• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

अस्सल मुंबई भेळ

- शुभा प्रभू साटम (हॉटेलसारखे... घरच्या घरी)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 16, 2022
in हॉटेलसारखे... घरच्या घरी
0

इथं चाट बिट नाही, निव्वळ मराठी भेळ, परत इथं मुंबईत मिळते ती भेळ हे महत्त्वाचं, कारण पुण्यात, पुष्करणी भेळ, संभाजी पार्कात मिळणारी भेळ जगप्रसिद्ध आहे असे (फक्त) पुणेकर(च) म्हणतात तथापि मुंबईत मिळणार्‍या भेळच्या कागदावर उरलेल्या शेवेच्याही समोर ती टिकणार नाही.. हे अस्सल मुंबईकाराचे मत..विषय निकालात!!!
काय असतं या भेळेत, म्हणजे मुंबई भेळेत?
कुरमुरे, तेही पारदर्शक असे, बटबटीत भंडग नाही.
नंतर येते शेव, ती पण अगदी पातळ अशी, इथं जाड्या शेवेला मज्जाव, ही शेव भुसा शेव म्हणून मिळते, अथवा नायलॉन शेव म्हणून.
मग शेंगदाणे, सालासकट.. ती साल नरड्यात बिलकुल अडकत नाहीत आणि इतके जर नाजूक असाल, तर मग बिसलेरीच्या पाण्याची पाणीपुरी मिळते तिथं जा..
मग येतो उकडून पातळ कापलेला बटाटा, कुस्करलेला नाही.. हे ठळक टायपात वाचावे.
नंतर तशीच पातळ कापलेली कैरी, अर्थात हंगामात म्हणा.. पण हल्ली जिथे डिसेंबरमध्ये फणस आणि जानेवारीत आंबे मिळतात तिथं कैरी बारमाही मिळायला काय कठीण! तर यानंतर येतो बारीक चिरलेला कांदा, मग हिरवी चटणी, लाल चटणी, आणि ज्यांना भेळ तिखी हवीय त्या अतुल्य धैर्यधराकरता खास चटणीचा लाल गोळा बाजूला असतो. त्यातला नखभर टाकायचा, मीठ, तो अद्वितीय चवीचा गुप्त मसाला, टोमॅटो हवा त्यांनाच, कोथिंबीर आणि लिंबू… सगळे छान एकत्र करून, त्यात दोनेक पुर्‍या कुस्करून, वर एखादी अख्खी पुरी, वरून परत थोडा कांदा आणि पेश करायची.. ती सुद्धा कागदाच्या कोनात!! पेप्राच्या…
ही अस्सल मुंबई भेळ!!!
आणि अशी भेळ आजकाल नाहीच मिळत बंटाय!!!
पार कायापालट झालाय तिचा.
त्यात आता येतो कॉर्न चिवडा (हा शोधणारा माणूस मला मिळाला पाहिजे), जाडी बटबटीत लाल शेव!! लाल शेव भेळेत?? अधर्म!!!!
हे कमी नाही म्हणून की काय, फरसाण नामक पिवळा बेचव कचरा, गाठ्या, बुंदी..
इतका भ्रष्टाचार करून मन भरत नाही, मग वरून परत गाजर, बिट, कोबी यांची पखरण, च्यामारी भेळ आहे की लग्नात मिळते ते बेचव सॅलड?? आणि शेवटी अ‍ॅस्थेटिक टच म्हणून डाळिंब दाणे…
एका ठिकाणी ही अशी कलाकुसर बघत मी उभी होते, बाबा थांबतच नव्हता, शेवटी मी म्हटलं त्याला भाई, और अगर शिमला मिरची, झालंच तर बैगन, पनिर डालकर उपर से मस्त जिरेका तडका दे दो, भेळ पुलाव, नयी डिश बन गयी…
हे झालं भेळच्या सामानाबद्दल, हल्ली तिच्यात ज्या चटण्या घातल्या जातात त्यापण पूर्ण बदलून गेल्यात.
हिरवी चटणी तरी बरी आहे, पण चिंचेची जी काळसर, आंबट गोड, तिखट चटणी असायची, तिच्याऐवजी कुठलातरी चिकट लालसर द्राव ओततात, मी तो द्राव समान न्यायाने पिझ्झा, सँडविच,समोसा यांच्यावर ओतला गेलेला पाहिलाय.. विचारल्यावर उत्तर मिळाले की ऑल इन वन सॉस है मॅडम.. अन्नात असा साम्यवाद इथंच आढळून आला मला..
मग किंमत कायकू वेगवेगळी रखा है? असं मनातच विचारलं.
