(`मेरीच लाल’ किल्ला. दिवाण ए खास. ब्यादश्या नौरंगजेब प्रसन्न मुद्रेत फोटोग्राफरना पोझ देत सिंहासनावर बसलेले. जवळ मेकअप आर्टिस्टचा पूर्ण लवाजमा उभा. दिवाण ए खासचं दैनंदिन काम बघण्यासाठी वजीर अमानतुल्ला शामेनी आणि काही मोजकी मंडळी समोर रांगेत उभी. उत्सुकतेने एक विदेशी पाहुणा दरबाराचं काम बघण्यासाठी आलेला, त्याच्यासोबत त्याचा दुभाष्या.)
अमानतुल्ला : तर आज हम यहाँ जमे हैं, आनेवाले दिनों में जम्हूरियत के नामपर अपोजीशनवालो से लड़ी जानेवाली आखरी लड़ाई के लिए रणनीति बनाने के लिए!
शेंदूर्णे : (नेहमीच्या पद्धतीने नाकातून झंकारलेले सूर काढत) हे रंतिनी काय्ये? सरळ चहापन्हाच्या हातात तरवारी देऊन सगळं अपोझिशन कापून काढू. नाहीतरी मी कालच बोललो ना, एक मुगल सब पे भारी!
हावडे : (समजावणीच्या सुरात) शेंदूर्णे! म्हणजे ह्या घनघोर रणात एकट्या ब्यादश्या नौरंगजेबांना धाडताय? तुम्हाला मनसब आणि वतनं काय मागे थांबून मजा बघायला दिलीत का दिल्लीपतींनी?
शेंदूर्णे : (उसनं हसू आणत) हं, हं! मी असं म्हणलो म्हणजे त्ये हारलेले यांना भित्यात ना?
अमानतुल्ला : (भाषा न कळल्याने चिडून) आप कम्बख्तोंको मनसब क्यों दिई? ये गौर से सोचने की बात है! जो कहना है, ओ सिर्फ उर्दू या फ़ारसी में कहो। ये मुग़ल दरबार हैं।
शेंदूर्णे : (नाकाच्या बेचकीत शक्य तेवढी उर्दू कोंबून ती एक श्वासात उडवत) पिछळी बार हरवाई था ना उणुको! इस बार बी हरवाइंगेगे। में मेरे लडकू के साथ इस जंगमे सबसे आगे होवोन्गे।
अमानतुल्ला : (कानावर आदळलेली उर्दू दोन्ही करंगळ्यांच्या टोकांनी चिरडत) बस कर भाई! अब सहा नही जाता। आगे से तू सिर्फ मराठी में बोलनेका? क्या समजा? इत्ती बेहूदा उर्दू सुन के ग़ालिब दस बार जान दे दें।
हावडे : (चटकन दोन पावले पुढे येत) वो मराठी बोलेंगे, मैं उसका उर्दू ट्रांसलेशन कर दूँगा, फिलहाल क्या हम आज के विषय के बारे में बोले?
(सिंहासनावर बसलेल्या नौरंगजेबास मुखशुद्धीसाठी अत्तराच्या कुपी देववून त्याच्या गुळण्या करण्यास सुचवलं जातं. भोळसट ब्यादश्या एक कुपी सेवकाच्या हातातून घेऊन सरळ पिऊन घेतो, तसे मेकअप आर्टिस्ट डोक्याला हात मारून घेतात.)
अमानतुल्ला : (बैठकीचे मुद्दे समजावत) आज इस दीवान ए खास में बुलाने की वजह आप सब की राय से हमें दुश्मनों से लड़ने की स्ट्रेटेजी बनाना है। तो सब मान्यवर अपने अपने विचार यहाँ रखे।
हावडे : (कुठलासा कागद काढत, तोच वाचत) हम चहापन्हा नौरंगजेब जी के विचारों से हर एक घर में, हर एक मन में मुल्क के प्रेम की चिंगारी जलायेंगे।
शेंदूर्णे : (बेफिकिरीने) ह्यँ? निस्तं पेटवायचं म्हणता ना? मग माझो पोर्गो राकेलची बोळी बनवून फेकून गाव-गाव, घर-घर पेटवूच र्हायली ना? हे काम माझ्याकडं द्या! मी अख्खा दख्खन पेटवतो की नाही ते बघा!
