• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

घोडेबाजार

- सॅबी परेरा (कहीं पे निगाहें...)

चित्रसेन चित्रे by चित्रसेन चित्रे
April 21, 2022
in कहीं पे निगाहें...
0

आज दसरा नाही की पाडवा नाही, की कसली निवडणूक जवळ आलेली नाही. तरीही आपल्या सर्वोच्च नेत्याने समस्त घोड्यांचा मेळावा बोलावला आहे. त्याअर्थी काहीतरी महत्वाचं असणार. कुणीतरी आपला एरिया या जंगलापासून तोडून टाकण्याचा डाव टाकला असणार, किंवा ‘अश्वधर्म खतरे में’ असणार किंवा दंडातल्या बेटकुळ्या फुगवून कुणा संभाव्य आभासी शत्रूला दाखवावयाच्या असणार, हे देशभरातील तमाम घोड्यांनी ओळखलं आणि ते सर्व घोडे दौडत दौडत जंगलाच्या मध्यभागी असलेल्या मैदानात जमा झाले.
मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर लक्षात आलं की केवळ आपल्याच एरियातील नव्हे तर मारवाडी, राजस्थानी, अरेबियन,
हॅक्ने, ओर्लो, जिप्सी, प्रिâशियन, मॉर्गन असे देशोदेशीचे नामचीन जातीचे घोडे तिथे जातीने हजर होते. फक्त चायनीज घोड्यांना या मेळाव्यात मज्जाव होता. पण बरेचसे चायनीज घोडे आखातात जाऊन तिथून आखाती पासपोर्टवर आलेले दिसत होते.
रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या फ्लेक्स बॅनर्स आणि झेंड्यावरून आणि सभास्थानी वाटण्यात येणार्‍या पॅम्प्लेटवरून लक्षात येत होतं की घोड्यांना बदनाम करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय कट रचला गेला असून त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तसेच हजारो वर्षे मनुष्यप्राण्यांची सेवा करून देखील योग्य सन्मान मिळत नसल्याबद्दल घोड्यांच्या मनात जो असंतोष खदखदत आहे त्याला वाचा फोडावी आणि काही ठोस कृती कार्यक्रम ठरवावा ह्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले होते.
अखिल भारतीय अश्व पार्टीचे पहिल्या फळीचे नेते व्यासपीठावर पोहोचले तेव्हा चहुबाजूने ‘घोडों का यह अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान’ अशा राष्ट्रभाषेत घोषणा देण्यात येऊ लागल्या. एकेकाळी आमदारकी भूषविलेल्या आणि चारपाच पक्ष फिरून आलेल्या एका वयोवृद्ध घोड्याच्या हस्ते व्यासपीठासमोर नारळ वाढवून सभेची सुरुवात करण्यात आली. नारळ वाढविण्याच्या प्रयत्नात दगड फुटला, त्या वयोवृद्ध घोड्याच्या हाताला खरचटलं. तो वैतागून म्हणाला, ‘साला, या नारळापेक्षा आम्ही आमदार बरे!’
सभेच्या सुरुवातीलाच हिरवी पँट, लाल शर्ट आणि त्यावर पिवळं जॅकेट घातलेल्या एका घोड-नेत्याने भाषणाची सुरुवात करताना ‘र’ ला ‘र’ आणि ‘ट’ ला ‘ट’ जुळवून एक कविता सादर करून हशा आणि टाळ्या वसूल केल्या. भाषणात तो नेता म्हणाला की, ‘या मनुष्यप्राण्याला आपण उगाच घोड्यावर चढवलंय, ही आपली घोडचूक आहे. आपण काही मागण्या मांडल्या की ही माणसं घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे असा चेहरा करतात. आपल्याला दाखवण्यापुरते केवळ कागदी घोडे नाचवतात आणि घोड्यावर बसून निघून जातात. पण आता ही आपल्या सन्मानाची आरपारची लढाई आहे. ही लढाई आपण जिंकणार. संविधानिक मार्गाने ते नाही मानले तर आपण त्यांच्या कानाखाली घोडा लावणार. पण आपले हक्क आपण मिळविणार. कारण घोडामैदान जवळच आहे.’ त्या नेत्याला नक्की काय सांगायचं होतं हे कुणालाच कळलं नाही. पण सभेच्या प्रवेशद्वारावरच मिळालेल्या स्नॅक्सच्या पाकिटाची आणि पाण्याच्या बाटलीची परतफेड म्हणून त्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यानंतर पहिल्या-दुसर्‍या फळीतील काही नेत्यांची आणि खेचरांच्या पक्षातून पक्षांतर करून घोड्यांच्या पक्षात आल्यामुळे स्टेजचा मान मिळालेल्या दलबदलू नेत्यांची, ‘बाटग्यांची बांग जोरात’ या न्यायाने आवेशपूर्ण आणि आगलावू भाषणे झाली. सर्वात शेवटी प्रमुख नेता बोलायला उभा राहिला. तो माईकवर येताच त्याच्या जयजयकाराने अवघा परिसर दुमदुमून गेला. आपल्या नावाने या गगनभेदी घोषणा देणारा हा जनसमुदाय, आपण निवडणूक लढवतो तेव्हा कुठे जातो असा मनातल्या मनात विचार करत प्रमुख नेता आपल्या हातखंडा स्टाईल मधे बोलू लागला.
तो म्हणाला, आपण घोडे, साडेपाच करोड वर्षांपासून या पृथ्वीवर वावरत आहोत. मनुष्यप्राणी अगदी अलीकडे इथे आला. तो उपरा आहे. आपण पृथ्वीचे मूळ रहिवासी असूनही कालपरवा आलेल्या या उपर्‍या मनुष्यप्राण्यांकडे आपल्याला गुलामासारखे राहावे लागते आहे. त्यांना पाठीवर घेऊन डोंगरदर्‍यातून धावावे लागत आहे. टांगा ओढावा लागतो आहे. शर्यतीत धावावे लागते आहे. इतकेच नव्हे तर स्वतःला राजे-महाराजे समजणार्‍या मनुष्यप्राण्याच्या आपापसातील
प्रॉपर्टी आणि बायकांवरील स्वामित्वहक्कासाठी आपल्याला लढाया लढाव्या लागत आहेत. ही आपल्यासाठी शरमेची बाब आहे. अरे, केवळ बापाकडे पैसे आहेत म्हणून, कुणीही सोम्यागोम्या येऊन उमद्या घोड्याच्या पाठीवर बसतो. मी तुम्हाला सांगतो, वार्‍याच्या वेगाने दौडणार्‍या अरबी घोड्यावर, वरातीसाठी एखाद्या शेंबड्या नवरदेवाला बसवणे म्हणजे ‘सबवे सर्फर’च्या चॅम्पियनला नोकिया-११०० हँडसेट देण्यासारखे आहे.
दिवसाला अठरा तास काम करून केवळ नाममात्र झोपण्याचा दावा करणार्‍यांचा या देशात उदो उदो केला जातो. मात्र ज्यांना झोपही उभ्याउभ्याच घ्यावी लागते अशा आपणा घोड्यांच्या नशिबी अशी तारीफ येत नाही. हल्ली तर परिस्थिती इतकी बिघडलीय की ही उभ्याउभ्या झोपही सुखासुखी शांतपणे घेता येत नाही. अरे, आपण साखरझोपेत असताना समोरच्या खुराड्यातून कोंबडे बांग देतात आणि आपली झोपमोड होते. मी तुम्हाला आवाहन करतो की यापुढे कुठल्याही खुराड्यातून कोंबड्याच्या बांगेचा आवाज आला तर माझे अश्वबंधू त्या खुराड्यासमोर सामूहिक खिंकाळण्याचा कार्यक्रम करतील. लक्षात ठेवा, आम्हाला शांतता प्रिय आहे आणि शांततेसाठी आम्ही तोंडाने आवाज करायला आणि कानाखाली आवाज काढायलाही मागेपुढे पाहणार नाही.
मित्रहो, आम्ही वारंवार भूमिका बदलतो. कधी एकाला तर कधी दुसर्‍याला सोयीस्कर भूमिका घेतो असा समज झाल्याने काही कार्यकर्ते आमच्यावर नाराज आहेत. ही नाराजीची भावना, दुसर्‍या फळीतील काही नाराज नेत्यांनी पहिल्या फळीतील नाराज नेत्यांकडे पोहोचवली आणि त्यांनी ती आम्हां श्रेष्ठींकडे पोहोचवल्यानंतर उरलेसुरले श्रेष्ठीही खूपच नाराज झाले आहेत. हे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगू इच्छितो.
मघाशी आमचा एक नेता म्हणाला की, हा देश आपल्या मर्जीप्रमाणे चालवायचा असेल तर आपण घोड्यांनी पार्लमेंटमधे गेलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. घोडे पार्लमेंटमधे गेले म्हणून ते राज्यकर्ते होत नाहीत, तर पार्लमेंट हेच एक रेसकोर्स होते. तुम्हाला ठाऊक असेलच की रेसकोर्सवरील शर्यतीत, घोडे कधीच जिंकत नाहीत. घोडे फक्त धावतात. तिथे जिंकतात ते घोड्यावर पैसे लावणारे शेटजी. तुम्हाला घोडे म्हणून धावायचं असेल तर खुशाल धावा, पण मला शेटजी व्हायचं आहे हे लक्षात ठेवा.
अरे पाठीवर स्वार झालेल्या मालकाच्या मर्जीप्रमाणे चौफेर दौडणारे आपण घोडे, पण हा मनुष्यप्राणी इतका कृतघ्न की तो मागील कित्येक वर्षांपासून पोराबाळांना गाणी शिकविताना ‘लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोडे की दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा’ असं आपल्या शेपटीवर हातोडा मारून हिंसेला प्रोत्साहन देणारं गाणं शिकवितो. मुलांसाठी गाणं म्हणून आपण आजवर त्यावर दुर्लक्ष करीत आलो. लग्न होत नसलेल्या व्यक्तीला घोडनवरा किंवा घोडनवरी म्हणून हिणवलं तेव्हाही आपण गप्पच राहिलो. पण आता मात्र पाणी डोक्यावरून जाऊ लागलं आहे.
मित्रहो, निवडणुका होतात. सरकार बनविण्याइतकं बहुमत कुठल्याच पक्षाला मिळत नाही. अशावेळी मोठे पक्ष इतर छोट्यामोठ्या पक्षातील निवडून आलेल्या आमदार/खासदाराला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी पैसा, पद अशी बरीच आश्वासने देऊन निवडून आलेले उमेदवार खरेदी केले जातात. या घाणेरड्या व्यवहाराला ‘घोडेबाजार’ असं नाव दिलं जातं. अरे मी म्हणतो, यात आम्हा घोड्यांचा काय संबंध? मालकाशी इमानदार राहण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या आम्हा घोड्यांना या बेईमानीच्या व्यवहाराशी का जोडता? जो माणूस भूमिका बदलताना माकडासारख्या कोलांटउड्या मारतो, सतत कुत्र्यासारखा संधीचा वास काढत असतो, राजकीय, वैचारिक विरोधकाला सापासारखा दंश करतो, वाळूत डोके खुपसून शहामृगासारखं जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो, घुबडांसारखा जो अंधाराचा सोबती असतो आणि स्वार्थ पाहून सरड्यासारखा रंग बदलत असतो त्या मनुष्यप्राण्याने दुसर्‍याचं इमान विकत घेण्याच्या क्रियेला ‘घोडेबाजार’ असं नाव देणे हा समस्त अश्व जातीचा अपमान आहे. योग्य वेळी या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय आपण राहणार नाही.
‘साहेब तुम्ही आदेश द्या, आम्ही तयार आहोत’ श्रोत्यांतून एक तरुण घोडा ओरडला आणि पाठोपाठ सगळा अश्वसमुदाय हेच जोरजोरात ओरडू लागला.अश्व-श्रोत्यांना शांत करीत नेता बोलला, सध्यातरी आपण यावर काही आक्रमक अ‍ॅक्शन घेणार नाही आहोत. आपण राज्यपालांना एक निषेधाचं पत्र देणार आहोत, इंटरनेटवर एक सिग्नेचर कॅम्पेन सुरु करणार आहोत आणि हुतात्मा चौकात धरणे धरणार आहोत..
‘या बुळबुळीत निषेधाने काय होणार’ पहिल्या रांगेतील एका घोड्याने जोरात विचारले?
‘होणार कदाचित काहीच नाही. पण लक्षात घ्या, निवडणूक खूप दूर आहे. आपल्याला अजून आपले मित्र कोण शत्रू कोण हे ठाऊक नाहीत. आपल्याला अजून आपला बाजारभावही ठाऊक नाही. तो ठरविण्यासाठी आणि आपली एमआरपी जमेल तितकी वाढवून घेण्यासाठी या मेळाव्याची गरज होती. तुम्ही सर्व इथे आलात याबद्दल तुमचे आभार! जय अश्वशक्ती!

[email protected]

Previous Post

‘बनवाबनवी’चा ‘बेस्ट’ अवतार!

Next Post

मालवणी फिश करी

Related Posts

कहीं पे निगाहें...

निंदकाचे घर…

October 6, 2022
कहीं पे निगाहें...

रात्रीच्या गरबात असे…

September 22, 2022
कहीं पे निगाहें...

शिक्षकांच्या बैलाला…

September 8, 2022
कहीं पे निगाहें...

देवा हो देवा!

August 25, 2022
Next Post

मालवणी फिश करी

बुरखा

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.