• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

व्यंग आणि चित्र…

- प्रदीप म्हापसेकर (भाग-२)

Nitin Phanse by Nitin Phanse
February 16, 2023
in व्यंगावर बोट
0

व्यंगचित्रकला म्हणजे कागदावरची रेषांच्या माध्यमातून केलेली विनोदनिर्मिती अशी अनेकांची समजूत असते. व्यंगचित्रे ही हास्यचित्रेच असतील असे नसते. व्यंगचित्र हे समाजातल्या घडामोडींवरचं व्यंगचित्रकाराचं भाष्य असतं. सखोल चिंतनातून आलेलं… हे चिंतन कसं घडतं, त्यातून चित्र कसं आकार घेतं, याची प्रोसेस मांडणारे लेखन मराठीत फार नाही. ज्येष्ठ व्यंगचित्रकार, लेखक, कवी प्रदीप म्हापसेकर यांचा ही प्रक्रिया उलगडणारा लेख ऋतुरंग प्रकाशनाच्या ‘तो कधी एकटा नसतो’ या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे. तो मार्मिकच्या वाचकांसाठी दोन भागांत देण्यात आला. आज दुसरा भाग!
– – –

एखाद्या घटनेवर, एखाद्याच्या कृतीवर मी जेव्हा चित्र, व्यंगचित्र रेखाटतो तेव्हा ते रेखाटून माझं काम संपलेलं असेलही. पण चित्रातले विचार, मत पुढे प्रवास करत असतं. त्याला नवे अर्थ प्राप्त झालेले असतात. इसिसच्या लोकांनी सिरीया ताब्यात घेतला आणि सिरीया ढवळून निघाला. रोज कत्तली, हिंसाचार, बॉम्बस्फोटांनी सिरीया हादरला.
पण हे सगळंच त्या वेळी जगाला कळलेलं नव्हतं. जगभरातल्या फोटोग्राफर व्यंगचित्रकारांनी सिरीयाची नवी काळी बाजू लोकांना दाखवली. युरोपातल्या, अमेरिकेतल्या बर्‍याच व्यंगचित्रकारांनी सिरीयावर चित्रं काढली. काहींची खूप भेदक, वास्तववादी होती. कधी कधी कलात्मकता ही तुमच्या अंगावर शहारे आणते. यातली बरीचशी चित्रं मी नेटवर पाहिली होती. या चित्रांमुळेच इसिसचा भेसूर चेहरा जगाला दिसला. सिरीयन लोकांचे अश्रू, वाताहत जगाला दिसली. लाखो लोक सिरीया सोडून इतर जवळपासच्या देशांचा आसरा शोधू लागलं. लहानसहान बोटीतून ते सिरीया सोडत होते. अशाच एका प्रसंगाने जग हादरून गेलं. काही सिरीयन लोक बोटीतून प्रवास करताना बोट कलंडली. बरेचजण पाण्यात बुडाले. काही वाचले. पण त्या वेळी किनार्‍यावर एका लहानशा मुलाचा मृतदेह आढळला. तो फोटो पाहून जगाचे डोळे पाणावले होते. काही व्यंगचित्रकारांनीही या प्रसंगावर, निर्वासितांच्या प्रश्नांवर बरीच चित्रं काढली होती. त्या वेळी आपल्याकडेही मला वाटतं श्री. श्री. रविशंकर यांनी एक भाष्य केलं होतं. ‘आपण लवकर जागं व्हावं नाहीतर भारताचाही सिरीया होईल,’ या रविशंकर यांच्या भूमिकेवर मी एक चित्र केलं होतं. असं म्हणतात की, व्यंगचित्र हा समाजाचा आरसा असतो. अशा चित्रांमुळे जड विषय सामान्य लोकांना समजायला सोपे जातात. चित्र त्यांची भाषेची अडचण दूर करतं. चित्रकार त्या घटनेत, कृतीत लपलेल्या सावल्या शोधत असतो. त्या सापडल्या की उजळवतो इतकंच.
