• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

महानाट्याची महापर्वणी!

- प्रशांत केणी (आप कतार में थे...)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 5, 2023
in घडामोडी
0
महानाट्याची महापर्वणी!

कतारसारख्या आकारानं छोट्या देशाकडे विश्वचषकाचं यजमानपद दिल्यापासून या आशियाई राष्ट्राच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. यजमानपदाच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्यामुळेही कतारची प्रतिमा डागाळली आणि स्पर्धेतील अन्य राष्ट्रांना तोंडसुख घ्यायची संधी मिळाली. पण प्रत्यक्ष स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही उणीव वा कमतरता भासू न देता कतारने हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं. या विश्वचषकासाठी कतारने सुमारे तीनशे अब्ज डॉलर खर्च केले. या तुलनेत रशियात २०१८मध्ये झालेल्या मागील विश्वचषकाचा खर्च १४.२ अब्ज डॉलर इतका अल्प होता. कतारमध्ये साडेसहा अब्ज डॉलर नव्या स्टेडियमच्या निर्मितीसाठी खर्च करण्यात आले. परंतु रशियात इतक्या कमी खर्चात बरेचसे स्टेडियम उपलब्ध होते.
शिवाय जून-जुलै महिन्यात कतारमधील उष्णतामान प्रचंड असते, त्यावर उपाय म्हणून ही स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात खेळवण्यात आली. याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर प्रकर्षानं दिसून आला. दुखापतींचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलं. मद्यविक्री आणि परस्त्रीशी लैंगिक संबंध यावर बंदी असलेल्या या देशात कसं जगायचं, या प्रश्नामुळे परदेशी फुटबॉलरसिकांनी विश्वचषकाआधी टाहो फोडला. पण विश्वचषक सुरू झाल्यानंतर याबाबत कोणत्याही बातम्या ऐकिवात आल्या नाहीत. इराणने सामन्याआधी राष्ट्रगीत गायनास नकार देत देशातील स्त्रियांच्या हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला.

धक्कादायक लढती

धक्कादायक निकालांची मालिका गट साखळीपासूनच सुरू झाली. त्यामुळेच या विश्वचषकाची लज्जत आणखी वाढली. विश्वचषकाच्या तिसर्‍याच दिवशी सौदी अरेबियानं अर्जेंटिनाला धूळ चारून खळबळ माजवली. मेसीनं या सामन्यात गोल केला. पण एकंदरीतच अर्जेंटिना फारसा प्रभाव पाडू शकणार नाही, याचे संकेत या सामन्यानं दिले. पुढच्याच दिवशी जपाननं जर्मनीचं आव्हान मोडीत काढलं. सलग दुसर्‍या विश्वचषकात साखळीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की जर्मनीवर ओढवली. जपाननं मग स्पेनला हरवून आणखी एक धक्का दिला. दक्षिण कोरिया या आणखी एका आशियाई राष्ट्रानं पोर्तुगालवर विजय मिळवत लक्ष वेधून घेतलं. मोरोक्कोनं जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावरील बेल्जियमला नामोहरम करीत चुणूक दाखवली. साखळी टप्प्यात ट्युनिशियानं गतविजेत्या फ्रान्सला पराभूत करीत खडबडून जाग आणली. त्यानंतर कॅमेरूननं ब्राझीलला नमवण्याची किमया साधली.
उपउपांत्यपूर्व फेरी : बाद फेरीतील पाच सामने पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगले. यापैकी विजेत्या अर्जेंटिना आणि क्रोएशियाच्या वाट्याला दोन सामने आले. रडत-खडत आणि गोलफरकाच्या समीकरणांच्या बळावर बाद फेरी गाठणार्‍या स्पेनला पुन्हा पेनल्टी शूटआऊटच्या लढाईमध्ये अपयश आले. विश्वचषकातील पाचपैकी चार पेनल्टी शूटआऊटमधील लढती गमावणार्‍या स्पॅनिश संघाचा यावेळी मोरोक्कोनं पराभव केला. क्रोएशियानं जपानला तर ब्राझीलनं दक्षिण कोरियाला पराभूत केल्यानं आशियाई राष्ट्रांच्या घोडदौडीला मर्यादा आल्या.
ब्राझील आणि पोर्तुगालचे पराभव हे उपांत्यपूर्व फेरीचे ठळक वैशिष्ट्य ठरले. क्रोएशियानं पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्राझीलच्या वाटचालीपुढे पूर्णविराम दिला, तर मोरोक्कोनं दुभंगलेल्या पोर्तुगालची वाटचाल खंडित केली. अर्जेंटिनानंही नेदरलँड्सवर थरारक विजयाची नोंद केली.
दोन्ही उपांत्य लढती तशा एकतर्फी झाल्या. अर्जेंटिनानं क्रोएशियाला पराभूत करीत जगज्जेतेपदाचा नारा बुलंद केला, तर फ्रान्सनं मोरोक्कोला हरवून सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरी गाठली. निवृत्तीच्या उंबरठ्यावरील लुका मॉ ड्रिचचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न पुन्हा अधुरं राहिलं. मागील विश्वचषकात क्रोएशिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं, तर यावेळी तिसरा क्रमांक पदरी पडला.

