(ह्या कथेत इंटरनेटच्या एका वेगळ्याच जगाची ओळख करून दिली आहे. ही कथा वाचत राहा, तिचा आनंद घ्या पण चुकूनही ह्या जगाची ओळख स्वत: करून घ्यायचा प्रयत्न करू नका हीच कळकळीची विनंती.)
गोष्ट तशी फारशी जुनी नाही. पाच सहा वर्षापूर्वी मी माझे गुजरात, राजस्थानमधले काम संपवून नुकताच पुण्यात स्थानापन्न झालो होतो. गणपती संपत आले होते, अचानक तेव्हाच एके दिवशी आमचा मोबाईल खणखणला. बघतो तर कश्यप साहेबांचा फोन. कश्यप साहेब गेल्या वर्षी पुण्याच्या सायबर क्राईमला जॉईन झाले होते. त्यांचे एकूणच ज्ञान, गुन्हा हाताळण्याची पद्धती, स्वभाव ह्या सगळ्याचे आपण एकदम फॅन, त्यामुळे पहिल्या रिंगला फोन उचलला.
‘सुसकाळ साहेबजी. आमची आठवण कशी काय काढली आज?’
‘पुण्यात आहेस?’ साहेबांनी विचारले. ‘असशील तर ताबडतोब ऑफिसला येऊन भेट. महत्त्वाचे काम आहे.’ साहेबांचा सूर ऐकूनच काहीतरी बिनसले असल्याचे लक्षात आले, आणि मी ‘पोचतोच अर्ध्या तासात’ असे सांगत फोन ठेवला.
साधारण साडेबारा एकच्या सुमारास साहेबांच्या ऑफिसात पोचलो. ‘सणावारी तरी सुखाने मोदक बिदक गिळू देत चला की..’ असे ओरडतच मी साहेबांच्या केबिनमध्ये घुसलो आणि एकदम चपापलो. केबिनमध्ये कश्यप साहेबांबरोबरच एक अजून साहेब आणि एक मॅडम बसलेल्या होत्या.
‘ये रे टोणग्या..’ साहेबांनी सुरुवात तरी खेळीमेळीने केली होती. मी यायच्या आधी बहुदा माझाच विषय चालला असावा कारण बाकीचे दोन लोक प्रदर्शनातले माहितीपत्रक वाचल्यावर, त्या वस्तूकडे बघतात तसे माझे निरीक्षण करत होते.
‘प्रसाद, हे इन्स्पेक्टर विजय कसाळकर आणि ह्या इन्स्पेक्टर रीटा गोम्स. दोघेही सध्या स्पेशल ड्यूटीवर आहेत, आणि तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. तुझ्याविषयी सगळी माहिती मी त्यांना दिली आहेच. जशी तू अधेमध्ये आम्हाला मदत करतोस, तशी त्यांना पण करावीस असे मला वाटते.’
‘नमस्कार’ मी आपले उगाच माझे संस्कार वगैरे दाखवत दोघांकडे पाहून हात जोडले. ‘कश्यप काकांनी माझ्याबद्दल काय काय सांगितले आहे मला माहिती नाही, पण मला इंटरनेट, हॅकिंग किंवा तत्सम क्षेत्रातले संपूर्ण ज्ञान खचीतच नाही. जे थोडेफार आहे, त्याच्या मदतीने शक्य ती मदत मी नक्की करेन.’
‘धन्यवाद प्रसाद. आम्हाला नक्की तुमच्याकडून काय मदत हवी आहे ते मी सांगायचा प्रयत्न करतो, ते ऐकून तुम्ही तुमचा निर्णय घ्या. अर्थात तुमचा मदतीला नकार असेल, तर इथले झालेले संभाषण तुम्ही बाहेर पडतानाच विसरावे हे तुम्हाला वेगळे सांगण्याची बहुदा आवश्यकता नसावी. बरोबर?’ कसाळकरांनी सुरुवात केली.
‘हो मला कल्पना आहे. याआधी मी एक दोन छोट्या प्रकरणात तुमच्या विभागाला मदत केली आहे. त्यामुळे तुम्ही तेवढा विश्वास नक्की ठेवू शकता.’
‘नक्कीच! विश्वासू नसतात तर कश्यप साहेबांनी तुमचे नाव सुचवलेच नसते. पण तरी एकदा खुंट हलवावासा वाटला म्हणून बोललो. राग नका मानू. तर प्रसाद, आम्हाला एक केस संदर्भात तुमची मदत हवी आहे.
