लोकप्रिय अभिनेत्री शेफाली शहा हिचे दिग्दर्शन असलेला पहिलाच लघुपट ‘समडे’ याच वर्षी एप्रिलमध्ये ५१व्या वार्षिक यूएसए फिल्म फेस्टिव्हलच्या आंतरराष्ट्रीय लघुपट आणि व्हिडिओ स्पर्धेसाठी निवडला गेला होता. त्यानंतर आता तिचा हाच लघुपट जर्मनीतील स्टटगार्टच्या १८व्या भारतीय चित्रपट महोत्सवात अधिकृतपणे प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट त्या महोत्सवातील फिचर फिल्म, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म आणि अॅनिमेशन या प्रकारात दाखवला जाणार आहे. ‘समडे’ ही दोन स्त्रियांची कहाणी आहे. युरोपमधील सर्वात मोठ्या भारतीय चित्रपट महोत्सवांपैकी एक असणार्या, स्टटगार्टचा १८ वा भारतीय चित्रपट महोत्सव २१ ते २५ जुलै २०२१ या कालावधीत होणार आहे. कोविडच्या संकटामुळे हा चित्रपट महोत्सव ऑनलाईन होणार आहे. गेल्या वर्षी शेफालीने ‘दिल्ली क्राइम’ या वेब शोद्वारे आंतरराष्ट्रीय एम्मी अवॉर्ड्समध्ये पुरस्कार जिंकला, तर नंतर आणखीही महोत्सवात तिच्या या लघुपटाने बाजी मारली आहे.