• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

यापुढे आपले पदक नक्की!

- सई लळित (‘मी बाई विचारवंतीण’)

सई लळीत by सई लळीत
August 25, 2021
in मी बाई विचारवंतीण
0
यापुढे आपले पदक नक्की!

एवढं सोन्याचं महत्त्व आपणाला असून सोन्याची चार-पाच पदकं आपणाला मिळाली नाहीत याचं वाईट वाटतं! आम्हाला काय सोन्याचा रत्नखचित हार किंवा नवरत्नांचा हार नको होता (?), नुसती चार पदकं मिळाली असती तरी खूप होतं. त्यांना शोभेलशी चेन एकवेळ आम्ही आमच्या खर्चाने केली असती. घरी स्वयंपाकपाणी आटपून टीव्ही बघत बसलेल्या एका निरागस गृहिणीला (म्हणजे मला) चार पदकं आम्हालाही मिळावीत असं वाटलं, तर काय तो अपराध नाही.
—-

काही दिवसांपूर्वी रोज टीव्हीवर ऑलिंपीक बघून बसल्या बसल्या खूप व्यायाम झालाय. सगळीकडे मीच आहे असं मला खूप वेळा वाटलं. मी धावते, नेमबाजी करते, मी डाइव मारते, बॅडमिंटन खेळते, हॉकी खेळते… खूप दमणूक. मनाला भरपूर व्यायाम होवून ते लवचिक बिवचीक झालंय! शरीराला पण झाला असणार व्यायाम नक्की… फक्त वजन कमी झालं की झालं… आणि ती काय मोठीशी गोष्ट नाहीय. मी माझं वजन उचलते हेच मला वेटलिफ्टिंग केल्यासारखं वाटतं.
रेसलिंग म्हणजे कुस्तीत आपण पदक मिळवल्यापासून खूपच भारी वाटायला लागलंय खरं… पण भालाफेकीत एक सुवर्णपदक मिळालं तेव्हापासून आपला मोरपिसारा खर्‍या अर्थाने फुलला आहे.
आम्हा भारतीयांना आधीच सोन्याचा किती सोस! बायकांना अर्थसंकल्पाच्या वेळी फक्त सोनं स्वस्त व्हायला हवं असतं. बाकी काहीही कितीही महाग असू दे! सोन्याचं एवढं आकर्षण की सून किंवा जावई पण आम्हाला सोन्यासारखाच हवा असतो. परवा एक नव्वदीची म्हातारी रडताना गहिवर काढून म्हणत होती, ‘हे आज असते तर माजा सोना आणि पानी करून टाकल्यानी असता! दारवेत बुडाले आणि शाप वाट लावल्यानी..’ (तरी बरं गेल्या वर्षीच गेलेत) सोना आणि पानी म्हणजे काय तर सुबत्ता! ‘आज सोन्याचो घास खावच्या टायमाक माझ्या तोंडात दात नाय..’ असंही म्हणतात. म्हणजे काय तुम्ही ओळखलं असेल! लहानपणी मला पिवळा वरणभात वाटायचा!
एवढं सोन्याचं महत्त्व आपणाला असून सोन्याची चार-पाच पदकं आपणाला मिळाली नाहीत याचं वाईट वाटतं! आम्हाला काय सोन्याचा रत्नखचित हार किंवा नवरत्नांचा हार नको होता (?), नुसती चार पदकं मिळाली असती तरी खूप होतं. त्यांना शोभेलशी चेन एकवेळ आम्ही आमच्या खर्चाने केली असती. घरी स्वयंपाकपाणी आटपून टीव्ही बघत बसलेल्या एका निरागस गृहिणीला (म्हणजे मला) चार पदकं आम्हालाही मिळावीत असं वाटलं, तर काय तो अपराध नाही.
अशावेळी ‘सुवर्ण’ची खरी किंमत कळते. या जगात सोनं-नाणं-पैसा-अडका इतर प्रॉपर्टी यापेक्षा गुणवत्ता किती महत्त्वाची आहे, हे चांगलंच कळतं. या जगात गुणवत्तेला महत्त्व आहे, हा गुणी कष्टाळु माणसांसाठी केवढा दिलासा आहे. मला हेच वाक्य परत परत शंभर वेळा लिहावंसं वाटतंय. पण वाचणारे वाचन सोडून देतील म्हणून हा मोह आवरता घेतेय.
