महाराष्ट्र
गद्दारांच्या जीवावर हा
केवढा ताठा केवढी गुर्मी
हुकूमशाहीची हद्द गाठली
जनता घालेल घावच वर्मी
गावापासून देशापर्यंत
म्हणे भाजपा आणा निवडून
लोक दावतील आपला हिसका
बोल शहांचे फेकतील वेचून
याला गाडू त्याला पाडू
महाराष्ट्र ना तुमचा नोकर
पालिकेच्या निवडणुकीतच
बसेल तुम्हाला मोठी ठोकर
—————
तडीपारांचे पाठीराखे
तडीपारीने खचू नका
तुमचेही येतील अच्छे दिन
भविष्य आहे तुमचे उज्वल
रेडी… स्टार्ट… इन मिन तीन
गुंडगिरीचा अनुभव तुमचा
देईल तुम्हाला नक्की साथ
राजकारणात तुम्ही घुसून बघा तर
बनेल उद्याची नक्की बात
जिकडे तिकडे दिसत आहेत
गुंडाराजच्या पाऊलखुणा
करूया क्रांती तडीपारांनो
या जनतेला लावू चुना
—————
एकनाथ शिंदे
पक्ष, चिन्हही चोरून आता
स्मारकावरती आमचा डोळा
माकडउड्या मारून दमलो
तरीही करतो नाद मी खुळा
दिल्लीचीही आहे सावली
मुळी न वाटे कसली धास्ती
दिल्लीपासून गल्लीपर्यंत
आमचीच आहे भरात मस्ती
कोण विचारतो या जनतेला
खरं काय नि खोटं काय
इलेक्शनची वाटते भीती
तिथेच जाईल फाटक्यात पाय
—————
वाल्मीकी कराड
कोण माझे वाकडे करणार
सत्तेत आहेत माझेच मित्र
दहशत आणि गुंडगिरी हे
आमचेच आहे कॉमन क्षेत्र
त्यांच्याच जीवावर मोठा झालो
कसा करतील ते माझा घात
जर अंगाशी आले त्यांच्या
तरच घडेल वेगळी बात
सार्या जगाला आहेत माहीत
त्यांची-आमची सुमधूर नाती
एकेक किस्सा सांगितला तर
दिवसा-उजेडी खातील माती
—————
देवेंद्र फडणवीस
धीट रहा माझ्या मना
कुणापुढेही झुकू नकोस
कितीही दबाव आला जरीही
कुणापुढेही वाकू नकोस
मित्रच वैरी झाले तरीही
पर्वा त्यांची करू नकोस
पीडितांना न्यायही द्याया
कुणालाही तू डरू नकोस
अत्याचार नि अनागोंदी ही
त्यांचा बाऊ करू नकोस
सर्व शक्तीही लाव पणाला
नराधमांपुढे हरू नकोस