बंडखोर
कशासाठी ‘इडी’साठी
कुठे आमची धाव
सेनेचे तर पांग फेडले
गद्दार आमचे नाव
पोट फुटेस्तोवर खाऊन
नमकहराम झालो
कमळाच्या चिखल तळ्यात
बुडेपर्यंत न्हालो
अडीच वर्षे नाही दिसले
कसे झालो आंधळे
भाजपाने झक्कू लावताच
धावलो आम्ही पांगळे
—– —– —–
अमित शहा
या बंड्यांनो या रे या
पिकनिक करून सारे या
मौज करा तुम्ही मजा मजा
नाहीतर इडीची मिळेल सजा
जे जे हवे ते सर्व मिळेल
ईडीची पिडा नक्की टळेल
भ्रष्ट जरी तुम्हा म्हटले कुणी
तुमची गाडी फास्ट पळेल
सेना संपविणे तुमच्या हाती
तोडून टाका जुनी ती नाती
टेन्शन सारे जाईल पळून
जरी खाल्ली कचरा-माती
—– —– —–
चंद्रकांतदादा पाटील
मनावर तर एवढा मोठा
दगड ठेवून देवेंद्रांनी
चिरडून घेतलं स्वत:ला नि
पक्षालाही त्या दगडांनी
भीती वाटते दगडाची त्या
जर त्याने दिला धक्का
पक्षातील तर विरोधक ते
मारतील जोरजोरात बुक्का
मी एवढा प्रदेशाध्यक्ष
मला कुणीच विचारले नाही
केले असते डेप्युटी सी.एम.
मी नसते म्हटले ‘नाही’
—– —– —–
रामदास कदम
भरभरून दिले मला
तरीही झालो बेईमान
मला आणखी हवे होते
कसा मी साहू हा अपमान
त्यांनी मला ऑफर दिली
मीही गेलो झुंडीबरोबर
खाल्ल्या मिठाला जागतो कोण
आवडले ते चिखल सरोवर
तीन वेळा मंत्री आणि
दोन वेळा आमदार पद
तरीही सगळे कमीच होते
बरे होते ते ड्रायव्हर पद
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
आता नको निवडणुका
सगळे मुसळ केरात जाईल
बघत रहा स्वभाव माझा
अपमानाचा बदला घेईल
एक गोष्ट सोडली तर
सगळे झाले मनासारखे
जोडी आमची अगदी विजोड
महत्त्वाकांक्षेला झालो पारखे
आयोगाचा निकाल जेवढा
जाईल तेवढा जाऊं दे पुढे
काय होणार ते दिसते आहे
धावतील तोवर लंगडे घोडे