• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

चला, दु:खमुक्त होऊया!

- राजेश कोळंबकर (टेन्शन काय को लेने का?)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 27, 2023
in भाष्य
0

समर्थांनी म्हटलं आहे की जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधूनी पाहे… याचा अर्थ काय, तर समर्थांना म्हणायचं आहे, अहो जगात कोण सुखी आहे? प्रत्येकाला काही न काही दुःख आहेच.
पण मंडळी, जगात जर कुणीच सुखी नसेल, सगळेच लोक दु:खी असतील तर या जगण्याला काय अर्थ आहे, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण खरंच जगात सगळेच लोक दु:खी असतील का, असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो. आमच्या शेजारच्या सुरेंद्रला तर तो पडतो. तो म्हणतो, गोरगरीब माणसांचं ठीक आहे हो, ते दु:खात नसतील तरच नवल. पण श्रीमंत माणसंही दु:खात असतील? सुरेंद्रला हे पटत नाही. तो म्हणतो. रग्गड पैसा असल्यावर कसलं आलंय दु:ख? पैसा असला की पावलोपावली सुख मिळवता येईल. हवं तसं जगता येईल. सुरेंद्रचं हे मत असलं तरी अनेक प्रसिद्ध माणसं, श्रीमंत माणसं, उद्योगपती, नटनट्या निराशेच्या गर्तेत असल्याचं आपण पाहिलं आहे. त्यांची शोकांतिका झाल्याचं आपल्याला ठाऊक आहे. काही तर व्यसनांच्या आहारी गेले, त्यांची धूळधाण झाली. करियर संपली. काहींनी आपलं जीवनही संपवलं. तेव्हा श्रीमंतांना दु:ख नसतील असं नाही. त्यांची दुःख गरीब माणसांच्या दु:खापेक्षा वेगळी असणार. पण त्यांनाही काहीतरी दु:ख हे असणारच. कधी मोठं असणार. कधी छोटं असणार.
तर एकूण, ‘जगी सर्व सुखी कुणीच नाही’ हे खरं आहे, असं आपल्याला दिसतं. पण मग प्रश्न पडतो हे असं का आहे? माणसाने दु:ख भोगतच का जगायचं? माणसाला दु:खमुक्त जगताच येणार नाही का? अशाने माणसामध्ये जगण्याचा उत्साह कसा येईल? माणूस सतत निराश, उदास नाही का राहणार?
आमच्या ऑफिसमधला नवजीत मागे एकदा असाच निराश झाला होता. जगण्याचा उत्साह त्याच्यात उरला नव्हता. त्याला मित्रांनी म्हटलं की अरे वेड्या, असं करू नकोस! निराश काय होतोस? आनंदाने जीवन जग. हे जीवन किती सुंदर आहे…
…पण जीवन सुंदर आहे असं कुणी सांगितलं की माणूस लगेच निराशा झटकून टाकेल काय? निराश माणूस ‘जीवन सुंदर आहे’ या वाक्यावर विश्वास ठेवेल काय? त्याचा किंवा आपल्या सार्‍यांचा अनुभव काय आहे? आपल्याला आपलं आणि आजूबाजूच्या माणसांचं जीवन सुंदर दिसतं काय? आपलं स्वत:चं जीवन सुंदर दिसत असण्याची शक्यता तशी कमी आहे. पण आपल्या काही मित्रांचं, नातेवाईकांचं, शेजार्‍यांचं जीवन सुंदर आहे, असं आपल्याला दिसत असेल. पण तसं दिसत असलं तरी या मंडळींच्या बाबतीतही दुरून डोंगर साजरे असं तर नसेल ना, असा आपला संशय असू शकतो. हा संशय खरा असण्याची फार मोठी शक्यता असते. दिसतं तसं नसतं हेही आपल्याला माहीत आहेच.
मंडळी, आपल्याला नवे लोक भेटतात. नव्या ओळखी होतात. त्यांच्याशी गप्पाटप्पा सुरू होतात. हळुहळू माणसं मोकळी होतात अन् खाजगी गोष्टी सांगायला लागतात, तेव्हा कळतं की एरवी हसतमुख असलेल्या या व्यक्तीने किती भोगलं आहे, भोगते आहे, सोसते आहे. या अनुभवातून मग हसतमुख माणसाबद्दल कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो. ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो?’ संत कबीर म्हणतात, ‘दुनिया में कितना गम है । मेरा गम कितना कम है । औरों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया ।’
संत कबीर म्हणतात ते खरं आहे. जगात कित्येक लोक जे दु:ख सोसत आहेत, दु:खाचा सामना करत आहेत, त्यापुढे आपलं दु:ख काहीच नाहीय हे आपण लक्षात घेतलं, तर इतर लोकांच्या दु:खापुढचं, त्यामानाने ‘पिटुकलं’ असलेलं आपलं दु:ख आपण नक्कीच विसरू शकू. निदान आपल्या दु:खाचं आपल्याला फार वाटणार नाही. वाटता कामा नये. कारण तसं वाटून दु:ख हलकं होत नसतं. आपण आपलं दु:ख जोजवत बसायचं नसतं.
सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे असं म्हटलं जातं. पण आपण सुख जवाएवढे (जवसाएवढे) आणि दु:ख डोंगराएवढे पाहण्याऐवजी दु:ख जवाएवढे आणि सुख डोंगराएवढे पाहिले तर? जीवनात काही प्रत्येक क्षणी आपल्यावर दु:खाचा डोंगर कोसळत असतो असं नाही. शेवटी आपण आपल्या सुखदु:खाकडे कसं बघतो, हेच महत्वाचं आहे. अगदी आपलं दु:ख हे डोंगराएवढं आहे असं म्हटलं क्षणभर तरी आपण त्याखाली चिरडून जायचं की तो डोंगर करंगळीवर पेलायचा वा तळहातावर ठेवून उड्डाण करायचं हे आपल्याच ‘हाती’ आहे ना?
मंडळी, दु:खात असलेल्या माणसाला आपण सारे नेहमी दु:ख विसरून जगायचा सल्ला देतो. पण आपण स्वत: मात्र तसं वागत नाही. आपण मात्र आपलं दु:ख कुरवाळत राहतो. अहो, प्रत्येक माणसाच्या जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही असतात. आपण या दोन्हीकडे निरपेक्ष भावनेने पाहू शकलो तर नीट जीवन जगू शकू. जीवनात सुखद काळ, सुखद गोष्टी येतात तेव्हा हे सुखद आहे हे अनुभवायचं आणि पुढे जायचं. जीवनात जेव्हा दु:खद काळ, दु:खद गोष्टी येतील, तेव्हा हे दुःखद आहे याचा अनुभव घ्यायचा आणि पुढे जायचं. सुखात अडकून पडायचं नाही अन दु:खाने खचून जायचं नाही. सुख किंवा दु:ख काहीच कायम टिकणार नाही. सुख आज आहे, उद्या नसेल. दु:ख उद्या आहे, परवा नसेल. दु:ख करत बसण्याने कधीच, काहीच फायदा होत नसतो. प्रत्येक सुखात काही घातक गोष्टी असू शकतात आणि प्रत्येक दु:खात काही चांगल्या गोष्टी असू शकतात. वाईटातून चांगलं ही एक म्हण आहेच की.
एकूण सुख आणि दु:ख म्हणजे तरी काय? तर मन स्वीकारतं ते सुख आणि मन जे स्वीकारायला नकार देत ते दु:ख. आपल्याला बाबा, बुवा मोटिवेशन गुरू सारेच ‘जीवन सुंदर आहे’ असं सांगतात तेव्हा आपल्या मनात येतं ‘तुमचं असेल, आमचं नाहीय’. जीवन सुंदर आहे हे आपल्याला पटत नाही.
अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धाने स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की ‘जीवन हे दु:खमय आहे’. बुद्धाने जी चार आर्य सत्ये सांगितली, त्यातलं पहिलं आर्य सत्य हे आहे की जीवन दु:खमय आहे. जीवन सुंदर आहे, जीवन छान आहे हा तथाकथित विचार खोडून काढणारं बुद्धाचं विधान आहे की जीवन दु:खमय आहे. बुद्ध आपल्यापासून हे कटू सत्य लपवत नाही. बुद्ध स्पष्टपणे सांगून टाकतो की जीवन दु:खमय आहे. पण जीवन दु:खमय आहे एवढं सांगून बुद्ध आपल्याला दु:खाच्या गर्तेत टाकून निघून जात नाही. बुद्ध दुसरं आर्यसत्य सांगतो की दु:खाला कारण आहे. दु:ख विनाकारण नाही. दु:ख उगीचच नाहीय. ते कुठून तरी, कशातून तरी आलंय. पण ते कुठून आलं? कशातून आलं? बुद्ध याचंही उत्तर देतो. बुद्ध तिसरं आर्य सत्य सांगतो. दु:खाला कारण आहे तृष्णा. तृष्णा म्हणजे तहान. तृष्णा (तहान) हा शब्द प्रतीकात्मक आहे. तहान, भूक, शरीराची मनाची…
माणसाला जगण्यासाठी अन्नपाणी ग्रहण करावंच लागतं. तहान, भूक ही गोष्ट नैसर्गिकच आहे. ती असणारच. पण तिने मर्यादा ओलांडली की ती दु:ख देते. ती हाव, लालसा, वखवख होते… म्हणून बुद्धाने सांगितलेलं चौथं आर्य सत्य महत्वाचं आहे. बुद्ध सांगतो, तृष्णा नियंत्रित करून दु:खमुक्त जगता येतं. तेव्हा आपण आपलं दु:ख कुरवाळत न बसता, आपल्या दु:खाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून आनंदाने जगायला हवं.

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

आम्हाला अजून तरूण ठेवणारा… गारवा!

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post
आम्हाला अजून तरूण ठेवणारा… गारवा!

आम्हाला अजून तरूण ठेवणारा... गारवा!

महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला नको नसेल तर...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.