ही आमची निक्की म्हणजे एक चक्रम प्रकरण आहे. आम्ही तिघांनी जेव्हा सायन्स किंवा कॉमर्सला प्रवेश घेतला होता, तेव्हा या पठ्ठीने एकटीने आर्टसला प्रवेश घेतला होता. म्हणजे आमच्या मंटूने एकट्याने सायन्सला प्रवेश घेतला होता आणि मी आणि किश्याने कॉमर्सला. ओहो, असे नुसते निक्की आणि मंटू वगैरे म्हणून कुणाला कसे समजणार, नाही का? सांगायचा मुद्दा ‘मंटू मोटोरोला’ने सायन्सला तर ‘किश्या कार्बन’ने कॉमर्सला प्रवेश घेतला आणि ‘निक्की नोकिया’ने आर्ट्सला. आमच्या या नावांनीच तर तुम्ही ओळखणार ना आम्हाला. मी म्हणजे सिद्धार्थ उर्फ ‘सिद्धू सॅमसंग’ आणि हे माझे तिघे मित्र म्हणजेच आमची विख्यात मोबाईल गँग. आम्ही सहावी सातवीत असतानाच आमची ही गँग तयार झाली होती आणि आम्ही केलेली सिंहगडावरचे, बोटीवरचे, विमानातले अशी अनेक धाडसे तर तुम्हाला आठवत असतीलच. पण मग मध्ये दहावीचे वर्ष आले आणि आम्हा सगळ्यांच्या आयांनी आमच्यामागे अभ्यासाचा झक्कू लावला आणि आमची मोबाईल गँग जणू काही विसर्जित झाली.
त्यात अकरावीला मी आणि किश्या एकाच कॉलेजमध्ये आलो, पण मंटू आणि निक्कीचे तर कॉलेज देखील बदलले. पुन्हा बारावीनंतर मंटूने इन्जिनीअरिंगमध्ये प्रवेश मिळवायला म्हणून औरंगाबादच्या एका विख्यात कॉलेजची वाट पकडली. नुसतीच वाट पकडली नाही तर तो तिथल्या हॉस्टेलवर राहायला गेला. तेव्हा मात्र आम्ही एकदाच आमच्या नेहमीच्या भेटायच्या जागेवर म्हणजे सी विंगच्या गच्चीत टाकीजवळ जमलो आणि जड अंत:कारणाने मित्राला निरोप दिला आणि मनातल्या मनात मोबाईल गँगचे औपचारिक विसर्जन केले. म्हणजे तसे कुणी प्रत्यक्ष म्हणाले नाही, पण मनातून प्रत्येकालाच ते जाणवले. तसेही गेली दोन तीन वर्षे आमच्या मोबाईल गँगने काहीच भरीव काम केले नव्हते. ‘आता उरल्या आठवणी…’ असे मी मनातल्या मनात म्हणालो देखील. तेव्हा खरेच आम्हाला वाटले देखील नाही की पुन्हा एकदा मोबाईल गँगचे पुनरुज्जीवन होणार आहे. पण झाले; होय, मित्रहो… आमच्या मोबाईल गँगचे पुनरुज्जीवन झाले! कसे?… त्याचीच तर ही कहाणी आहे.
म्हणजे त्याचे झाले असे, की मंटू मोठ्या उत्साहात औरंगाबादच्या त्या विख्यात कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन सामान-सुमान घेऊन
हॉस्टेलवर गेला. त्याचे अगदी तपशीलवार पत्र देखील आले मला. मी अर्थातच ते निक्की आणि किश्याबरोबरच वाचले. पत्र अगदी उत्साहाने फसफसत होते. त्याची रूम, त्याचा विनोद नावाचा रूम पार्टनर, खिडकीतून दिसणारे निसर्गसौंदर्य, जवळची लेणी आणि दूरवरचे जंगल… असे सगळ्याचे वर्णन करणारे ते पत्र वाचून क्षणभर मला मंटूचा हेवाच वाटला.
त्यानंतर देखील मंटूची पत्रे अधून मधून येत असत. आणि दिवाळीच्या सुट्टीत मंटू घरी आला, तेव्हा तर आम्ही बहुतेक वेळा एकत्र गप्पा मारत होतो. निक्की त्याला हसत म्हणाली, ‘मग, काय रे मंटू, तिकडे कुणी छान गर्लफ्रेंड वगैरे मिळाली की नाही?’ मंटू वैतागल्या स्वरात म्हणाला, ‘छे गं, निक्की, तिथे अभ्यासातून डोकं वर काढायला देखील वेळ मिळत नाही. गर्लफ्रेंड कुठली मिळणार. तुला सांगतो बघ निक्की, आपल्यात पहिला हा कविता बिविता करणारा सिद्ध्याच गर्लफ्रेंडच्या जाळ्यात अडकणार.’ मी आपला संकोचून नुसताच म्हणालो, ‘मी नाय बर्का त्यातला. पण मंटू, एक सांग मला, तिकडे हॉस्टेलवर सगळी व्यवस्था वगैरे चांगली आहे ना?’ मंटू म्हणाला, ‘व्यवस्था वगैरे अगदी उत्तम आहे. आणि सिनेमात वगैरे दाखवतात तसला र्यागिंगचा वगैरे काही नाही विशेष त्रास झाला. म्हणजे तसे सिनिअरचे मित्र थोडी टिंगल मस्करी करतात, पण फार त्रास वगैरे काही नाही बरं का.’
