• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

बोले तो भौत हार्ड पिच्चर!

- गुरुदत्त सोनसुरकर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 15, 2021
in सिनेमा
0
बोले तो भौत हार्ड पिच्चर!

ड्रायव्हर बापाचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्याची बदली ड्युटी करणारा, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असणारा मुराद बापाच्या बॉसची आलिशान गाडी चालवतोय. बाजूच्या सीटवर बॉसची मुरादच्याच वयाची मुलगी. पाठी बॉस आणि त्याची बायको. बॉस वैतागला आहे कारण पोरगी ग्रॅज्युएशन करून जॉब करायचं म्हणतेय. त्याच्या म्हणण्यानुसार ग्रॅज्युएशनला काही किंमत नाही. तो मुरादला विचारतो, ‘कहां तक पढे हो?’ मुरादचा चेहरा उजळतो. ‘लास्ट इयर को हूँ सर’ बॉस मुलीला इंग्लिशमध्ये म्हणतो, ‘बघ… तुला त्याची बरोबरी करायचीय आहे का?’ मुरादचा चेहरा कानाखाली मारल्यासारखा पडतो.


झोया अख्तर. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गज कथा, पटकथा, संवाद लेखक जावेद अख्तर आणि ‘लम्हे’सारखा चित्रपट लिहिणार्‍या एकेकाळच्या बालकलाकार हनी इराणी यांची मुलगी. अभिनेता दिग्दर्शक फरहान अख्तरची बहीण.. पण याही पलीकडे झोयाची स्वतंत्र ओळख आहे ती एक समर्थ फिल्ममेकर म्हणून. ‘लक बाय चान्स’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘शीला की जवानी’ (एक भाग), ‘लस्ट स्टोरीज’ (एक भाग), ‘घोस्ट स्टोरीज’ (एक भाग), ‘दिलधडकने दो’ आणि… ‘गली बॉय’!
झोया अशा कुटुंबातून आलीय की ती श्रीमंत असल्याचा शिक्का तिच्यावर असणं साहजिक होतं. श्रीमंतपेक्षा प्रिविलेज्ड… मात्र हे तितकसं खरं नाही. आई हनी आणि बाप जावेद यांचा काडीमोड झाल्यानंतर, सगळं फार काही आलबेलनव्हतं. आई हनीने ‘आईना’ लिहायच्या आधीपर्यंत साड्यांना डिझायनर एम्ब्रॉयडरी करण्याची कामं केलीयेत. मुलांची बहुतेक जबाबदारी हनीनेच उचलली. झोयाने सेंट झेवियर्समधून कला शाखेतली पदवी घेतल्यानंतर न्यूयॉर्क इथून फिल्ममेकिंगचं प्रशिक्षण घेतलं. मग देव बेनेगल, मीरा नायर, फरहान अख्तर यांना सहायक म्हणून काम केलं. कला ही जरी निसर्गदत्त देणगी असली, तरी त्याचं प्रशिक्षण माणसाच्या कलेला उत्तम निखार आणतं हे झोयाच्या कामातून प्रकर्षाने दिसतं.
‘गली बॉय’च्या आधी झोयाच्या ‘लक बाय चान्स’, जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘दिल धडकने दो’ या फिल्म्समुळे तिच्यावर ‘श्रीमंतांच्या फिल्म्स’ बनवण्याचा आरोप होत होता. खरं तर ‘लस्ट स्टोरीज’मधला झोयाने केलेला भाग (भूमी पेडणेकर, नीलभूपती) कष्टकरी कामगार वर्गाला उपभोग्य समजणारा उच्चभ्रू वर्ग याचं अप्रतिम चित्रण होतं. पण झोयाच्या ‘मी माणसांच्या कथा मांडते,’ या म्हणण्याला पुष्टी द्यायला ‘गली बॉय’सारखं उत्तरच असायला हवं होतं.
‘गली बॉय’ हा चित्रपट नेझी आणि डिवाईन या मुंबईच्या रॅपर हिपहॉपर मुलांच्या आयुष्यावर आधारित आहे, जसा ‘एट माइल्स’ हा एमिनेम या अमेरिकन रॅपरवर होता. नेझी म्हणजेच नावेदवर यूट्युबला ‘बॉम्बे-७०’ म्हणून एक शॉर्ट फिल्म आहे. खरं म्हणजे गुन्हेगार बनता बनता राहिलेली ही मुलं आणि त्यांचं हिप हॉपमधून सुलगत जाणारं विश्व… झोयाला तिची चौकट मोडायला एक उत्तम विषय सापडला होता. रीमा कागतीच्या मदतीने झोयाने ‘गली बॉय’ची कथा मांडली.


