• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

लव्हशीप देशील का?

- सारिका कुलकर्णी (बे दुणे पाच)

Nitin Phanse by Nitin Phanse
February 16, 2023
in भाष्य
0

रीतिपरंपरेप्रमाणे यावर्षीदेखील व्हॅलेंटाईन दिवस उत्तम पार पडला. मी तर या काळात फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियावरून अजिबात फारकत घेत नाही. बेसुमार करमणूक असते. कवितांचा खच पडतो. मला प्रेमकविता फारशा समजत नसल्याने मी त्या सगळ्या विनोदीच समजते, हा भाग वेगळा. पण उत्साहाने वातावरण ओथंबून भरलेलं असतं. क्षणभर आपण सोशल मीडियापासून दूर गेलो आणि नेमकं तेवढ्याच वेळात तिथे काही महत्वाची आणि रंजक पोस्ट पडली तर, कॉमेंट करणार्‍यांमध्ये आपलं नाव उशिरा यायला नको म्हणून सतत मोबाईल चालूच ठेवून असते.
व्हॅलेंटाईन दिवस आपला नाही वगैरे गोष्टींवर माझा अजिबातच विश्वास नाही. ‘जे जे उत्तम उदात्त’ वगैरे आहे ते आपलं आहेच. मला तर वाटतं व्हॅलेंटाईन दिवस भारतातच आधी साजरा झाला. साधारण गुप्त आणि मौर्य राजवटीच्या काळात सर्वप्रथम वसंत ऋतूत प्रेमदिवस साजरा झाला. म्हणजे नक्की मौर्य की गुप्त ते आता आठवत नाही. पण, अलीकडेच झालेल्या संशोधनात हे सिद्ध झालेले आहे की ज्याप्रमाणे योग, पुष्पक विमान, आयुर्वेद, शेती करण्याची कला या सगळ्या गोष्टी जगाने भारताकडून चोरल्या तद्वतच व्हॅलेंटाईन यांनी हा दिवस भारताकडून चोरलेला आहे. गुप्त आणि मौर्य अशा दोन्हीही राजवटीतील राजांचे वंशज माझे मित्र आहेत. त्यांनी अभिमानाने आपल्या पूर्वजांनी असा दिवस साजरा केला होता हे छातीठोकपणे सांगितलेले आहे. आता त्यांच्याच वंशावळीतील लोक सांगत आहेत म्हटल्यावर विश्वास बसायला नको का? काय झालं की एके वर्षी रंगपंचमी १४ फेब्रुवारीला आली. रंगपंचमीला सगळीकडे रंगांची उधळण होते. गुप्त मौर्य राजवटीतील रंगांचं प्रॉडक्शन डिपार्टमेंट संपावर होतं, फक्त लालच रंग शिल्लक होता. मग सगळ्यांनी माझ्याकडे लाल असं म्हणत हा लाल रंग उधळला. मिठाया वाटल्या. लाल रंग हा प्रेमाचं द्योतक असल्याने आणि रंगपंचमीला प्रेमाचा बहर आलेला असल्याने तेव्हापासून त्या तारखेला प्रेमदिवस साजरा होऊ लागला. व्हॅलेंटाईन दिवसाच्या दिवशी लाल कपडे घालणे गरजेचे असते यावरूनच यातील खरेपणा लक्षात येतो. पण, भारतीय लोक मुळातच निरागस आहेत. शिवाय ते अनुभव घेण्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे प्रेम करत बसण्यातून या दिवसाचं पेटंट वगैरे घेण्यासाठी त्यांना फुरसतच मिळाली नाही. परिणामी पुढच्या काही २००-३०० वर्षांत हा दिवस बाहेरच्या देशातील लोकांनी चोरला आणि त्यांच्या नावावर साजरा करू लागले. पण, बाहेरच्या देशातील म्हणून त्याची संभावना आपल्या देशात होऊ लागली. माझं काय म्हणणं आहे, लोकांनी प्रेम करावं ना, दिवस कोणी शोधून काढला यावर काथ्याकूट कशाला करावा?
