• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

खाणे आणि गाणे एकसाथ…

- नितीन फणसे (रंगतरंग)

नितीन फणसे by नितीन फणसे
August 18, 2021
in सिनेमा
0
खाणे आणि गाणे एकसाथ…

माझा शो सुरू करायचा तर त्यात काही वेगळं असायला हवं. मी गायक, संगीतकार आहे, तर रेसिपी करता करता लोकांना जर छान गाणी ऐकवता आली, तर ते इंटरेस्टिंग होईल ही कल्पना मनात आली आणि हा शो तयार झाला. माझी स्वत:ची गाणी तर आहेतच, पण इतरही वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी मी सहज ऐकवू शकतो. गाणी ऐकवत ऐकवत लोकांना एखादा पदार्थ करून दाखवायचा. हीच आहे ‘गवय्या ते खवय्या’ची युनिक कॉन्सेप्ट.
—-

मुसळधार पाऊस… मस्त वातावरण… अशावेळी चटपटीत पदार्थ आणि गाणी हा माहौल असेल तर…? भन्नाटच ना… नेमकी हीच थीम घेऊन प्रसिद्ध गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांनी ‘गवय्या ते खवय्या’ हा मजेदार कुकिंग शो नुकताच यूट्युब चॅनलवर स्वत:च्या पेजवर आणला आहे. या शोचं वैशिष्ट्य असं की, तो दिसायला एक रेसिपी शो असला तरी त्यात फक्त तेवढेच नाही. ते एखादा चटकदार पदार्थ करून दाखवतातच, पण त्यात मध्ये मध्ये ते प्रेक्षकांना बहारदार गाण्यांचे मुखडे गाऊन दाखवतात. पण फक्त गाणीच नाहीत हं… त्या गाण्यामागची आपल्याला माहीत नसलेली एखादी घटनाही ते नकळत सांगून जातात.

ही कल्पना कशी सुचली हे सांगताना मिलिंद म्हणतात, मला लहानपणापासूनच खाद्यपदार्थ बनवून बघण्याची प्रचंड आवड होती. तेव्हा आजीकडे काही काळ राहिलो होतो. तेव्हा ती बाजारात भाजीपाला, वेगवेगळे जिन्नस घ्यायला जायची, तेव्हा मला बरोबर घेऊन जायची. तेव्हा भाजी चांगली कशी, वाईट कुठली हे शिकलो. मग मुंबईत आलो तर आईकडूनही तेच शिकलो. ती म्हणायची, आम्ही बाहेर गेलो तर तुला जेवण बनवून खाता आलं पाहिजे. त्यामुळे भाजी, फुलके बनवणं यायला लागलं. आमटी कशी करायची, कुकर कसा लावायचा हे सगळं मी तेव्हाच शिकलो. खवय्या तर मी लहानपणापासून होतोच. मी खाण्याच्या बाबतीत खूप चोखंदळ आहे. म्हणजे एखाद्या पदार्थात मीठ, मसाला वगैरे मला बरोबरच पडायला हवं असतं. चव अशी म्हणजे अशीच हवी असते. त्यामुळे गेले काही महिने माझ्या डोक्यात ही कल्पना होतीच. खिलवण्याचीही मला खूप आवड आहे. हे सगळं घेऊन सोशल मीडियावर काही करता येईल का हा विचार मी करायला लागलो. तेव्हा पाहिलं की यूट्युबवर रेसिपीचे शोज खूप आहेत. माझा शो सुरू करायचा तर त्यात काही वेगळं असायला हवं. मी गायक, संगीतकार आहे, तर रेसिपी करता करता लोकांना जर छान गाणी ऐकवता आली, तर ते इंटरेस्टिंग होईल ही कल्पना मनात आली आणि हा शो तयार झाला. माझी स्वत:ची गाणी तर आहेतच, पण इतरही वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी मी सहज ऐकवू शकतो. गाणी ऐकवत ऐकवत लोकांना एखादा पदार्थ करून दाखवायचा. घरच्या घरी असे व्हिडीओज करता आले असते, पण मी म्हटलं जरा प्रोफेशनली करून बघू… किचन, शूटिंग, तीन कॅमेरा सेटअप या सगळ्या गोष्टी मी शोधल्या. त्यामुळे हा शो बघाल तर त्याला प्रोफेशनल लुक आलेला दिसेल. फूड कनेक्ट नावाची कंपनी मला यात मदत करतेय. माझी स्वत:ची प्रॉडक्शन कंपनीही आहे. तिच्या अंतर्गत आम्ही हे प्रॉडक्शन करतोय.

आता प्रॉडक्शनचं काम म्हटलं तरी त्यासाठी खर्च होतोच. हे सगळं कसं मॅनेज करता? असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. यावर बोलताना इंगळे म्हणाले, हो तर… खर्च तर होतोच. यासाठीच मग काही स्पॉन्सर्स बघितलेत. त्यामुळेच मला हे शक्य झालंय. आत्ता तरी हा शो मी यूट्युब चॅनेलवर सुरू केलाय. हा शो जसजसा जास्तीत जास्त लोक बघतील, माझे हे चॅनल सबस्क्राईब करतील, तसतसं त्यापासून काही उत्पन्न सुरू होईल. हे सोपं नक्कीच नाहीये. तुमचा व्हिडिओ एक लाख वा त्याहून जास्त लोकांनी पाहिला, की नंतर तुमचं इन्कम सुरू होतं. ते सुरू व्हायला बर्‍यापैकी वेळ लागतो. पण आत्ता तरी स्पॉन्सर्स महत्त्वाचे ठरताहेत. या शोची कॉन्सेप्ट वेगळी असल्यामुळे स्पॉन्सर्सना ते आवडतंय. एका महिन्यात मला आठ शोज शूट करावे लागतात. मग त्या त्या शोसाठी मी स्पॉन्सर मिळवतो. आत्ता मला व्ही. पी. बेडेकर हे स्पॉन्सर आहेत. ते पहिल्या आठ शोजसाठी स्पॉन्सर असतील. आणखीही काही स्पॉन्सर कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत.