मुराद हा धारावीसारख्या विक्राळ झोपडपट्टीत, बाप, आजी, आई आणि लहान भाऊ यांच्यासोबत राहणारा एक कॉलेज तरूण. बापाने या वयात दुसरं लग्न केलं आहे, पण त्याची दहशत आणि त्याने मुरादच्या शिक्षणासाठी टाकलेला पैसा यामुळे मुराद बापाकडे नजर वर करूनही पाहत नाही. दोन-तीन मित्रांचा त्याचा कंपू आहे आणि त्याची लहानपणापासूनची पझेसिव्ह गर्लफ्रेंड सफिना हे त्याचं धारावीपुरतं जग.
जे दुसरं जग आहे ते प्रस्थापितांचं, श्रीमंतांचं… ते आपल्याला सामावून तर घेणार नाही, पण नाकारत राहीलहे मुरादला माहीत आहे. त्याच्या दबलेल्या भावना तो कागदावर उतरवत राहतो. आयुष्य असंच चाललेलं असताना त्याला एम.सी. शेर हा रॅपर दिसतो. शेरही असाच कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातला. पण बिनधास्त. त्याचं रॅपिंग पाहून मुराद त्याला भेटतो. मुरादचे शब्द म्हणजे भळभळत्या वेदना… एम.सी.शेर आणि मुराद म्हणजेच ‘गली बॉय’ ही दोन समाजाच्या तथाकथित खालच्या स्तरातून आलेली मुलं आपला संघर्ष कसा मांडतात आणि लोकांसमोर येतात ही कहाणी झोया अख्तरचा ‘गली बॉय’ इतक्या प्रभावीपणे मांडतो की एक एपिक सिनेमा बनून जातो.
झोया अख्तर या एका सुस्थितीत असलेल्या तरुणीने समाजातली ‘आर्थिक विषमता’ हा समाजाचा सहजभाव नाही आणि नसावा हे समजून उमजून असा सिनेमा करणं हेच तिचं संवेदशीलमन दाखवतं. त्याही पलीकडे जाऊन ‘गली बॉय’चे संवाद (विजय मौर्य) त्यातली रॅप + हिपहॉप गाणी ही निव्वळ नृत्य गीत न राहता दबल्या गेलेल्या कष्टकरी वर्गाचा हुंकार बनतात. नवदलित साहित्य बनतात.
रूढार्थाने दलित साहित्य म्हणजे काय? तर समाजाने नाकारलेले घटक, झिडकारले गेलेले लोक यांनी कलेच्या माध्यमातून केलेला उठाव…. जसं नागराज मंजुळे यांच्या ‘फॅन्ड्री’मधून जब्या आपल्यावर एक दगड भिरकावतो, तसा ‘गली बॉय’चा मुराद ‘अपना टाइम आएगा’ म्हणत ठासून गातो…
