• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

स.न.वि.वि.

वाचकांची मार्मिक पत्रे

Nitin Phanse by Nitin Phanse
May 26, 2022
in गर्जा महाराष्ट्र
0

गोळीबंद शैली आणि भाषासौष्ठव

श्रीलंकेतील परिस्थितीवरील आल्हाद गोडबोले यांचा लेख वाचला आणि आवडला. इंडियन एक्स्प्रेस आणि इतर ठिकाणी आलेले लेख वाचले होते, पण गोडबोले यांचा लेख थेट विषयाला भिडणारा, भाषासौष्ठव आणि गोळीबंद शैलीचे दर्शन घडवणारा असल्याने अधिक भावला. बर्‍याच वर्षापूर्वी ‘सकाळ’मध्ये विजय साळुंखे परदेशातून कॉलम लिहीत असत. विषयातील गुंतागुंत कळली नाही तर साळुंखे यांचा लेख वाचायचा आणि विषय समजून घ्यायचा अनेक वाचकांचा परिपाठ होता. हा लेख वाचताना साळुंखे यांची आठवण झाली.
– अनिल डोंगरे, अहमदाबाद

भाजीच्या धंद्याची छान माहिती मिळाली

‘धंदा म्हणजे काय रे भाऊ’ या कॉलममध्ये छापून आलेला, ‘वाहतो ही भाज्यांची जुडी’ हा लेख आवडला.
डबघाईला आलेल्या कंपन्या आणि सरकारी नोकर्‍यामध्ये खाजगीकरण तसेच वाढत चाललेला बेकारी यावर दिलेला लाखमोलाचा, स्वानुभवाचा व्यवसायाचा सल्ला नोकरीच्या मागे लागलेल्या तरूण पिढीला प्रेरणादायी आहे. या लेखात, सगळं जग झोपलेलं असताना मध्यरात्रीपासून चालणार्‍या भाजी व्यवसायाबद्दल नवीन माहिती मिळाली. सहज सोप्या भाषेत आणि ओघवता लेख लिहिला असल्यामुळे एकदा वाचन चालू केल्यावर लेख सलग वाचला जातो.
– मंदार खोत, प्रभादेवी

Previous Post

कुठे ‘खोदिशी’ काशी!

Next Post

जनमन की बात

Next Post

जनमन की बात

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.