□ आधार, व्होटर आयडी आणि रेशनकार्ड ग्राह्य धरावेच लागेल – सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला बजावले.
■ प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी सगळ्या चाव्या यांच्याच हातात असतात. तेव्हा काय करतील, ते सांगता येत नाही. बिहारमध्ये महाराष्ट्राप्रमाणे निवडणूक चोरली जाणार यात काही शंका नाही. फक्त बिहारी लोक मराठी माणसांप्रमाणे निमूटपणे ही चोरी स्वीकारतात का, हेच पाहायचं.
□ गैरव्यवहार केल्याने मुंबईचे शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे निलंबित.
■ गैरव्यवहारांची एक साखळी असते. त्यातली एखादी कडीच निखळवली जाते, तेव्हा तो बाकीची साखळी सुरक्षित ठेवण्याचा उपायही असू शकतो. एक भ्रष्ट अधिकारी निलंबित झाला, याच्या आनंदाला ही मर्यादा आहे.
□ भूमिगत मेट्रोमुळे फोर्टमधील ऐतिहासिक वास्तूचे नुकसान – मुंबई मेट्रोची हायकोर्टात कबुली.
■ मेट्रोसाठी वाट्टेल ते! जिथे जिवंत झाडांची कत्तल करून टाकली जाते रातोरात, तिथे जुन्या वास्तूंच्या काय गमजा! नशीब यांच्यातल्या कुणाला ब्रिटिशांची ओळख पुसून टाका म्हणून बोंबलत सुटायची इच्छा झालेली नाही. नाही तर या वास्तू उद्ध्वस्त करायलाही कमी करणार नाहीत यांच्या टोळ्या!
□ शहा सेनेचे मंत्री शिरसाट यांना आयकर नोटीस; पाच वर्षांत संपत्ती १२पट वाढली.
■ खरंतर ही नोटीस पाच वर्षांत संपत्ती इतकीच कशी वाढली म्हणून बजावायला हवी होती. एवढी संधी मिळाली तिचं सोनं करायच्या ऐवजी पितळच केलंत की सोनं केलंत आणि त्याचे वाटे नीट घातलेले नाहीत?
□ मराठीद्वेष्ट्या निशिकांत दुबेंचा मुंबईत आलिशान फ्लॅट -उमेदीच्या काळात मुंबईनेच तारले.
■ हे भिकारडे इथेच येऊन मोठे होतात आणि नंतर इथेच तंगडी वर करतात. आता तेच पवित्र तीर्थ म्हणून भक्तिभावाने स्वीकारणार्या मेंदूच्या जागी शेण भरलेल्या मराठी भय्यांचीच तर इथे चलती आहे. त्यांच्या बळावरच हे माजलेले आहेत.
□ मिंधे खासदार संदीपान भुमरेंना मिळाले विमानापेक्षा जास्त वेगाने दारूचे परवाने – रोहित पवार यांचा गंभीर आरोप.
■ सगळ्या परिसराची विमानं हवेत उडवण्याची व्यवस्था करायची तर परवाने दिलेच पाहिजेत ना वेगाने? सरकारला महसूल मिळणार आहे ना त्यातून? केवढी मोठी ही देशसेवा आहे. खासदारकी-आमदारकी मिळवल्यावर एवढी व्यवस्था तर करायला जमलंच पाहिजे ना!
□ सरकारच्या नाकर्तेपणाचे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ३४० बळी; लटकलेल्या चौपदरीकरणाने अपघात वाढले.
■ देशाची लोकसंख्या खूप आहे, मरायला सामान्य माणसंही खूप आहेत. देशात आजवरच्या मानवजातीच्या इतिहासातले सगळ्यात कर्तबगार रस्ते वाहतूक मंत्री आहेत. ते सेकंदासेकंदाला एक रस्ता बांधत असतात. त्यात कमीजास्त होणारच. नेहरूंनी वेळेत रस्ते बांधले असते तर ही वेळ आली असती का?
□ मिंध्यांनी गुरू बदलला म्हणून त्यांना दिल्ली गाठावी लागली – राजन विचारे यांची टीका.
■ गुरू नव्हे, शनि आहे तो त्यांच्या राशीतला. आता बसता उठता त्याची पूजा करायला लागते, शांती करायला लागते. नाहीतर त्याची पीडा केवढी तापदायक होईल, विचार करा. आता ही साडेसाती राजकीय आयुष्य जेवढं आहे तेवढा काळ चालणार.
□ नागपुरात उद्घाटनाआधीच उड्डाणपूल खचला – मंत्री बावनकुळे यांच्या मतदारसंघातील प्रकार.
■ तरी बराच नंतर खचला. काही पूल आणि प्रकल्प तर कागदावर असतानाच खचतात म्हणे मोदीकाळात.
□ राहुल गांधी यांचा हल्ला; अदानीच मोदींना चालवताहेत…
■ यात हल्ला काय आहे? ही वस्तुस्थिती आहे. ते कोणाचे चौकीदार नाहीत, हे ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पुन्हा एकदा स्पष्ट झालं होतं, त्याआधी गलवानच्या वेळीही झालंच होतं. आणि ते कोणाचे चौकीदार आहेत, ते तर रोजच कळत असतं.
□ भाजपाशासित बेळगाव महापालिकेतून मराठी हटवली; सक्तीचे कानडीकरण.
■ तिकडे कानडी अस्मिता गोड वाटते, इथे मराठी अस्मितेचं नाव काढलं की दूध फाटते.
□ नोटांनी भरलेली बॅग आणि हातात सिगारेट; शहा सेनेच्या संजय शिरसाट यांच्या व्हिडिओने खळबळ.
■ हे नेमके यांच्याच पक्षाच्या नेत्यांचे व्हिडिओ लागोपाठ येतात, यांचेच राडे घडतात, यांनाच तोंड लपवायची वेळ येते, हे काही सरळ प्रकरण नाही. ही मारामारी दिल्लीतली आहे, तिचे पडसाद इथे उमटतायत फक्त. लवकरच धुमश्चक्री पाहायला मिळणार तर.
□ अधिकारी आणि बिल्डर्सची हातमिळवणी; सिडकोत १ हजार कोटींचा घोटाळा; चौकशीसाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती.
■ अधिकारी आणि बिल्डर्सची हातमिळवणी नसेल तर आपल्या देशात कुठेही एखादा प्रकल्प पुढे जाईल का? काही घडेल का? अधिकारी काय जनतेशी हातमिळवणी करतील का? तळे राखतो तो पाणी चाखणारच ना?
□ लाडक्या बहिणींना दोन महिने हप्ते मिळाले, आता पैसे मिळायचे बंद झाले – भाजपचे राम कदम यांनी केली सरकारची पोलखोल.
■ पोलखोल कसली, सगळा झोल आहे हा? मोठा आव आणायचा आणि आपल्या सरकारला कव्हर द्यायचं हा यांचा उद्योग. स्टंट म्हणून तरी राजीनामा द्या इतका बहिणींचा पुळका आला असेल तर.