□ माटुंग्यातील वृद्ध पित्याला छळणार्या दोन मुलांना आणि सुनांना पित्याचे घर तात्काळ खाली करण्याचे हायकोर्टाचे आदेश
■ ही वेळ येण्यापेक्षा प्रेम कायम ठेवून वेळेत वेगळं होणं काय वाईट?
□ पंतप्रधानांचा काशीमध्ये मध्यरात्री फेरफटका
■ म्हणजे १०० टीव्ही कॅमेरामन, २ मेकअपमन, ७२ न्यूज अँकर आणि असंख्य सरकारी प्रसिद्धी अधिकार्यांना रात्रपाळी भत्ता लागू
□ वारांगनांना रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड द्या : सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना आदेश
■ त्यांच्याकडे जाणार्या गिर्हाईकांना हे सगळे आणि समाजात प्रतिष्ठाही मिळत असेल तर वारांगनांना किमान सरकार दरबारी ‘ओळख’ मिळायला काय हरकत आहे?
□ राज्यातील तीन पक्षांचे महाआघाडी सरकार पडेल असे वाटत नाही : मनसेप्रमुख राज ठाकरे
■ पण, एक घाटावरचे आणि एक कोकणातले अशा दोन दादांना ही ‘राज की बात’ कळणार कधी?
□ लोकशाहीच्या स्तंभांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह : ज्येष्ठ पत्रकार सुचेता दलाल
■ याचा अर्थ ‘नव्या भारता’च्या उभारणीतला पहिला टप्पा पार झाला!
□ मुखपट्टीशिवाय मंत्रालयात फिरणार्या भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला दंड
■ इतर अनेकांप्रमाणे पंतप्रधान मोदी हेच त्याचे आदर्श असणार! ते स्टुडिओत मास्क घालतात आणि लोकांमध्ये बिनामास्कचे फिरतात.
□ विरार नालासोपारा नगरपरिषदेचा मुख्य वैद्यकीय अधिकारी निघाला मुन्नाभाई एमबीबीएस- दोन खासगी रुग्णालयेही चालवत होता…
■ तो पकडला गेला, त्याचे गॉडफादर पकडले जातील का?
□ करण जोहरच्या पार्टीमधून कोरोनाचा संसर्ग, अनेक अभिनेत्रींच्या इमारती सीलबंद
■ न्यू इयर पार्ट्या आयोजित करताना सावधान!
अमेरिकेच्या फॅशन ब्रँडची खादीला पसंती
■ कापडापुरतेच राहा, भलती ‘खादी’ डोक्यावर घेऊ नका म्हणजे झाले!
□ भारतातील ४० टक्के इंटरनेट वापरकर्ते सट्टा आणि जुगाराचे शौकीन
■ स्वस्त डेटा ‘महाग’ पडतो तो असा!
□ मोदी सरकारचा महाराष्ट्रद्वेष पुन्हा उफाळला… नागपूर येथील कामगार शिक्षण मंडळाचे कार्यालय दिल्लीला हलवले
■ त्यापेक्षा देशाची राजधानीच इकडे आणलीत तर कष्ट वाचतील… नाहीतरी तिथे सर्वच प्रकारचं प्रदूषण वाढलेलं आहे…
□ पीएमकेअर फंडासाठी तिरंगा आणि राजमुद्रेचा बेकायदा वापर – हायकोर्टाची केंद्राला नोटीस
■ कोरोनाकाळातला सगळ्यात मोठा आर्थिक घोटाळा आहे हा!
□ पंतप्रधानांचे ट्विटर हँडल सुरक्षित नाही, मग इतरांचे काय? काँग्रेसचा लोकसभेत हल्लाबोल
■ जरा कळ काढा… भक्तगण त्यातही मोदीजींचा मास्टरस्ट्रोक शोधून काढतील!
□ गुजरातमधील कोरोनाबळींची संख्या दाखवली होती त्यापेक्षा दुप्पट : सर्वोच्च न्यायालयात सत्य उघड
■ हेच ते लपवाछपवी आणि फेकाफेकीचे भंपक गुजरात मॉडेल!
□ श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात २ पोलिस ठार, १२ अन्य जखमी
■ गोळीबारांचं ठीक आहे, तिथे कुणी दगडफेक करण्याची हिंमत करतंय का? चांगली बाजू बघा ना!
□ लखीमपूरमध्ये शेतकर्यांना गाडीखाली चिरडून मारणे हा अपघात नव्हे, उत्स्फूर्त कृती नव्हे, पूर्वनियोजित कट; केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलावर एसआयटीचा ठपका
■ तरी अजय मिश्रा यांचा राजीनामा घेण्याची हिंमत मोदी करू शकत नाहीत… अरेरे, असे कसे हे मतपेटीपुढे लाचार पोलादी पुरुष!
□ स्टेथस्कोप, टाय, सायकल हेल्मेट, ओव्हन, बांगड्या, खाऊच्या पाकिटांमधून अंमली पदार्थांची अमेरिकेला तस्करी करणारे रॅकेट उघड
■ इतकी कल्पकता पाहून एखादा व्हेंचर कॅपिटलिस्ट स्टार्टअपसाठी पैसा पुरवेल या उद्योगी तस्करांना!
□ महागाईने गाठली १२ वर्षांतील विक्रमी पातळी
■ तरी आमची जनता धार्मिक द्वेषाच्या अं’गाई’गीतात रमून ‘गाई गाई’च करते आहे…