किश्या डोळे मोठाले करत म्हणाला, ‘पण एकटं राहायचं म्हणजे डेंजर नाय वाटत?’
मंटू हसत म्हणाला, ‘त्यात काय, सवय होते रे किश्या. आणि बरोबर नेहमी रूम पार्टनर विनोद तर असतोच की. मस्त आहे माझा रूम पार्टनर. तो ना, काय मस्त बासरी वाजवतो. शिवाय चित्रं देखील मस्त काढतो.’
निक्की गमतीने म्हणाली, ‘मग काय बुवा, आता मंटूला नवे मित्र मिळाल्यावर आमची कुठली आठवण येणार.’
मंटू म्हणाला, ‘तसं अज्जिबात नाही बर्का. तुम्ही सगळे म्हणजे…’ आणि पुढे त्याला काही बोलताच येईना.
दिवाळीची सुट्टी संपवून मंटू परत गेला आणि आम्हीही आपापल्या व्यवधानात गुंतलो. अधून मधून किश्या, निक्की आणि मी आमच्या गच्चीतल्या जागी भेटायचो म्हणा, पण तेही जेमतेम आठवड्यातून एकदा किंवा कधी दोनदा. किश्या अभ्यासात जेमतेमच होता, पण त्याला नाटकात काम करायची आवड लागली आणि आमच्या कॉलेजतर्फे त्याने पुरुषोत्तम करंडकच्या एकांकिका स्पर्धेत देखील भाग घेतला. निक्कीला समाजशास्त्र आणि त्याचबरोबर फ्रेंच भाषा शिकायची आवड निर्माण झाली आणि आम्ही भेटलो की ती हटकून होय, होय न म्हणता उई, उई करायची.
आणि मला वाटते ती जानेवारीची सतरा तारीख होती. अचानक माझ्या आईला मंटूच्या आईचा फोन आला. अगदी घाबर्याघाबर्या स्वरात तिने सांगितलं, की म्हणे तिकडे मंटू कालपासून हॉस्टेलच्या रूमवरून बेपत्ता झाला होता. तसा फोन आला होता तिकडच्या प्राचार्यांचा. आईने मला लगेच ते सांगितले, तेव्हा मला तर शॉकच बसला. मी सर्वप्रथम मंटूला फोन लावला तर फोन बंद होता. ठराविक निवेदन ऐकू येत होते. मी चटकन निक्कीला फोन लावला आणि आम्ही दोघे लगेच मंटूच्या घरी पोचलो.
मंटूच्या घरी सगळा गोंधळ उडाला होता. मंटूचे बाबा सतत फोनवर कुणावर तरी ओरडत होते, तर मंटूची आई डोळ्याला पदर लावून बसली होती. मंटूची मावशी शेजारी बसून मंटूच्या आईच्या पाठीवरून हात फिरवत होती. मंटूच्या बाबांच्या बोलण्यावरून आम्हाला इतकेच समजले, की मंटू काल सकाळी विनोदला, म्हणजे मंटूच्या रूम पार्टनरला शेवटचा भेटला. दोघांनी कँटीनमध्ये चहा घेतला आणि नंतर मंटू कॉलेजमध्ये तासालाही नव्हता आणि संध्याकाळी रूमवर देखील नव्हता. रात्रभर वाट बघून विनोदने सकाळी प्राचार्यांना हे सांगितले आणि एकच गोंधळ उडाला. त्यात मंटूचा फोन देखील बंद लागत होता. औरंगाबादचे पोलीस इन्स्पेक्टर रावत यांच्याशी मंटूचे बाबा फोनवर तावातावाने बोलत होते. आणि मग फोन बंद करून ते मंटूच्या आईला म्हणाले, ‘मी निघतो लगेच तिकडे जायला.’ त्यावर मंटूच्या आईने सोबत जायचा हट्ट धरला त्यामुळे तासाभरात ते दोघेही कारने निघालेच.
मी आणि निक्की आमच्या नेहमीच्या जागी गेलो. सी विंगच्या गच्चीत. निक्कीने तेवढ्यात किश्याला देखील फोन केला, तेव्हा तोही धावत आलाच. मी म्हणालो, ‘आपण आपल्या मारणेकाकांना सांगूया का? ते नक्की त्या रावत इन्स्पेक्टरना ओळखत असतील. नक्की काही तरी मदत होईल.’ निक्की म्हणाली, ‘हो, पण आपल्याला अजून काहीच नक्की आणि नीट कळले नाहीये.’
