• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

आफ्रिकन सुवर्णकन्या!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
March 28, 2025
in खेळियाड
0

राजकीय अस्थैर्य, महागाई अशा अनेक बाबतींत संघर्ष करणार्‍या झिम्बाब्वेची सुवर्णकन्या जलतरणपटू किस्ट्री कॉव्हेंट्रीची नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. हे पद भूषवणारी पहिली महिला आणि पहिली आफ्रिका खंडातील व्यक्ती अशी दुहेरी कामगिरी बजावणार्‍या किस्ट्रीची कारकीर्दसुद्धा खास आहे.
– – –

जागतिक नकाशावरील आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील भागात झिम्बाब्वे हा देश आहे. दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना, मोझाम्बिका आणि झाम्बिया ही त्याची सीमावर्ती राष्ट्रे. हा देश समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्यपूर्ण वन्यजीवन आणि ‘ग्रेट झिम्बाब्वे रुइन्स’सारखी ऐतिहासिक पर्यटन स्थळे यांच्यासाठी ओळखला जातो. झिम्बाब्वेलाही भारताप्रमाणेच ब्रिटिशांच्या वसाहतींविरोधात लढा दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले; पण प्रदीर्घ काळानंतर, १९८०मध्ये. रॉबर्ट मुगाबे हे त्यांचे पहिले राष्ट्राध्यक्ष. १९८० ते २०१७ अशी (३७ वर्षे) दीर्घकाळ त्यांची राजवट टिकली. त्यांच्या जमीन सुधारणा धोरणामुळे शेती व्यवस्थेची अपरिमित हानी झाली. ज्यामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण होऊन महागाई वाढली. त्यानंतरच्या सरकारांना भ्रष्टाचार, निर्बंध आणि राजकीय दडपशाहीचा सामना करावा लागला. २०१७मध्ये मुगाबे यांना पदच्युत करणार्‍या सत्तापालटामुळे आशावाद निर्माण झाला. परंतु प्रशासनापुढील प्रश्न आजही कायम आहेत. त्यामुळे राजकीय अस्थिरता आणि आर्थिक स्थैर्य हे तेथील प्रमुख आव्हान.
क्रिकेटमधील तळागाळातले राष्ट्र अशी भारतीयांना झिम्बाब्वेची ओळख. अँडी व ग्रँट हे फ्लॉवर बंधू, हीथ स्ट्रीक, ब्रँडन टेलर, ततेंद्र तैबू, सिकंदर रझा, अ‍ॅलिस्टर कॅम्पबेल, हॅमिल्टन मसाकाझा, एल्टन शिगुंबुरा, हेन्री ओलंगा, क्रेग एर्विन, सीन विल्यम्स असे काही विचित्र नावांचे, परंतु आपल्याला परिचित क्रिकेटपटू झिम्बाब्वेचेच. १९९९ आणि २००३च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धांमध्ये या देशाने अव्वल सहा (सुपर सिक्स) फेरीत मजल मारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. क्रिकेटच्या पलीकडे ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर या देशाने १९८०मध्ये आपली पहिल्यांदा मोहोर उमटवली, ती महिलांच्या हॉकी स्पर्धेचे कांस्यपदक जिंकून. पण त्यानंतर दोन तपांचा पदक-दुष्काळ संपवला, तो जलतरणपटू किस्ट्री कॉव्हेंट्रीने. झिम्बाब्वेने आजवर कमावलेल्या आठ ऑलिम्पिक पदकांपैकी सात पदके एकट्या किस्ट्रीने जिंकली आहेत, २००४च्या अथेन्स आणि २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये.
दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्य पदक प्राप्त करणारी किस्ट्री ही एक प्रकारे झिम्बाब्वेचे अनमोल क्रीडा वैभव. आफ्रिकेच्या कोणत्याही क्रीडापटूच्या खात्यावर अशी पदकांची पुंजी जमा नाही. २००८मध्ये कमावलेल्या ऑलिम्पिक यशानंतर मुगाबे यांनी ‘सुवर्णकन्या’ असा तिचा गौरव केला. झिम्बाब्वे ऑलिम्पिक समितीचे प्रमुख पॉल शिंगोका हे तिला ‘आमची राष्ट्रीय संपत्ती’ असे संबोधतात.
नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) १०व्या अध्यक्ष म्हणून किस्ट्रीची निवड झाली आहे. जागतिक ऑलिम्पिकचे नियंत्रण करणार्‍या या संघटनेच्या सव्वाशेहून अधिक वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपद मिळवणारी ती पहिली महिलाही आहे आणि पहिली आफ्रिकन व्यक्तीही आहे.