भायखळ्याच्या राणीच्या बागेत पेंग्विन येऊन आता दोनेक वर्षं झाली असतील. म्हणजे घटना दोन वर्षांपूर्वीची. त्यावेळी माझी पत्नी त्या भागातून म्हणजे भायखळ्यातून घरी आल्यावर खूप चिडचिड करायची. म्हणायची, ‘‘किती गर्दी करतात लोक तिकडे. बघा पेंग्विन, पण शिस्तीत जा ना… किती कचरा करतात. धड चालताही येत नाही.’’ तिची चिडचिड पुढे चालूच असते. त्यावेळी मी पेंग्विन आगमनावर एक चित्र केलं होतं. नंतर पुढे ते पेंग्विन आम्ही विसरलो. आमची पत्नीही त्यांना विसरली. घटना पुढे सरकल्या होत्या. या १५ ऑगस्टला ऑफिसात काम करत असताना कुणीतरी मोठ्याने ओरडलं, ‘‘नव्या पेंग्विनचा जन्म झाला!’’ मी चमकलो. नव्या पेंग्विनचा जन्म? तोसुद्धा भारतात. म्हणजे भारतीय पेंग्विनचा जन्म? तोसुद्धा १५ ऑगस्टला! किती हा योगायोग! घटना माझ्या डोक्यात नाचू लागते. तिला पंख फुटू लागतात. डोळ्यांसमोर तिरंगा दिसतो. स्वातंत्र्य दिसतं आणि इवलुसा पेंग्विन दिसतो. मी इथे ऑफिसात. तो नवा जन्मलेला राणीच्या बागेत.
घटनेला वेग येतो. मी मनाने कागद-पेन्सिल घेऊन राणीच्या बागेतच असतो. त्या नव्याकोर्‍या पाहुण्याच्या आगमनाचं चित्र मी रेखाटतो. हे चित्र १६ ऑगस्टला ‘मुंबई लाइव्ह’च्या वेबसाइटवर झळकतं. चित्र असं असतं : राणीच्या बागेतल्या आपल्या जागेत ते सहा-सात पेंग्विन एका बाजूला उभे आहेत. नवलाने समोर सगळे पाहताहेत. समोरून ते लहानसं इवलुसं नुकतंच जन्मलेलं पेंग्विन पिल्लू हातात भारताचा तिरंगा घेऊन त्यांच्या दिशेने हळूहळू चाललंय. १५ ऑगस्टच्या निमित्ताने मी त्या नव्या बाळाच्या हातात तिरंगा दिल्याने म्हणा वा रेखाटल्याने म्हणा माझा ऊर भरून येतो. मला आवडलेलं चित्र असतं ते. लोकांनाही आवडतं चित्र. त्यानंतर सहा-सात दिवस जातात. आठवड्यात बर्‍याच घटना देशात, मुंबईत, जगात घडलेल्या असतात. लहान-मोठे क्षण कागदावर येऊन जात असतात.
एके संध्याकाळी ऑफिसमध्ये कुणीतरी फोनवर मोठ्याने ओरडतं, ‘‘काय पिल्लू गेलं? कधी? किती वाजता? पेंग्विन बाळ गेलं?’’ त्यांना बातमी करायची असते. थोड्या वेळाने टीव्हीवर, चॅनेलवरही बे्रकिंग न्यूज येते. भारतात जन्मलेला पहिलावहिला पेंग्विन गेला. दगावला! मला माझा तो तिरंगा हातात घेतलेला पेंग्विन आठवतो. इतक्या लवकर त्याने जावं? खरंतर आपलं भारतातलं वातावरण त्यांना मानवत नाही. तरीही एका आठवड्यात त्याने जग सोडावं? भारत सोडावा? मुंबई सोडावी? हे काही मनाला पटत नाही. बिच्चारा! मी घराकडे निघताना हे पिल्लू अधूनमधून माझ्या डोळ्यांसमोर येत असतं. ट्रेनमध्ये त्याचा भास होतो. बाहेर सगळं काही व्यवस्थित चालू आहे. पण मनात ते पिल्लू कुठेतरी आहेच. सगळ्या गोष्टी नेहमीसारख्या घडत आहेत. गिरगावात गाड्या त्यांच्या पद्धतीत चालल्यात रस्त्यावरून. माणसांची लगबग तशीच रोज असते तशी. इमारतीच्या तळमजल्यावर कुणीतरी नेहमीसारखा मोबाइलवर काहीतरी पाहतोय. मनात विचार येतो, ‘याला ठाऊक असेल का ते पिल्लू गेल्याचं? जाऊ दे! त्याला त्याचं काम करू दे.’ डोक्यात चित्र आकार घेऊ लागलंय. जेवतानाही ते चित्र धूसर दिसू लागतं. अन् पत्नी म्हणते, ‘‘बिच्चारं ते पिल्लू गेलं! त्याच्यावर काढा ना एखादं चित्र, व्यंगचित्र.’’ तीच पत्नी दोन वर्षांपूर्वी भायखळ्याला चालता येत नाही म्हणून चिडचिड करणारी. ती पुन्हा म्हणते, ‘‘वाईट झालं.’’ वेगवेगळे पैलू, धागे माझ्या मेंदूत बंदिस्त होताहेत. पेंग्विन लहान मुलांचा लाडका. श्रद्धांजली, फुलं, मेणबत्ती वगैरे दिसू लागतं. सकाळी लवकरच उठलो. रात्रीचं मेंदूतलं चित्र अस्वस्थ करत असतं. चहा आटोपताच चित्र तयार होतं.
दुपारी ऑफिसला गेल्यावर कागदावर उतरतं. ते चित्र असं असतं, शाळेतल्या मुलींचा एक घोळका राणीच्या बागेतल्या त्या पेंग्विनच्या गॅलरीसमोर उभा आहे. या सगळ्या मुली खाली मान घालून शांत उभ्या आहेत. काचेपलीकडले पेंग्विनही शांत उभे आहेत. काचेबाहेर कुणी फुलं ठेवलीत, कुणी मेणबत्ती लावलेय. शांत, स्तब्ध वातावरण. त्या चित्रावरची एक प्रतिक्रिया आठवते. माझ्या जे.जे.तल्या मित्राची. त्याने लिहिलं होतं, ‘‘ग्रेट! या चित्रात तू एकही प्रौढ माणूस दाखवला नाहीस.’’ असो. तर असा तो पेंग्विन प्रसंग होता. नंतर तो पेंग्विन मी माझ्या मनातल्या कपाटात कायमचा बंद करून टाकतो.
गेल्याच आठवड्यातली घटना आहे. दादर रेल्वे पुलावरची. मी दादरच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर रेल्वेतून उतरलो. पुढे सरकत वर पुलावर जाणार्‍या पहिल्याच पायरीवर पाय ठेवतो. पण वर खूप गर्दी असते. पुढे सरकता येत नाही. वरचे खाली येत नसतात. जिन्याच्या मध्यावर बरीच गर्दी असते. लोक थांबलेले असतात. ते खाली येत नसल्याने वरच्यांनाही धड खाली येता येत नाही. मी किंचितसा चिडतो. काय हा प्रवास! धड चालताही येत नाही. एका बाजूने जोर लावत मी कसाबसा चार-सहा पायर्‍यांवर चढतो अन् मला ती समस्या दिसते. ती घटना दिसते. गर्दी का झालेय ते कळतं. तिथे एक जोडपं उभं असतं. पुरुषाच्या खांद्यावर ८-९ महिन्यांचं बालक आहे. बाजूला त्याची बायको धास्तावलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहतेय. तो पुरुष त्या बालकाला हलवून उठवू पाहतोय. मोठमोठ्याने म्हणतोय, ‘‘ए बबलू… ए बबलू… ऊठ.’’ पण बबलू नामक बालक हालचाल करत नसतं. मलाही कळलंय ते झोपलेलं नाही. गर्दीतलेही त्या बालकाकडे घाबरून पाहतायत. सगळेच जागेवर थिजलेले. फक्त त्या माणसाचा आवाज येतोय. ‘‘बबलू ऊठ ना…’’ पण बबलू थंडगार त्याच्या खांद्यावर पडलेला. बहुतेक बबलूचा श्वास थांबलेला असावा. मला हे दृश्य पाहवत नाही. मी कसाबसा धक्के देत वर जातो. त्या जीवघेण्या दृश्यातून सुटका करून घेतो. वर पुलावर आणि पुढेही मला सतत तो बबलू दिसत असतो. काय झालं असेल त्याला? जिवंत असेल ना? बापरे! उगाच वाईट विचार डोक्यात येतात. कुठे गुदमरला तर नाही ना बबलू?
कैलास सत्यार्थी म्हणाले होते, ‘‘बालपण म्हणजे साधेपण. म्हणूनच मुलांच्या डोळ्यांनी जग पहा. ते फार सुंदर दिसतं.’’ मुलं आपली जीव की प्राण असतात. मुलं आपलं भविष्य असतं. आपल्या मुलांना साधं खरचटलं तरी आपण कासावीस होतो. मुलांमुळेच आपलं कुटुंब आनंदी असतं. मुलांच्या अशाच एका दुर्दैवी घटनेवर मी चित्र केलं होतं. घटना उत्तर प्रदेशातली होती. त्या चित्राला मी नाव दिलं होतं निरुत्तर प्रदेश. दीडेक वर्षांपूर्वी मला वाटतं १४ ऑगस्टला. तिकडे एका हॉस्पिटलमध्ये २९-३० मुलं एकाच दिवशी दगावली होती. त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने एका क्षणात इतक्या मुलांचे जीव गेले होते. या घटनेने देश हादरला होता. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली होती. ऑफिसातल्या टीव्हीवर ती बातमी पाहून मी खूपच अस्वस्थ झालो होतो. एकदम ३० मुलांचा जीव जावा? का तर ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने? कारण काय तर त्या हॉस्पिटलने त्या पुरवठादार कंपनीचं बिल भरलं नव्हतं म्हणून? म्हणजे हे नंतर कळलं होतं. पण त्या निष्पाप मुलांचा दोष काय? मुख्यमंत्री योगी यांचं सरकार नुकतंच स्थिरावलं होतं. रात्रभर ती मुलं माझ्या डोळ्यांसमोर दिसत होती. दुसरा दिवस स्वातंत्र्यदिनाचा होता. पण कसलं स्वातंत्र्य? इकडे बालकं मरताहेत. कुणाला दोष द्यावा? कसली सिस्टीम आहे आपली? त्या प्रसंगावर मी एक चित्र काढलं होतं. योगी रस्त्यावरून चालले आहेत. त्यांच्या हातात एक छोटंसं वासरू आहे. त्याला गोंजारत ते पुढे चालले आहेत अन्… त्यांच्या मागे मुलांचे मृतदेह हातात घेऊन त्यांचे पालक चालले आहेत. मला वाटतं हे चित्र मी नेहमीप्रमाणे केलंय. पण तसं नव्हतं. चित्राने भलताच इतिहास घडवला. एका वेदनेवरचं चित्र काय करू शकतं, याचा मलाही अंदाज नव्हता. हे चित्र देशभर गाजलं. परदेशात फेसबुकवरून फॉरवर्ड झालं.
दुसर्‍या दिवशी जेव्हा सकाळी मी फोनवर, फेसबुकवर ते चित्र सहज म्हणून पाहिलं तेव्हा मला धडकी भरली. लाखांवर त्याला हिट्स होते. मला वाटलं मी झोपेत आहे की काय? तासाभरात ते दीड लाखांवर गेले. या चित्राने उत्तर प्रदेश ढवळून काढला. माझ्या फेसबुक पेजवरून तीन हजार लोकांनी ते शेअर केलं. तीन लाखांवर तर माझ्या पेजवरच होतं. त्याशिवाय ते कॉपी करून पाठवलेल्यांची संख्या तिप्पट होती. प्रश्न आकड्यांचा नव्हता. प्रश्न होता लोकांच्या सहनशीलतेचा, त्यांच्या भावनांचा. हे चित्र त्यांच्या भावना व्यक्त करत होतं. उत्तर प्रदेशातल्या बर्‍याच हिंदी पेपरात हे चित्र छापलं गेलं होतं. देशातल्या महत्त्वाच्या राजकीय वेबसाइटवर ते दाखवलं गेलं