खरं तर हा सिनेमा सतत आपल्याला टोचन देत रहातो. साध्या साध्या गोष्टींमध्ये आपणच केलेलं समाजाचं वर्गीकरण… भेदभाव. जसं मार्केटिंगमध्ये सेक्शन ए, बी असा ग्राहकवर्ग विभागलेला असतो, तशी आपण उत्पन्न आणि कामांची आपल्याच पद्धतीने केलेली उतरंड. सिनेमात एका ठिकाणी मुरादचा सेल्समन मामा, ‘मेहनत करने का’ म्हणणार्‍या ड्रायव्हर भावजीला म्हणजे मुरादच्या बापाला म्हणतो, ‘हमारा काम अलग है. इसमें दिमाग लगता है.’ म्हणजे जरा बर्‍या आर्थिक स्थितीत असणारा माणूस लगेच बुद्धी, लायकी याचं वर्गीकरण करून मोकळा होतो. झोयाच्या सगळ्याच सिनेमात हे असे बारकावे असतात, पण ‘गली बॉय’मध्ये ते इतक्या सहजतेने आलेले आहेत की क्षणभर मुरादचं नाव कळताच ‘कहां रहता है? भेंडी बाजार?’ म्हणणार्‍या शेर उर्फ श्रीकांतच्या बापात आपण स्वत:ला बघून जातो.
निव्वळ ठाशीव व्यक्तिचित्रण आणि संवाद ही ‘गली बॉय’ची खासियत नाही, तर अप्रतिम ओल्ड स्कूलप्रतीकात्मक दृश्य चौकटी यांनी सिनेमा अनेक ठिकाणी बहरला आहे. बापाच्या जागी अनिच्छेने ड्युटी करायला गेलेला मुराद जेव्हा एका क्लबबाहेर मालकिणीची वाट बघत इतर ड्रायव्हर्सबरोबर थांबला आहे, तेव्हा क्लबमधलं हिप हॉप म्युझिक ऐकू यावं म्हणून तिथून पुढे पुढे येत राहतो. त्याला बघताच तिथले बाउन्सर्स त्याला मागे जायला सांगतात. मनात धुमसत मुराद परत जाऊन गाडीत बसतो. त्याच्या मालकाच्या त्या काळ्याशार आलिशान गाडीवर पडलेलं रोषणाईचं प्रतिबिंब आणि आत बसलेला झिडकारले गेलेला मुराद.. दुसरी गाण्यात गाडीला ड्राइव्ह करत असलेला शोफर मुराद आणि मागच्या सीटवर बसलेली मालकाची मुलगी.. स्कायच्या प्रशस्त आलिशान घरात तिच्या तेवढ्याच मोठ्या बाथरूममध्ये पावलं टाकत जागा मोजणारा मुराद… भिंतीवर रोटी, कपडा, मकान और इंटरनेट असं रंगवणारा मुराद..
झोया आणि तिच्या टीमने म्हणजे डीओसी जय ओझा, एडिटर नितीन बैद, पटकथाकार खुद्द झोया आणि रीमा कागती, आणि संवाद लेखक विजय मौर्य (मुरादचा मामा) अफलातून काम केलं आहे. मुंबईची खास करून मुस्लिम इलाख्यात बोलली जाणारी हिंदी (यातले आलिया भट्टचे संवाद लोकप्रिय झालेत) आणि किळसवाणी न वाटता कथेतलेच एक पात्र वाटणारी धारावी.