तेवढ्यात एक चमत्कारिक गोष्ट झाली. निक्कीला व्हाट्सअपवर मेसेज आला. मेसेज अनोळखी नंबरवरून आला होता आणि फक्त इतकाच होता– ‘मी एमएम. अडकलोय. मदत करा.’
निक्कीने तो आम्हाला वाचून दाखवताच आधी तर आम्ही तिची चेष्टाच केली, कोण गं हा एमएम? काही चक्कर आहे वाटते… वगैरे.
पण निक्कीने डोळे वटारले आणि ती म्हणाली, ‘काही पण फालतू नका रे बोलू. पण काय रे सिद्धू, एमएम म्हणजे आपला मंटू तर नसेल?’
किश्या म्हणाला, ‘नक्कीच. तो म्हणतोय मदत करा. दोस्तांनो, आपल्या मोबाईल गँगची गरज आहे त्याला. ते काय पुनर्जीव का काय म्हणतात ना ते करायला हवे आपल्या गँगचे.’
मी हसत म्हणालो, ‘पुनरुज्जीवन रे लेका. पण निक्की, मला वाटते किश्या म्हणतोय ते खरे आहे. आपणच आता काहीतरी करायला हवे.’
आणि तेवढ्यात पुन्हा त्याच नंबरवरून मेसेज आला– कैलास. चरस. १०. अंधार. लवकर. एमएम.
आता मात्र आम्ही पुरते चक्रावून गेलो. या मेसेजचा तर काही अर्थच लागेना. हा कैलास कोण बरे? आणि चरस आणि १० म्हणजे काय? आणि ते एमएम म्हणजे नक्की मंटू मोटोरोलाच असेल का? का कुणाचा चुकीचा मेसेज आलाय हा? आम्हाला काहीच कळेना. निक्की म्हणाली, त्यापेक्षा आपण या नंबरला सरळ फोन करूया ना. म्हणजे नक्की काय ते कळेल. निक्कीने सरळ त्या नंबरला फोन केला. बराच वेळ कुणी उचललाच नाही. मग एक जाडा भरडा आवाज म्हणाला, ‘कौन चाहिये?’ निक्की म्हणाली, ‘वो मेसेज. हमारा मंटू…’ तेवढ्यात तिकडून फोनपाशी तो माणूस खेकसल्याचे ऐकू आले, ‘अबे, जग्गू उस लडके के नजदीक फोन कायकू रख्खा. रंगादादा तेरेको ठोक देगा अब. इस साले लडकेने अगर कुछ गडबड किया तो– आणि फोन कट झाला.
निक्कीने फोन स्पीकरवर ठेवला असल्याने आम्ही सगळ्यांनी ते ऐकलेच. किश्या सर्वप्रथम बोलला. म्हणाला, ‘निक्कीताई, नक्की काहीतरी गडबड दिसतेय. तो लडकेने म्हणाला म्हणजे नक्की तो मंटूच असणार लडका म्हणजे. पण मग तो कैलास कोण?’
आणि एकदम चुटकी वाजवून मी उडी मारली आणि म्हणालो, ‘अरे कैलास कुणी मुलगा किंवा माणूस नाही. कैलास म्हणजे कैलास लेणे. म्हणजे लेण्यांच्या आसपास.’ निक्की म्हणाली, ‘काहीतरी चरस वगैरे ड्रग्जची भानगड दिसतेय. पण मग हे १०चे काय गौडबंगाल?’ किश्या म्हणाला, ‘१० लोक असतील बहुतेक तिथे.’ मी डोके खाजवत म्हणालो, ‘नाही. तसे नाही वाटत. कैलास. आणि १०… आणि अंधार म्हणजे लेण्यांचा काही तरी संबंध असणार.
आता आम्हाला स्मार्टफोन मिळालेले होते. त्यामुळे निक्कीने लगेच नेट चालू केले आणि वेरुळच्या कैलास लेण्याची माहिती विकिपीडियावर पाहिली. औरंगाबादला वेरूळ आणि अजिंठा अशा दोन ठिकाणी अप्रतिम लेणी असल्याचे मंटू म्हणाला होता खरे. मग आम्ही नेटवर नीट शोधले तर कळले. तिथले कैलास लेणे फारच प्रसिद्ध आहे आणि ते वेरूळच्या लेण्यात आहे. तिथे म्हणे ३४ लेणी आहेत आणि कैलास हे तिथले जगप्रसिद्ध लेणे. ३४ पैकी हे सोळावे लेणे.