आमच्या काळात कॉलेजात या दिवशी ‘लव्हशीप’ मागायची पद्धत होती. ती आताच्या काळातही रूढ आहे का हे बघण्यासाठी मी १४ तारखेला एका कॉलेजात चक्कर टाकली, तर तेथील वातावरण बघून मी भारावूनच गेले. पुस्तकी आणि वर्गातील शिक्षणावर या पिढीचा अजिबात विश्वास नाही हे बघून बरं वाटलं. दीडशे पटसंख्या असलेल्या वर्गात फक्त शेवटच्या बाकावर ४-५ मुलं बसलेली होती. तीदेखील मॅडमना लव्हशीप मागण्यासाठी बसलेली आहेत, असे नंतर कळले. ज्या वर्गात मुली बसलेल्या होत्या, तिथे पुरुष प्राध्यापक असावेत. बाहेरच्या मुक्त वातावरणातच जीवन समजते हे जाणून सर्व विद्यार्थीगण बागेत, नाहीतर स्टारबक्स नामक कॉफीगृहात, अथवा कुठल्या तरी कॅफेमध्ये बसलेला होता. मागच्या आठवड्याभरापासून हे दृश्य असेच आहे असे समजले. आधी गुलाब देणे, मग चॉकलेट, मग भालू (टेडी बेअर हो) देणे वगैरे प्रक्रियेतून सगळ्यांना जावे लागते असे समजले. मगच लव्हशीप मागता येते. मग मुली ‘माझ्या मनात असं काही नाही,’ इथून सुरुवात करतात. हे मात्र माझ्या कॉलेजात असताना जसं असतं तसंच अजूनही आहे. काही गोष्टी शाश्वत असतात त्या अशा.
हल्ली प्रेमाची जाणीव फार लवकर सगळ्यांना होते. आमच्या सोसायटीतील इयत्ता तिसरीत असलेल्या मुलाला मी मुलीकडे लव्हशीप मागताना बघितले आणि आता देशात सगळीकडे फक्त प्रेम आणि प्रेमच दिसणार याची खात्री झाली. हल्ली या आठवड्यातच प्रोपोज दिवस सुद्धा असतो म्हणे. त्या दिवशी देखील कॉलेजात उत्साहाचे वातावरण होते. मुलंमुली एकमेकांना वेळ काढून प्रोपोज करीत होते. काही प्रोपोजल नाकारले गेल्यामुळे चेहर्‍यावर निराशा होती. पण पुढच्याच क्षणी अन्य पर्याय सापडल्याने ही निराशा कुठच्याकुठे लोप पावत होती. आजकालचं हे एक फार आवडतं मला. उगीचच फापटपसारा नाही, हो म्हणतेस की नाही? का दुसरी शोधू?
एकाने तर मुलीला म्हटलेलं देखील मी ऐकलं,’ दिव्या, तू लवशीप देतेस की नाही, की मी काव्याला प्रोपोज करू?’
पिझ्झा खाऊ की बर्गर खाऊ हा पेच जितक्या सहजी सोडवता येतो, तितक्याच सहजी हे प्रेमाचा पेच सोडवतात, हे बघून माझे उर भरून आले.
अशा या शुद्ध दिवसाला नावे ठेवणारे लोक मला अजिबात आवडत नाहीत. या आठवड्यातच एक किस डे असतो. मुका घेऊन मुक्याने मुके करण्याची ही एवढी सुंदर प्रक्रिया आणि त्याला गाजराचा कीस, दुधीचा कीस असे फोटो टाकून लोक आपल्या अरसिकतेचे प्रदर्शन करतात.
एका कॅफेमध्ये एक मुलगी एकटी बसलेली दिसली. मला वाईट वाटले. ाfहला कोणी लवशीप मागितलेली दिसत नाही. माझ्या मनात अपार करुणा दाटून आली. म्हणून मी तिच्या शेजारच्या टेबलावर बसून तिच्या मोबाईलमध्ये जरा डोकावले तर समजले की तिचा मित्र बाहेरगावी होता. तिथून तो हिला किस मागत होता. असल्या आळशी मुलाशी हिने तत्काळ लवशीप तोडावी असा सल्ला मी देऊन टाकला. तिनेदेखील तो शिरोधार्य मानून दुसर्‍या मित्राला तिथल्या तिथे होकार भरला. आम्ही कॉलेजात असताना ही प्रक्रिया अकरावीपासून सुरु झाली की शेवटच्या वर्षापर्यंत कशीबशी होकारावर यायची. आता ती काही क्षणात पूर्ण होते हे बघून जग किती वेगवान झाले आहे हे समजले.
