• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

- सुधीर साबळे (सायबर जाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 15, 2025
in पंचनामा
0

सोशल मीडियाचा वापर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यावर एखादी गोष्ट आली की अनेकदा ती खरी आहे का, याची पडताळणी न करता अनेकजण त्यावर विश्वास ठेवतात, आकर्षक मेसेजला भुलतात. त्याचा परिणाम काय होतो तर ते स्वत:चीच फसवणूक करून घेतात. बर्‍याचदा असे प्रकार घडतात ते प्रश्नमंजुषा, कोडी अथवा सर्वेक्षणांच्या माध्यमातून. सोशल मीडियाच्या व्यासपीठावर सायबर चोरटे अशी बनावट सर्वेक्षणं आणि प्रश्नमंजुषा सादर करतात, त्याचा मुख्य उद्देश हा समोरच्या व्यक्तीची माहिती जमा करून त्याची फसवणूक करण्याचा असतो. पण अनेकांना हे लक्षात येत नाही. त्यांची फसवणूक होते. आर्थिक नुकसानही होते. कोलकात्यामधील सार्थक बसूची गोष्ट ऐकलीत तर हे प्रकरण कळेल.
आताच्या पिढीतल्या अन्य तरुणांप्रमाणेच सार्थकला सोशल मीडियामध्ये वेळ घालवण्याचा नाद होता. जरा कधी कामामधून वेळ मिळाला की सोशल मीडियावर नवीन ट्रेंड काय सुरू आहे, याचा शोध घेणे हा सार्थकच्या सवयीचा भागच बनला होता. सोशल मीडियावरील माहिती किती खरी, किती खोटी याची शहानिशा करण्याची तसदी न घेता सार्थक त्यातली एखादी गोष्ट आवडली तर त्यामध्ये गुंगून जायचा, त्यात भरपूर वेळ घालवायचा. असाच तो एका सर्वेक्षणाच्या जाळ्यात सापडला.
‘द क्विझमास्टर’ नावाच्या ग्रुपने धूर्त पद्धतीने एक सर्वेक्षण करण्याची आखणी केली होती. सार्थकचा खास मित्र सनी याने त्याला या ग्रुपने तयार केलेली ‘डिस्कव्हर युवर ड्रीम व्हेकेशन डेस्टिनेशन!’ नावाची लिंक शेअर केली. काहीतरी नवा इंटरेस्टिंग प्रकार दिसतोय, म्हणून सार्थकने त्या लिंकवर क्लिक केले, तेव्हा वेगवेगळ्या रंगांची, शब्दांची आकर्षक मांडणी असणारा एक फॉर्म त्याला दिसला. या फॉर्ममध्ये तुम्ही विचारलेली माहिती भरा आणि तीन दिवस दोन रात्री क्रूझवर घालवा, अशी आकर्षक ऑफर त्यावर देण्यात आली होती. कायम सोशल मीडियावर असणार्‍या सार्थकला त्याची भलतीच भुरळ पडली, फॉर्म भरल्यावर आपल्याला क्रूझवर मजा करायला मिळणार, मस्त खानपान, रात्रीची मजा, अशी स्वप्ने त्याला भर दिवसा दिसू लागली. त्याने क्षणाचाही विलंब न करता ती माहिती भरून दिली. उशीर केला तर आपल्याला फुकटात क्रूझवर जायला मिळणार नाही, अशी त्याची धारणा झाली होती.
सार्थकने लिंक ओपन केल्यावर समोर आलेल्या सर्वेक्षणात वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. त्याची उत्तरं त्याने झटपट भरण्यास सुरुवात केली. या सर्वेक्षणामध्येच तुमचे आवडते खाद्यपदार्थ, ती मिळणारी ठिकाणे, प्रवास करायला आवडतो का, कुठे जायला आवडते, असे प्रश्नही विचारण्यात आले होते. सार्थकने पुढचा मागचा विचार न करता आनंदाने ती माहिती भरली होती. सर्वेक्षणाच्या अखेरच्या भागात आपले पूर्ण नाव, जन्मतारीख, मूळ गाव, पत्ता, ईमेल अ‍ॅड्रेस, मोबाईल नंबर, अशा प्रकारची वैयक्तिक माहितीदेखील विचारण्यात आली होती. सर्वेक्षणामध्ये ही माहिती कशासाठी विचारण्यात येत आहे, असा प्रश्न सार्थकला पडला नाही. त्याने कोणताही विचार न करता तीही माहिती झटपट भरून टाकली. सर्वेक्षण फॉर्मच्या अखेरीस तुम्हाला पुढल्या १५ दिवसांत अपडेट करण्यात येईल, असे म्हटले होते. त्यामुळे १५ दिवसानंतर आपल्याला क्रूझवर जायला मिळणार, तिथे भरपूर मजा करणार, अशी स्वप्ने सार्थक पाहत होता.
दोन दिवसांनी सार्थकच्या ईमेलवरून त्याच्या असंख्य मित्रांना मेल गेली, आपण खूपच अडचणीत आहोत, घरात मेडिकल इमर्जन्सी आहे, त्यामुळे मला सध्या ४ लाख रुपयांची आवश्यकता आहे, त्यामुळे तुम्हाला खाली दिलेल्या बँक खात्यावर जमेल तेवढी रक्कम भरा, मी तुम्हाला ती रक्कम १५ दिवसांत परत करेन, असे नमूद करण्यात आले होते. सार्थकच्या दोन मित्रांनी त्या खात्यामध्ये पैसे टाकले आणि त्यानंतर तुला आम्ही प्रत्येकी २५ हजार रुपये टाकले असल्याचे सांगण्यासाठी सार्थकला फोन केला. त्याने आपण अशा प्रकारची मेल पाठवली नसल्याचे त्यांना सांगितले. दरम्यान, सार्थकाला फोन येण्यास सुरुवात झाली होती. हा सगळा प्रकार त्याला गोंधळात टाकणारा होता. सार्थकने मेलचा पासवर्ड बदलला आणि तो मदत मागणारा मेल फसवा आहे, तुम्ही कोणतीही मदत पाठवू नका, असे आपल्या संपर्कातील सर्वांना कळवले.
दोन दिवसांनी त्याला अनोळखी नंबरवरून फोन आला, तुमच्या नावाने कुरियर आले आहे, ते हवे असेल तर तुम्हाला एक लिंक पाठवली आहे, ती डाऊनलोड करा आणि तुमची माहिती भरा, म्हणजे त्याची डिलिव्हरी देणे सोपे होईल, असे त्या व्यक्तीने सार्थकला सांगितले. सार्थकने त्यावर विश्वास ठेवून ती लिंक डाऊनलोड केली, ते करताना तुम्ही एक रुपया ट्रान्सफर करा, असा मेसेज त्याला आला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार त्याने तसे केले आणि आपल्या बँक खात्यामधले एक लाख रुपये एका झटक्यात गमावून बसला. आधी ईमेल हॅक, दोन दिवसांनी बँकेची फसवणूक या प्रकाराची त्याने पोलिसात तक्रार केली. पोलिसांना माहिती देताना त्याने आपण गेल्या आठवड्यात एका ऑनलाइन सर्वेक्षणात सहभाग घेतला होता, त्यामध्ये सगळी माहिती दिली होती, हेही सांगितले. ते सर्वेक्षण फसवे होते, त्यामधून माहिती घेऊन फसवणूक करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवण्यात आल्याचे त्ापासातून स्पष्ट झाले. सायबर पोलिसांनी आयपी अ‍ॅड्रेसच्या आधारे शोध घेऊन हैद्राबादमधून फसवणूक करणार्‍या चार सायबर चोरट्यांना अटक केली. चौकशीत असे कळले की या फसव्या सर्वेक्षणातून त्यांनी ५० हजारपेक्षा अधिक लोकांची सर्व वैयक्तिक माहिती जमा करून त्यांची फसवणूक करण्याचा सपाटा लावला होता. सार्थकसारखेच अनेक तरुण-तरुणी फुकटात क्रूझवर जाण्याच्या नादात त्यांच्या जाळ्यात फसले होते.
सोशल मीडियावर सर्वेक्षणाच्या माध्यमातून कोणते बक्षीस, सहल असे आमिष दाखवण्यात येत असले तर तो प्रकार फसवा असू शकतो, हे कायम लक्षात ठेवा.