निक्कीने एकदम उडीच मारली आणि ती म्हणाली, ‘अरे तो १० आकडा म्हणजे १० क्रमांकाचे लेणे असणार.’ मी म्हणालो, ‘बरोब्बर. त्या १०व्या लेण्याची काही माहिती आहे का बघ.’ लगेच निक्कीने वाचून दाखवले. ‘हे लेणे चैत्य आहे. येथे पूजास्थळ होते. छतात लाकडी सर्प आहेत. यात बुद्धांची भव्य मूर्ती बसलेल्या अवस्थेत आहे.’
आम्ही लगेच त्या लेण्याचा फोटो पाहिला. बापरे केवढे प्रचंड होते ते. आणि केवढी ती मूर्ती. किश्या ते चित्र पाहून एकदम ओरडला, ‘अरे त्या मूर्तीच्या मागे अंधार असणार. तिथेच असणार आपला मंटू.’
तेवढ्यात निक्कीचा फोन वाजला. आणि काय आश्चर्य, त्याच मघाच्या नंबरवरून फोन होता. फोनवर एक माणूस अगदी मवाळ, नम्र स्वरात म्हणाला, ‘बेहनजी, गलतीसे आपको दो मेसेज गये थे. वो मेरा भांजा है ना, वो दोस्तों के साथ कुछ गेम खेल रहा होगा. मेरा फोन उठाया और उसने मेसेज भेजे. माफ करना बेहनजी.’
निक्कीने तेवढ्यात हुशारी दाखवली आणि ती म्हणाली, ‘कोई प्रॉब्लेम नाही भाईसाब, वैसे मेरे पिताजी औरंगाबाद में पोलीस इन्स्पेक्टर हैं ना, वे भी मुझे हमेशा डाटते हैं, फोन यहां वहां रखने पर. आज हम लोग कैलास की सैर पर जानेवाले हैं ना, इसलिये मुझे लगा मंटूका, याने मेरे दोस्त का ही मेसेज है’ आणि तिने फोन किंचित बाजूला धरला आणि ती ओरडली.. ‘हा हा पापा, आ रही हूँ.’
निक्कीच्या या हजरजबाबीपणाने मी थक्कच झालो. पण फोन चालू होता म्हणून मी अगदी गप्प राहिलो. तो माणूस अधिकच नम्र आवाजात म्हणाला, ‘फिर से माफी मागता हूँ बेहनजी. अपने पापा को यह फालतू बाते बताने की कोई जरुरत नहीं हां बेहनजी. एकदम गलाती से ही मेसेज भेजे गये थे. पापा को मत बताना हा…’ आणि त्याने फोन ठेवून दिला.
किश्या एकदम ओरडला, ‘नक्कीच हा माणूस कुणीतरी डांबरट वाटला. आपण आता मारणे काकांना सांगायलाच हवं हे.’ लहानपणी मोबाईल गँगने केलेल्या अनेक साहसांत या इन्स्पेक्टर मारणेकाकांची आम्हाला मदत झाली होती. मारणे काकांनाही आमच्या मोबाईल गँगचे खूप कौतुक होते. त्यामुळे मग मात्र आम्ही वेळ न दवडता मारणे काकांना फोन लावला. सुदैवाने मारणे काका चौकीत होते. आम्ही लगेच चौकीत गेलो आणि सगळा प्रकार मारणे काकांना सांगितला. मारणे काका थक्क होत म्हणाले, ‘अरे पोरांनो, तुमची मोबाईल गँग अजून जोरात आहे वाटते. बहुतेक तुम्ही म्हणताय त्यात तथ्य असावे. कारण औरंगाबादचा इन्स्पेक्टर रावत तर माझा चांगला मित्र आहे. मध्यंतरी मी फॅमिलीला घेऊन औरंगाबादला ट्रिपला गेलो होतो तेव्हा भेटला होता. तेव्हा कुणा रंगा आणि जग्गूच्या टोळीबद्दल म्हणत होता काही तरी. पण निकिता, तू नक्की ती दोन नावे ऐकलीस ना?’
त्यावर किश्याच म्हणाला, ‘अहो काका, स्पीकरवर होता ना फोन, आम्ही तिघांनी ऐकली ती नावं. तो हरामखोर आपल्या दोस्ताला जग्गूच म्हणत होता. आणि म्हणाला ना, रंगादादा तुझे ठोकेगा, असे.’ मारणेकाका हसत्ा म्हणाले, ‘ओके बाबा, तसे असेल मग. थांबा मी लगेच रावतला फोन लावतो.’ आणि मारणे काकांनी त्यांच्या मित्राला फोन लावला आणि सगळे सांगितले. तिकडून ते रावत म्हणाले, ‘काय सांगतोस, मारण्या, मी निघालोच वेरूळला. अर्ध्या तासात तुला कळवतो काय होते ते. थँक्स यार.’
