मोहन भागवत
दिवसरात्र मंदिर मंदिर
शब्द ऐकून कान किटले
भक्तांनो, पक्षाच्या आमच्या,
बंद करा ते देवही विटले
मूर्खांच्या नादाला लागून
का बडवता घंटा-टोले
ते लोक लुच्चे गेमच खेळतात
बस करा आता देवही बोले
आपण सारे विश्वधर्मी
हिंदुत्वाचे सत्ता-सोंग
लोक ओळखून आहेत भक्तों
द्वेष वाढवायचे तुमचे ढोंग
नूपुर शर्मा
बोलघेवडे बोलघेवड्या
आमच्या पक्षात आहेत भरपूर
तोंडफाटके, तोंडफाटक्या
माझ्यासारख्या आहेत नूपुर
धडा शिकवण्या मोदींनाही
केला वकिलातीचा वापर
घाबरतात की बाजू घेतात
पाहून हसले त्यांची पॉवर
आखाती देशांना घाबरून
पीएमनी तर टाकली नांगी
मलाच त्यांनी दिले हाकलून
पुराणातच राहिली वांगी
काँग्रेस
दोन हजार तेरा साली
मनमोहन होते पंतप्रधान
अमेरिकेमध्ये झाला होता
भारतीय महिलेचा अपमान
देवयानी खोब्रागडे बाई
आठवते का तिचे नाव
भारतीय वकिलातीत बसला
गैरवर्तनाचा खोटा घाव
मनमोहनांच्या कानी येता
दिला अमेरिकेस सज्जड दम
क्षमा मागितली अमेरिकेने
हे तर नुसते पानी कम
नरेंद्र मोदी
कतारसकट मुस्लिम देश
आपण सारे भाऊ भाऊ
भूमिका गेली तेल लावत
त्यांचे तेल प्रेमाने खाऊ
आपले अडतीस नेते पक्के
दुसर्या धर्मांना देतात शिव्या
पुन्हा कोणी जर केले अस्से
गाऊन घेईन कुराण ओव्या
बेताल बडबड केली तर ना
कोंबेन तोंडात कायम बोळे
आता तंतरली नि आले
पोटामध्ये आवळेच आवळे
कृपाशंकर सिंह
यूपीत सगळ्या शाळांमध्ये
मराठी हा विषय शिकवा
मुले मोठी झाल्यावरती
नोकरीसाठी मुंबईत पाठवा
योगी आदित्यना लिहून पत्र
मी तर केले त्यांचे भले
आवजाव घर तुम्हारा
तुमची मुले ती आमचीच मुले
क्रांतिकारक पत्राने माझ्या
मुंबईत उडाली एकच खळबळ
प्रतिक्रिया त्या ऐकून ऐकून
माझ्या पायातील गळले बळ