एकनाथ शिंदे
मी मुख्यमंत्री बोलतोय
आता ऐका माझं भाषण
माझे मीच लिहिले आहे
हसा ऐकून विनोद भीषण
मोदींसारखी माझी पट्टी
हवी तशी नाही लागत
तरी वरचा सा लावतो
टाळ्या वाजवून करा स्वागत
गद्दारी मी केली कशी
त्याचीच आता सांगतो कथा
अलिबाबा नि चाळीस चोर
ऐकून हसा त्यांच्या व्यथा
———————
अजितदादा पवार
समोर अन्याय दिसत असून
काहीच बोलू शकत नाही
तोंडावरती चिकटपट्टी
लावून गेले नेते काही
तेव्हा कशी होती जरब
माझ्या फटकळ आवाजाची
मोदी-शहांचे पाय धरत
शेळी झाली वाघोबाची
आता फरफटत जायचे आहे
सांगतील ते ते गायचे आहे
स्वार्थासाठी झालो बंदा
घडेल ते ते पाह्यचे आहे
——————–
अमित शहा
आता योग्य जागी आलात
चुकली होती तुमची जागा
मळके कपडे धुवून आता
भाजप नेत्यांसारखे वागा
जम्बो आहे वॉशिंग मशीन
एकावेळी पाचशे मावतील
कपड्यांसह शरीर स्वच्छ
मी आणि मोदी पावतील
पैसा हवा तेवढा मागा
सगळी तुमची हौस पुरवू
करा विकास सगळीकडून
आपण काकांचीही जिरवू
——————–
राहुल गांधी
किती छळाल एखाद्याला
सत्तेचाही करून वापर
शेवटी बसली गालफडात
पार्श्वभागी सुप्रीम ठोकर
न्यायालयांनाही दहशत
हुकूमशहांचे हे प्रताप
संसदेलाही वेठीस धरती
लोकशाहीला दिसती साप
लागे उतरणीला आता
मन की कसली ढोंगी बात
लोकशाहीचा केला विचका
जनता लवकर मारील लाथ
——————–
देवेंद्र फडणवीस
भिडे गुरुजी आमचे गुरू
जरी त्यांचे खोटे नाव
त्यांच्यासाठी विरोधकांचे
झेलू छातीवरती घाव
गांधी, नेहरू, फुले, साई
असतील त्यांची दैवतेही
भीडभाड नाही ठेवत गुरुजी
आणि त्यांचे संशोधनही
कशी अटक करू त्यांना
ते तर जुने संघसोबती
माझी ट्युबच पेटत नाही
लोक का त्यांना चक्रम म्हणती?