त्यानंतरचा अर्धा पाऊण तास आम्ही कसा काढला ते आम्हालाच माहीत. तेवढ्यात मारणे काकानी आमच्यासाठी थम्सअप मागवले. अर्धा पाऊण वगैरे नाही पण तासाभरात रावत इन्स्पेक्टरांचा फोन आला. फोनवर बोलता बोलताच मारणे काकानी किश्याच्या हातातल्या बाटलीकडे बोट दाखवले. आम्हाला काहीच कळेना. निक्की मिस्कील हसत म्हणाली, ‘अरे मारणे काका म्हणताहेत थम्सअप, म्हणजे काम झाले.’ आणि तेवढ्यात मारणे काकांचा फोन संपला आणि ते म्हणाले, ‘माझ्या तरूण मित्रांनो, तुमची माहिती अगदी अचूक होती. आत्ताच रावतने वेरूळच्या १० नंबरच्या लेण्यात लपलेल्या रंगा, मन्या आणि जग्गा या तिघांना पकडले आहे. आणि हो, तुमचा मंटू रावतबरोबरच आहे. पाच मिनिटात जीपमध्ये बसल्यावर रावत त्याला फोन लावून देईल.’
आणि तेवढ्यात मारणे काकांचा फोन वाजलाच. फोनवर मंटूशी बोलताना आम्हा तिघांना किती बोलू अन किती नको असे झाले होते. मंटू इतकेच म्हणाला, ‘दोस्तहो, अखेर आपल्या मोबाईल गँगचे पुनर्जीव केला का नाय आपण!’ मी हसत म्हणालो, ‘अरे मंटू, तू पण लेका किश्याहून वेगळा नाहीस. अरे पुनर्जीव नाही, पुनरुज्जीवन रे. होय मित्रा, आपली मोबाईल गँग अशी सहजासहजी संपणार नाही.’
औरंगाबादला मंटूचे आई बाबा पोचले तेव्हा त्यांच्या स्वागताला खुद्द मंटूच होता तेव्हा त्या दोघांना काय आनंद झाला. शिवाय चरस वगैरे ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आणि आमच्या गँगला मोठे बक्षीस देखील दिले. मंटूच्या आग्रहावरून आम्ही सगळेच नंतरच्या शनिवार–रविवारी औरंगाबादच्या ट्रिपला गेलो ते बक्षीस स्वीकारायला.
रावतकाकांनी तर थेट पोलीस चौकीतच एक छोटासा कार्यक्रम करून आम्हाला धक्का दिला. एरवी ज्यांची भीती वाटते ते सगळे खाकी कपड्यातले पोलीस आमच्यासमोर खुर्च्यांवर बसले होते. मस्त कौतुकाने हसत. कार्यक्रमात रावतकाका म्हणाले, ‘मित्रहो, पुण्यात एके काळी प्रसिद्ध असलेल्या बच्चे कंपनीच्या मोबाईल गँगने आता आपल्या औरंगाबादेत धमाल उडवली आहे. आमचे मित्र, पुण्यातले इन्स्पेक्टर मारणे यांच्या मदतीने ही मोबाईल गँग पुण्यात बरेच उद्योग करत होती म्हणे. आणि यावेळी या गँगने औरंगाबाद शहरात धुमाकूळ घालत असलेल्या कुप्रसिद्ध ड्रग्ज टोळीचा नायनाट करण्यात आमची मदत केली आहे. पण हे सगळे झाले तरी कसे हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असाल, तर मी आमचा तरुण मित्र मनीष… नाही, नाही मंटू मोटोरोला यालाच विनंती करतो, की नेमके कसे काय घडले बुवा हे सगळे, हे आम्हाला तरी सांग.’
एरवी बोलायला कचरणारा मंटू यावेळी मात्र मोठ्या रुबाबात उभा राहिला आणि सांगायला लागला, ‘मित्रहो, आम्ही सहावीत होतो तेव्हा आमच्या पुण्याच्या हाय फाय सोसायटीत एक मोबाईल चोरी झाली आणि त्या चोराला पकडण्यात माझे मित्र सिद्धार्थ कांबळे उर्फ सिद्धू सॅमसंग आणि निकिता उर्फ निक्की नोकिया यांनी मोठीच कामगिरी केली. तेव्हापासून आमच्या या मोबाईल गँगने अनेक धाडसे केली. लवकरच आमच्या गँगमध्ये किश्या कार्बनदेखील आला. खूप साहसे केली आम्ही. माझा मित्र सिद्धू ती लिहून काढत असतो. पण पुढे आमच्या दहावीच्या परीक्षेमुळे आणि नंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी
कॉलेजमध्ये गेल्याने आमची ही मोबाईल गँग जणू विसर्जन झाली.’
