प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डिस्कव्हरी प्लस वाहिनीने आपल्या लोकप्रिय मिशन फ्रंटलाईन आणि ब्रेकिंग पॉईंट या फ्रँचायजीमध्ये नवीन मालिका सुरू करायचे ठरवले आहे. 20 जानेवारी रोजी सादर होणाऱ्या ‘मिशन फ्रंटलाईन’मध्ये कलाकार, लेखक, निर्माता व सादरकर्ता फरहान अख्तर व त्याच्यासोबत प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता रोहीत शेट्टी खडतर प्रशिक्षण घेताना दिसणार आहेत, तर 21 जानेवारी रोजी ‘ब्रेकिंग पॉईंट’ मालिकेमध्ये चार नवीन डॉक्युमेंटरीजचा शुभारंभ केला जाणार आहे. या शोमध्ये पॅराट्रूपर्स, रणगाडे, पायदळ आणि हवाई दळ ह्या विविध सैनिकांच्या गटांच्या प्रशिक्षणाची झलक बघायला मिळेल. ही थरारक कृत्ये प्रेक्षक थक्क होतील. नाशिक, जोधपूर, अहमदनगर, आग्रा, जैसलमेर आणि सरमथुरा अशा शहरांमधील भारताच्या मुख्य संस्थांमध्ये देण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणाला आजवर पहिल्यांदाच बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल. आपल्या ह्या प्रशिक्षण अनुभवाबद्दल बोलताना फरहान अख्तर म्हणतो, “आम्ही लक्ष्यचे शूटींग करत होतो, तेव्हा आम्ही आपल्या जवानांचे व्यक्तिगत जीवन अगदी जवळून बघू शकलो होतो. परंतु त्यांच्या जागी जाऊन राहणे आणि प्रत्यक्ष त्यांच्या समोर असलेल्या कठीण परिस्थितीला सामोरे जाणे, हा जीवन बदलणारा अनुभव होता. अशा प्रतिकूल प्रदेशामध्ये व विपरित स्थितीमध्ये प्रशिक्षण प्राप्त करणे, हे माझ्यासाठी अतिशय कठीण होते. म्हणून ‘मिशन फ्रंटलाईनचा’ भाग बनणे व ही संधी मिळणे माझा सन्मान आहे.”