• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

जनमन की बात

सोशल मीडियावरचे जनमानस

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 24, 2022
in गर्जा महाराष्ट्र
0

‘जनाब’शी तुमचेच रोटी-बेटीचे संबंध

प्रति,
जनाब देवेंद्र फडणवीस,
विरोधी पक्षनेते विधानसभा महाराष्ट्र.
महोदय,
‘जनाब’ या शब्दाशी जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे तीन पिढ्यांचे रोटीबेटीचे नातेसंबंध आहेत. चौथ्या पिढीतही रझाकारांचे वारस असलेल्या एमआयएमसोबत तुमची सोयरीक सुरळीतपणे सुरु आहे. मग तुम्हाला जनाब हा शब्द आत्ताच का झोंबतोय?
१) हिंदू महासभा व बॅरिस्टर जिना यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतात एकत्र सत्ता भोगली. तेव्हा भाजपाचे संस्थापक जनाब शामाप्रसाद मुखर्जी हे बंगालमधील लीगच्या फजलुल हक सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
२) मुस्लीम लीगने १९४० मध्ये लाहोर परिषदेत ‘स्वतंत्र पाकिस्तान’निर्मितीचा ठराव मंजूर केला आणि श्यामा प्रसाद यांचे नेते फजलुल हक यांनीच तो मांडला. तरीही जनाब शामाप्रसाद मुखर्जी सत्तेवरच होते. १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनात देशांतर्गत सर्व सरकारांनी राजीनामे दिले, पण जनाब शामाप्रसाद मुखर्जी सत्तेवरच होते.
३) जनाब अटलबिहारी वाजपेयींनी देशाचे पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानात जाऊन ‘मीनार-ए-पाकिस्तान’ला (पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव ज्या ठिकाणी मांडला ती जागा) वंदन केले. फाळणीच्या जखमा विसरुन १९९९मध्ये ‘दिल्ली-लाहोर बससेवा’ सुरु केली.
४) ‘आता तर वाजपेयीजी पाकिस्तानमधून निवडणूक लढले, तरी जिंकतील.’ – जनाब अटलबिहारी वाजपेयींचे कौतुक करताना जनाब नवाज शरीफ.
५) जनाब लालकृष्ण आडवाणी यांनी २००५ मध्ये पाकिस्तान दौर्‍यात कराचीस्थित ‘मजार-ए-कायद’ (जिनांची कबर) येथे जिनांच्या मजारीवर जावून माथा टेकवला. जिना यांचा ‘धर्मनिरपेक्ष नेता’ म्हणून गौरवदेखील केला.
६) वाजपेयी मंत्रिमंडळातील अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री जनाब जसवंत सिंग यांनी तर पुस्तक लिहून जिनांचे कौतुक केलेय.
७) २०१५ साली जनाब नरेंद्र मोदी यांनी विनानिमंत्रण, अधिकृत दौरा नसताना, विमान अचानक पाकिस्तानात उतरवून, पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ (सध्या गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगत असलेले) यांची सर्व प्रोटोकॉल तोडून त्यांच्या वाढदिवशी भेट घेतली. शुभेच्छांचं, भेटवस्तूंचं आदान-प्रदान करत पाहुणचारही घेतला.
मुख्यमंत्रीपदावर विराजमान असताना आपणही जनाबांकडून इफ्तार पार्टीच्या दावती झाली झोडल्या. त्या पार्ट्यांसाठी छापलेल्या पत्रिका आणि बॅनरवर आपल्या नावापुढे अधिकृतपणे ‘जनाब’ लावलेले आहे. मुख्यमंत्रापद गेल्यापासून आपली अवस्था ‘मेंटल गेलेल्या बत्तीसारखी’ झाली आहे..
औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणारी एआयएमआयएमवाले जनाब आणि जनसंघ, रा. स्व. संघ, भाजपचे जनाब यांचीच युती योग्य आहे. शिवसेना किंवा महाविकास आघाडी तुमच्या अंगवस्त्रासोबत युती करणार नाहीत.
यापुढे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अदबीने घ्या.. अन्यथा आपल्या जनसंघातील मालगुजारांचा इतिहास नाईलाजाने महाराष्ट्राला सांगावा लागेल..
आपला स्नेहांकित,
शिवसेनेचा शिवसैनिक
चंद्रकांत देसाई

—– —– —–

दृष्टी तशी सृष्टी…

एखाद्याला सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत चहूबाजूला फक्त भ्रष्टाचार, गैरव्यवहार, वसुली हेच दिसत असले, तर आपण काहीच करू शकत नाही! तुम्ही मंडळी उद्या महाराष्ट्रात सत्तेवर आलात, तर भ्रष्टाचार चुटकीसरशी नष्ट होईल याची खात्री आहे, अशी वरवरची कौतुकपेरणी करून आपण त्यांना फार तर ‘उगी उगी’ करू शकतो… परंतु आपल्या आसपास काही चांगल्या गोष्टीही घडत असतात. उदा. दादर टीटीचे एशियाड बस स्थानक आहे, तेथे उड्डाण पुलाखाली बाकडी टाकून, लहान मुलांसाठी बाग करून सुंदर वातावरण निर्माण केले गेले आहे. तसेच काही काळापूर्वी रुईया कॉलेजजवळच्या डॉ. अशोक तुळपुळे चौकापासून ते माहेश्वरी उद्यानापर्यंतचा जो उड्डाणपूल आहे, त्याखाली वॉकिंग ट्रॅक आणि कडेला पायर्‍यांवर मस्त गप्पा मारण्यासाठी बसण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील बेस्ट बससेवा अत्यंत उत्तम झाली आहे. एसी बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली असून, छोटेखानी एसी बसेसमधून प्रवास करणे हा खरोखरचा आनंद आहे. बसेसची फ्रिक्वेन्सी वाढवण्यात आली आहे. तसेच रेल्वे स्थानकापासून प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक छोट्या छोट्या मार्गांवर एसी मिनी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. एसी बसेसचा मासिक पास १२५० रुपये असून, ज्येष्ठ नागरिकांना तो बाराशे रुपयांत उपलब्ध आहे. ‘चलो अ‍ॅप’मुळे या बसेस नेमक्या कुठे आहेत आणि किती वेळात येणार आहेत, हेही कळू शकते. माझ्या मते, मुंबईकरांनी खासगी कारचा वापर कमीत कमी करून रेल्वे, बस, मोनो व मेट्रो या सार्वजनिक वाहतूक साधनांचाच वापर वाढवला पाहिजे. बसमध्ये बसल्यास प्रतिष्ठेला धक्का बसतो असे ज्यांना वाटते, त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही! असो. परंतु सध्या बेस्ट उपक्रमास धन्यवाद द्यावेत, तेवढे थोडेच आहेत. मुंबई महानगरपालिकेने विकसित केलेली उद्याने तसेच बेस्ट उपक्रमाने केलेल्या चांगल्या गोष्टींचे कौतुक केलेच पाहिजे. मग ‘महावसुली’, ‘महावसुली’ म्हणून बोंबलणारे कितीही बोंबलू देत!

– हेमंत देसाई

Previous Post

खोट्याच्या कपाळी गोटा!

Next Post

प्रबोधनकारांच्या आठवणी जपणारं गाव

Next Post

प्रबोधनकारांच्या आठवणी जपणारं गाव

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.