• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

हस्तिदंत तस्करीच्या पर्दाफाशाचा थरार…

- युवराज माने (मार्मिक प्राइम)

Nitin Phanse by Nitin Phanse
March 14, 2024
in मनोरंजन
0

नव्वदीच्या दशकात भारतामध्ये वन्यजीव सुरक्षा कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल केले गेले. परिणामी वन्यजीवांची शिकार करण्यावर बरीच बंधने आली. मनोरंजनासाठी किंवा व्यावसायिक नफेखोरीसाठी प्राण्यांची हत्या करणे हा गुन्हा मानला जाऊ लागला आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली. त्यावेळी हस्तिदंतासाठी हत्तींची होणारी निर्घृण हत्या थांबवण्यासाठी वनविभागाने मोठी मोहीम राबवून माफियांच्या टोळ्यांना जेरबंद केलं, ज्यांची पाळेमुळे अगदी चीन, जपानपर्यंत पोहोचली होती. अशा कठोर उपायांनी हत्तींच्या अवैध शिकारीवर कायमची बंदी आली. वनविभागाच्या अखत्यारीत असणार्‍या जंगलांत, अभयारण्यात आणि राष्ट्रीय उद्यानांत वन्यजीवांचं मोठ्या प्रमाणावर पुनर्वसन करण्यात आलं. वनविभागाच्या अधिकार्‍यांचं नियमित लक्ष असल्याने शिकारीचा मुद्दा आता निकालात निघाला आहे, अशीच सर्वांची समजूत होती. परंतु २०१५मध्ये एका वृत्तपत्रात हस्तिदंतासाठी केरळमध्ये जवळपास २० हत्तींची शिकार केली गेल्याची बातमी छापून आली आणि सर्वांचेच धाबे दणाणले. याची चौकशी करण्यासाठी आणि या तस्करीत सामील असणार्‍या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘ऑपरेशन शिकार’ ही एक मोठी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेवर आधारित असणारी ‘पोचर’ ही वेबसिरीज अ‍ॅमॅझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे.
केरळ वनविभागात कामाला असणारा अरुकू (सूरज पॉप्स) तिथे हत्तींची शिकार झाल्याची कबुली देतो आणि एकच खळबळ उडते. दुर्मिळ हस्तिदंतासाठी जवळपास १८ हत्तींची तस्करांनी हत्या केल्याची खबर वार्‍यासारखी पसरते आणि वनविभागातील अनेकांच्या नोकरीवर गदा येते. या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे नील बॅनर्जी (दिब्येंदू भट्टाचार्य) या अधिकार्‍याकडे सोपवली जातात. माला जोगी (निमिषा सजयन) या धडाडीच्या स्थानिक ऑफिसरला नील या मोहिमेत सामील करून घेतो. संशयितांच्या मोठ्या प्रमाणावर असणार्‍या कॉल रेकॉर्ड्सचं विश्लेषण करण्यासाठी अ‍ॅलन (रोशन मॅथ्यू) या दिल्लीतील तज्ञाची मदत घेतली जाते. त्रिवेंद्रम येथील एका संशयिताची चौकशी करण्याची जबाबदारी दिना (कनी कुस्रुती) या बेधडक अधिकार्‍याकडे सोपवली जाते. हे प्रकरण दिसतं तितकं साधं नसून यामध्ये मोठमोठी नावं गुंतली असण्याची शक्यता लवकरच सर्वांच्या लक्षात येते. त्यामुळे या मोहिमेबद्दल शक्य तितकी गुप्तता पाळत हे सर्वजण या गुन्ह्याची उकल कशी करतात, याची थरारक कथा सिरीजच्या आठ भागांत दाखवली जाते.
रिची मेहता यांनी सिरीजचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. याआधी ‘दिल्ली क्राइम’ या सिरीजसाठी ‘बेस्ट ड्रामा सिरीज’चा इंटरनॅशनल एमी पुरस्कार जिंकणारे मेहता पुन्हा एकदा त्याच लयीत दिसून आले आहेत. या जटील विषयावर आधारित त्यांचा सखोल अभ्यास सिरीज पाहताना पदोपदी जाणवतो. गुन्ह्याची उकल करत असताना पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षण या महत्वाच्या मुद्द्यांकडे ते प्रेक्षकांचे लक्ष वेधतात. प्रत्येक भागात बर्‍याच घडामोडी घडत असताना