• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

म्हणे महाराष्ट्राने मृत्यू लपविले?

- डॉ. प्रदीप आवटे (जनमन की बात)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
June 17, 2021
in कारण राजकारण
0
म्हणे महाराष्ट्राने मृत्यू लपविले?

सध्या महाराष्ट्राने कोविड १९ आजाराचे मृत्यू लपविले अशी चर्चा काही माध्यमे करत आहेत. यावर काय बोलावे तेच कळत नाही. म्हणजे बघा, भारतातील प्रत्येक पाचवा कोविड रुग्ण महाराष्ट्राने रिपोर्ट केला आहे. देशात या आजाराने झालेले एकूण मृत्यू ३.६१ लाख त्यापैकी १.०५ लाख महाराष्ट्रातील. म्हणजे देशातील प्रत्येक तिसरा मृत्यू महाराष्ट्राने रिपोर्ट केला आहे. देशातील सर्वाधिक मृत्यू आपल्या राज्याने रिपोर्ट केले, ही काही अभिमानाने सांगावी अशी बाब नाही. पण आपले रिपोर्टिंग इतर अनेक राज्यांच्या तुलनेत चांगले आहे, पारदर्शक आहे, हे यातून समजायला हरकत नाही. साथरोगशास्त्रातील एक महत्वाचा सिध्दांत आहे– तुमची समस्या नेमकी मोजा, तुमचे निम्मे उत्तर त्यात दडले आहे. आणि हे लक्षात घेऊनच आपण आपली सर्वेक्षण व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत असतो.
काही तुलनात्मक बाबी पाहू…
युपीसारखे महाराष्ट्राच्या जवळपस दुप्पट लोकसंख्या असणारे राज्य २१,५९७ मृत्यू रिपोर्ट करते. याच्यापेक्षा अधिक मृत्यू मुंबई-ठाण्याने रिपोर्ट केले आहेत.
सात कोटीहून अधिक लोकसंख्या असणार्‍या गुजरातने पुण्यापेक्षाही कमी मृत्यू रिपोर्ट केले आहेत.
पूर्ण ओरिसा राज्यापेक्षा अधिक मृत्यू अहमदनगर जिल्ह्याने रिपोर्ट केले आहेत.
नाशिकने रिपोर्ट केलेले मृत्यू आसाम आणि तेलंगणापेक्षा अधिक आहेत.
नागपूर–चंद्रपूरपेक्षा कमी मृत्यू मध्य प्रदेश राज्याने रिपोर्ट केले आहेत.
बिहारने रिपोर्ट केलेले मृत्यू फार फार तर ठाण्याएवढे आहेत.
आणि तरीही काही जणांना वाटते की महाराष्ट्राने मृत्यू लपविले आहेत. आपण काही गोष्टी लक्षातच घेत नाही.
कोविड पँडेमिक ही एक अभूतपूर्व घटना आहे. स्वाईन फ्ल्यूचे मागील १२ वर्षांचे आकडे एकीकडे आणि कोविडचे केवळ एका दिवशीचे आकडे एकीकडे अशी परिस्थिती आहे. प्रचंड मोठ्या आकडेवारीचे संकलन आपली यंत्रणा करते आहे. हे काम कशा पद्धतीने चालते, हे थोडे समजून घेतले तर त्यातील बारकावे लक्षात येतील.
भारत सरकारने कोविड डेटा गोळा करण्यासाठी दोन पोर्टल उपलब्ध करून दिली आहेत. सीव्ही अ‍ॅनालिटिक्स आणि कोविड पोर्टल. याशिवाय कोविड निदान करणार्‍या प्रयोगशाळांसाठी आरटीपीसीआर अ‍ॅप आणि कोविड रूग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालयांसाठी फॅसिलिटी अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. पण अनेकदा एक-एक प्रयोगशाळा दिवसाला दोन दोन हजार तपासण्या करते. पण त्या दोन हजार जणांची एंट्री त्याच दिवशी करणे अनेकदा प्रयोगशाळेला शक्य नसते. आणि जोवर प्रयोगशाळा पोर्टलवर एखाद्या व्यक्तीची माहिती भरत नाही तोवर तो रूग्ण पोर्टलवर दिसत नाही. मग त्याचे पुढे काय झाले ही माहिती भरायलाही अडचण येते.
