अभिनेता रणबीर कपूरच्या हस्ते मुंबई सिटी फुटबॉल क्लबने नुकतेच क्लबच्या नवीन मानचिन्हाचे अनावरण केले. 2023-24 हंगाम हा क्लबच्या इतिहासातील महत्त्वाचा 10वा हंगाम आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात मुंबई सिटी फुटबॉल क्लब चाहते, खेळाडू आणि भारतीय फुटबॉल चाहत्यांना नवीन मानचिन्ह प्रदान करण्यात आले. नवीन मुंबई सिटी एफसी क्रेस्ट क्लब आपल्या मानचिन्हात मुंबईच्या महत्त्वाच्या मूल्यांसह या शहराच्या आधुनिकता आणि अग्रगण्य भावनेचे प्रतिनिधित्व करतो.
या नवीन मानचिन्हात मुंबईचा समुद्र, सागरी सेतू महामार्ग आणि मुंबई शहराची जीवन वाहिनी समजली जाणारी उपनगरीय रेल्वे याचा समावेश आहे. हे मानचिन्ह बनवताना ब्रँड पार्टनर्स आणि चाहत्यांचे मत विचारात घेण्यात आले. याच कार्यक्रमात स्पोर्ट्स ब्रँड PUMA इंडियाने मुंबई शहराच्या प्रतिष्ठित निळ्या रंगात डिझाइन केलेल्या 2023-24 होम किटचे देखील अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मुंबई सिटी एफसीचे सीईओ कंदर्प चंद्रा म्हणाले, “मुंबई सिटी एफसीच्या महान इतिहासातील पुढच्या अध्यायात आमचं नवीन मानचिन्ह लॉन्च करताना मला खूप आनंद होत आहे. मुंबईकरांना अभिमान वाटेल अशी संस्था निर्माण करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे. आम्ही चाहत्यांसाठी मैदानावर यश मिळवून देण्यासाठी कठोर परिश्रम करत असताना, मानचिन्ह सारख्या महत्त्वाच्या निर्णयाबाबतीत आमच्या समर्थकांना सहभागी करून घेणे महत्त्वाचे होते. आमचा नवा मानचिन्ह आधुनिक दृष्टीकोनासह मुंबई शहराची ओळख जपण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो.