□ काँग्रेसने इतक्या वर्षांत जे केले नाही, ते मोदींनी करून दाखवले : अमित शाह.
■ देशाचे वाटोळेच ना! मग बरोबर
□ सावित्रीबाई फुले वसतिगृहातील सीसीटीव्ही कॅमेरे वर्षभरापासून बंद.
■ आता बैल गेल्यावर झोपा करतील आणि जिथे गरज नाही तिथेही सीसीटीव्ही कॅमेरे लावतील.
□ पावसाळा तोंडावर; पण बोरिवली, दहिसर, मागाठाण्यातील नाल्यांत अजूनही गाळ तसाच.
■ मुंबईची सगळी नालेसफाई पूर्ण झाल्याच्या बातम्या तर गेल्या महिन्यातच देऊन झाल्या ना!
□ मुंबईत कचर्याच्या तक्रारींचा पाऊस.
■ मंत्रालय परिसरात तर फार झाला म्हणतात… खोक्यांचा आणि खोकेबाजांचा कचरा!
□ महिला सुरक्षा वार्यावर… मुख्यमंत्री तीन दिवस सुट्टीवर.
■ सुट्टी नावाला असते हो, तिथेही सतत काम करत असतात ते… काय काम करतात ते विचारू नका फक्त!
□ विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या निर्णयावरून सरकारची माघार.
■ स्वघोषित विद्वानाचा बालहट्ट होता तो, वेगळं काय होणार होतं?
□ राजकारणासाठी तुम्हाला औरंगजेब लागतो हे तुमच्या तथाकथित हिंदुत्वाचे दुर्दैव – संजय राऊत यांचा घणाघात.
■ कबरीतून बाबर, हुमायून, शाहजहान या सगळ्यांना आळीपाळीने बाहेर काढून आणतील हे मतांसाठी.
□ रायगडावरचे टकमक टोक गद्दारांना जागा दाखवण्यासाठीच – सुनील तटकरे यांचा गोगावलेंना टोला.
■ महाडची जनता हा सोहळा घडवून आणण्यासाठी फार उत्सुकतेने वाट पाहते आहे निवडणुकांची.
□ कल्याणमध्ये अन्य उमेदवार सहन करणार नाही; कल्याणमधील बैठकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांचा एकमुखी निर्धार – मिंधेंची घटका भरू लागली.
■ तात्पुरते छातीवर बांधून घेतलेले दगड आहेत हे, वेळ आली की पायाभरणीसाठी वापर होईल त्यांचा.
□ नरेश म्हस्के हे बौद्धिक दिवाळखोर झालेत का? – राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा सवाल.
■ भलते सलते आरोप करू नका परांजपे… बौद्धिकतेचा आरोप खपवून घेतला जाणार नाही.
□ भाजप नेत्यांच्या सेवेसाठी मिंधे गटाच्या मंत्र्यांना जुंपले.
■ जुंपले म्हणजे काय? नाही तर त्यांची योग्यता काय आहे?
□ शरद पवार यांना भाजप कार्यकर्त्याची जीवे मारण्याची धमकी.
■ अशी किती चिलटे आली गेली…
□ मुंबईकरांच्या पैशाने ‘सीएम हेल्पलाईन’च्या प्रसिद्धीचा घाट – आदित्य ठाकरे यांचा सणसणीत टोला.
■ त्यांच्यापुढे आदर्शच तेवढा मोठा आहे, आदित्यजी!
□ धर्मवीर आनंद दिघे यांचा आश्रम बळकावताना लाज वाटली नाही काय? – खासदार राजन विचारे यांचे मिंध्यांना तडाखे.
■ लाजेचा आणि त्यांचा संबंध काय?
□ विधिमंडळाला हवी शिवसेनेची घटना.
■ टाइमपास करून करून किती करतील?
□ एनईपीच्या अंमलबजावणीला ब्रेक; विद्यापीठांची तयारीच नाही; आता जून २०२४चा मुहूर्त.
■ तारीख पे तारीख, तारीख पे तारीख!
□ मिंधे सरकारच्या विकासकामे रोखण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्या तब्बल ४५ याचिका दाखल.
■ श्रेय तुम्ही लाटा हवं तर, पण लोकांची कामं रोखून कसं चालेल?
□ हंडाभर पाण्यासाठी कर्जतमध्ये चिमुकलीचा जीव गेला; वा रे गतिमान सरकार… पाण्यासाठी मारामार.
■ जाहिरातींची भरमार आणि कारभार सुमार!
□ आता हद्द झाली… आमदार राजन साळवींचा बंगला बांधणार्यास मजुरांचीही अॅसण्टी करप्शन चौकशी
■ विटा कुठे पाडून घेतल्या त्या भट्टीवरही जाऊन या म्हणावं लगेहाथ!
□ मिठाचा खडा टाकू नका, अन्यथा खासदारकीचा राजीनामा देईन – श्रीकांत शिंदे यांचे भाजपला आव्हान.
■ अशीही ही शेवटचीच टर्म आहे, घाई कशाला करताय?
□ रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मोदी सरकार उदासीन; अपघातांबाबतच्या २८ अहवालांवर कारवाईच नाही.
■ त्या अहवालांवर कारवाई करत असतानाचा फोटो निघू शकतो, हे साहेबांना कोणीतरी सांगायला हवे होते…
□ शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना नारळ? हायकमांडकडून आदेश
■ खायचे दात दिसू लागले आता महाशक्तीचे!