तीच गोष्ट हॉस्पिटलची! आता मागच्या एप्रिल–मेमध्ये तर हॉस्पिटल ओसंडून वाहत होती. रुग्णालये उपचार, ऑक्सिजन, बेड व्यवस्थापन यात गुंतलेली. फॅसिलिटी अ‍ॅपवर रुग्णांची माहिती त्या त्या दिवशी अपडेट होणे निव्वळ अशक्य! कारण प्राधान्य प्रत्यक्ष उपचाराला देणे आवश्यकच असते. जेव्हा लाट प्रचंड वेगात सुरू होती तेव्हा अनेक रुग्णालयांनी मॅन्युअल रॅपिड अँटीजन टेस्ट रिपोर्टवर पेशंट भरती केले. पण त्यांची पोर्टलवरील एंट्री राहिली. काही ठिकाणी रिपोर्टिंग करणारी माणसेच स्वत: पॉझिटिव्ह आली. अशी एक ना अनेक कारणे! शिवाय ही पोर्टल किंवा अ‍ॅप अगदी सुरळीत चालत आहेत, असे नव्हे. त्यांच्यातही अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण होतात. लॅबचा डेटा कोविड पोर्टलवर सिंक्रोनाईझ व्हायला काही काळ लागतो. या सगळ्यामध्ये काही पेशंटची एंट्री मागे राहते. ती उशिरा होते. मृत्यूबाबतही असे होते. पण आपण हे सारे मृत्यू कितीही जुने असले तरी त्यांची माहिती घेऊन ते पोर्टलवर अपडेट करतो आहोत. अगदी मागच्या १५ दिवसांत अशा आठ हजारांहून अधिक मृत्यूंचा समावेश करण्यात आला आहे आणि ही प्रक्रिया सुरूच आहे. मृत्यू त्या त्या दिवशी रिपोर्ट होत नाहीत, याला ही अशी अनेक कारणे आहेत. आपण त्यामागील अपरिहार्यता समजून घेतली आणि ही प्रलंबित माहिती अद्ययावत करण्यासाठी यंत्रणेने केलेले प्रयत्न लक्षात घेतले तर सारेच उमजेल. यंत्रणा हे मृत्यू लपवत नाही, हे मृत्यू उशिरा रिपोर्ट होताहेत, हे उमजेल! पण मृत्यू उशिरा रिपोर्ट होणे ही असते वस्तुस्थिती आणि मृत्यू लपविले, हा असतो आरोप! यातील गुणात्मक फरक लिहणार्‍या-वाचणार्‍या माणसाला तरी कळायला हवा.
मुळात या कोविड महामारीमध्ये महाराष्ट्र खूप पोळला आहे. खूप जणांनी जवळची माणसे गमावली आहेत. डॉक्टर्स गेले आहेत, नर्सेस गेल्या आहेत, पोलिसांनी प्राण गमावले आहेत, पत्रकार गेले आहेत, राजकारणी गेले आहेत. लाखभर माणसं जाणं ही सामाजिक शोकांतिका असते. खूप क्लेशकारक असते दोस्त, मृत्यूचा असा जाहीर हिशोब देणे! या जवळच्या माणसांचं जाणं टाळता आले असते तर किती बरं झालं असतं. पण असं झालं नाही. आता ही माणसं हरवल्याची नोंद लपवून काय होणार आहे? या प्रत्येक माणसाला अखेरचा निरोप देताना महाराष्ट्राच्या डोळ्यांत आसू उमटले आहेत. महाराष्ट्राने मृत्यू लपविले नाहीत, या प्रत्येक मृत्यूसोबत डोळ्यात येणारे अश्रू मात्र नक्कीच लपविले आहेत आणि या वैराण काळात पुन्हा पुन्हा खंबीरपणे उभा राहायचा प्रयत्न केला आहे.

– डॉ. प्रदीप आवटे

Previous Post

मधुमेहींनी खायचं काय?

Next Post

मुकुल रॉयच्या घरवापसीमागील सत्य

Related Posts

कारण राजकारण

जातगणना : एक चुनावी जुमला!

May 15, 2025
कारण राजकारण

मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

May 15, 2025
कारण राजकारण

टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

May 15, 2025
कारण राजकारण

पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

May 8, 2025
Next Post
मुकुल रॉयच्या घरवापसीमागील सत्य

मुकुल रॉयच्या घरवापसीमागील सत्य

अमर प्रेम : पिक्चर फॉर क्लास नॉट फॉर मास

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.