□ दादागिरी बंद करा! मोदी सरकारच्या दडपशाहीविरुद्ध ‘इंडिया’चा धडक मोर्चा
■ नुसते मोर्चे काढून परिणाम होण्याइतके हे संवेदनशील नाहीत. गेंड्याची कातडी आहे. ती थरथरवायची तर अधिक ऊग्र आंदोलन हवं… तेही जनतेचं.
□ महाराष्ट्रात कमळाबाई एकटीच लढणार.
■ …आणि एकटीच पडणार! फ्यॅ फ्यॅ फ्यॅ!!!
□ देशावर तब्बल २०५ लाख कोटींचे कर्ज.
■ शेठ कधीतरी एकदमच काढतील विकायला! घ्यायला मालक बसलेले आहेतच.
□ मिंधे सरकारचे तळीरामांना ‘चियर्स’.
■ उगाच फुकाच्या संस्कृतिरक्षणाच्या गप्पा छाटल्या नसत्या तर यात काही गैर नव्हतं… पण, दाखवायचे दात वेगळे असले की खायचे दात दिसल्यावर हसू येतंच…
□ तारीख पे तारीख चालणार नाही; राखून ठेवलेला निकाल ४५ दिवसांच्या आत द्यावा लागणार.
■ हाच नियम शिवसेनेच्या फुटीच्या तथाकथित चौकशीला लागला असता, तर राज्याचं केवढं नुकसान टळलं असतं.
□ मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुलुंड-ठाणे दरम्यानचे नवे रेल्वे स्थानक लटकले.
■ यांच्या कर्तबगारीमुळे काय पूर्णत्वाला गेलं ते सांगा… ती बातमी असेल!
□ झोपडपट्टी स्वच्छतेसाठी कंत्राटदार नेमल्याने गरीबांचा रोजगार जाणार.
■ देश गरिबीमुक्त करायचा म्हणजे तो गरीबमुक्त करायचा, असं धोरण असलेलं हे भांडवलशहांच्या खिशातलं सरकार आहे. ते वेगळं काय करणार?
□ येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांना जामीन; ईडीला मोठा दणका.
■ ईडी माणूस असती आणि तिला थोडी लाज असती तर चाळणीत पाणी घेऊन तिने जीव दिला असता.
□ नवी मुंबईत मिंधेंचा फोडाफोडीचा बार फुसका.
■ जे फुटतायत, त्यांचीही मजबुरी आहे. ती संपली की यांना यांची खरी योग्यता कळेल.
□ मिंध्यांनी अयोध्येकडे पाठवलेल्या कार्यकर्त्यांच्या फलकांवर रामाचा पत्ताच नाही, फक्त शोबाजी.
■ गांधीजींच्या नावाने आयोजित कार्यक्रमात गांधीजींचा फोटो न लावता आपलेच फोटो लावणारे सर्वोच्च नेते त्यांना लाभले आहेत… त्यांचे भक्त छोटा राम मोदींचं बोट पकडून मंदिराकडे चाललाय, असं थेट प्रभू श्रीरामापेक्षा एक फुटकळ मानव मोठा असल्याचं चित्र दाखवतात, त्यापुढे हे काहीच नाही.
□ भाजपच्या रामशेठ ठाकुरांच्या ‘रामबाग’वर सिडकोचा हातोडा पडणार.
■ पडेल तेव्हा पाहू. नेमकं कुठे सेटिंग चुकलं ते तेव्हाच कळेल.
□ टेम्पोचालक, दोन बंगल्यांचा मालक ते हेलिपॅडच्या प्रवासाचे गुपित शिंदेंनी सांगावे – शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांचे आव्हान.
■ ठाण्यातल्या बच्च्याबच्च्याला ते माहिती आहे घाडीगावकर… पण, उघड कोणी बोलणार नाही…
□ तीन खासदारांना निलंबित करून लोकसभेचे कामकाज एक दिवस आधीच गुंडाळले.
■ त्या लोकसभेत लोकशाहीचं थडगं बांधा आणि थेट हुकूमशाही लादण्याचं डेअरिंग तरी करा… म्हणजे समोरासमोर लढता तरी येईल लोकशाहीवाद्यांना.
□ धूर पाहून भाजप खासदारांची हवा निघाली – राहुल गांधी.
■ आपल्याच देशातल्या आंदोलक शेतकर्यांना भेटण्याऐवजी २० मिनिटं गाडीत बसून काढून ‘जीव कसाबसा वाचला’ म्हणत पळ काढणार्या नेत्याचे अनुयायी… पळपुटेपणाची परंपरा पहिल्यापासूनच आहे त्यांच्यात.
□ २६३ कोटींचा ‘स्ट्रीट फर्निचर’ घोटाळा लोकायुक्तांच्या कोर्टात; मिंधे सरकारला दणका.
■ रोज इकडून दणका, तिकडून चपराक… काय अवस्था करून घेतली स्वाभिमानाला तिलांजली देऊन!
□ महाडमध्ये गोगावलेंच्या गुंडांची मस्ती शिवसैनिकांनी उतरवली.
■ शिवसेनाप्रमुखांविषयी गैर उद्गार काढून नॅपकिन काकांनी आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली आहे.
□ सरकारकडून शेतकरी, मध्यमवर्गीय, तरूण व उपेक्षितांची फसवणूक; हिवाळी अधिवेशनात पदरी निराशा.
■ संत्रा बर्फी, फार्म हाऊसेसवरच्या पार्ट्या हे सगळं नीट झालं ना… मग यशस्वी झालं अधिवेशन!
□ मंत्री अब्दुल सत्तारांना मासळी बाजाराची स्थगिती भोवणार.
■ …म्हणजे त्यांना आदेश देणारा नेता सहीसलामत सुटणार!
□ पनवेलच्या गाढी नदीचे पात्र बिल्डरने गिळले.
■ नदी, समुद्र, गटारं, नाले, मैदानं… सगळं खातात तरी यांना अपचन कसं होत नाही?…
□ संकल्पयात्रेचा रथ नको, आधी पाण्याचा टँकर द्या – शहापूरच्या ग्रामस्थांनी सरकारची रथयात्रा रोखली.
■ प्रचारयात्राच आहेत त्या… सरकारी खर्चाने काढलेल्या. त्यांच्याविरोधात विरोधकांनी कोर्टात जायला पाहिजे.