केवळ चलाखी आणि चापलुसीच्या जोरावर काही माणसं पुढे जातात, तेव्हा त्यांचं कर्तृत्व धवल राहत नाही. त्याला कुबट वास येतो. खूप दिवस न धुतलेल्या पांघरुणासारखा! आमची मुलं अत्यंत हुशार गुणी असूनही कष्टात कमी पडतात की कौशल्यात कमी पडतात? की डोक्यात हे ऑलिंपीकचं वेड भरवण्यात आम्ही कमी पडतो… कोण जाणे! प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा टीव्हीवर अत्यंत हिरीरीने खेळ बघणं जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत असंच होणार. खेळासाठी चमकदार कामगिरीसाठी रान उठवावं लागेल. रोज शाळेत पी.टी.चा तास हवा आणि मुख्य म्हणजे मैदानाशिवाय शाळा भरताच नये… बघा मला बसल्या बसल्या किती सुचतंय!
आता याक्षणी आपल्याला सात पदकं मिळाली आहेत. एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार ब्रॉन्झ. सगळे धातू आपण कव्हर केले. अमुक एक नाही असं नाही! अमेरिकेतल्या एका मुलीने म्हणे एकटीने चार-पाच सुवर्ण पदकं खिशात घातली. अशा बातम्या सहसा खोट्या ठरत नाहीत. खिशाचा तपशील कदाचित चुकला असेल. खिसा नसेल तर रुमालात बांधून घेतली असतील. एवढाच काय तो फरक!
तर घरात टीव्ही बघताना मी खूप चेहरा हसरा केला होता. कुस्तीत रौप्यपदक मिळाल्यावर मी गरागरा नाचून आनंद व्यक्त केला. कुणाला घरात कळूच दिलं नाही की मला सुवर्ण हवं होतं. माझ्या डोळ्यात पाणी होतं… पण ते रौप्यपदकाचे आनंदाश्रु आहेत असं मी ठणकावून सांगितलं!
परवा हॉकीची मुलींची मॅच आम्ही बघितली. तिथं आपण जिंकलो असतो तर आपणाला कांस्यपदक मिळालं असतं! (एरवी आपण त्या कांस्यला हिंग लावून विचारत नाही. काशाची एक मोठी वाटी माझ्याकडे किती वर्ष पडून आहे आणि ती घेवून मी कुठेच मिरवत नाही). पण कांस्यपदकासाठी होणारी लढत अधिक तगडी होते. तेवढी रौप्य आणि सुवर्ण यासाठी होत नाही. कारण तिथे काहीतरी मिळणार ही निश्चिंती असते. निश्चिंती माणसाला आळशी बनवते. रिकाम्या हाताने देशात परत जायला कुणालाही जिवावर येतंच. बाजारातून घरी जाताना पर्समधे काहीतरी मुलांसाठी खाऊ आहे या भावनेनेच आपण तुडुंब खूश असतो (तेवढी मुलंही खूष होत नसतात). घेणार्‍यापेक्षा देणारा अधिक आनंदी असतो. हेच शेवटी खरं!
तर आपल्या मुलींनी प्रचंड धडपड केली… पण त्या ग्रेट ब्रिटनच्या पोरी भलत्याच अप्पलपोट्या निघाल्या. तो बॉल आपल्या आपल्यातच खेळवत बसल्या. आपल्या मुलींना अजिबात देईनात. मी खूपदा डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघितलं. पण त्या मला थोडीच दाद देणार! आपल्या पोरी पडल्या सरळ स्वभावाच्या निष्कपट! हिसकावून घेण्याची अशी वृत्ती नाहीच. शेवटी त्या जिंकल्या. त्यांनी खूपच मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला. आमच्यांना अश्रू अनावर झाले. ब्रिटनच्या पोरींना ओरडून ओरडून चेव आणणारी एक लेडी आमच्या पोरीचं सांत्वन करायला आली होती. तिने त्यांना जवळ घेतलं. खांद्यावर थोपटलं. माणुसकी म्हणून ठीक आहे. असं म्हणू नये पण तिने जर ब्रिटनच्या पोरींना चेव आणला नसता तर चित्र उलटं दिसलं असतं… आता कशाला तो मोठेपणा सांत्वन करण्याचा? बोलणार नव्हतेच… पण बोलल्याशिवाय राहवत नाही.
