• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

मराठी साहित्य संमेलनाची मंगळ-वारी!

- ज्ञानेश सोनार (इतिहास्य)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 27, 2023
in भाष्य
0

कालपरवाच भारताने चांद्रयान चंद्रावर पाठविले. एसटी उशिरा आली किंवा रेल्वे लेट झाली तर आपली अस्वस्थता शिगेला पोहोचते. इथे जगभरातील पैसेवाले चंद्रावर वा मंगळावर जायला उत्सुक आहेत. फक्त या यानांत लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा अंतर्भाव व्हायला हवाय. या अनेक उत्सुक लोकांमध्ये अर्थातच मराठी साहित्य संमेलनाची मंडळी आहेतच. परंपरेने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी होतेच. नंतर नंतर जागतिक मराठी साहित्य संमेलनही होऊ लागले. हा सगळा खेळ अर्थातच सरकारच्या मदतीवर, हौशी देणगीदारांच्या, पालकमंत्र्यांच्या जिवावर चालला आहे. कोणतेही साहित्यिक पदरमोड करणे तर दूरच, उलट अहेर, विहिणी-विहिणींतील रुसव्या-फुगव्याप्रमाणे देणे घेणे, प्रवासभाडे, मानधन, राहण्याची फाइव्ह स्टार सोय, स्टेजवर अग्रस्थान, अशासाठी गेली कित्येक वर्ष सातत्याने हटून बसत आलेत. त्यात अनेक वस्ताद लेखक गुणवत्तेपेक्षा फिल्डिंग लावण्यात अत्यंत तरबेज असल्याने त्यांचा उदो उदो होत आला आहे, न मागता काहीच मिळत नाही हे त्यांना ठाऊक आहे; त्यामुळ अनेक ज्ञानवृद्ध-तपोवृद्ध लेखक संमेलनांपासून दूर अंतरावर राहणेच पसंत करतात. श्री. ना. पेंडसे यांच्यासारखे.
सुदैवाने २००१ सालाआधी अनेक यथार्थ साहित्यिकांना अध्यक्षपदाचा मान मिळालेला आहे. सर्वश्री वि. स. खांडेकर, पु. भा. भावे, वि. वा. शिरवाडकर, इंदिरा संत, शांताबाई शेळके, दुर्गा भागवत, वसंत कानेटकर, ब. मो. पुरंदरे, शिवाजीराव भोसले, रणजीत देसाई आदी. मला आठवतं त्याप्रमाणे १९६० सालापासून साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, संयोजक समितीतील धेंडे, नाराज गट, उपेक्षित गट दर वर्षी भांडत आलेत. सुदैवाने त्यावेळेला आजच्यासारख्या कळलाव्या मीडिया नव्हता. आता तो कार्यरत झालेला आहेच. चादरीला एवढुसे भोक पडले तर त्याची मच्छरदाणी करण्याची ताकद या मंडळींमध्ये आहे. साहित्य संमेलन म्हटले की हौसे, नवसे, गवसे मंडळीची गर्दी प्रकर्षाने जाणवते.
हौशे ही जमात फक्त गर्दी करण्यासाठी येते. ते कधीच अध्यक्षाचे भाषण, परिसंवाद, शे-दीडशे कविता वाचणार्‍या कवींच्या नादी लागत नाहीत. पुस्तकांच्या स्टॉलपासून ठरवून दूर राहतात. डिस्काउंटमधलं बर्‍यापैकी जाड जोड पुस्तक घेतलं तर घेतलं, नाही तर नाही. फुकटातले चहाचे स्टॉल्स, जेवण, नाश्ता, आठवणीने अटेंड करतात. सुंदर दिसणार्‍या कवी व लेखक पोरींना गाठून ओळख करून घेतात. आताशा सेल्फी काढून घेतात. गवशे जमातीत नवे लेखक कवी त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंबरी, कवितासंग्रह यांच्या प्रकाशनासाठी प्रकाशकाचा शोध घेत फिरत असतात. काहीजण कविता संमेलनात एखादी कविता वाचून दाखवण्यासाठी वा नामवंत लेखकांबरोबर फोटो काढण्यासाठी वा स्वतःच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहून घेण्यासाठी नामवंत लेखकाला धुंडाळत असतात. संमेलनाला आलेल्याची खूण म्हणजे त्याची शबनम झोळी; त्यातलं कंटेंट नेमकं काय असतं हे कधीच कळत नाही. न