□ महाराष्ट्रात गद्दार, गँगस्टर, बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे सरकार – आदित्य ठाकरे यांची टीका.
■ एवढा पाण्यासारखा पैसा वाहवून लोकप्रिय सरकार उलथून टाकण्याइतकी ताकद आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा अन्य कोणाची असणार आदित्यजी!
□ मिंधे गटाची धडधड वाढली; ‘विसर्जना’ची तयारी सुरू
■ हा मजकूर छापून येण्याच्या आधीच ती शुभवार्ता सगळ्यांच्या कानी पडो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना! हे कायमचे आपापल्या ‘गावाला’ गेल्याशिवाय महाराष्ट्राला चैन पडणार नाही.
□ महाराष्ट्रात सात महिन्यांत दीड हजार शेतकर्यांच्या आत्महत्या.
■ नीतीमान, गतिमान, वेगवान सरकार त्यांच्या दारी जाऊन काय अंतिम कार्यांना हजेरी लावतंय की काय?
□ मिंधे सरकारने बेरोजगारांकडून उकळले २६६ कोटी.
■ नोकरी देण्याच्या नावाखाली लाखो मुलांकडून फिया उकळायच्या आणि ढिम्म बसून राहायचं… गेले त्या बिचार्यांचे पैसे पाण्यात. जॉब रॅकेट चालवणार्या गुन्हेगारांची मोडस ऑपरंडी आहे ही.
□ मेहुल चोक्सीला फरारी घोषित करण्याचा मार्ग मोकळा.
■ हे असले वरवरचे उद्योग करून दाखवा, नंतर त्याच्यावरच्या नोटिसा मागे घ्या, त्याला शाही आयुष्य जगण्याची मुभा द्या, इकडे बँकेचा एखादा हप्ता थकवणार्याच्या मागे मात्र ससेमिरा लावा!
□ मिंध्यांप्रमाणे सरकारी अधिकार्यांनाही खोक्यांचा हव्यास; ११ महसूल अधिकारी निलंबित.
■ यथा राजा, तथा प्रजा हे राजेशाहीत खरं असेल कदाचित, आताच्या काळात जसे सत्ताधारी, तसे अधिकारी अशी म्हण प्रचलित करायला हवी.
□ मिंधेधार्जिणे ठाणे भाजपाध्यक्ष वाघुलेंना पदावरून हटवा; रोहिदास मुंडे यांच्या मागणीमुळे भाजपातील वाद चव्हाट्यावर.
■ और लडो, खूब लडो… खतम कर दो एकदूसरे को!
□ पावणेतीन वर्षांत रायगडातील २५ अट्टल गुन्हेगार तडीपार.
■ मोबाइल फोनच्या जमान्यात तडीपारीला काही अर्थ आहे का?
□ आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मदतीतही मिंधे सरकार उदासीन
■ मदत करण्याची दानत असती, तर मुळात आत्महत्या करण्याची पाळी आली असती का शेतकर्यांवर?
□ भाजप खासदाराची मुस्लिम खासदाराला लोकसभेत गलिच्छ शिवीगाळ.
■ डुकरांना घाणीत लोळायची आवड असते. त्यांना तुम्ही कितीही चांगल्या ठिकाणी, उच्च पदांवर न्या, ती घाण करतातच. त्याशिवाय लोळण्याचा आनंद कसा मिळणार?
□ नार्वेकर ‘दिल्ली’चा सल्ला घेऊन परतले, पुढील आठवड्यात सुनावणी.
■ लाळघोट्या काळकाढूपणाचं जिवंत प्रतीक म्हणून गिनीज बुकात नाव जाणार बहुतेक यांचं.
□ हिंदुस्थानी राजनैतिक अधिकार्यांची कॅनडाकडून हेरगिरी.
■ सगळ्याच देशांमधल्या राजनैतिक अधिकार्यांवर त्या त्या देशांची नजर असतेच. कॅनडाने शीख फुटीरवाद्यांवर पण अशीच नजर ठेवली असती तर बरं झालं असतं.
□ देशात २५ वर्षांखालील ४२ टक्के तरुण बेरोजगार.
■ आता निवडणुकीआधी दंगली घडवण्यासाठी कच्चा माल तयार आहे… ज्वलनक्षम मनांमध्ये विद्वेषाचं इंधन भरून ठिकठिकाणच्या गुरुजींच्या माध्यमातून फक्त पेटत्या काड्या टाकायच्या… सत्तेची पोळी भाजलीच म्हणून समजा!
□ आयफोनसाठी तब्बल १७ तास रांग.
■ रांगांचं काय कौतुक, लोकांना ‘रांगायला’ सांगितलं तरी ते रांगतील या आयफोनसाठी.
□ महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये अदानीचा शिरकाव.
■ भारत देशाचे अत्रतत्रसर्वत्र असे चराचराला व्यापून उरलेले परमेश्वर आहेत ते, महावितरणचे स्मार्ट मीटर क्या चीज है?
□ खड्ड्यांचे फोटो पाठवा; कोकण भूषण पुरस्कार जिंका – आगळ्या स्पर्धेची एकच चर्चा
■ इतके धो धो फोटो येतील की किलोमीटरवर पुरस्कार द्यायला लागतील.
□ सरकारला प्रत्यक्षात महिला आरक्षण द्यायचेच नाहीये – राहुल गांधी.
■ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे हा, तायांनो, पोटभर जेवा!
□ आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांना आता निर्णय घ्यावाच लागेल; कुणाचीही सुटका नाही – अॅड. अनिल परब.
■ उघड उघड बेकायदा सरकार इतका काळ टिकले आणि त्यांनी राज्याची आणखी वाट लावून ठेवली, हे सगळ्यात धक्कादायक आहे.
□ ओबीसीच्या बैठकीत विरोधकांना का डावलले? – अनिल देशमुख यांचा मिंधे सरकारला सवाल.
■ जिथे कुठे श्रेय मिळण्याचा प्रश्न येतो, तिथे ते सत्ताधार्यांनीच लाटायचे, हा दिल्लीतून शिकवला जाणारा धडा आहे. तोच गिरवतायत इथेही.
□ मोदींना अशुभ म्हणणार्या कुमारस्वामींचा ‘जेडीएस’ पक्ष एनडीएमध्ये सामील.
■ अशुभ ते शुभ करून घेतो सत्तेचा हव्यास!!