अशी घ्या काळजी

– आपला डेटा सुरक्षित करा : आपले पूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता ही संवेदनशील माहिती कधीही उघड करू नका. विशेष म्हणजे ऑनलाइन सर्वे, प्रश्न मंजुषा अशा ठिकाणी तर ही माहिती अजिबात उघड करू नका, त्यामुळे फसवणुकीचे प्रसंग उद्भवू शकतात, हे लक्षात ठेवा.
– अधिकृतता तपासून पाहा : आपण ज्या प्रश्नमंजुषा, सर्व्हेमध्ये सहभागी होत आहोत, ते अधिकृत आहे का, याची खात्री करून घ्या. आपल्या वैयक्तिक माहितीची सुरक्षा करण्यास प्राधान्य द्या.
– भक्कम पासवर्ड : आपल्या सोशल मीडियाच्या खात्यासाठी भक्कम पासवर्डचा वापर करा. त्यामध्ये आकडे, विशेष चिन्ह याचा योग्य पद्धतीने वापर करा. दर तीन महिन्यांनी पासवर्ड बदला.
– स्त्रोत पडताळणी : क्विझची वैधता ते प्रतिष्ठित स्त्रोतांकडून किंवा अधिकृत खात्यांकडून आहेत का ते तपासा.
– अपडेट राहा : सोशल मीडिया क्विझशी संबंधित जोखमींबद्दल आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्याचे महत्त्व याबद्दल स्वत:ला आणि मित्रांना शिक्षित करा.
– तुमची सुरक्षा मजबूत करा : तुमच्या सोशल मीडिया खात्यांसाठी मजबूत, अद्वितीय पासवर्ड वापरा आणि संरक्षणाचा अतिरिक्त स्तर जोडण्यासाठी द्वि-घटक प्रमाणीकरण (२एफए) सक्षम करा.
– संशयास्पद गतिविधीची तक्रार करा : तुम्हाला संशयास्पद प्रश्नमंजुषा आढळल्यास किंवा तुम्ही एखाद्या घोटाळ्याला बळी पडल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याची तक्रार करा आणि तुमची खाती सुरक्षित करण्यासाठी त्वरित पावले उचला.

Previous Post

फ्राईड राईस

Next Post

राशीभविष्य

Related Posts

पंचनामा

डिसीप्लिन

May 8, 2025
पंचनामा

टेक सपोर्ट नव्हे, लुटालूट!

May 5, 2025
पंचनामा

कर भला, तो हो भला!

April 25, 2025
पंचनामा

मीडिया बेटिंग

April 18, 2025
Next Post

राशीभविष्य

चल उड जा रे पंछीऽऽऽ

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.