तेव्हा मी शेजारी बसलेल्या निक्कीच्या कानात पुटपुटलो, ‘विसर्जन नाही गं, विसर्जित झाली असे म्हणायला हवे.’
निक्की मला दटावत म्हणाली, ‘ऐक रे सिद्धू, तुझं आपलं नेहमी मराठीकडे लक्ष.’
मंटू पुढे म्हणाला, ‘तर मित्रहो, मी औरंगाबादला शिकायला म्हणून आलो आणि एके दिवशी मला शेजारच्या रूममधला जयदेव नावाचा मित्र चोरून त्याच्या कपाटात काहीतरी लपवताना दिसला. मी खोदून खोदून चौकशी केली तेव्हा मला कुणाला न सांगण्याची शपथ घालून तो म्हणाला, की कुणी मन्या नावाचा मित्र त्याला कसलीतरी पूड देतो म्हणे सांभाळायला. आणि कॉलेजमध्ये म्हणे तो मुलांना ती विकणार आहे. खूप खूप म्हणजे हज्जारो रुपये मिळणार होते जयदेवला. मित्रहो, मला लगेच समजले की नक्कीच हा अमली पदार्थांचा प्रकार असणार. या भानगडीची माहिती मिळवावी म्हणून मी त्याला म्हणालो, मला पण भेटव की तुझ्या मित्राला. तेव्हा कुणाला न सांगण्याची शपथ घालून त्याने होकार दिला. तो म्हणाला, ‘उद्या तो मला सामान देणार आहे. उद्या आमची भेटायची जागा वेरूळच्या लेण्यात १० नंबरच्या गुहेत ठरली आहे. पण आज एका हॉटेलमध्ये तो मला सगळी माहिती देणार आहे. तेव्हा आजच तू पण माझ्याबरोबर ये.’ मित्रहो, आधी मी घाबरलो होतो, पण पूर्वी आमच्या मोबाईल गँगने केलेली धाडसे आठवून मी ठरवले, की या प्रकरणाचा छडा लावायलाच हवा. म्हणून मी त्या मित्राबरोबर हॉटेलमध्ये गेलो. तिथे तो मन्या आम्हाला त्याच्या खोलीवर घेऊन गेला आणि त्याने सगळी योजना समजावून सांगितली. या लोकांना म्हणे औरंगाबादेत त्यांचे जाळे पसरवायचे होते. नंतर तो मन्या म्हणाला, की आज आम्ही हॉटेलवरच राहायला हवे. मी थोडा प्रतिकार केला, पण जयदेव म्हणाला, आता त्यांचे ऐकायला हवे. तो सतत बरोबर असल्याने मला फोन देखील करता आला नाही. दुसर्या दिवशी सकाळी माल घ्यायला म्हणून आम्ही वेरूळला गेलो तेव्हा तो गालावर मोठ्ठा जखमेचा वण असलेला मन्या म्हणाला, ए जयदेव, हा तुझा मित्र कुणाला काही बोलणार नाही ना? जयदेव घाबरत म्हणाला, नाही नाही. याला पण आपल्याबरोबर काम करायचे आहे. मन्या म्हणाला, लवकरच त्याचा मित्र जग्गू माल घेऊन येणार होता. मी त्याला म्हणालो, मला जरा लघवीला जायचे आहे, मी आलोच आणि मी बाहेर येऊन मारणे काकांना फोन लावला, पण दुर्दैवाने तेवढ्यात तो मन्या बाहेर आला आणि त्याने मला फोन करताना पाहिले. मी फोनवर फक्त ‘इन्स्पेक्टर मारणे ना?’ असे म्हणालो, ते त्याने ऐकले आणि झर्रकन माझ्या हातातला फोन हिसकावून घेतला आणि माझ्या कानफटात भडकावली. तेव्हा ना, मी ज्याम घाबरलो होतो. त्या गुंडाने मला मूर्तीमागच्या अंधारात नेले आणि म्हणाला, थांब आता जग्गू येईल आणि तुला ठोकेल. त्याने त्याच्या फोनवरून जग्गू का कोण त्याला बोलावले आणि तो माझ्या जवळच बसला. अचानक तो उठला आणि म्हणाला, जग्गू यायच्या आत मी धार मारून येतो. इथून हललास तर खबरदार असे म्हणत त्याने खिशातला चाकू मला दाखवला. जयदेवला तो म्हणाला, ए लेका, याच्यावर लक्ष ठेव बरं का. तू आपल्यातला आहेस आता. लक्ष ठेव याच्यावर. आणि तो घाईत पळाला. मी तर ज्यामच टरकलो. पण तो गडबडीत बाहेर पळाला, तेव्हा जाताना नेमका तो त्याचा फोन तिथेच विसरला.
