• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!

- डॉ. जितेंद्र आव्हाड

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 22, 2021
in भाष्य
0
खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!

कधी थाळ्या वाजवायला
लावल्या नाही..
ना कधी मेणबत्या आणि दिवे
लावायला लावले..
निर्णय घेताना घेतले
विश्वासात..
विरोधकांचे त्यामुळेच फावले..
शांत राहून तो लढत आहे
विरोधकांचे खरंच राईट आहे..
खरंच.. हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!

मंदिर उघडा, बाजार उघडा
शाळा उघडा ते म्हणाले..
परीक्षा पुढे ढकलल्या तर
ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले..
कोरोना वाढला तर ते आता
फक्त सरकारला दोषी ठरवत आहे..
विरोधकांचे खरंच राईट आहे..
खरंच.. हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!

इमान तर विकले नाहीच
ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या..
कोरोनाचे आकडे लपवले नाहीच
खोट्याने न कधी माना झुकल्या..
घरी पत्नी आणि मुलगा
आजारी असतांना तो मात्र लढत आहे..
विरोधकांचे खरंच राईट आहे..
खरंच.. हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!

ना कुठे बडबोलेपणा
ना कशाचा बडेजाव..
आठ हजार कोटीचे
विमान नको..
ना कोणत्या प्रकरणात
घुमजाव..
जे करतोय ते प्रामाणिक पणे
तो करतो आहे..
विरोधकांचे खरंच राईट आहे..
खरंच.. हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!

व्यापार्‍यांचे ऐकून घेतोय..
विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय..
गोर गरीब जनतेला
एकवेळ शिवभोजन मोफत देतोय..
निसर्ग चक्रीवादळ,कोरोना संकट
शेतकर्‍यांच्या अडचणी
साठी तो शांततेत लढतो आहे..
विरोधकांचे खरंच राईट आहे..
खरंच.. हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!

ना क्लीन चिट देता आली..
ना खोटी आकडे वारी देता आली..
निवडणूक काळात तर कधी
ना अशक्य घोषणा त्याला करता आली..
जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय..
विरोधकांचे खरंच राईट आहे..
खरंच.. हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!

महाराष्ट्राचे मीठ खाऊन
निधी पंतप्रधान निधीला ते देताय..
उठ सूठ, सकाळ संध्याकाळ
ते टीका सरकार वर करताय..
तो मात्र टिकेला उत्तर न देता
सर्वसामान्यांसाठी झटत आहे..
विरोधकांचे खरंच राईट आहे..
खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!

Previous Post

कोरोनाविरोधी लढ्यातही महाराष्ट्रच अग्रेसर!

Next Post

कोल्हापूरचं नाद खुळा लशीकरण!

Next Post
कोल्हापूरचं नाद खुळा लशीकरण!

कोल्हापूरचं नाद खुळा लशीकरण!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.