• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

इतना आसां नहीं कमाल खान होना

- (व्हायरल)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 24, 2022
in व्हायरल
0

चालती-बोलती माणसं अशी अचानक चालता-चालता अचानक आपल्यातून निघून जाणं, हे अलीकडच्या काळात खूप व्हायला लागलं आहे. त्यात ही माणसं जवळची, ओळखीची, ज्यांना दीर्घायुष्य लाभावे, असं वाटावं अशी माणसं.
कमाल खान हा काही आपल्या नात्यातला, मित्रपरिवारातला नव्हता. तो काही कोणी थोर नेता, विचारवंत किंवा ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ताही नव्हता, पण तरीही कमाल खान हा हिंदी बातम्या बघणार्‍या/ऐकणार्‍या लाखो लोकांना प्रिय असा माणूस होता. हातात कुठल्यातरी वृत्त वाहिनीचा बूम धरून रोज शेकडो चॅनेल्सवर दिसणार्‍या हजारो वार्ताहरांपैकी तो एक होता, पण स्वतःच्या कर्तृत्वामुळे, स्वतःच्या विशिष्ट शैलीमुळे, अभिजात आणि रसाळ लखनवी हिंदी भाषेच्या अत्यंत अदबशीर लहेज्यामुळे तो एका अर्थाने एकमेवाद्वितीय होता.
त्याच्या अशा अचानक निघून जाण्याने एका वृत्तवाहिनेचे नव्हे तर एकूणच पत्रकारितेचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रसंगी त्याची पत्नी रुची आणि त्याच्या मुलांना सांत्वनाचे दोन शब्द पोचवण्यापलीकडे आपण करू तरी काय शकतो?
पण मला या निमित्ताने जे सांगायचे आहे ते हे की कोणत्याही पत्रकाराचे कमाल खान होणे सोपे नसते; फार फार कठीण असते.
गेल्या पंधरा-वीस वर्षांत भारतातील पत्रकारिता पार रसातळाला गेली आहे. त्यातही वृत्त वाहिन्या- मग त्या तथाकथित राष्ट्रीय असोत की प्रादेशिक- त्या तर चिखलाचे तळे झालेल्या आहेत. आता वर्तमानपत्रात हवे ते छापून आणण्यासाठी आणि वृत्त वाहिन्यांत हवे ते दाखवून घेण्यासाठी पत्रकाराचे भ्रष्ट असणे गरजेचे उरलेले नाही; संपादक ओळखीचा किंवा भ्रष्ट असणेही गरजेचे नाही. राजकीय पक्ष आणि काही कंपन्या सरळ त्या वृत्तसंस्थेच्या मालकाला किंवा व्यवस्थापनाला थेट पैसे देऊन हे काम करून घेतात. लोकांचे शिव्याशाप मात्र तुटपुंज्या पगारावर काम करणार्‍या पोटार्थी पत्रकारांच्या वाट्याला येतात. या पार्श्वभूमीवर द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, एनडीटीव्ही यासारखे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशा वृत्तसंस्था आपली पत आणि प्रतिष्ठा टिकवून आहेत.
म्हणूनच रवीश कुमार आणि कमाल खान हे एका अर्थी भाग्यवान पत्रकार आहेत की ज्यांना त्यांच्या व्यवस्थापनामुळे उत्तम, नैतिक पत्रकारिता करता तरी येते. कमाल खान जर आज तक, इंडिया न्यूज, रिपब्लिक टीव्हीसारख्या वृत्तवाहिनीत असता तर?
पण नुसते भाग्यवान असून चालत नाही. एखाद्या पत्रकाराची कारकीर्द अनेकानेक कारणांनी उभी होत असते. कमाल खानची कारकीर्द ही त्याच्या कष्टाने, अभ्यासू वृत्तीने, सतत करत राहिलेल्या वाचनाने, नेमके संदर्भ गोळा करत राहण्याच्या व ते संदर्भ योग्यवेळी वापरण्याच्या वृत्तीमुळे आणि त्याने आपली भाषा उत्तम असावी यासाठी भाषेवर केलेल्या कष्टसाध्य संस्कारांमुळे घडली आहे. तो प्रवासात असताना त्यांच्या गाडीत खूप सारी पुस्तकं असायची जी तो सतत वाचत असायचा आणि त्यादरम्यान काही नोट्स घेऊन ठेवत असे जे त्याला नंतर उपयोगी पडायचे.
त्याला जसे उत्तम शेर पाठ होते, तश्याच उत्तम कविताही. कधी कुराणातील दाखले द्यायचा तर कधी रामचरितमानस मधल्या ओळी त्याच्या रसाळ वाणीतून श्रोत्यांपर्यंत पोचायच्या. कमाल खानने केलेले गेल्या दोन-अडीच दशकांतले अयोध्येचे वार्तांकन हा माझ्यामते श्रेष्ठ पत्रकारितेचा वस्तुपाठ होता. त्याला अयोध्येतील वीट-न-वीट ठाऊक होती. एकेक माणूस, महंत त्याच्या ओळखीचा होता. म्हणूनच त्याला तिथे वार्तांकन करताना त्याचे ‘खान’ असणे आड येत नसे!
पण हा इतिहास आहे.
योगीचे सरकार सत्तेत आल्यानंतर हे चित्र बदलले होते. हळूहळू त्याचे ‘खान’ असणे आणि त्यात तो एनडीटीव्हीचा असणे त्याच्या विरोधात जायला लागले होते. भाजपचे मुख्यमंत्री आणि मंत्री त्याला टाळू लागले होते. अलीकडे तर मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला त्याला निमंत्रितही करत नव्हते! पण तो आपले दुःख बोलून दाखवत नसे. तटस्थपणे आपले काम करत असे. अगदी काल संध्याकाळपर्यंत तो कामच करत राहिला.
मध्य प्रदेशातही अगदी असेच होत आहे. एनडीटीव्हीच्या अनुराग द्वारीला मुख्यमंत्री शिवराज चौहानही आपल्या पत्रकार परिषदेत आमंत्रित करत नाही.
या पार्श्वभूमीवर एखाद्याचे कमाल खान म्हणून घडणे नि असणे, हे काही सोपे नाही.
इतना आसां नहीं कमाल खान होना!
कमाल साहब,
इस अदना दोस्त का आखिरी सलाम कुबूल कीजिये! अलविदा!!

– गणेश कनाटे

Previous Post

बेपत्ता मुलाचं गूढ…

Next Post

पोक्याची लगीनघाई!

Related Posts

व्हायरल

बाबा… सोबत आहेत… राहतील

June 22, 2023
व्हायरल

हाफ प्लेट

June 22, 2023
बिनलशीचा चॅम्पियन
व्हायरल

बिनलशीचा चॅम्पियन

June 22, 2023
व्हायरल

आगरकर आणि नेहरू लायब्ररी

June 22, 2023
Next Post

पोक्याची लगीनघाई!

नया है वह

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.