मुद्दा हा की, भेळेची ही अधोगती का झाली?
वडापावमध्ये चीझ आलं, आपण सहन केलं.
पावभाजीत कांदा लसूण अभावाने येऊ लागला, परत त्यात सेझवान सॉस घुसला, आपण चूप बसलो, साबुदाणा वडा मेयो सोबत दिला, आपण गिळला.
चॉकोलेट पुरणपोळी, स्ट्रॉबेरी मोदक, लाल रंगाचा तिखट मसाले भात, पनिर घातलेली व्हेज कोल्हापुरी (याच्या उगमाचे कोडे अजून कायम आहे), टोमॅटो कांदा यांच्या संकरात लडबडलेली मालवणी कोंबडी, मँगो बासुंदी, पान फ्लेवर श्रीखंड, चीझ मिसळ, व्हॅनिला/चॉकोलेट/पान फ्लेवर चिक्की, असे अनेक प्रकार मराठी माणूस चुपचाप गिळतोय. पण भेळेसारख्या म्हटलं तर सोप्या गोष्टीतसुद्धा असलं काही भयानक मिसळू/मिळू लागलं तर मग उपेग काय भावा? ही सेझवान सॉस घातलेली भेळ तुम्ही जरूर खा, वरून हवं तर मोक्कार चीझ पेरा, पण मूळ भेळ हरवायला देऊ नका!! सगळं सबगोलंकार नको.
मला कुठंतरी असे वाटते की मराठी पदार्थ एकतर अतिशय सोप्पे असतात अथवा कठीण. बरं जे सोप्पे असतात ते जमतातच अस नाही, गोडे वरण आणि पुरणपोळी.. एक प्राथमिक, दुसरा पार एमआयटी लेव्हलचा. पण जमायला दोन्ही अवघड. भेळेचे तसेच आहे.
निव्वळ शेव कुरमुरे एकत्र करून, वरून चटण्या, कांदा ओतून भेळ होत नाही.. सगळे घटक पदार्थ त्याच प्रमाणात यायला हवेत.
आणि नेमके तेच चुकते. नाविन्याच्या तथाकथित हौसेपाई अनेक पदार्थ मूळ रूप सोडून पार बदलून गेलेत.
तर आज बघू अस्सल मुंबई भेळ.
साहित्य :
भेळ हिरवी चटणी
पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, चाट मसाला, मीठ एकत्र वाटून
भेळ आंबट गोड चटणी
पाव वाटी खजूर बी काढून
थोडी चिंच
थोडा गूळ
लाल तिखट
जिरे पूड
हे सर्व नरम उकडून घ्यावे. आणि मीठ घालून गुळगुळीत वाटावे
ही आंबट गोड चटणी
तिखट भेळ हवी तर लाल मिरची, मीठ यांचा ठेचा करून घ्यावा.
आता भेळ साहित्य…
पारदर्शक पातळ कुरमुरे
त्याच्या अर्धी बारीक शेव
त्याच्या अर्धे शेंगदाणे
शेवपुरी पुर्‍या
उकडलेला बटाटा पातळ काप करून
कैरी पातळ काप करून
कांदा बारीक चिरून
टोमॅटो बारीक चिरून
लिंबू रस
चाट मसाला
कृती :
प्रथम कुरमुरे, शेव, शेंगदाणे एकत्र करून घ्यावे.
आता त्यात प्रथम बटाटे, मग टोमॅटो, मग कांदा घालून, व्यवस्थित एकत्र करून, क्रमक्रमाने सर्व चटण्या, चाट मसाला घालून नीट ढवळून घ्यावे.
आता वरून कांदा, कुस्करलेली शेवपुरी घालून परत एकदा नीट कालवावे.
देतेवेळी वरून बारीक कांदा, लिंबू, कोथिंबीर, कैरी काप घालून द्यावे.
ही अस्सल मुंबई भेळ…

Previous Post

नॉनस्टॉप हसविणारे खेळकर नाट्य!

Next Post

राखणदार

Related Posts

हॉटेलसारखे... घरच्या घरी

घशी आणि नीर डोसा, बेहोश करणारे खाणे!!

September 22, 2022
हॉटेलसारखे... घरच्या घरी

पितरांसाठी प्रसादाचे जेवण

September 8, 2022
हॉटेलसारखे... घरच्या घरी

बाप्पा मोरया, मस्त मोदक चापू या!

August 25, 2022
हॉटेलसारखे... घरच्या घरी

थाय फूडचा नाद करायचा नाय!

July 28, 2022
Next Post

राखणदार

भविष्यवाणी १८ जून

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.