इंगळे यांच्या या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. आपले वेगवेगळे सण येत असतात. त्या त्या वेळी येणार्‍या शोमध्ये इंगळे यांनी त्या त्या सणाला अनुसरून विशेष खाद्यपदार्थ बनवायला सुरुवात केली आहे. काहीच दिवसांपूर्वी आषाढी एकादशी होऊन गेली. त्यानिमित्ताने मिलिंद यांनी उपवासाचे साबुदाण्याचे काही पदार्थ करून दाखवले. त्यावेळी विठ्ठलाचा अभंग त्यांनी प्रेक्षकांना ऐकवला. गेला अख्खा जुलै महिना त्यांनी पावसाळी गाणी ऐकवली. पावसाळ्यातले खाद्यपदार्थ आणि पावसाळी गाणी अशी थीमच त्यांनी जुलै महिन्यात राबवली. पावसाळ्यात लोकांना भजी खायला आवडते, पाणीपुरी आवडते. ते आणि मूगडाळीचे वडे त्यांनी करून दाखवले. मेहंदी हसनचा जन्मदिवस होता त्या आसपास इंगळेंनी त्यांच्या गझला म्हटल्या आणि त्यामागच्या काही चटकदार आठवणी सांगितल्या.

विशेष म्हणजे इंगळे निव्वळ करायचं म्हणून काहीतरी करत नाहीत. आपल्या प्रत्येक शोचे ते खास स्क्रिप्टिंग करून घेतात. समीरा गुजर प्रत्येक शोचे स्क्रिप्टिंग करते. शोसाठी खास टायटल साँगही इंगळे यांनी करवून घेतले आहे. या गाण्याचे बोल आणि संगीत मिलिंद इंगळे यांनीच दिले आहे. प्रत्येक शोच्या सुरुवातीला हे ३५ सेकंदांचे गाणे दिसते. यात या शोची संपूर्ण संकल्पना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मुलाने म्हणजे सुरेल इंगळे याने या गाण्याचे अ‍ॅरेंजिंग आणि प्रोग्रॅमिंग केलेय.

हा शो एखाद्या चॅनेलवर वगैरे सहज दाखवला जाऊ शकतो, पण इंगळे म्हणतात, चॅनेलला ऑप्रोच होऊन तेथे शो करण्यात बराच वेळ निघून गेला असता. सोशल मीडिया सध्या एवढं प्रचंड वाढलाय की लोकांना शो आवडला तर तो व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. शिवाय ‘गवय्या ते खवय्या’ हा शो मला चॅनलपेक्षा सोशल माध्यमांसाठी आयडियल वाटला. कारण गाणे आणि खाणे लोकांना कधीही आवडते. दोन्ही गोष्टी एकत्र मिळाल्या तर लोकांना ते आवडेलच. म्हणूनच तर फेसबुकवर मला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. वीस-वीस हजार, पंचवीस हजार व्ह्यूज मला प्रत्येक शोवर दिसत आहेत. कमेंट्सही सुंदर देतात. शो अपलोड केला की ओळखीचे लोक लगेच व्हॉट्सअपवर सांगतात, सर शो आवडला. आम्ही लगेच वडे करून बघितले वगैरे. त्यामुळे हे सगळं करायला खूप मजा येतेय.

‘गवय्या ते खवय्या’ या मिलिंद इंगळेंच्या यूट्युब शोला खूपच कमेंट्स आलेल्या दिसतात. शो आवडल्याच्या भरपूरच असतात, पण त्यामध्ये काही सूचनाही असतात. या शोमध्ये आणखी असे कराल तर आणखी छान वाटेल वगैरे लोक सुचवत असतात हेही त्यांनी सांगितले. पण एकूणच वेगळी संकल्पना असल्यामुळे हळूहळू शोची लोकप्रियता वाढायला लागली आहे हे नक्की.

– नितीन फणसे

(लेखक ‘मार्मिक’चे उपसंपादक आहेत)

Previous Post

अश्वत्थाम्याच्या चिरंतन वेदनेचं भळभळतं गीत…

Next Post

दिव्याच्या अवसेचे खायचे दिवे

Related Posts

सिनेमा

इतिहासात घडणारा मुळशी पॅटर्न

June 9, 2022
सिनेमा

दिसायला चांगला पण लवचिक!

December 1, 2021
सिनेमा

खवय्यांसाठी खास यूट्यूब चॅनेल : लवंगी मिरची

September 16, 2021
सिनेमा

शब्दांच्या पलिकडल्या आशाताई!

September 2, 2021
Next Post

दिव्याच्या अवसेचे खायचे दिवे

संपलो एकदाचो लॉकडावन

संपलो एकदाचो लॉकडावन

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.