मित्रहो, हीच संधी आहे असे ओळखून मी चटकन निक्कीला मेसेज केला. तो कधीही परत येईल म्हणून मी अगदी थोडक्यात मेसेज करायचे ठरवले. मी लिहिले, मी एमएम. अडकलोय. मदत करा. मला खात्री होती, निक्की त्या ‘एमएम’ वरून मला ओळखेल आणि नक्कीच सिद्धू आणि किश्याच्या मदतीने काहीतरी करेलच. पण काहीच उत्तर आले नाही तेव्हा मी चटकन दुसरा मेसेज केला- कैलास. चरस. १०. अंधार. लवकर. एमएम. पण माझे दुर्दैव आड आले आणि तेवढ्यात तो दुष्ट परत आला. सोबत त्या जग्गूला घेऊन. तेवढ्यात निक्कीने नेमका त्या नंबरावर फोन केला. आणि त्या दोघांना मी मेसेज केल्याचे समजले. त्या जग्गूने देखील मला एक मुस्काटात मारली आणि म्हणाला, रंगादादा आता येईल आणि तुला खतम करेल. मी असला घाबरलो होतो ना. मग माझ्यावर लक्ष ठेवायला म्हणून जग्गूला ठेवून तो मन्या रंगादादाला आणायला बाहेर गेला. असाच अर्धा पाऊण तास गेला. आम्ही तिघे म्हणजे मी जयदेव आणि तो जग्गू त्या भल्यामोठ्या मूर्तीच्या मागच्या अंधारात बसलो होतो आणि एकदम बाहेरून बुटाचा खाड खाड आवाज आला. मला वाटले, तो रंगा येणार आणि आता मला मारून टाकणार. पण मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण स्वत: रावतकाका आणि त्यांचे दोन साथीदार आले होते. त्यांनी त्या मन्या आणि रंगाला पकडलेच होते बाहेर. आमच्या बरोबर बसलेल्या त्या जग्गूच्या सण्ण्कन कानाखाली वाजवत रावतकाका म्हणाले, तरुण पोरांना नादी लावतोस होय रे… आणि मग रावतकाकांनी मारणेकाकांना फोन लावला आणि मला जीपमधून चौकीत नेले. आई-बाबा इकडे यायला निघालेच होते. तर मित्रहो, माझ्या मोबाईल गँगच्या मदतीने आम्ही अशी वेरुळच्या लेण्यात धमाल उडवली.’
एवढे बोलून मंटू खाली बसला आणि रावतकाकानी फुलांचा गुच्छ देऊन आमचा सत्कार केला. शिवाय रावतकाकांनी बक्षिसाचे एक पाकीट आमच्या हातात दिले, तेव्हा मंटूच्या बाबांनीच आमचे फोटो काढले. नंतर आम्ही पाकीट उघडले तर काय! आत चक्क एक लाख रुपयांचा चेक होता. पण वर नाव लिहिले होते, ‘मोबाईल गँग, पुणे’ तेव्हा हसत हसत मंटूचे बाबा म्हणाले, ‘अरे पोरांनो, म्हणजे आता तुमच्या गँगच्या नावाने बँकेत खाते उघडायला हवे की!’
मी निक्कीच्या कानात म्हणालो, ‘व्वा! ही म्हणजे आपल्या गँगची औपचारिक प्रतिष्ठापनाच की!’
निक्की मला कोपराने ढोसत म्हणाली, ‘जरा इतरांना समजेल असे बोलत जा की रे सिद्धू.’
नंतर त्या रात्री आम्ही पोलिसांच्या गेस्ट हाउसवर राहिलो आणि दुसर्या दिवशी परत येण्यापूर्वी रावतकाकांनी आम्हाला त्यांच्या जीपमधून वेरूळची लेणी दाखवायला नेले. तेव्हा १० नंबरच्या त्या लेण्यात बुद्धाच्या भव्य मूर्तीमागे नेऊन तिथला अंधार दाखवत मंटू म्हणाला, तो मन्या का कोण चुकून त्याचा फोन इथे १० मिनिटे ठेवून बाथरुमला गेला म्हणून… नाहीतर मी या अंधारातच…’
तेव्हा मंटूच्या पाठीवर थाप मारत निक्की म्हणाली, ‘काही नाही मंटू, काही नसते झाले तुला. दुसरी काही आयडिया काढलीच असतीस तू. नक्कीच. अरे मोबाईल गँगचे सदस्य कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढतातच!’
तेव्हा उत्साहाने किश्या ओरडला, मोबाईल गँग जिंदाबाद!… किती तरी वेळ त्या लेण्यात तो आवाज घुमत राहिला… जिंदाबाद! जिंदाबाद! जिंदाबाद!