• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नियतीचा क्रूर खेळ!

- योगेश त्रिवेदी (चौफेर)

Nitin Phanse by Nitin Phanse
February 29, 2024
in भाष्य
0

पऽ प्पा ऽऽऽऽऽ! काळीज चिरत जाणारा टाहो तेजस्वी कन्या यश्वीने फोडला आणि आजोबा विनोदजींनी त्या नऊ वर्षाच्या नातीच्या डोक्यावर हात फिरवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या आसवांचा ‘अभिषेक’ होत होता आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला होता. दिवाकर रावते, विजय दारूवाले, भाई विलास पोतनीस अशा असंख्य सहकार्‍यांनी विनोद घोसाळकर यांना सावरण्याचा प्रयत्न केला. चार वर्षांचा सतेज आई आणि आजीकडे आळीपाळीने पहात होता. त्या बिचार्‍याला काही कळत नव्हते. संपूर्ण खोलीतले वातावरण शोकसागरात बुडाले होते. एक राजबिंडे, हसतमुख युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले होते आणि त्याचे पार्थिव काचेच्या पेटीत पुढच्या प्रवासाची प्रतीक्षा करीत होते. या नऊ वर्षांची यश्वी आणि चार वर्षांच्या सतेजचा काय दोष होता? त्यांनी काय गुन्हा केला होता की, ही कठोर शिक्षा देत नियतीने या लेकरांबरोबर अत्यंत क्रूर चेष्टा केली.
शिवसेना उपनेते आणि मुंबई घर दुरूस्ती मंडळाचे माजी अध्यक्ष विनोद घोसाळकर हे नित्यकर्मे उरकून शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासमवेतच्या एका कार्यक्रमासाठी निघाले होते. अभिषेक घोसाळकर हे आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री येथे गेले. तिथे चर्चा करून बोरीवली येथे पोहोचले. अभिषेक आणि विनोद घोसाळकर यांचा भ्रमणध्वनीवर संपर्क सुरूच होता. सौ. तेजस्विनी अभिषेक घोसाळकर याही घरातली कामं हातावेगळी करून हळदीकुंकू आणि साडीवाटप या कार्यक्रमांसाठी औदुंबर येथून बाहेर पडल्या होत्या. बोरीवली पश्चिम येथील आयसी कॉलनीतील आपल्या कार्यालयाकडे अभिषेक निघाले. इतक्यात मॉरिस नरोन्हाने त्यांना त्याच्या कार्यालयात बोलावून घेतले.
भोळ्या भाबड्या अभिषेकने विश्वास ठेवून मॉरिसचे कार्यालय गाठले. आता आपण एकत्र काम करून आयसी कॉलनीत विकासाची, प्रगतीची वाटचाल करूया, फेसबुक लाइव्हवरून नागरिकांना आपल्या एकत्र येण्याची माहिती देऊ या, असे मॉरिसने सांगितले. अभिषेक आयसी कॉलनीत विकासाची गंगा आणण्यासाठी भगीरथ होऊन विश्वासाने पुढे निघाला. पण त्याला काय माहित की यमराजाच्या रूपात कोण मॉरिसच्या कार्यालयाबाहेर दबा धरून बसलाय! भोळसटपणाने सर्व संवादात भाग घेऊन अभिषेक उठतोय तोच धाड धाड अशा एक दोन तीन चार आणि पाच गोळ्यांनी त्याच्या शरीराचा वेध घेतला होता. अतिशय करूण परिस्थितीत अभिषेकला करूणा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. विनोद घोसाळकर यांना गोळीबाराची बातमी कळताच त्यांनीही हॉस्पिटलकडे धाव घेतली. वैद्यकीय अधिकारी सारे प्रयत्न करीत होते, पण अभिषेकने इहलोकीची यात्रा आधीच संपवली होती.
नियतीने काय खेळ मांडला होता! मुलाचे पार्थिव समोर असतांना सारे दु:ख गिळून विनोद घोसाळकर यांनी अभिषेकचे पार्थिव दहिसर स्पोर्ट्स फौंडेशनच्या सभागृहात ठेवण्याच्या सूचना देत अभिषेकची माऊली वैभवी, सून तेजस्विनी आणि कुटुंबियांना अभिषेक आपल्यात आता नाही, याची कुणकुण लागू दिली नाही. जे. जे. रूग्णालयात पुढचे सोपस्कार पार पाडून पार्थिव औदुंबर येथे आणण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्व कार्यक्रम रद्द करीत बोरीवलीला धाव घेतली. शिवसेनेचे तमाम नेते, उपनेते, पदाधिकारी औदुंबर परिसरात मोठ्या संख्येने जमले. शोकाकुल वातावरणात अभिषेक घोसाळकर या राजबिंड्या, सदैव हसतमुख अशा युवा नेतृत्वाला साश्रुनयनांनी निरोप दिला.
या संपूर्ण दु:खमय परिस्थितीत गलिच्छ आरोप करून घोसाळकर यांच्या राजकीय, सामाजिक जीवनाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न काही नतद्रष्ट लोकांनी केला. घोसाळकर यांनी प्रसंगावधान राखून या संदर्भात एक निवेदन प्रसृत केले आहे. त्यात म्हटले आहे की, माझा मुलगा अभिषेक याची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. असे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ थांबवा.
‘१९८२पासून मी सक्रिय राजकारणात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्राचे तंतोतंत पालन करत आहे. मी आणि माझा पुत्र अभिषेक आम्ही निरपेक्षपणे आणि निष्ठेने समाजकारण आणि राजकारण केले आहे. शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत, कोणताही डाग आमच्यावर नाही. मी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. नंतर विधानसभेवर निवडून गेलो. मुलगा अभिषेक, सून तेजस्वी हेसुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले. जनतेचे प्रेम आणि विश्वास आम्हाला मिळाला. त्याला आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही. जनतेची आम्ही नि:स्वार्थपणे सेवा केली, असे घोसाळकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे, अशा तीव्र भावना घोसाळकर यांनी निवेदनात व्यक्त केल्या आहेत.

Previous Post

विधान भवनावर पुन्हा भगवा फडकवणार!

Next Post

इलेक्टोरल बाँड्सचा पर्दाफाश!

Next Post

इलेक्टोरल बाँड्सचा पर्दाफाश!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.