• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

जुळ्या प्रोफाइलने घात केला…

- सुधीर साबळे (सायबर जाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 24, 2025
in पंचनामा
0

फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम, टेलिग्राम अशा सोशल मीडियांचा वापर करणार्‍यांची संख्या शहरात आणि ग्रामीण भागांतही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. संवाद साधण्यासाठी हे माध्यम प्रभावी असले तरी तुमचे प्रोफाईल क्लोन करून म्हणजे तुमच्याच नावाचे, तुमचेच आहे असे भासणारे बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार सर्रास इथे घडतात. त्यात आर्थिक गैरव्यवहारही आले. त्यामुळे सोशल मीडियावर वावरणार्‍या प्रत्येकाने अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.
हा क्लोनिंगचा उद्योग करताना हे सायबर चोरटे माणसांचा, त्यांच्या मित्रपरिवाराचा अगदी बारकाईने अभ्यास करतात, समोरच्या व्यक्तीची माहिती मोठ्या चलाखीने जमा करतात आणि त्याचा वापर करून समोरच्या व्यक्तीची बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून फसवणूक करतात. सायबर चोरटे ते नेमके कसे करतात, हे या उदाहरणाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
नम्रता ही कथ्थक नृत्यात पारंगत होती. तिच्या कार्यक्रमांचे वेगवगळ्या ठिकाणी आयोजन केले जायचे, त्यामुळे तिचा नावलौकिक सर्वत्र वाढत होता. आपल्या कलेची प्रसिद्धी व्हावी, कार्यक्रमांचे फोटो व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचावेत, अधिकाधिक माणसांना आपले कलागुण कळावेत आणि अधिकाधिक कार्यक्रम मिळावेत, यासाठी सोशल मीडियावरही तिचा वावर मोठ्या प्रमाणात होता. हल्ली कलाकारांनी सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर बनण्याचाही ट्रेंड आहेच.
किरण नावाच्या सायबर ठगाची नम्रताच्या फेसबुक प्रोफाईलवर नजर पडली. नम्रता त्यावर सतत वेगवेगळ्या बातम्या, माहिती, उपक्रम, दौर्‍यांचे, सहलीचे फोटो टाकून वेगवेगळ्या विषयावरील विचार मांडत असे, त्याला अनेकजण लाइक करत असत. तिचा चाहता वर्ग मोठा होता आणि दिवसागणिक तो वाढतच चालला होता. त्यामुळेच किरणने तिचे बनावट फेसबुक खाते तयार करून त्याआधारे फसवणूक करण्याचा उद्योग सुरू करण्याचे ठरवले. किरणने फेसबुकवरचे नम्रताचे फोटो, प्रोफाईल, पोस्ट, तिची लेखन करण्याची पद्धत याची कॉपी करून तिच्या नावाने एक बनावट फेसबुक खाते काढले. अगदी तिच्यासारखेच हुबेहूब दिसणारे ते खाते होते, अनेकांना किरणने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मेंबर करून घेतले. अनेकदा फेसबुकवर फ्रेंड लिमिट पूर्ण झाली म्हणजे ५००० मित्र गोळा झाले की अनेक लोक दुसरं अकाऊंट काढतात. हा तसाच प्रकार असावा, असंही लोकांना वाटलं असेल.
किरणचा नम्रताच्या मित्रांबरोबर अगदी बेमालूमपणे संवाद सुरू झाला होता, आपल्याशी नम्रताच बोलत आहे, असा भास तिच्या मित्रमंडळींना होत असे. कुणाला आपण वेगळ्या कुणाशी बोलत आहोत, अशी शंकादेखील आली नाही. किरणने हा सगळा उद्योग नियोजनपूर्वक केला होता. किरणने अगदी सूक्ष्मपणे नम्रताची वैयक्तिक माहिती गोळा करण्याच्या दिशेने संभाषणे सुरू केली होती, त्यामध्येच फेसबुकवर जोडल्या गेलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्या लाइफबद्दलची माहिती, आवडी-निवडी, दिनचर्या आणि संपर्कांबद्दलचे तपशील अनपेक्षितपणे शेअर केले होते. या सगळ्या माहितीचा वापर करत किरणने अधिकाधिक वैयक्तिक माहिती जमा करून त्याआधारे काहीजणांची फिशिंगच्या हल्ल्यांमधून फसवणूक करण्यास सुरुवात केली.
‘आपण खूपच आर्थिक अडचणीत सापडलो आहोत, कुणीतरी आपल्याला बाहेर काढावे’ असा मेसेज त्याने या बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून दिला. आपली ही मैत्रीण अचानक कोणत्या आर्थिक अडचणीत सापडली आहे, हे जाणून घेण्यासाठी तिच्या राही नावाच्या मैत्रिणीने तिला फोन केला, ‘काय गं नम्रता, तू कोणत्या अडचणीत आहेस? जरा आम्हालाही कळू देत’ असे तिने विचारल्यावर आपण कोणत्याच अडचणीत नाही, तुला हे कोणी सांगितले, असे नम्रताने तिला विचारले. तेव्हा, तुझ्या फेसबुकवर हा मेसेज पडला आहे, तुझ्याच नावाने आहे तो, असे राहीने तिला सांगितले. नम्रताने शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तिचे बनावट फेसबुक खाते काढण्यात आले असून त्यामधून अनेक प्रकारची फसवणूक होत असल्याचे तिच्या नजरेत आले. या सगळ्या प्रकाराची तिने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून माहिती काढली. तेव्हा आयपी अड्रेसचा पत्ता लागला आणि तो अहमदाबादमधील असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला, तेव्हा तो एका महिलेच्या नावावर नोंद असल्याचे समोर आले. पोलिसांनी सुगंधा प्रभू नावाच्या त्या महिलेकडे विचारणा केली तेव्हा आपल्या आयपी अ‍ॅड्रेसचा वापर आपला भाऊ किरण करतो, असे तिने सांगितले. तो कायम म्हणजे दिवसभरातले १४ तास संगणकावर असतो, हेही तिने सांगितलं. तू कोणता व्यवसाय करतो, असे आपण त्याला अनेकदा विचारले. पण त्याच्याकडे काही विचारणा केली की, लगेचच तो चिडून अंगावर धावून येतो, त्यामुळे मी त्याच्याकडे विचारणा करणे बंद केल्याचे सुगंधा यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सुगंधाला किरण जे उद्योग करतो त्याची माहिती दिली. किरणला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून हा प्रकार कसा करतो, केव्हापासून करतो, याची माहिती घेतली. तेव्हा दोन वर्षांपासून आपण असे प्रकार करत असल्याची कबुली त्याने दिली.