पण एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आलीय. आम्हा भारतीयांना सात हा आकडा लहानपणापासून प्रियच म्हणानात! म्हणूनच आपणाला सात पदकं मिळाली असावीत असा माझा अंदाज आहे. सगळ्या गोष्टीत राजकन्या किंवा राक्षस सात समुद्रापलीकडेच राहायचे. पाताळं पण बहुतेक सातच आहेत. आकाशात सप्तर्षी आहेत. सूर सात आहेत. साडेसातीत पण सात आहे. स्वर्ग पण सात आहेत, असं म्हणतात (मी अजून एकही बघितला नाही, खोटं कशाला बोलू?). त्यामुळे बहुतेक पदकंही आपणाला सात मिळाली आहेत आणि हा आकडा शुभ आहे. म्हणजे पुढचं ऑलिंपीक आपणाला शुभ जाणार ही दगडावरची रेघ आहे. मग तो दगड कसल्याही रंगाचा असू दे!
ऑलिंपीकच्या निमित्ताने मला खूप देशांची नावं कळली आणि खूप खेळही कळले. ही गोष्ट काही कमी मोलाची नाही. शेवटी ज्ञानात भर पडणं महत्वाचं! हे मला कोणत्याही झाडाखाली न बसता मिळालेलं ज्ञान आहे. आपण काही ठिकाणी पराभूत झालो तरी आपण तिथे जाण्याची पात्रता गाठली ही काही कमी महत्त्वाची गोष्ट नाही. आपल्या देशाचं नाव तिथे झळकलं. कोणतरी पराभूत झालं म्हणून कोणतरी विजयी झालं! ही पण आपली महत्त्वाचीच कामगिरी आहे. आपण सगळीकडे टफ फाईट दिली. नेमबाजीत याअगोदर आपण सुवर्ण घेतलं होतं! यावेळी नेमबाजीत काहीच मिळालं नाही, अशी खंत मी काल बटाट्याची भजी लसणीच्या लाल तिखट चटणीसोबत खाताना व्यक्त केली. सगळे हायहुय करण्यात व्यस्त असल्यामुळे साहजिकच मला एकमुखी अनुमोदन मिळालं!
तरीपण माझ्या महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही. कुस्तीचं एखादं पदक आपणाला मिळालं असतं तर आपण सर्वच नव्हे तर कोल्हापूरचा रंकाळाही थयाथया नाचला असता ही गोष्ट नजरेआड करून चालणार नाही. अगदी खरंखुरं मनातलं सांगायचं झालं तर आपण भारतीय ऑलिंपीकचा एक भाग होतो… आपले खेळाडू तिथे खेळले-बागडले… खूपशी इर्ष्या आणि अनुभव गाठीला बांधून परत आले! आम्ही समाधानी आहोत. महाराष्ट्राला पुढच्या हेच्यात पदक मिळेल याची मला मनातून खात्री आहेच!

(लेखक खुसखुशीत ललित लेखन आणि सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहेत)

Previous Post

अस्सल मराठी गावरान फास्ट फूड

Next Post

‘नसीब’वालं भूत!

Related Posts

मी बाई विचारवंतीण

सारवासारवीचे दिवस

September 29, 2022
मी बाई विचारवंतीण

कोरस

September 16, 2022
मी बाई विचारवंतीण

गणपती इले…

September 1, 2022
मी बाई विचारवंतीण

दगडांच्या देशा…

August 4, 2022
Next Post
‘नसीब’वालं भूत!

‘नसीब’वालं भूत!

…मोरावर चोर

...मोरावर चोर

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.