मथुरेत भावी पंतप्रधान योगी आदित्यनाथ यांच्या कृपेने मांसाहार आणि दारूवर बंदी घालण्यात आली आहे. आम्ही तर म्हणतो की भाजपशासित सगळ्याच राज्यात, खासकरून गोव्यात, हे लगेच करून टाकावं. अशा तामसी कृत्यांसाठी उठसूट गोव्यात जाणार्या आगाऊ पब्लिकचा मोरू झाला तर आम्हाला भलताच सात्विक आनंद होईल!! गोव्यातल्या प्रत्येक मंदिरापासून १० किमीच्या परिघात आणि समुद्र हे साक्षात वरूणदेवाचे स्थान असल्याने किनार्यापासून २० कि.मी.च्या परिघात मांसाहार, कांदा-लसूण आणि दारू (रेडबुलसकट) बंद करून टाकावी. गोव्यात समुद्रकिनारी पूर्ण कपड्यातल्या सत्संगाचे कार्यक्रम, जैन बिर्याणी आणि लिंबू सरबत एवढंच मिळायला लागलं की किती हौशी लोक पर्यटनासाठी गोव्याच्या ट्रीपा काढतात ते बघूच!!!