• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

डायटसाठीचं सूप(शास्त्र)

- जुई कुलकर्णी (डाएट मंत्र)

जुई कुलकर्णी by जुई कुलकर्णी
February 19, 2022
in डाएट मंत्र
0

स्वयंपाक करायच्या पद्धतीला संस्कृतमधे ‘सूपशास्त्र’ असं म्हणतात. पण आपल्याला भरपूर ओळखीचा असलेला सूप हा पदार्थ काही भारतीय स्वयंपाकपद्धतीचा भाग नाही असं आपल्याला वाटत असतं. एका अर्थी ते चुकीचं आहे, कारण सूप म्हणजे भाज्या किंवा मांस किंवा डाळी शिजवलेला पातळसर पदार्थ असतो. भारतीय जेवणात या प्रकारचे अनेक पातळ पदार्थ नेहमीच असतात.
वरण, आमटी, दाल, सांबार, रस्सम, कढण, कळण, कढी, सार, भाज्या घालून केलेले वरणाचे आणि आमटीचे प्रकार असे अनेक प्रकार आपण खातो. ते एकप्रकारे सूपच तर असतात. तरीही सूप म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे काही येतं त्या मूळ सूपचा शोध चीनमधे लागला आहे असं गुगल म्हणतं. सूपचं प्राचीनत्व सिद्ध होतं कारण त्याचा उगम इसवी सनापूर्वी २००० वर्षे इतका जुना आहे. तरी सूप हा शब्द मात्र फ्रेंच आहे. (संदर्भ : विकिपीडिया)
सूप हा पातळ प्रकारचा एक अगदी पौष्टिक पदार्थ आहे. सूप पूर्णान्न असतं. सूप्स सहसा गरमागरम वाढली जातात. काही गारेगार सूप्सही असतात. सूप्स दाट आणि पातळ दोन्ही प्रकाराची असतात. सूप्स अ‍ॅपेटायझर्स म्हणजे भूक वाढवणारी म्हणून काम करतात. त्यामुळे ती जेवणाच्या सुरुवातीलाच घेतली जातात. बरेचदा सूपात मिरपूड घातली जाते, कारण मिरपूड सूपची चव वाढवून भूक प्रज्वलित करणारी असते. सूपात भरपूर साखर घालून तुम्ही चव वाढवली तरी पौष्टिकता मात्र कमी होते. सूपाचा दाटपणा वाढवायला मैदा, कॉर्नफ्लोअर वापरलं जातं, तेही टाळलेलंच बरं.
डायबेटिक लोकांसाठी, डायटप्रेमी लोकांसाठी केली जाणारी आणि पथ्याची सूप्स वेगळी असतात.
सूप हेच एक पूर्णान्न असतं कारण सूपात मुळात काय काय असतं :
१) कार्बोहायड्रेडस : सूप दाट करायला वापरलेली कणीक/ मैदा/ कॉर्न फ्लोअर/ बटाटा/ पास्ता/ ओट्स वगैरे.
२) प्रोटिन्स : मांस/ अंड/ हाडं/ डाळी/ कडधान्ये वगैरे.
३) भाज्या : कांदा/ टोमॅटो/ पालक/ गाजर/ भोपळा/ ब्रोकोली/ फ्लॉवर/ फरसबी/ कोबी/ मका वगैरे.
४) मसाले : लसूण, मिरची, तिखट, हळद, दालचिनी, जिरं, मिरं, इटालियन हर्ब्ज अर्थात वाळवलेले ओरेगानो, बेसिल वगैरे.
५) स्निग्ध पदार्थ : पचनाला मदत करण्यासाठी तेल, बटर, तूप, लोणी, क्रीम, साय.
हे पाचही घटक प्रमाणात एकत्र करून सूप्स तयार होतात. योग्य प्रकारची सूप्स करून आहारात वापरली तर डायटसाठी सूप्स उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ :
– सूपात साखर घालणं टाळून स्टिव्हीआ वापरायची.
– तेल, तूप, बटर, लोणी अगदी कमी प्रमाणात वापरायचं. साय, क्रीम यांना फाटा द्यायचा.
– भरपूर भाज्या वापरायच्या.
– प्रोटीन रिच सूप्स कशी करता येतील याचा विचार करायचा.
असे काही नियम पाळून सूप्स बनवली तर ती डायटसाठी उत्कृष्ट ठरतात. सूप्स आणि सॅलड हे एकावेळचं पोटभर जेवण होऊ शकतं.