अभिनय तर यात कुणी केलाच नाहीये. अभिनय करू नका अशीच झोयाची ताकीद असणार. मुरादची आई बनलेल्या अमृता सुभाष, आजी बनलेल्या ज्योती सुभाष, बाप विजय राज, मित्र मोईन बनलेला विजय वर्मा, सफिनाचे आई-बाप, मुरादच्या प्रोजेक्टवर काम करणारी प्रोड्युसर स्काय म्हणजे कल्की…. सगळे त्या कथेतली, त्या काळातली, त्या जगातली लोक आहेत. पण तीनजण मात्र खरोखर काबिले तारीफ.. सफिना बनलेली आलिया. तोडफोड असलेली मेडिकलस्टुडेंट. प्लेयिंग टू दी गॅलरी असा हा रोल. पण आलियाने इतका समरसून केलाय. शेवटी मुरादच्या रॅपमध्ये ती अत्यानंदाने किंचाळते… बाप रे.. तिचा अभिनिवेश… एखादी मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला असं चिअरअप नाही करणार तर कसं.. दुसरा म्हणजे एम.सी. शेर बनलेला सिद्धांत चतुर्वेदी. पहिल्या प्रसंगापासूनच सिनेमा खिशात टाकतो हा पोरगा. त्याचं बिनधास्त असणं. त्याची मुरादची दोस्ती. मुरादला पाठिंबा देण्यासाठी वाटेलते करण्याची तयारी…. आणि शेवटी रणवीर सिंग. सिंबा केलेला हाच का तो असा प्रश्न पडू शकतो इतकं सुंदर काम केलेलं आहे त्याने. मुरादचं दबून असणं, आत्मविश्वास नसणं, एका क्षणी पेटून उठणं… अनेकदा डोळ्यांनी तो संधी न देताच नाकारले गेल्याचं दुःख वागवत रहातो. अफलातून.. ‘गली बॉय’ला रणवीरच्या अभिनयाने एक वेगळीच पातळी दिली आहे.
‘गलीबॉय’चं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे यातली गाणी. हिप हॉप, रॅप असा मिक्स प्रकार असला तरी शब्द असे आहेत की नकळत एक दाद जातेच. एक सुप्त विद्रोह आहे या शब्दांत, जो आजच्या परिस्थितीला इतका लागू होतो.. उदाहरणार्थ जिंगोस्तान हे गाणं. त्यातले ‘२०१८ है देश को खतरा है’ हे शब्द किंवा ‘वहां पे पेटी पेटी धन, यहां पे खेती खेती गंद, इक दुनिया में दो दुनिया, उजाला इक अंधेरा, सेठजी इक चेला…
जावेद अख्तर साहेबांनी तरुण रॅपर डिवाइन, अंकुर तिवारी यांच्या साथीने मांडलेत हे निखारे.. पण हे सगळं मांडायला झोयाचं दिग्दर्शक असणं खूप महत्त्वाचं. कारण तिच्या दृष्टीने ‘गली बॉय’ ही कर्णाची वेदना आहे. एकलव्याची वेदना आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतीय म्हणून उतरवल्या गेलेल्या मोहनदास गांधींची वेदना आहे, दलित म्हणून हिणवल्या गेलेल्या भीमराव आंबेडकरांची वेदना आहे.. त्या प्रत्येक गुणी असूनही नाकारल्या गेलेल्या जीवाची वेदना आहे, जी ‘गलीबॉय’च्या शब्दात म्हणावं तर..
काट लो जुबान.. आसुओं से गाऊंगा
गाड़ दो बीज हूं पेड़ बन ही जाऊंगा..
भौत हार्ड…. भौत हार्ड बंटाय..
कट इट!

– गुरुदत्त सोनसुरकर
(लेखक चित्रपट रसिक, लघुपट दिग्दर्शक आणि जाहिरात व्यावसायिक आहेत)

Previous Post

लस आणि सत्तालोलूपांची ठसठस

Next Post

कसा पण टाका

Related Posts

सिनेमा

इतिहासात घडणारा मुळशी पॅटर्न

June 9, 2022
सिनेमा

दिसायला चांगला पण लवचिक!

December 1, 2021
सिनेमा

खवय्यांसाठी खास यूट्यूब चॅनेल : लवंगी मिरची

September 16, 2021
सिनेमा

शब्दांच्या पलिकडल्या आशाताई!

September 2, 2021
Next Post
कसा पण टाका

कसा पण टाका

भिका-यांचे भरले संमेलन!

भिका-यांचे भरले संमेलन!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.