• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

‘लोन फ्रॉड’पासून सावधान!

- सुधीर साबळे (सायबर जाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
February 24, 2023
in पंचनामा
0

पैशाची गरज कधी कोणाला लागेल ते सांगता येत नाही. कधीतरी अत्यंत तातडीने पैशांची गरज भासते आणि अशावेळी आपल्यातील बहुतेक जण मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडून ही रक्कम उधार घेतात. काहीजण बँकेतून पर्सनल लोन घेतात. अलीकडच्या काळात अनेक ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तुम्हाला पैशांची गरज पडणार हे काही कंपन्यांना जणू तिसरा डोळा असल्याप्रमाणे कळते आणि ते तुम्हाला अतिशय आकर्षक व्याजदरात भरपूर कर्ज देण्याचं आमिष दाखवणार्‍या मेसेजेसचा, फोनकॉल्सचा तुमच्यावर भडीमार करतात. काही लोन अ‍ॅप अतिशय सुलभतेने कर्ज देण्याची हमी देतात. मात्र, कर्ज कधीही सुलभतेने मिळत नाही, जिथे ते इतक्या सुलभतेने मिळते, तिथे त्यात काहीतरी गडबड असते, फसवणूक होण्याचा धोकाही मोठा असतो. पण ती वेळ अशी असते की सावधगिरीचा विचारच सुचत नाही.
ही अशीच एक गोष्ट. तुषार कोल्हापूरमध्ये राहत होता. नुकतेच त्याचे कॉम्प्युटर इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण झाले होते. तो नोकरीच्या शोधात होता. काही दिवस अर्ज, इंटरव्ह्यू हे चक्र पार केल्यावर त्याला पुण्यातल्या एका कंपनीत नोकरी मिळाली. पुण्याची थंड, निरोगी हवा, चांगले पगारपाणी, सुखी जीवनशैली यात तो रमून गेला होता. पुण्यात बाहेरून येणारे या शहराच्या प्रेमात पडतातच. तेच तुषारच्याही बाबतीत झालं. लग्न करून इथेच स्थायिक होण्याचा निर्णय त्याने घेतला.
चांगली नोकरी, सुस्वभाव, भक्कम पगार असल्यावर लग्न जुळायला किती वेळ लागतो? एका डिसेंबरमध्ये तुषारचे शुभमंगल झाले. आता घराची प्रतीक्षा होती. घर त्याने आधीच बुक केलं होतं. त्या वन बीएचकेच्या फ्लॅटसाठी लोन काढलेलं होतं. फेब्रुवारी महिन्यात त्याला या नव्या घराचे पझेशन मिळणार होते. साहजिकच नव्या घरात काय वस्तू घ्यायच्या, कुठे ठेवायच्या, फर्निचर कसं करायचं, या सगळ्याचं नियोजन सुरू होतं. तुषार आणि नवपरिणीत पत्नी दोघेही या खरेदीसाठी आर्थिक तजवीज कशी करायची, हे ठरवत होते.
नवे घर मिळण्याचा दिवस जवळ येत चालला होता. गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीचं बजेट जमवलं आणि नंतर दोघांच्या लक्षात आलं की आपण मायक्रोवेव्ह ओव्हनचा समावेशच केला नाही आपल्या यादीत. आधी निश्चित केलेल्या बजेटमध्ये जवळपास पाच हजार रुपयांची वाढ होणार होती. इतक्या काटेकोर बजेटमध्ये आता हे पैसे कसे उभे करायचे, असा विचार पडला. रक्कम तशी किरकोळ होती. एखाद्या लोन अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेऊ आणि महिना-दोन महिन्यांतच ते फेडू, असं दोघांनी ठरवलं. इतका खर्च केला, घर घेतलं, आता पाच हजार रुपड्यांसाठी मित्रांपुढे हात पसरणं बरं वाटेना.
तुषारने अ‍ॅप डाऊनलोड केलं आणि त्यावरून लोन घेण्यासाठी अर्ज केला. तात्काळ पाच हजार रुपये खात्यात जमा झाले. काम भागले. पण, हे समाधान आठवडाभरच टिकलं. एका आठवड्यातच लोन कंपनीचा तगादा सुरू झाला, पैसे लवकर द्या, ताबडतोब द्या. फोनवरची आधीची सर, मॅडम वगैरे विनम्रतेची भाषा बदलली. गुंडगिरीची भाषा आणि गलिच्छ शब्दांत होणारी दमदाटी, यामुळे दोघेही हैराण होऊन गेले होते. अखेरीस त्यांनी मित्रांकडून पैसे घेऊन कर्जाची ती रक्कम व्याजासह देऊन टाकली आणि ते मोकळे झाले.
परंतु, इतक्यावरच हे प्रकरण थांबणार नव्हते, त्यांची सुटका होणार नव्हती. अ‍ॅप डाऊनलोड करताना तुषारच्या मोबाईलवरचा डेटा तुषारच्या नकळत त्यांच्याकडे गेला होता. त्याचा गैरफायदा घेत त्यांनी तुषारच्या फेसबुक अकाउंटवर जाऊन त्याचे फोटो मॉर्फ करून ते नको त्या अवस्थेतील फोटो त्याच्या मित्रमैत्रिणींना पाठवण्याचा उद्योग सुरु केला. या प्रकारामुळे मानसिक स्वास्थ्य इतकं ढासळलं की तुषारच्या मनात आत्महत्येचे विचार यायला लागले.
अशात एक दिवस अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज देऊन फसवणूक करणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याची बातमी वर्तमानपत्रात तुषारच्या वाचनात आली. तिथे त्याला आशेचा किरण दिसला आणि एक पाऊल पुढे टाकून त्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी विविध अ‍ॅप, कॉल सेंटर, बँक खाते, सिमकार्ड याचा तपास केला, तेव्हा एकाच पत्त्यावर अनेक खोट्या कंपन्यांची नोंदणी केल्याचे आढळून आले. बेरोजगार तरुणांना या बनावट कॉल सेंटरमध्ये नोकरी देऊन त्यांच्याकडून अशा प्रकारची गुन्हेगारी कृत्ये करून घेतली जात होती. पोलिसांनी सापळा रचून त्या सेंटरवर छापा टाकून या लोकांना ताब्यात घेतले, तेव्हा ही मंडळी गरजू कर्जदाराला चिनी अ‍ॅपचा वापर करण्याचे सांगून त्यातून फसवत असल्याचे निष्पन्न झाले.
आपल्याकडे अनेक चायनीज अ‍ॅप तात्काळ कर्ज देतात आणि त्यानंतर फोनवर त्रास देतात. कर्ज घेण्यासाठी अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर फोनमधले सगळे संपर्क, फोटो, संभाषणे आदी माहिती हे गुन्हेगार मिळवतात आणि नंतर त्रास द्यायला सुरुवात करतात. हा सगळा व्यवहारच बेकायदा आहे. त्यात फसणारे अनेकजण डिप्रेशनमध्ये जातात. गुन्हेगार चीनमधून सगळी सूत्रे हलवत असतात. भारतात खोट्या वित्तीय कंपन्यांची नोंद करतात. भारतातील बँकांचे खाते वापरतात. इथे त्यांची कॉल सेंटर सुरु होतात. हा सगळा प्रकारच अजबच आहे. आपण यात अतिशय सावध राहण्याची गरज आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून शक्यतो लोन घेऊच नका. त्याऐवजी खासगी बँकांमधून मिळणार्‍या कर्जसुविधांचा लाभ घ्या. तसे केले तर अशा प्रकारांना बळी पडण्याची वेळ आपल्यावर येणार नाही आणि मानसिक स्वास्थ्यही बिघडणार नाही…