अमानतुल्ला : (शांतपणे) ये ध्यान में रख लो के हमारे जितने तक मुझे पूरे मुल्क में शांति चाहिए।
हावडे : जी! जी! (पुढला मुद्दा वाचत) हम सब मनसबदार मिलकर झोलमखोर नौरंगजेबजी के अच्छे काम गिनवाएँगे।
शेंदूर्णे : (प्रचंडआळसदेत) आधी ती वजीर ए खजाना एक काम बोर न मारता सांगत्ये का बघा? आणि आपुन कामावर सपोर्ट मागायचा हे रिस्कचं अपमानजनक काम आहे. आपल्या सात पिढ्या ते जमणार नाही. आणि त्याच्यात कामं कोणती केली, हे शोधायला टॉर्च आहे कुठं?
अमानतुल्ला : (हावडेकडे बघत, काहीशा रागाने) ये सचमुच हमाराही आदमी है न?
हावडे : जी, हुजूर!
शेंदूर्णे : (खिन्नपणे) आयला, हे बरंय! पार मेरीच लाल किल्ल्यापासून सुभेदार इकमालच्या बरखा महलपर्यंत सगळीकडची बूट चाटून साफ केल्यावर सुद्धा वजीरसाब आम्हाला भुलणार असतील तर ह्या डे-नाईट सेवेचं चीज काय?
हावडे : (मध्यस्थीच्या सुरात) शेंदूर्णेजी, आपकी सेवा तो गुलामों में सर्वोपरि हैं। (वजीराकडे बघत) हुजूर, लेकिन शेंदूर्णेजी ने जो बात रखी ओ सही हैं। हम कामपर अवाम का सपोर्ट नहीं मांग सकते।
अमानतुल्ला : (अंमळ संतापाने) तो हाथपर हाथ रख के बैठ जाएं?
हावडे : (काही आठवल्यागत) एक स्किम है, हुजूर!
अमानतुल्ला : ( चमकून बघत) कौनसी?
हावडे : कुबेर नगरीके सुभेदार इकमाल सिद्दीक और उनके दीवाण फूलचंद डबीर ने एक अच्छी स्किम लगाई है, `हर हर मौत, हर घर मौत.’
अमानतुल्ला : (शंकेने) उससे क्या होगा?
हावडे : उससे डर पैâलेगा। और डर से लोग डरते हैं। और डरे हुए लोग किसी का भी कहा मानकर या मज़हब, जाति के नामपर अपना दिमाग खोकर भावनाओं में बह जाते हैं। ऐसे ही लोग तानाशाही के रखवाले बन सकते है।
अमानतुल्ला : (खोदून विचारत) हां, तो उसके लिए क्या करना पड़ेगा?
हावडे : खुलेआम बंदूके बांटनी पड़ेगी, नफ़रत फैलानी पडेगी।
चहापन्हा : (मेकअप नि कपडेपटाच्या कामात व्यस्त असताना मान उंचावत) हां, ये कर दो। (तसे वजीर अमानतुल्ला शामेनी मान हलवतात.)
(तितक्यात मनसबदारांच्या रांगेतून कुठूनसा हुंदका ऐकायला येतो. सगळ्यांच्या नजरा तिकडे वळतात.)
अमानतुल्ला : (भिरभिरत्या नजरेने) कौन है? क्या हुआ?
मनसबदार : हे काझी चाँद इस्माईल आहेत. ते बंदीगढमध्ये जम्हूरियत के पाक मंदिर में एक रखवाले ने संविधान के होली काऊ को कांट फेका, उसके साथ बर्बरता की, अशी बातमी ऐकून रडताय!
अमानतुल्ला : (घोकंपट्टी केलेलं वाक्य फेकत) काज़ी जी। मैं आपकी भावनाओं को समझ सकता हूँ। लेकिन मैं आपको आश्वस्त करता हूँ कि आनेवाले समय में पूरे मुल्क में होली काऊ हत्याबंदी लागू की जाएगी!