अशी घ्या काळजी

– गोपनीयता सेटिंग्ज : फेसबुकवर तुमची वैयक्तिक माहिती आणि पोस्ट कोण पाहू शकते हे नियंत्रित करण्यासाठी तुमच्या सोशल मीडिया गोपनीयता सेटिंग्जचे नियमितपणे पुनरावलोकन करा आणि समायोजित करा.
– टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम करा : आपल्या खात्याला सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडण्यासाठी तुमच्या सोशल मीडिया खात्यांवर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (२एफे) सक्षम करा.
– प्रोफाइल पडताळणी : फेसबुक आणि ट्विटरसारखे प्लॅटफॉर्म प्रोफाइल पडताळणी वैशिष्ट्ये देतात, जे वापरकर्त्यांना कायदेशीर खाती ओळखण्यात मदत करू शकतात.
– विनंत्यांपासून सावध रहा : तुम्ही आधीच ओळखत असलेल्या लोकांकडून मित्र किंवा कनेक्शन विनंत्या स्वीकारण्याबाबत सावध राहा. काहीतरी बंद वाटत असल्यास त्यांची ओळख सत्यापित करा.
– माहिती शेअरिंग : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घरचा पत्ता किंवा आर्थिक तपशील यासारखी संवेदनशील वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा.

Previous Post

स्टर फ्राय भाज्या

Next Post

राशीभविष्य

Next Post

राशीभविष्य

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.