हे लक्षात ठेवा…

या प्रकाराला इंस्टंट लोन फ्रॉड असे म्हणतात. कर्ज घेण्यासाठी कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करू नका. करणार असालच तर त्या कंपनीची अधिकृत माहिती गुगलवरून तपासून घ्या. ही विश्वासार्ह कंपनी असल्याची खात्री करून घ्या. भारतात ही कंपनी कोणत्या ठिकाणी आहे, ती नोंदणीकृत आहे का, त्यांच्याकडे कर्ज देण्याचा परवाना आहे का, याची शहानिशा केल्याखेरीज लोनचे अ‍ॅप डाउनलोड करू नका. अ‍ॅप डाउनलोड करताना तुमच्या मोबाईलमध्ये असणारा सगळा डेटा त्या कंपनीकडे जात असतो. त्यामुळे कॉन्टॅक्ट डिटेल्स, फोटो फाईल, स्टोअर नसतील, अशाच मोबाइलमध्ये हे अ‍ॅप इन्स्टॉल करावे. अशा प्रकारची अ‍ॅप डाऊनलोड करताना त्याच्या टर्म्स बारकाईने वाचणे गरजेचे आहे. या अ‍ॅपवरून कर्ज घेतले की त्यावर आकारण्यात येणारे चक्रवाढ व्याज हे खूप असते. त्यामुळे जास्त व्याज देण्याची तुमची तयारी असेल, तरच या फंदात पडा. लोन अ‍ॅपवरून कर्ज घेण्याआधी फेसबुक, इन्स्टाग्राम प्रोफाइल लॉक करून ठेवा. तुमच्या फोटोचा आधार घेऊन मित्रांकडे, नातेवाईकांकडे बदनामीचा प्रयत्न झाला तर त्याची तक्रार पोलिसात नोंदवा. लोन अ‍ॅपवरून कर्ज घेतले की तुम्हाला येणारे पैसे हे कोणत्या बँकेतून आले आहेत, तुम्ही कर्जाची रक्कम फेडताना देत असणारे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये भरत आहात, या बद्दल सजग राहणे आवश्यक आहे.

Previous Post

देवाघरची फुले

Next Post

भविष्यवाणी २५ फेब्रुवारी

Related Posts

पंचनामा

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
पंचनामा

डिसीप्लिन

May 8, 2025
पंचनामा

टेक सपोर्ट नव्हे, लुटालूट!

May 5, 2025
पंचनामा

कर भला, तो हो भला!

April 25, 2025
Next Post

भविष्यवाणी २५ फेब्रुवारी

अपशकुन

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.