नन्या, मन्या आणि विन्या हे शाळकरी मित्र एका बोटीतून सहलीला निघाले होते. ती बोट फुटली आणि ते तिघे एका फळकुटाच्या आधाराने एका छोट्याशा बेटावर जाऊन पोहोचले. तिघेही रडवेले झाले होते. त्या बेटावर फिरताना विन्याला एक दिवा दिसला. तो मित्रांना म्हणाला, अरे हा सेम जादूच्या दिव्यासारखा दिसतोय, घासून बघू या का?
विन्याने दिवा घासला, अचानक त्यातून धूर निघाला आणि त्यातून एक राक्षस प्रकट झाला. त्याने सांगितलं, तुम्ही तिघे माझे मालक आहात. मी तुमच्या तिघांच्याही मिळून तीन इच्छा पूर्ण करीन. मग या दिव्यातली जादू संपून जाईल. विचार करून ठरवा काय मागायचं ते.
विन्या पटकन म्हणाला, माझी एकच इच्छा आहे रे बाबा. मला माझ्या घरी जायचंय.
विन्या फटकन गायब झाला.
मन्या म्हणाला, माझी तरी दुसरी काय इच्छा असणार. मलाही घरी पाठव रे बाबा.
तोही फटकन गायब झाला.
नन्या म्हणाला, त्या दोघांशिवाय मी एकटा या बेटावर काय करणार? मला कसं करमणार? तू त्या दोघांना परत आण रे बाबा!!!!