• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कोल्हापूर दंगलीचे मास्टरमाइंड कोण?

- संतोष देशपांडे (देशकाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 15, 2023
in गर्जा महाराष्ट्र
0
कोल्हापूर दंगलीचे मास्टरमाइंड कोण?

सोशल मीडियाचे फायदे जास्त आहेत का तोटे अधिक हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय असला तरी सोशल मीडिया वापरून देशात अंतर्गत कलह माजवता येतो, बनावट इतिहास आणि वर्तमान लोकांपुढे मांडता येतो, अफवांचा प्रसार करता येतो, तथ्य सांगू पाहणार्‍याला टोळ्यांनी हल्ले करून बेजार करता येतं, हे सगळं गेली नऊ वर्षे आपला देश पाहतो आहे. खोट्या बातम्या पसरवण्याच्या गुन्ह्याखाली जे तुरुंगात असले पाहिजेत ते सत्ताधारी पक्षाच्या आयटी सेलच्या प्रमुखपदावर बसून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या राष्ट्रपुरुषांची यथेच्छ बदनामी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर आपण जे करू त्यातून कलह माजवता येतोच, पण इतर कोणी जे केलेलं असेल, त्यातूनही कलह कसा माजवता येतो, याचा वस्तुपाठ कोल्हापुरात पाहायला मिळाला. तिथे पाच जणांनी औरंगजेबाचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं म्हणून तथाकथित हिंदुत्ववादी संघटना गोळा झाल्या आणि शाहूनगरी कोल्हापूरचा पुरोगामित्वाचा इतिहास कलंकित करणारी दंगल घडवली गेली.
देशात पन्नास कोटी लोक व्हॉट्सअप वापरतात. त्यातील फक्त पाच जणांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे जर कोल्हापूरसारखं सुजाण शहर पेटू लागलं, तर उद्या काहीशे, काही हजार किंवा काही लाख लोकांच्या स्टेटसने देशभरात काय अनर्थ होईल? आभासी जगातील गोष्टींना इतक्या गांभीर्याने घेऊन दंगल होत असेल तर आभासी आणि वास्तव जगाची भीषण गुंतागुंत आपण करून ठेवलेली आहे, हे स्पष्ट व्हायला लागले आहे. कोल्हापुरात दोन अल्पवयीन आणि तीन सज्ञान अशा पाच जणांनी स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसवर औरंगजेबाची प्रतिमा ठेवली. औरंगजेब हा कोणासाठीही आदर्श राजा असू शकत नाही, हे मान्य केलेच पाहिजे. पण, महात्मा गांधीजींच्या खुन्याला, नथुरामला पंडित नथुराम गोडसे म्हणून गौरवणार्‍या, त्याची पुण्यतिथी वगैरे साजरी करून गांधीजींच्या फोटोवर गोळ्या झाडणार्‍या विचारधारेला असा आक्षेप घेण्याचा अधिकार आहे का? माथी फिरलेले युवक सर्व समाजांमध्ये आहेत. त्यांच्याकडून घडणार्‍या प्रमादांचा पराचा कावळा करून एक संपूर्ण शहर वेठीला धरण्यातून काय साध्य झाले? जी गोष्ट तंबी देऊन संपवता आली असती तिच्यावरून या शहरात बंद पुकारला जाणे आणि त्यानंतर त्या बंदला हिंसक वळण लागून त्याची दंगल होणे, हे वरवर अनाकलनीयच वाटते. आजवर अनेक कारणांनी दंगली झालेल्या आहेत. शहाणी माणसे सांगतात की सरकारची इच्छा असल्याशिवाय कुठेही दंगल होऊ शकत नाही. बहुतेक वेळा अतिशय फुटकळ कारणावरून दंगली पेटल्या आहेत. आता यापुढे व्हॉट्सअप स्टेटसवरून दंगल असा एक प्रकार उदयाला येण्याची भीती वाटते.
शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर व्हॉट्सअपवर औरंगजेबाची प्रतिमा मिरवणारे नतद्रष्ट हे तर महाराष्ट्रद्रोही आहेतच, पण त्या ढेकणांच्या मूर्खपणाला अवास्तव महत्व देत त्यावर ताबडतोब एवढी मोठी प्रतिक्रिया देणारे मूर्ख नाहीत. त्यामागे निराशेतून उद्भवलेले राजकारण आहे. अशा सायबर गुन्हा प्रकरणी तंत्रज्ञानाची मदत लागत असल्याने पोलीस कारवाईसाठी थोडा वेळ घेतला जातो, तो त्यांना दिला असता तर कायद्याने आपले काम केलेच असते. सहा जूनला पाच जणांचे खोडसाळ व्हॉट्सअप स्टेट्स फिरवले जातात आणि सात जूनला कोल्हापूर शहर बंदची हाक दिली जाते व दंगल देखील होते. इतकी फास्ट ट्रॅक दंगल कशी झाली? शिवरायांच्या सन्मानाला ठेच पोहोचवली म्हणून कोणीही बंद पुकारेल तर त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळतो, कारण त्यात शिवप्रेमाला साद घातलेली असते. पण त्यानंतरची जाळपोळ आणि दंगल हा शिवप्रेमाचा भाग असू शकत नाही. सच्चा शिवप्रेमी अकारण हिंसेवर उतरत नाही आणि फक्त राष्ट्ररक्षणासाठीच शस्त्र हातात घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य जपण्यासाठी एका स्त्रीने जिथे शस्त्र हातात घेतले त्या छत्रपती ताराराणींचे हे कोल्हापूर आहे. इथे क्षुल्लक कारणावरून गोरगरीबांचे नुकसान करणारी जाळपोळ करणे सहन केले जात नाही. म्हणून तर काही तासांत दंगल शमली. त्यात इंटरनेट बंद करण्याचा उपयोग झाला आहे.
मणिपूरमध्ये पेटलेल्या हिंसाचारानंतर तिथेही दहा दिवस इंटरनेट बंद केले होते, तेच कोल्हापुरातही केले गेले. याचा सरळ अर्थ असा आहे की इंटरनेट बंद केले नसते तर दंगल आणखी भडकली असती. दंगलीचे कारणही व्हॉट्सअप स्टेटस म्हणजेच इंटरनेटशी संबोधित होतेच. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात तरूणांना छत्रपती शिवाजी चौकात जमण्यासाठी मेसेज गेले होते, तेही व्हॉट्सअपच्याच माध्यमातून गेले होते ना!
या दंगलीच्या प्रकरणात पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली काम केले, असा प्रश्न पडतो आणि त्याचे उत्तरही साफ आहे. एवढा मोठा जमाव जमतो तेव्हा त्यातून काय होणार आहे, याची पूर्वकल्पना पोलिसांना असते. त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय काय केले? दंगलीनंतर ज्यांना अटक झाली, त्यात दंगलीसाठी जमाव गोळा करणार्‍या एकाही संघटनेच्या पदाधिकार्‍याचा समावेश नाही; मास्टरमाइंड तर दूरच राहिले. जे ३५ तरूण अटकेत आहेत, त्यांनी दगडफेक केली असेल यावर त्यांच्या आईवडिलांचा विश्वास बसत नाही, अशा बातम्या आल्या. आपली मुले कोणाच्या संगतीत असतात, फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्रामवर कोणाला फॉलो करतात, काय मेसेज करतात, कोणाला काय रिप्लाय देतात, काय स्टेटस ठेवतात, यावर नजर ठेवली असती तर कदाचित त्यांचा विश्वास बसला असता. आपल्या मुलांनी चांगले करियर घडवावे, याची नुसती स्वप्नं पाहून उपयोग नाही, ती स्वप्नं प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने मुलांची वाटचाल सुरू आहे की राष्ट्रवादाच्या नावाखाली विद्वेष पसरवणार्‍यांच्या नादी ते लागले आहेत, यावर लक्ष ठेवणंही आवश्यक आहे. या तरुणांचे आईबाप या मुलांच्या जामीनाची तजवीज करत होते, तेव्हा ज्यांनी त्यांच्या हातात दगड दिले, ते तथाकथित नेते सोशल मीडियावर फेक प्रोफाईल गायब होतात तसे गायब झाले होते. हे नेते आणि त्यांची मुलंबाळं कधीही दंगलीत उतरत नाहीत, दगड फेकत नाहीत, त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही; आयुष्य बरबाद होते ते त्यांच्या नादी लागणार्‍यांचे, हा धडा आता या मुलांनी आणि त्यांच्या उदाहरणातून इतर तरुणांनी शिकायला हरकत नाही.
