• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘गैरी’च्या ट्रेलरने उत्सुकता वाढवली

Nitin Phanse by Nitin Phanse
December 15, 2022
in मनोरंजन
0

निखळ मनोरंजनातून आदिवासींच्या समस्या मांडणारा आणि विचार करायला लावणार्‍या ‘गैरी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. आदिवासी समाजातल्या डॉक्टर होऊ पाहणार्‍या एका तरुणाची गोष्ट असलेला ‘गैरी’ चित्रपट १६ डिसेंबरला प्रदर्शित होतोय. चित्रपटाचा टीजर आणि ट्रेलरमधून चित्रपटाच्या रंजक कथेचा अंदाज बांधता येतो. आदिवासींच्या समस्या मांडतानाच पुरेपूर मनोरंजन करत वास्तवाविषयी विचार करायला लावणारी कथा या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत. खुसखुशीत संवादांच्या जोडीला उत्तम अभिनयाची मेजवानी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच ‘गैरी’ चित्रपटाविषयी आता उत्सुकता वाढली आहे.
या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या हटके स्टाईल आणि अदांमुळे नेहमीच चर्चेत असलेली ‘युवा डान्सिंग क्वीन’ फेम मराठमोळी अभिनेत्री कृतिका गायकवाड या सिनेमातील एका आयटम साँगमध्ये झळकली आहे. ‘तू छेडू नको, हा आयटम बॉम्ब’ असे धमाकेदार शब्द असलेले या सिनेमातील गाणे सध्या सोशल मीडियावर गाजतेय. कृतिकाने या गाण्यावर ठुमके लगावले असून या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय.
युक्ता प्रॉडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या ‘गैरी’ या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन पांडुरंग बाबुराव जाधव यांनी केलं आहे. गुरु ठाकूर आणि विष्णु थोरे यांनी गीतलेखन, अमितराज, मयुरेश केळकर यांचे संगीत दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. वैशाली सामंत, अमितराज, मधुरा कुंभार, हृषिकेश शेलार यांनी गाणी गायली आहेत. तर पार्श्वसंगीत मयूरेश केळकर यांचं आहे. विनोद पाटील यांचं छायालेखन आहे. अभिनेता मयुरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड आणि देविका दफ्तरदार यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

– नितीन फणसे

Previous Post

वेगळ्या वळणाचा ‘धोंडी चंप्या’

Next Post

ग्रूप पाहता लोचनी…

Next Post

ग्रूप पाहता लोचनी...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.