(तितक्यात सिलेक्टिव्ह कमिशनचा कमिश्नर हाताला लागलेले रक्त दाखवत चित्कारत मिरवत आत येतो. ब्यादश्यांना मुजरा घालतो. झोलमखोर नजरेचा केवळ एक कटाक्ष टाकतात. बाकी सर्व दरबार विस्फारल्या डोळ्यांनी त्याकडे बघू लागतो.)
अमानतुल्ला : कमिश्नर! ये हाथ पर लगा खून किसका है?
कमिश्नर : (अत्यानंदाने) मैं दोबारा कर के आया हूँ।
हावडे : (उत्सुकतेने) हां, लेकिन क्या करके आये हो आप?
कमिश्नर : (हात उंचावून दाखवत) जम्हूरियत की होली काऊ मारकर आया हूँ! दख्खन से कोई आया था! काफर! उस जम्हूरियत की होली काऊ को बचाने की गुहार लगाते हुए। लेकिन मैंने उसके सामने ही उसे कांट दिया!
चहापन्हा : (वराह अवतारात फोटोसाठी पोझ देत) गोश्त लाया?
कमिश्नर : (नकारार्थी मान हलवत) नहीं लाया चहापन्हा! (ब्यादशा जळजळीत नजरेने बघतात. तिकडे काझी चाँद इस्माईलला पुन्हा हुंदके अनावर होतात.)
शेंदूर्णे : (हेटाळणीच्या सुरात) हे काय ओ? एवढं रडण्यासारखं काय आहे? मुघलांच्या परंपरेत कुठल्यान्कुठल्या होली काऊचा बळी दिल्याच जातो ना? इथं जम्हूरियतची होली काऊ मारली त्यात काय एवढं? सांजच्याला एक बघुणं घेऊन तुम्हीबी या! तुम्हाला पण तुमचा हिस्सा मिळेल की!
काझी : (डोळे पुसत कुठल्याशा निर्धाराने) मैं खुली आँख से इतनी बर्बरता देख नहीं सकता। इस खून खराबे के खिलाफ मैं जल्द ही कोई फतवा निकालूँगा।
हावडे : चाँद इस्माईल तुम्ही ज्या सेटलमेंट कमिशनचे काझी आहात त्याच तुमच्या सेटलमेंट कमिशनमुळे दोन होली काऊ नाईलाजाने सिलेक्टिव्ह कमिशनच्या दारात गेल्यात. तुमच्या विलंबाला आणि मौनाला होकार समजून त्यांचं शीर उडवलं गेलंय…
चहापन्हा : (चकाकणार्या कॅमेर्यांच्या प्रकाशात, प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात)… तो मेरे दोस्तों अगर हमारा तख्त आप और मजबूत करना चाहते हो, तो हमें ४००से ज्यादा क़िले जितने पड़ेंगे। उसके लिए आपको एकजुट होकर काम करनेकी जरूरत है। लेकिन फिर भी अपोजीशन वाले महजबी सपोर्ट की मांग के लिए सेटलमेंट कमीशन में जरूर जायेंगे. ऐसे में चाँद इस्माईल आपका दायित्व बढता है। अगर आप हर बारकी तरह सेटलमेंट कमीशन को ऐदिराम चीभॉय जैसे हमारे हितमें फैसला सुनवावोगे तो तुम्हें भी रिटायरमेंट के पश्चात नौरंगजेब गारंटी के तहत मनसबदारी मिलेगी। और ये अवसर बार बार नहीं मिलता…।
(विदेशी पाहुणा आणि दुभाषी छानछौकीचा दरबार बघून मुदपाकखान्यात प्रवेशतात. तो त्यांना सिलेक्टिव्ह कमिश्नरने कापलेली होली काऊ मोठ्या पातेल्यात शिजताना दिसते. तर सेटलमेंट कमिशनचा काझी एक सुरा कुर्बानीसाठी नेताना दिसतो.)