापालिकेचा एकही अधिकारी शिल्लक राहिला नाही तर? शिवाय बांधकामं कुणाची आहेत? दुर्लक्ष करण्याचे आदेश कुठून येतात? लक्ष दिलं तर बदल्या कोण करतं? त्या सत्ताधार्‍यांचं काय करायचं?

□ नवी मुंबईला भीती बाहेरच्या चोरट्यांपासून – गणेश नाईकांचा रोख कुणावर?
■ नाईक कुणाबद्दल बोलतायत, ते सगळ्यांना माहिती आहे. त्यांचा रोख ठाण्याकडे आहे. पण नाईकांनी अशी भीती व्यक्त करणं म्हणजे चोराचोरांमध्ये स्थानिक आणि बाहेरचे असा भेद करण्यासारखं नाही का?

□ पालघरमध्ये संतप्त वाढवणवासीयांचे समुद्रात जलसमाधी आंदोलन.
■ उगाच काहीतरी करायला जाऊ नका. मानवी जीवनाची किंमत असलेले आणि शेतकरी, कष्टकरी यांच्याविषयी खरा कळवळा असलेले सत्ताधारी नाहीत हे! जलसमाधी घेतलीत तर म्हणतील, बरं झालं काही विरोधक कमी झाले!

□ शिंद्यांचे खासदार संदिपान भुमरे यांचा चालक दीडशे कोटींच्या जमिनीचा मालक; आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू.
■ असं कसं? तो कुणाचा कोण आहे ते पाहा. त्याचे मालक, त्यांचे मालक, त्यांच्या मालकांचे मालक कोण आहेत ते पाहा. ईडी येडी झालीये काय? की आदेशच तसे आहेत, मित्रांनाच खच्ची करून संपवण्याचे?

□ तिकीट दरवाढीचा ‘बेस्ट’ला फटका; महिनाभरात प्रवासी संख्या अडीच लाखांनी घटली.
■ बेस्टची तिकीट दरवाढ असते किती? तीही परवडत नाही, असा इतका मोठा वर्ग या महानगरात आहे, हा चिंतेचा विषय आहे. या मंडळींनी काय मार्ग पत्करला असेल मग प्रवासासाठी?

□ भाजपच्या राज्यात काहीही शक्य; मध्य प्रदेश मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील वाहनांत डिझेलऐवजी पाणी.
■ गडकरी साहेबांना सांगू नका! ते लगेच या आयडियेचे पेटंट घेतील आणि बोलतो ते करून दाखवतो, असंही सांगतील.

□ ट्रम्प लोकांचा आवाज दाबताहेत, त्यांचे सरकार अमेरिका पोखरतेय – बराक ओबामा संतापले.
■ ट्रम्प हे करणार आहेत, हे माहिती असून अमेरिकनांनीच त्यांना दुसर्‍यांदा निवडून दिलं आहे, म्हणजे पाहा! आम्हा भारतीयांकडे पाहा बराकसाहेब, आम्ही अघोषित आणीबाणी पण किती आनंदाने साजरी करतो.

□ गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्तच; पालकमंत्री फडणवीसांचा दावा फोल.
■ सगळं असतं फोल, पण बोलतात गोल गोल आणि इतके वाजवतात ढोल की लोकांच्या लक्षात येत नाही ढोल!

Previous Post

बिहारचा ‘महाराष्ट्र’ करण्याचा डाव?

Next Post

मराठी शक्तीपुढे सक्ती नमली!

Next Post

मराठी शक्तीपुढे सक्ती नमली!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.