आज्जी ए आज्जी… ऐक ना गं… विवान सारखा पदर ओढत होता.
खेळ ना गं माझ्याबरोबर.
चोर पोलिस खेळू आपण… बघं कशी मज्जा येईल… अमितची आज्जी रोज खेळते त्याच्याबरोबर… तू खेळ चल…
अरे माझे पाय दुखतात… मी बोलल्यावर… दूखू दे. मी दाबेन तू खेळ…
तू असं कर विवान… मी जरा त्याचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी तू की नई खिडकीतून किती गाड्या जातात ते मोज बरं. आणि मग मी मोजेन.. जास्त ज्याच्या… नको… तू रोजच असंच सांगतेस… तो हट्टाला पेटला होता.
खाली जाऊ देत नाहीस… गार्डनमध्ये नेत नाहीस.. आणि शॉपिंग पण नाही… मला कंटाळा आलाय… चल खेळ…
बापरे हे असं किती दिवस चालणार. कोरोनामुळे मुलांना शाळा नाही. कोणाकडे जाणं येणं नाही… खेळायच्या बागडायच्या वयात घरात राहिल्याने त्यांची घुसमट होत होती… आणि आमची मात्र फरपट झाली होती… दीड पावणे दोन वर्षे होत आली…
दुसरीकडचा किस्सा म्हणजे सौम्या… मोबाईल एके मोबाईल.
मोबाईल दुणे
बापरे… हातातून काढून घेतला का आकांत.. युट्यूब वर… रमलेली…
मग कोणाला तरी सांगायचं रिंग द्या… मग आणून द्यायची फोन… पण परत आपल्याला कधी मिळतो हातात… वाट बघत बसायची…
खरं तर लहान मुलांना मोबाईल सतत बघणं हानिकारक… पण करायचं काय… त्यांच्या समजण्याच्या वयात होणारी घुसमट.
लहानपणी आपलं कसं होतं. मातीत खेळलो. पावसाच्या पाण्यात भिजलो.. मग कधीतरी सर्दी झाली की ओरडा… घरच्यांचा… ईथे न खेळता न भिजता सर्दी होईल म्हणून घाबरत रहायचं…
बालपणं हरवलं त्यांचं… बागेत जाऊन फुलपाखरू पकडण्याची मजा… जमलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडण्याची मज्जा.. लगोरी म्हणून ओरडतानाचा आनंद… सगळं हरवलंय… आणि काय तर फक्त घुसमट वाढलेय… ए आज्जी खेळ की गं.. खरंच पाय दुखले तर मी चेपेन… तू चोर हो मी पोलिस…. विवानच्या आवाजाने मी तंद्रीतून बाहेर आले.