सोळाव्या, सतराव्या शतकातील साधारण दीडशे वर्षांच्या मोठ्या कालखंडात महाराष्ट्रानेच नव्हे, तर सबंध हिंदुस्तानाने कोणा चक्रवर्ती हिंदू राजाचा राज्याभिषेक कधी पाहिलेला नव्हता. त्या दीडशे वर्षांत कुतुबशाही, बहामनी, आदिलशाही, मुघल या राजवटींच्या बादशाह, सुलतान, नबाब यांचेच राज्यारोहण सोहळे या एकत्रित भूप्रदेशाने (तो आधुनिक अर्थाने देश बनला १९४७ साली) पाहिले होते. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र एका हिंदूपतपादशाहाने सिंहासनाधिस्थ होण्याची अक्षरशः चमत्कार वाटावी अशी घडलेली घटना म्हणजे रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक. आज साडेतीनशे वर्षे झाल्यावर देखील ज्या युगपुरूषाचे नाव घेताच हा महाराष्ट्र जात, पात, धर्म, वर्ग, वर्ण विसरून एक होतो, त्या रयतेच्या राजाच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानंतर समाजातील दोन वर्गात तेढ निर्माण करणारी दंगल घडणे पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणे आहे.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर सहा जूनला मोठा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र शिवप्रेमाने रोमांचित झाला. लाखो लोकांनी आपल्या व्हॉट्सअपवर महाराजांचे चित्र स्टेटसवर ठेवून आदर व्यक्त केला. शिवसेना फक्त शिवधर्म जाणते, त्यामुळेच प्रत्येक मुस्लिमधर्मीय शिवसैनिकांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर देखील शिवरायांचे चित्र आदराने झळकत होते. शिवराय हे जाती धर्मात विभागता येणारच नाहीत. असे असताना पाच मूर्खांनी (ज्यात अल्पवयीन मुले देखील आहेत) मुद्दाम औरंगजेबाचे चित्र स्टेटसवर ठेवणे, ही घटना निंदनीयच होती. तिचा तीव्र निषेधच व्हायला हवा होता. पण, शिवप्रतिमा स्टेटसवर ठेवणार्‍या कोट्यवधींपेक्षा पाच मूर्ख औरंगजेबवादी महत्त्वाचे ठरावे, हे आश्चर्यकारक नाही का?
या आधी अहमदनगरमध्ये देखील एका संदल मिरवणुकीत डीजेसमोर नाचत एका तरूणाने औरंगजेबाचे पोस्टर झळकवले, त्याची तीव्र प्रतिक्रिया आली होती. महाराष्ट्रात अचानक कोणी औरंगजेबाचा उदो उदो करणे आणि त्यावरून प्रतिक्रिया म्हणून सामाजिक शांतता, सलोखा धोक्यात येणं, हा एक पॅटर्न विकसित होऊ लागलेला दिसतो आहे. अचानक औरंगजेबच्या आठवणीने आज कोणाला उचक्या येत आहेत? औरंगजेब मराठ्यांचा पराभव करायला लाखोंचे सैन्य घेऊन या महाराष्ट्रात पंधरा वर्षे राहिला, लढला आणि मरेपर्यंत त्याला मराठ्यांना हरवता आले नाही, हा इतिहास असताना आज त्याला थडग्यातून काढून त्याचा परत नव्याने बिमोड कोण आणि कशासाठी करायला निघाले आहे? हे सामाजिक नाही, राजकीय प्रकरण आहे.
सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण वस्त्रहरण केल्यानंतरही दिल्लीपतींनी नाकात ऑक्सिजनची नळी लावली आहे म्हणून निलाजरेपणाने सत्तेचा श्वास घेणारे राज्यातले सत्ताधारी राणा भीमदेवी थाटात महाराष्ट्राला आज सांगत आहेत की ते औरंगजेबच्या अवलादी संपवणार आहेत. पाच पोट्टी पकडून आत टाकायची आणि ढोल वाजवायचे, हे करायला औरंगजेब म्हणजे गल्लीतला गुंड वाटला की काय? सतराव्या शतकातला भारताचा सर्वात शक्तिशाली, धूर्त, कावेबाज आणि क्रूर दिल्लीपती बादशहा म्हणजे औरंगजेब. त्याच्याकडे नजर उचलून पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्याला संपवणे फक्त आणि फक्त शिवछत्रपतींना, स्वराज्यरक्षक संभाजींना आणि त्या शूरवीर मर्दमराठ्यांनाच जमले. औरंग्या आणि त्याच्या अवलादी संपवायचे काम येरागबाळ्यांचे नसते, त्यासाठी शिवनेरीवर शिवछत्रपती जन्माला यावे लागतात, पुरंदरावर छत्रपती संभाजी जन्माला यावे लागतात. खरेतर शिवछत्रपती आणि औरंगजेब दोघेही समकालीन, पण दोघांमध्ये जमीनअस्मानाचा फरक होता. औरंगजेब धर्मांध होता तर आपले महाराज धर्मांध नव्हते, ते हिंदू धर्माचा प्रखर अभिमान बाळगताना इतर धर्मांचा देखील सन्मान करणारे होते. औरंगजेब सतत स्वतःची सत्ता आणि साम्राज्य यात गुंतलेला होता, तर आपले महाराज व्यापारवृद्धी, शेतकरी हित, दुष्काळ संरक्षण, न्यायनिवाडा, स्वराज्य रक्षण अश्या लोककल्याणकारी कामात गुंतले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वडिलांवर संकट आल्यावर सर्वस्वत्यागाची तयारी दाखवली होती, तर औरंगजेबाने स्वतःच्या बापालाच वैâदेत टाकले होते.
आजच्या केंद्र आणि राज्यातील सरकारने स्वतःच्या कारभाराकडे पाहावे आणि विचार करावा, आपला कारभार कोणाच्या जवळ जाणारा आहे? औरंगजेबाच्या सत्तापिपासूपणाचा रोग आपल्याला जडलेला आहे की महाराजांच्या सर्वसमावेशक लोककल्याणकारी राज्यवâारभाराचा आदर्श आपण घेतला आहे?
औरंग्याची अवलाद असा बेजबाबदार शब्दप्रयोग घटनात्मक पदावर बसलेल्यांनी करावा का? मग, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी, शिवसेना पक्षप्रमुखांनी टाकलेल्या विश्वासाशी आणि रस्त्यावरच्या सच्च्या शिवसैनिकांच्या श्रद्धेशी गद्दारी करून सत्तेत येणार्‍या गद्दारांना कोणाची अवलाद म्हणायचे? दिसेल त्या गोष्टींवर औरंगजेबाच्या जिझिया कराची आठवण होईल असा अन्यायकारक कर कोणाची अवलाद लावते आहे? औरंगजेबालाच साजेल अशा धर्मांधतेला खतपाणी कोणत्या अवलादी घालत आहेत? वाट्टेल ते करून महाराष्ट्र जिंकायचा दिल्लीपती औरंगजेबासारखा अट्टाहास आज कोणाचा आहे? महागाईने गरीब पिचला तरी त्याला दिलासा मिळत नाही, मग लोककल्याण बाजूला ठेवून औरंगजेबी कावेबाज सत्ताकारण आज कोण करते आहे?
औरंग्याच्या औलादी नक्की कोण आहेत ते राज्यकारभारावरून जनता ठरवणार आहेच. राजकारणात अखंड बुडलेल्या कावेबाज धूर्त नेत्यांनी त्या फंदात पडू नये. जातीपाती आणि धर्मावरून औरंग्याच्या अवलादी कधी ठरू शकत नाहीत आणि व्हॉट्सअप स्टेटसवरून तर कदापि ठरत नाहीत. व्हॉट्सअप स्टेटसला किती महत्व द्यायचे हे जर आज समाजातील तरुणाईला कळत नसेल तर देशाचे उज्वल भविष्य फक्त नेत्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर राहील आणि औरंगजेबाला थडग्यातून बाहेर काढून वातावरण तापवणार्‍या त्या नेत्यांचे राजकीय ‘स्टेटस’ मात्र जोमाने वाढत जाईल.

Previous Post

…अशा शिवसैनिकांचा मला अभिमानच आहे!

Next Post

छत्रपती शिवरायांचा जगभर डंका

Related Posts

गर्जा महाराष्ट्र

महायुतीत कुणाचा जोर, कोण शिरजोर?

May 8, 2025
गर्जा महाराष्ट्र

महाराष्ट्रदिनाचा वज्रसंकल्प!

May 5, 2025
गर्जा महाराष्ट्र

भाजपाची कोटी-कोटीची उड्डाणे!

April 25, 2025
गर्जा महाराष्ट्र

‘फुले’ आणि काटे!

April 17, 2025
Next Post

छत्रपती शिवरायांचा जगभर डंका

टपल्या आणि टिचक्या

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.