पूर्वीच्या काळी प्रेमात हिशेब ठेवला जात नसे, आता मात्र दोघेही तो हिशेब ठेवतात.
‘तू मला गुलाब आणि चॉकलेट का दिले नाहीस?’ अशी तक्रार एक मुलगी रेल्वे स्टेशनवरील सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर भेटलेल्या आपल्या प्रियकराला करत होती.
यावर मुलाने उत्तर दिले- हे बघ, मी आताच नोकरीला लागलो आहे. तुझ्या त्या गुलाबावर आणि चॉकलेटवर ५०० रुपये खर्च होतात. त्याऐवजी २-४ वडा पाव नाहीतर चायनीज भेळ घेऊन देतो आणि ५५ रुपयांचा रिचार्ज करून देतो. चालत असेल तर लवशीप चालवू या अथवा आमच्या ऑफिसात न्यू जॉईनीज भरपूर आहेत.
मुलीने त्यात वडापाव आणि ६९ रुपयांच्या रिचार्जवर तडजोड मंजूर करून घेतली.
गुलाब दिन, प्रस्ताव दिन, चॉकोलेट दिन, वचन दिन, मिठी दिन, पप्पी दिन हे सगळे प्रेमाचे सोपान आहेत हे मी समजू शकते पण तो एक अस्वल/भालू दिवस यात कसा आला हे मात्र मला अजून समजलेले नाही. म्हणजे प्रेमात माणसाचं माकड होतं असं मी ऐकलेलं होतं. पण अस्वल का होत असावं? अस्वल जसं गुदगुल्या करतं तशा प्रेमात गुदगुल्या होतात का? की अस्वलासारखं प्रेमात कोणाच्या तालावर नाचावं लागतं?
एका मुलीने तर जवळपास १५-२० मुलांना माझ्या समोर लवशीप द्यायला नकार दिला. तिला कारण विचारल्यावर म्हणाली, ‘प्रेमाची सुरुवात व्हॅलेंटाईन डे, हग डे, किस डे ने होते पण शेवट मात्र चहा दे, पाणी दे, झोपू दे यानेच होतो. म्हणून मला यात पडायचंच नाही.’
यावर्षी आमच्या सोसायटीत एका आजोबांनी व्हॅलेंटाईन दिवसाच्या दिवशी सगळीकडे गुलाब वाटले. मलाही आजोबांनी गुलाब दिला. त्यांना म्हटलं, काय विशेष काका?
तर म्हणाले- अगं खुळी की काय तू? आज व्हॅलेंटाईन दिवस.
मी- काका, तुमचा विश्वास आहे यावर?
काका- दिवसाचं सोड, प्रेमावर तर विश्वास आहे ना. प्रेम करण्यासाठी कुठलंही निमित्त पुरतं की. मला तर खूप आवडतात या सगळ्या नव्या प्रथा. जुन्या काळी आपण एकमेकांना आवडतो हे सांगायला लोक संपूर्ण आयुष्य घालवायचे. एखाद्याची एखादी गोष्ट आवडली तरी सांगायला हात आखडता घ्यायचे. एका घरात राहून नवरा बायकोने एकमेकांवरील प्रेम सांगायला म्हातारपण यायचं. आता या दिवसांच्या निमित्ताने बोलून टाकावं. काही राहिलं असं वाटू नये. नवीन पिढी क्षणार्धात ते बदलते हे माहिती आहे, पण ते फक्त प्रेमाच्याच नव्हे तर सगळ्याच बाबतीत तसे आहेत. मग कशाला बोल लावायचा?
मलाही पटलं. उगीच एवढ्या सगळ्या संघटना याला विरोध करतात. हे दिवस भारतातच सुरु झाले ही खरी बातमी लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत कोणीतरी पोचवायला हवी. त्यांना पटत नसेल तर मी मौर्य आणि गुप्त वंशजांना त्यांची भेट घालून द्यायला तयार आहे.

Previous Post

वंचितांच्या शिक्षणाचे धिंडवडे

Next Post

इंद्रजाल

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

इंद्रजाल

भविष्यवाणी १८ फेब्रुवारी २०२३

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.