होतं. या चित्राद्वारे लोक व्यक्त होत होते. कितीतरी लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या. त्या उर्दू भाषेत होत्या. बंगाली भाषेत होत्या. न कळणार्‍या भाषेत होत्या. जणू काही या चित्रामुळे लोकांच्या मनाचा बांध फुटला होता. कलकत्त्याच्या एका संस्थेने मला आमंत्रण दिलं होतं. मुलांची संस्था होती. असं बरंच काही या चित्रामुळे झालं. एक छोटंसं साधं चित्र काय करू शकतं याची कल्पना न केलेली बरी. त्या धक्क्यातून सावरायला मला आठवडा गेला आणि आता गेल्या आठवड्यातलं आठवतंय. तो दादरचा प्रसंग. बबलू ठीक असेल ना?
सॉक्रेटिसला जेव्हा अखेरच्या दिवशी सेवकाने विषाचा प्याला दिला तेव्हा सॉक्रेटिस त्या सेवकाला म्हणाला, ‘‘विषप्राशनाच्या वेळी मी काय करायचं, कसं वागायचं हे तुला ठाऊकच असेल.’’ तो सेवक म्हणाला, ‘‘तुम्ही फक्त हे हेमलॉकचं विषप्राशन करा आणि पाय जड वाटेपर्यंत चालत रहा. नंतर स्वस्थ पडून रहा. विष आपलं काम करील.’’ सॉक्रेटिस काही वेळ चालत होता. मग खाली पडून राहिला. त्याला विषाचा पेला देणारा सेवक अधूनमधून त्याचे पाय, पोटर्‍या दाबून पाहत होता. त्याने मधेच सॉक्रेटिसचा पाय जोरात दाबत विचारलं, ‘‘तुम्हाला हा दाब समजतोय का?’’ सॉक्रेटिस थंडपणे ‘नाही’ म्हणाला. घटना इथे संपलेली नाही. दुसर्‍या क्षणी तो आपला शिष्य क्रिटोला म्हणाला, ‘‘क्रिटो अ‍ॅस्लेपियस देवाला मी एक कोंबडा देण्याचा नवस केला होता. तो द्यायचा राहिलाय. तू तो द्यायला विसरू नकोस.’’ घटना थोडीशी पुढे सरकते. क्रिटो म्हणतो, ‘‘तुमच्या अजून काही इच्छा आहेत का?’’ सॉक्रेटिसकडून काहीच उत्तर मिळत नाही. घटना संपलेली आहे. सॉक्रेटिस संपलेला आहे. कितीतरी अशा घटना आपल्या मेंदूत बंदिस्त होत असतात. मेंदूवर कधी आघात करत असतात. त्यामुळे कागदावर काही बिरकटले खरडलं जातं. नव्याने संदर्भ सापडून चित्र तयार होत असतं. हे चित्र चांगलं-वाईट तुम्ही ठरवत असता. मला पुढच्या घटनेकडे सरकावं लागतं. वेगवेगळ्या विषयांचे पेले रिचवायचे असतात. आता अशा हलक्या विषांची सवय झालेय. अंगात भिनून गेलंय ते. त्यामुळे माझा काही जीव जात नाही. जाणार तरी कसा? पुढची घटना माझ्या मानेवर बसलेली असते. कागदावर उतरवण्यासाठी… पण त्या दादरच्या बबलूचं काय झालं असेल?

[email protected]
रेखाचित्रे : प्रदीप म्हापसेकर

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

प्रेमप्रवास हा सुखाचा!

Related Posts

व्यंगावर बोट

हल्ला हल्ला!!!

February 9, 2023
व्यंगावर बोट

ललाटावरची एक सिल्व्हर लाईन

July 28, 2022
व्यंगावर बोट

दिल्लीचा लाकूडतोड्या आणि पायावर मारून घेतलेली कु-हाड

December 30, 2021
Next Post

प्रेमप्रवास हा सुखाचा!

श्रेष्ठ दान

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.