किमयागार मेसी

अर्जेंटिनाच्या विश्वविजेतेपदाचा मेसी हा खर्‍या अर्थानं शिल्पकार ठरला. महाअंतिम लढत अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यापेक्षा मेसी विरुद्ध एम्बापे यांच्यातील कौशल्याचा कस लागणारी ठरली. ८०व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिनाच्या यशावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. पण एम्बापेनं संघाला बरोबरी साधून दिली. अतिरिक्त वेळेत पुन्हा मेसीनं अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली, तर एम्बापेनं फ्रान्सला बरोबरी साधून दिली. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटपर्यंत लांबलेला हा अखेरचा अंक आणि या महानाट्याचा उत्कंठावर्धक शेवट फुटबॉलरसिकांची दाद मिळवणारा ठरला. अर्जेंटिनाचं हे यश ३६ वर्षांनी मिळवलेलं, तसंच दक्षिण अमेरिका खंडात दोन दशकांनंतरचं. याशिवाय सार्वकालिन सर्वोत्तम (गोट) फुटबॉलपटू म्हणून मेसीला मोठेपण मिळवून देणारं ठरलं.

मोरोक्को : नवी आफ्रिकन महासत्ता

मोरोक्कोनं आपल्या शैलीदार खेळाच्या बळावर यंदाच्या विश्वचषकावर छाप पाडली. विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारा हा पहिला आफ्रिकन आणि अरब देश ठरला. अन्यथा विश्वचषकावर प्रमुख मक्तेदारी ही युरोपियन आणि दक्षिण अमेरिकेच्या देशांचीच दिसून यायची. या वाटचालीत मोरोक्कोनं बेल्जियम, स्पेन आणि पोर्तुगाल अशा युरोपमधील तीन महासत्तांना हादरे दिले. उपांत्य फेरीपर्यंत या संघाविरुद्ध प्रतिस्पर्धी संघांना एकही गोल नोंदवता आला नाही, हे त्यांच्या यशाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरलं.

रोनाल्डो अपयशी

गटसाखळीच्या पहिल्याच लढतीत घानाविरुद्ध ख्रिस्तियानो रोनाल्डोनं पेनल्टीद्वारे गोल नोंदवला, तेव्हा पाच विश्वचषकांमध्ये (२००६, २०१०, २०१४, २०१८, २०२२) गोल साकारणारा तो पहिला फुटबॉलपटू ठरला. पण वैयक्तिक विक्रमाच्या हिंदोळ्यावर स्वार झालेल्या रोनाल्डोचा अहंकार पोर्तुगालसाठी हानीकारक ठरला. प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांनी स्वार्थी रोनाल्डोला वेसण घालण्याचा विडा उचलला. उपउपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडविरुद्ध आणि उपांत्यपूर्व फेरीत मारोक्कोविरुद्ध रोनाल्डोला बाकावर बसवून दुसर्‍या सत्रात मैदानावर आणण्याची चाल सांतोस यांनी रचली. पण जशी पोर्तुगालची कामगिरी मर्यादित राहिली, तसंच रोनाल्डोवर विश्वविजेतेपदाच्या अधुरेपणानं शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे शोकाकुल अवस्थेत रोनाल्डोला मैदान सोडावं लागलं. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक ११८ गोल खात्यावर असणार्‍या रोनाल्डोला विश्वचषकाच्या बाद फेरीमधील आठही सामन्यांत गोल नोंदवता आले नाहीत, हा आणखी एक अपयशाचा टिळा त्याच्या माथी लावण्यात आला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत प्रशिक्षक सांतोस यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

नेमार, ब्राझीलची प्रतीक्षा कायम

नेमार हा पेले आणि रोनाल्डोप्रमाणे तीन विश्वचषकांमध्ये गोल करणारा ब्राझीलचा तिसरा खेळाडू ठरला. इतकंच नव्हे, तर त्यानं पेलेच्या ७७ आंतरराष्ट्रीय गोलच्या विक्रमाची बरोबरी साधली. पण हे यश पाच वेळा विश्वविजेत्या ब्राझीलचा क्रोएशियाविरुद्ध पराभव टाळू शकले नाही. पेनल्टी शूटआऊटमध्ये नेमारला संधी मिळण्यापूर्वीच ब्राझीलचा पराभव झाला.