अनेक गोंधळलेली सामाजिक-राजकीय स्थित्यंतरे झिम्बाब्वेमध्ये घडत असताना हरारे येथे किस्ट्रीचा जन्म झाला. किस्ट्रीचे वडील
रॉब कॉव्हेंट्री हे व्यावसायिक, तर आई लिन ही माजी जलतरणपटू. पण पुढे तिने प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. किस्ट्रीच्या मनात जलतरणाचे प्रेम रुजवण्याचे, तसेच शिस्त आणि महत्त्वाकांक्षी स्वप्न देण्याचे श्रेय लिनलाच जाते. बालपणीपासूनच किस्ट्रीमध्ये ऊर्जेचा प्रचंड स्रोत होता. जिज्ञासा, स्पर्धात्मकता आणि दृढनिश्चय ही तिची वैशिष्ट्ये. हरारे स्पोर्ट्स क्लबवर आईकडून जलतरणाचे धडे गिरवणार्‍या किस्ट्रीने किशोरावस्थेत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व करणारी ती एकमेव जलतरणपटू. यावेळी तिची पदकांची झोळी रिती राहिली, पण १७व्या वर्षी मिळालेला हा अनुभव तिच्या पंखांना गगनभरारीचे बळ देणारा ठरला. २००१मध्ये अमेरिकेच्या अलाबामा शहरातील रॉबर्न विद्यापीठाची जलतरण शिष्यवृत्ती तिला मिळाली. येथे प्रशिक्षक डेव्हिड मार्शने किस्ट्रीच्या युवा गुणवत्तेला पैलू पाडून तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने मेहनत घेतली. बॅकस्ट्रोक हे तिचे बलस्थान झाले.
२००४च्या अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये किस्ट्रीने २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण, १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य आणि २०० मीटर मिडलेमध्ये कांस्य अशी तीन पदके जिंकत ऑलिम्पिकच्या नकाशावर झिम्बाब्वेचे नाव अधोरेखित केले. या देशासाठी वैयक्तिक पदक जिंकणारी ती पहिलीच, म्हणूनच प्रेरणादायी. किस्ट्रीने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्येही पदकांची लयलूट कायम राखली आणि चक्क ‘पदक-चौकार’ खेचला. यावेळी २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सोनेरी यश मिळवतानाच २ मिनिटे आणि ०५.२४ सेकंद अशी विश्वविक्रमी वेळसुद्धा नोंदवली. याशिवाय १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, ४०० मीटर आणि २०० मीटर मिडले प्रकारांत रौप्य पदकेसुद्धा तिने कमावली.
मुगाबे यांच्या राजवटीत महागाईशी संघर्ष करणार्‍या झिम्बाब्वेला किस्ट्रीच्या यशामुळे क्षणभंगुर आनंद मिळाला. त्यामुळे स्वाभाविकपणे तिचे अभूतपूर्व असे स्वागत झाले. तिला एक लाख डॉलरचे वैयक्तिक इनाम दिल्यामुळे मुगाबे वादाच्या भोवर्‍यात सापडले. परंतु, त्यानंतर किस्ट्रीचा ऑलिम्पिक प्रवास सुरू राहिला. २०१२च्या लंडन आणि २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला पदक मिळवण्यात अपयश आले. परिणामी पाच ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणार्‍या किस्ट्रीने निवृत्ती पत्करली; पण तोवर क्रीडाक्षेत्रात तिने आपली महानता सिद्ध केली होती. त्याआधीच प्रशासक म्हणून तिने कारकीर्द सुरू केली होती. २०१२मध्ये ‘आयओसी’च्या क्रीडापटूंच्या आयोगावर तिची नियुक्ती झाली, तर २०१८मध्ये तिच्याकडे या आयोगाचे प्रमुखपद देण्यात आले. त्यामुळेच २०२३ला ‘आयओसी’च्या कार्यकारिणी मंडळावरही तिला स्थान मिळाले. ऑबर्न विद्यापीठात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवस्थापनातील पदवी संपादन करणार्‍या किस्ट्रीमधील कौशल्याला या नव्या भूमिकेत वाटचाल करताना वाव मिळाला.