आमंड ब्रोकोली सूप

मला सूप्स प्रचंड आवडतात. एकदा तीच नेहमीची सूप्स घेऊन कंटाळा आला होता म्हणून एकदा एका हॉटेलात हे वेगळंच सूप पिऊन बघितलं. खूप आवडलं म्हणून घरीही करून बघितलं. हे सूप घरी खूपच स्वस्तात होतं, पोटभरीचं होतं. सोबत एखादं सँडविच किंवा सॅलड केलं तर पूर्ण जेवणच होतं.
साहित्य : एका मध्यम ब्रोकोलीचे तुरे,
सहा सात बदाम,
दोन तीन चमचे कणिक,
अमूल बटर एक टीस्पून,
साय काढलेलं गार दूध दोन तीन कप,
स्टिव्हीआ टॅबलेट/ पूड, ड्रॉप्स किंवा कुठलाही आर्टिफिशियल स्वीटनर (हे ऑप्शनल आहे).
मीठ, मिरपूड चवीनुसार
कृती :
१) ब्रोकोलीचे तुकडे करून एक वाटी पाण्यात घालून मायक्रोवेव्हमध्ये/ गॅसवर चार पाच मिनिटे उकडून घ्यावेत. पाण्यातून काढून थंड करावेत (हे पाणी नंतर दुसरीकडे वापरता येईल).
२) जरा गार झाल्यावर ब्रोकोलीचे तुरे अगदी बारीक चिरून घ्यावेत.
३) बदाम दोन तासभर गरम पाण्यात भिजवून घ्यावेत. नंतर सालं काढून बारीक काप चिरून घ्यावेत.
४) एका खोलसर फ्राय पॅनमध्ये एक चमचा अमूल बटर घालून त्यावर कणिक परतून घ्यावी. आच बारीक असावी. हलकेच परतून झाली की त्यावर एक कप दूध घालून व्हाइट सॉस करून घ्यावा. पातळ हवं असेल तर थोडं पाणी घातलं तरी चालेल, पण गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजेत, हेच या संपूर्ण रेसिपीत अवघड काम आहे. सतत व्हिस्करनं हा सॉस हलवत राहावा.
५) सॉस थोडासा शिजला की त्यात अजून दोन कप दूध घालावं. दोन मिनिटं ढवळून मग चिरलेली ब्रोकोली घालावी. चिरलेले बदाम घालावेत. दोन मिनिटं एक वाफ आणून आच बंद करायची.
६) स्टिव्हीआ ड्रॉप्स/ गोळी/ पूड वरून घालायची. कारण हे सूप जरा गोडसर चवीचं चांगलं लागतं. नको असल्यास हे घातलं नाही तरी चालेल.
७) मीठ आणि मिरपूडही चवीनुसार वरून घालायची. इटालियन हर्ब्जही घालता येतील.