धुतलेली जीन्स व खादीचा कुडता, पिंजारलेले केस व बेवारस दाढीचे जंजाळ… नवशे जमात थोडी वेगळी. लेखक व कवी म्हणून थोडंफार नाव झालेली मंडळी मुख्य स्टेजवर जायची संधी शोधत असतात. नामवंतांना मिळणार्‍या फॅसिलिटीज मिळविण्यासाठी पराकाष्ठा करत असतात… उदा. फाईव्ह स्टार राहायची सोय, नामवंतांच्या पंक्तीतले जेवण, यासाठी ते बरीच वर्षे नवस करत असतात. जमलेल्या गर्दीपेक्षा स्टॉल्सवरची दुप्पट पुस्तके नागड्या उघड्या पोरांसारखी मांडलेल्या टेबलांवर सुस्त पडलेली असतात. चार दोन मोठे प्रकाशक आलेले असतात. जे ना लेखकांत मोडतात ना वाचकांच्या गर्दीत. पाठीवर हात दुमडून दुरून ते कोणत्या स्टॉलवर जास्त गर्दी आहे ते न्याहाळत असतात आणि पुढच्या संमेलनाला देखण्या तरुणी असलेल्या स्टॉलवर पुस्तके विकायला ठेवायचे नक्की करतात.
हल्ली वेगवेगळ्या तंबूमध्ये परिसंवाद चाललेले असतात. मुख्य स्टेजवर संमेलनाध्यक्ष, पाच-पाच-सात जीवनगौरव प्राप्त थरथरते बुजुर्ग लेखक, महामंडळाचे ‘अहम ब्रह्मास्मि’ विद्वान अध्यक्ष, पालकमंत्री, कमिशनर, कलेक्टर आदी… अध्यक्षीय भाषणात बहुदा मराठी वाचवायला पाहिजे, राजकारण्यांची ढवळाढवळ नको, सरकारने भरपूर फंड्स द्यायला हवेत, वाचन संस्कृती वाढायला पाहिजे, साहित्यातले हीन,’ अश्लीलता संपायला हवी, हे मुद्दे आलटून पालटून असतातच. माझं लिखाण वेगळं कसं आहे, हे अध्यक्ष आठवणीने सांगतात. अध्यक्षीय भाषण बहुदा किचकट, ओठांवर चुकूनही स्मितरेषा उमटू न देणारे आणि बरेचदा नीरस असल्याने इतरजण चुळबुळ करत… पुढचा अध्यक्ष कोण… मी आता काय बोलू… मी पालकमंत्री राहिलो की अशी ५६ संमेलन करीन… गौतमी पाटीलसारखी नर्तिका नाचवीन, अशी मंत्रीजी मनोमन भाषणाची तयारी करत असतात. पेंडाल भव्य दिव्य, लाखभर लोक बसतील इतका मोठा असतो. पण प्रत्यक्षात दोन चारशे माणसं आणि हजारएक रिकाम्या खुर्च्या पेंगत असतात. त्यातल्या काही जेवणावळीसाठी पळविल्या जातात. त्याचवेळी एखाद्या दुर्लक्षित साहित्यिक गटाकडून साहित्य संमेलन वा अध्यक्ष वा समितीचा निषेध करणारी परिपत्रके वाटली जात असतात. एवढ्या आठ-दहा वर्षांत मीडियाची टोळधाडही संमेलनभर घोंगावत असते. साहित्याला पोषक अशा बातम्या न देता कुचकट बातम्या देत राहतात. एखाद्या दुर्लक्षित पण वजनदार लेखकाला प्रश्न विचारत असतात, तुम्हाला कधी अध्यक्षपद? तुम्हालाच यावेळी मिळायला हवं होतं, अशी चर्चा आहे. आजचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचे व्याही आहेत असं समजलं. तसं पाहिलं तर तुमचं साहित्य ज्ञानपीठ मिळण्याइतकं समर्थ आहे, यावर आपलं काय म्हणणं आहे?
मराठीचा झेंडा लावण्यासाठी चंद्रावर वा मंगळावर संमेलनासाठी कुणी स्पॉन्सरर भेटला तर अध्यक्ष म्हणून जाल का? खर्चाचा भार महाराष्ट्र सरकार उचलेल असं वाटतं का? असे असंबंध वा उचकून देणारे प्रश्न विचारण्यात मीडियाचा हात कुणी धरू शकणार नाही. साहित्य संमेलन समिती चंद्रावर वा मंगळावर संमेलन भरवो वा न भरवो, मी मात्र ते भरवून मोकळा झालो. ‘जे न देखे रवी.. वो देखे कवी’ या उक्तीप्रमाणे. माझ्या व्यंगचित्रांतून.
एक आठवण सहज सांगण्यासारखी आहे.