इंग्लंड : तेच शल्य सातव्यांदा

२००६नंतर इंग्लंडचा संघ प्रथमच गटविजेत्याच्या अविर्भावात बाद फेरीसाठी पात्र ठरला. परंतु गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखालील इंग्लंडची मोहीम फ्रान्सनं उपांत्यपूर्व फेरीत स्थगित केली. सामन्याच्या उत्तरार्धात हॅरी केनची पेनल्टीद्वारे गोल करण्याची नामी संधी हुकली नसती, तर हा सामना आणखी रंगतदार ठरला असता. कदाचित निकाल इंग्लंडच्या बाजूनंही लागला असता. विश्वचषकाच्या इतिहासात उपांत्यपूर्व फेरीत सातव्यांदा पराभूत झाल्याचं शल्य इंग्लिश संघ लपवू शकला नाही.

लेवांडोवस्कीची गोलसलामी

सौदी अरेबियाविरुद्धच्या साखळी सामन्यात तारांकित फुटबॉलपटू रोबर्ट लेवांडोवस्कीनं गोल केला, तेव्हा त्याला आपले अश्रू रोखता आले नव्हते. ३४ वर्षीय लेवांडोवस्कीचा हा पाचवा विश्वचषक सामना. परंतु त्याची ‘गोल झोळी’ अद्याप रिकामीच होती. मेक्सिकोविरुद्धच्या साखळीतील सलामीच्या लढतीतही पेनल्टीचं गोलरुपांतर करण्यात त्याला अपयश आलं होतं. उपउपांत्यपूर्व फेरीत लेवांडोवस्कीनं आणखी एक गोल केला. पण फ्रान्सकडून पत्करलेल्या पराभवामुळे पोलंडचं आव्हान संपुष्टात आलं.

विश्वचषकातील तारे

किलियन एम्बापेनं अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवत फ्रान्सच्या जेतेपदासाठी शर्थीनं प्रयत्न केले. त्याआधी पोर्तुगालच्या गोन्झालो रामोसनं स्वित्झर्लंडविरुद्धच्या लढतीत हॅट्ट्रिकची अदाकारी पेश केली. एम्बापेनं (८ गोल) विश्वचषकातील सर्वाधिक गोलसाठीचा ‘गोल्डन बूट’ पुरस्कार पटकावला, तर मेसीनं (७ गोल) स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या ‘गोल्डन बॉल’ पुरस्कारावर नाव कोरलं. अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ ‘गोल्डन ग्लोव्हज’ पुरस्काराचा मानकरी ठरला.

प्रशिक्षकांवर संक्रांत

विश्वचषकातील कामगिरीमुळे प्रशिक्षकांवर मात्र संक्रांत ओढवली आहे. ब्राझीलचे टिटे, स्पेनचे लुइस एन्रिक, पोर्तुगालचे फर्नांडो सांतोस, नेदरलँड्सचे लुइस व्हॅन गॅल, बेल्जियमचे रोबर्टो मार्टिनेझ, मेक्सिकोचे टाटा मार्टिनो, दक्षिण कोरियाचे पावलो बेंटो आणि घानाच्या ओट्टो अड्डो यांना विश्वचषकानंतर प्रशिक्षकपद सोडावे लागले.

[email protected]

Previous Post

पारंपारिक बेकरीत बनलेला फ्रेश केक

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Related Posts

घडामोडी

गुलाबी पाहुण्यांची गर्दी; पण स्वागतास कुणीच नाही!

May 15, 2025
घडामोडी

मुळ्येकाकांचा माझा पुरस्कार!

April 4, 2025
घडामोडी

मराठी चित्रपटांना आता एक पडदा थिएटर्सचा आधार?

March 20, 2025
घडामोडी

सेन्सेक्सची गटांगळी, अर्थव्यवस्थेची डुबकी

March 7, 2025
Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.