लेमन कोरिअँडर सूप

विशेषतः थंडीत अशी सूप्स फार मस्त वाटतात. हे सूप क्लिअर सूप प्रकारातलं सूप आहे, म्हणजे हे पातळच असतं. हे सूप मला फार आवडतं. कारण चवीला चटपटीत असतं. यात भरपूर भाज्या तर असतातच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे करायला सोपं असतं.
साहित्य :
चार/पाच वाट्या पाणी,
दोन वाट्या मध्यम आकारात चिरलेल्या भाज्या :
फ्लॉवर, कोबी, गाजर, श्रावण घेवडा.
चार पाकळ्या चिरलेला लसूण,
एक/दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून
अर्धे/एक लिंबू,
मूठ-दोन मुठी कोथिंबीर
अर्धा टीस्पून तेल/बटर
मीठ मिरपूड चवीनुसार
कृती :
१) सॉसपॅन/ कढईत अर्धाच चमचा तेल/बटर टाकावे. तापले की त्यात लसूण टाकावा. मिरची टाकावी.
२) लसणाचा छान वास येऊ लागला की आधी गाजर,
फ्लॉवर टाकावा, श्रावणघेवडा टाकावा. मीठ घालून थोडे परतावे. मग कोबी टाकावा. कोबी लगेच काळा चिडका होतो म्हणून तो शेवटी टाकायचा.
३) नंतर लगेच चार-पाच वाट्या पाणी टाकायचं.
४) मीठ, मिरपूड चवीनुसार घालून खळखळून उकळी आली की सूप तयार.
५) या सूपात भाज्या जरा टचटचीतच राह्यला हव्यात. पचपचीत झाल्या की लगदा होतो आणि मजा येत नाही.
६) वरून चवीप्रमाणे लिंबू पिळायचे आणि भरपूर प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.

मसूर डाळ सूप

मसुराच्या डाळीला मराठी स्वयंपाकात फारसं स्थान नाही. मसूर डाळ भरपूर प्रोटिन्स असलेली असते. या डाळीचं सूप छान होतं.
साहित्य : एक वाटी मसूर डाळ, एक टेबलस्पून मूग डाळ, एक टोमॅटो चार तुकडे करून.
दोन लसूण पाकळ्या, पेरभर आलं, एक टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हिंग, एक टीस्पून जिरेपूड, एक टीस्पून हळद, एक टीस्पून तेल, एक टीस्पून मिरपूड, मीठ चवीनुसार. पाणी.

इटालियन हर्ब्ज

कृती :
१) छोट्या कुकरमधे मसूर डाळ, मूग डाळ स्वच्छ धुवून घालाव्यात. एक टोमॅटो चार तुकडे करून घालावा. लसूण आणि आलं घालावं. तीन शिट्ट्या कराव्यात.
२) कुकरची वाफ जाऊन जरा गार झाल्यावर ब्लेंडरने नीट घोटून घ्यावं. ब्लेंडर नसेल तर मिक्सरमधून वाटून घ्यावे.
३) घोटलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालावं.
४) या मिश्रणात एक टीस्पून तेल, जिरेपूड, हिंग, हळद, तिखट, मिरपूड आणि चवीनुसार मीठ घालून खळखळून उकळी काढावी.
५) वाढताना इटालियन हर्ब्ज घालून वाढावे.

(टीप : लेखिका आहारतज्ज्ञ नाहीत. लेखातील मते वैयक्तिक अनुभवांवर आधारित असून बहुतांश पाककृती पारंपरिक आहेत.)

Previous Post

झेरॉक्स मशीनमधून काढली यशाची ट्रू कॉपी!

Next Post

पैसा : भाग्यवंतांचे परिपूर्ण खाद्य!

Related Posts

डाएट मंत्र

पौष्टिक पथ्यकर रोटी आणि पराठे

September 29, 2022
डाएट मंत्र

भाजणी : मराठमोळं डायटफूड

September 16, 2022
डाएट मंत्र

क्विनोआ : प्राचीन पण परदेशी

September 1, 2022
डाएट मंत्र

वन डिश मील : पौष्टिक एकीकरण

August 4, 2022
Next Post
पैसा : भाग्यवंतांचे परिपूर्ण खाद्य!

पैसा : भाग्यवंतांचे परिपूर्ण खाद्य!

हॅलो हॅलो...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.