२००५ साली नाशिकला साहित्य संमेलन झाले. संमेलनाची जबाबदारी डॉ. वसंत पवार यांनी घेतली होती. त्यांच्या कॉलेजचे प्रोफेसर्स स्टाफ झटून काम करत होते. साहित्यिकांचे निमंत्रक नामवंत कवी किशोर पाठक हे होते. राजकारण आणि व्यंगचित्रे अशा परिसंवादासाठी मी निमंत्रित होतो. परिसंवादासाठी मुकुंद टाकसाळे, म.टा.च्या नाशिक आवृत्तीचे संपादक शैलेंद्र तनपुरे आणि येवल्याचे व्यंगचित्रकार प्रभाकर झळके असे मिळून आम्ही तो परिसंवाद छान रंगवला. आम्ही निमंत्रित असल्याने मेमेंटो, शाल, श्रीफळ, मानधन अत्यंत सन्मानपूर्वक देण्यात आले. याउलट गंमत पाहा…
छगनराव भुजबळ (पालकमंत्री) यांच्या पुढाकाराने २०२१ साली नाशिकला धुमधडाक्यात साहित्य संमेलन झाले. पाहुण्यांची सरबराई करण्यात भुजबळ साहेबांचा कुणीही धरू शकणार नाही. भुजबळ नॉलेज सिटीच्या विस्तीर्ण प्रांगणात अगदी राजेशाही थाटात संमेलन भरवले होते. आदल्या वर्षी कोरोनाने मोडता घातला होता. त्याआधी विसंवादाचे ढोलताशे बडवण्यात आले होतेच. नामवंत शास्त्रज्ञ जयंत नारळीकर प्रमुख पाहुणे होते. ऐनवेळी ते आलेच नाहीत. विख्यात लेखक विश्वास पाटील यांनी ती धुरा सांभाळली. या निमित्ताने अनेक परिसंवाद छोट्या मोठ्या कॅम्पसमध्ये चालू होते. त्यात नाशिकच्या नामवंत कलावंतांचे चित्रप्रदर्शन ठेवण्यात आले होते. मुख्य संयोजक जयंत जातेगावकर यांनी मला फोन करून म्हटले, आपला सहभाग असावा असे भुजबळ साहेबांनी सुचविले आहे. व्यंगचित्रे ही अधिक वास्तववादी कला आहे असे साहेबांचे मत होतेच, कारण त्यांचे दैवत, शिवसेनाप्रमुख व नात्याने एक कुटुंबीय असे ज्येष्ठ व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे होते. माझे पन्नास वर्षातले काम भुजबळ साहेबांना जवळून माहित आहे. पण याचा काहीही मुलहिजा न ठेवता एका चित्रप्रदर्शन कार्यकर्तीने फोन केला व म्हणाली, ‘संमेलनातील प्रदर्शनासाठी आपले एखादे कार्टून हवे होते.’
‘एखादेच?… भरपूर पेंटिंग्जचे प्रदर्शन भरविणार आहोत ना?’
‘…हो पण ती सर्व पेंटिंग्ज लँडस्केप्स असतील!’
‘इतरांकडून तुम्ही किती घेणार आहात?’
‘नाशकातल्या नामवंतांची प्रत्येकी किमान दहा-बारा असतील?’
‘मग माझी निदान चार-पाच कार्टून तरी हवीत ना… कार्टून हा विषय समजायला तर हवा.. एखाददुसरे चित्र कुठल्या कोपर्‍यात असेल कोणी ढुंकूनही त्याच्याकडे पाहणार नाही…’
बाई मोठी हिंमतीची आहे हे हळूहळू माझ्या लक्षात यायला लागले होते. ती म्हणाली, तरीही एखादे दुसरेच द्या!’ आणि महत्वाचे असे की सभासद मूल्य आपणास ५०० रुपये द्यायचे आहे, म्हणजे चहापाणी नाश्ता यासाठी आपली सोय आपणच करायचीय!
मी म्हटलं, ‘मॅडम, व्हॉट्सअपवर मी उद्या आपणास मेसेज टाकतो!
दुसरे दिवशी तिला मेसेज टाकला, ‘महोदया, आपले निमंत्रण काल ऐकले. अपार आनंद झाला. परमेश्वरकृपेने गेली ५० वर्षे माझे नाव सव्यसाची व्यंगचित्रकार, चित्रकार म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहे. माझी हजारो चित्रे महाराष्ट्रभरातल्या रसिकांनी पाहिलेली आहेत. तुम्ही सोडून… तुमची ऑफर अगदी नवोदित कलावंतालासुद्धा देऊ नका आणि महत्त्वाचे म्हणजे पुन्हा संपर्क करू नका. धन्यवाद!’

Previous Post

करिअरची गवसली वाट

Next Post

गरज आहे जोरदार यशाच्या किकची!

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

गरज आहे जोरदार यशाच्या किकची!

बाळासाहेबांचे फटकारे...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.