दरम्यानच्या काळात, २०१७मध्ये ईमर्सन मांगवा हे झिम्बाब्वेच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाले. त्यांच्या विनंतीला मान देऊन किस्ट्रीने पुढच्याच वर्षी केंद्रीय युवा, क्रीडा, कला आणि मनोरंजन खात्याचे केंद्रीय मंत्रीपद स्वीकारले. तिचा हा कार्यकाळ ध्रुवीकरण करणारा होता. टीकाकारांनी देशातील ढासळती क्रीडा व्यवस्था आणि सरकारी हस्तक्षेपामुळे ‘फिफा’ने झिम्बाब्वेवर घातलेली बंदी याकडे लक्ष वेधले, तर समर्थकांनी तळागाळातील विकासासाठी तिने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. पुरेसे पाठबळ न मिळाल्याबद्दल कलाक्षेत्रही तिच्याबाबत नाराज होते. मुगाबे यांच्या पुतण्याला चुकीच्या पद्धतीने शेतजमीन दिल्याचा ठपका विरोधकांनी किस्ट्रीवर ठेवला होता. पण, न्यायालयात तिचे निर्दोषत्व सिद्ध झाले. सप्टेंबर २०२३च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तिची पुन्हा केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली. याशिवाय खेळातील परतफेडीच्या भावनेने युवा जलतरणपटू घडावे म्हणून किस्ट्री कॉव्हेंट्री अकादमीची तिने निर्मिती केली. किस्ट्रीने २०१३मध्ये आपला व्यवस्थापक टायरॉन सीवर्डशी विवाह केला. या दाम्पत्याला दोन मुले आहेत.
थॉमस बाश यांच्यानंतर ‘आयओसी’च्या अध्यक्षपदाची गादी चालवण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सात जणांनी दावेदारी केली. यात किस्ट्रीही होती. अन्य सहा पुरुष प्रतिनिधींमध्ये ब्रिटनचे सबास्टियन को आणि स्पेनचे ज्युआन अँटोनिओ समारांच ज्युनिअर यांचे प्रमुख आव्हान होते. निवडणुकीच्या मोहिमेत किस्ट्रीने पारलिंगी क्रीडापटूंवर पूर्णत: बंदीचे समर्थन केले. २० मार्चला ग्रीसमध्ये झालेल्या ‘आयओसी’च्या १४४व्या सत्रात पहिल्याच फेरीत किस्ट्रीने ९७ पैकी ४९ मताधिक्यासह अध्यक्षपद प्राप्त केले. २३ जून २०२५ या दिवशी ती पदभार स्वीकारेल.
‘आधुनिक ऑलिम्पिकचे जनक’ असे बिरूद मिरवणार्‍या पेरी डी कुबर्तिन यांच्यानंतर ४१ वर्षीय किस्ट्री ही ‘आयओसी’ची सर्वात युवा अध्यक्ष. तसेच युरोप आणि अमेरिका खंडांव्यतिरिक्त हे पद भूषवणारीही ती पहिलीच. ज्यावेळी तिने जलतरणाला प्रारंभ केला, तेव्हा एक दिवस आपण जागतिक ऑलिम्पिकमधील हे सर्वोच्च पद मिळवू, असा स्वप्नातही विचार केला नव्हता. त्यामुळेच अध्यक्षपद मिळाल्यानंतरच्या पहिल्याच भाषणात ‘आज काचेचं छत कोसळलंय’ अशा शब्दांत तिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
किस्ट्रीची खरी अग्निपरीक्षा आता सुरू झाली आहे. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमधील वादंगामुळे दिसून आलेले भू-राजकीय तणाव, वातावरणविषयक चिंता आणि क्रीडाक्षेत्रातीलल लिंग समानतेबाबतचा वादविवाद ही तिच्यापुढील प्रमुख आव्हाने. खेळाडूंचा आवाज बुलंद करणे, महिला क्रीडाप्रकारांचे संरक्षण आणि ऑलिम्पिक हे जागतिक स्तरावरील शक्तिस्थान राहील ही तिच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासने तिला सत्यात उतरवावी लागतील. २०२६च्या मिलान-कोर्टिना हिवाळी क्रीडा स्पर्धा ही तिच्या कारकीर्दीची पहिली चाचणी ठरेल. त्यानंतर २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे शिवधनुष्य तिला यशस्वीपणे पेलावे लागेल. तिचा कार्यकाळ आठ वर्षांचा असेल. याच कालखंडात २०३६च्या ऑलिम्पिक यजमानपदाची निश्चिती होईल. त्यासाठी दावेदारी करणार्‍या भारताच्या दृष्टीने म्हणूनच किस्ट्रीची कारकीर्द ही अत्यंत महत्त्वाची ठरेल. तूर्तास, या महान आफ्रिकन सुवर्णकन्येला नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा!

[email protected]

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

कधीही रिटायर न होणारा टायरचा व्यवसाय!

Related Posts

खेळियाड

युद्धाचा खेळ, खेळांतले युद्ध!

May 15, 2025
खेळियाड

बिहारी बालकाचं वैभव टिकेल का?

May 8, 2025
खेळियाड

चंपक आहे साक्षीला…

May 5, 2025
खेळियाड

चला दोस्तहो, बॅटसंदर्भात बोलू काही…

April 25, 2025
Next Post

कधीही रिटायर न होणारा टायरचा व्यवसाय!

शरण अंकल

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.