शेतकरी मेला तरी हरकत नाही,
युवकांनी आत्महत्या केली तरी हरकत नाही,
पंमचरवाल्याची जिरली पाहीजे.
दोन वेळ उपाशी राहू, भले बेकार राहू
परंतु पंमचरवाल्याची जिरली पाहिजे.
कष्ट करून दिवसा दोनशे मिळवतो म्हणजे,
भले बेकारीत इमारतीच्या भिंती पाहू,
परंतु झोपडीवाल्याला सुखाने जगू नाही देऊ.
पन्नासचे मटन रोज खातो, म्हणजे काय
दोनशेत आनंदी राहतो म्हणजे काय.
भले दु:खी राहू, भले नागडे होवू
परन्तु पंमचरवाल्याची जिरली पाहिजे
नको नोकरी, नको छोकरी, नको दोन वेळची भाकर,
नको चारचाकी गाडी, नको घरावर माडी
नको विकास, नको प्रगती, नको भविष्य,
नको स्वप्न, नको सब्सीडी आम्हाला,
भले काढून टाका वीज, राहू आम्ही अंधारात,
बंद पडू द्या पाण्याची मोटर आम्ही दुष्काळात राहू,
भले एकच पीक घेवू, तुमच्या मढ्यावर कर देवू,
आमचे कर कष्ट करीत तुटू द्या,
राखरांगोळी होवू द्या संसाराची…
पर विनंती मायबाप सरकार
तेवडी पंमचरवाल्याची जिरवा.
सायब जिरवायची स्वप्ने दाखवली तुम्ही
पर जिरलीच काही नाही की हो,
दोनशेत खूश दिसतोय तो,
आता त्याचा आनंद पहावत नाही,
लावा आजून जोर
त्या पंमचरवाल्याची जिरवण्यासाठी
पंमचरवाल्याची जिरली पाहिजे
प्रेतांची रास लागली तरी
टाळूवरचे लोणी खाणारे आपले आहेत.