नव्या भागाची सुरुवात करताना ते प्रेक्षकांना पुन्हा त्याच ठिकाणी घेऊन येतात जिथे एका हत्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या हत्तीचं सडत जाणारं धूड हा सगळा आटापिटा कशासाठी चालला आहे याची आठवण करून देते. तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी पेरलेले वन्यजीव या गुन्ह्याच्या मुळाशी जाणार्‍या खटाटोपाचे साक्षीदार वाटतात. आरोपीच्या घरी पोहोचण्याआधीच तो फरार झालेला असताना दिसणारा बिबट्या, पहाटे दोन वाजता धाड टाकताना दिसणारे वटवाघूळ, एका ट्रेनमध्ये आरोपीचा शोध घेत असताना उंच आकाशातून त्याकडे तीक्ष्ण नजर ठेवणारी घार असे अनेक प्राणी-पक्षी विशेष लक्षात राहतात. याशिवाय मालाचं श्वानप्रेमी असणे, अ‍ॅलन एक सर्पमित्र असणे आणि नीलला दीर्घायुषी असणार्‍या कासवांचं आकर्षण असणे या गोष्टीही वैशिष्ट्यपूर्ण वाटतात.
सिरीजमधील व्यक्तिरेखांचे संवाद त्यांच्या मातृभाषेला लक्षात ठेवून लिहिण्यात आले आहेत. माला, अ‍ॅलन आणि केरळमधील इतर व्यक्तिरेखा मल्याळम भाषेतच बोलतात. नील आणि इतर बाहेरच्या लोकांशी हिंदीत संवाद साधला जातो. नील आपल्या घरी कुटुंबाशी बंगालीमध्ये बोलतो. मल्याळम आणि बंगाली भाषांसाठी स्वतंत्र संवादलेखक असल्याने व्यक्तिरेखांची प्रादेशिक पार्श्वभूमी ठळकपणे लक्षात राहते आणि सिरीजमध्ये त्यांचा लहेजा नैसर्गिक वाटतो. पटकथेमध्ये मुख्य व्यक्तिरेखांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनातील ससेहोलपट विस्तारपूर्वक मांडली गेली आहे. माला आणि तिच्या आईचं नातं, अ‍ॅलनचं पत्नी आणि मुलावर असणारं प्रेम आणि नाराज पत्नीशी असणारा नीलचा अवघडलेपणा पटकथेत अत्यंत संयतपणे दाखवला गेला आहे. एका प्रसंगात तस्कराबद्दल एका तरुणीची उलटतपासणी होत असताना असं लक्षात येतं की ज्या कारणांसाठी मालाला तस्करांबद्दल चीड वाटत असते, अगदी त्याच कारणांमुळे ती तरुणी त्याच्यावर भाळलेली असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची सारखीच स्वभाववैशिष्ट्ये पाहून दोन भिन्न व्यक्तीं कसं त्याच्याबद्दल चांगलं-वाईट मत बनवतात हा मानवी दृष्टिकोनातील फरक दिग्दर्शक मोठ्या खुबीने दाखवतो.
सिरीजमधील एकूणच स्त्री व्यक्तिरेखा लक्षपूर्वक िलहिण्यात आल्या आहेत. अगदी एका तस्कराची लहान मुलगीही मोठेपणी नोकरी करून आईवडिलांना या दलदलीतून बाहेर काढण्याचा विश्वास मालाकडे बोलून दाखवते, तेव्हा ते कुठेही अतिशयोक्तीपूर्ण वाटत नाही.
अभिनयात सर्वच कलाकारांनी उत्तम कामगिरी केली आहे. निमिषा सजयन या मल्याळम अभिनेत्रीने उभी केलेली तडफदार माला जोगी संपूर्ण सिरीज व्यापून टाकते. निसर्गावरचं तिचं निस्सीम प्रेम, पर्यावरणाला हानी पोहोचवणार्‍यांबद्दल मनस्वी संताप आणि कसलाही धोका पत्करून ठोस निकाल लावण्याचा बेधडकपणा निमिषाने जोमदारपणे साकारला आहे. अशी प्रबळ व्यक्तिरेखा असूनही एका जीवघेण्या प्रसंगातून वाचल्यानंतर आईला फोन करून तिच्यासमोर भावनांचा कडेलोट होत हमसून हमसून रडण्याच्या अवघड प्रसंगात तिची अभिनयप्रतिभा प्रकर्षाने दिसून येते. जंगलातील हत्तींचं महत्व सांगत असताना मालाच्या मनातील निसर्गाबद्दलची तळमळ ती पडद्यावर जिवंत करते. रोशन मॅथ्यू या मल्याळम चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्याने अ‍ॅलनची कामावरील निष्ठा, मनात नसतानाही धोका पत्करण्याची तयारी आणि कुटुंबावरील प्रेम व्यक्त करण्याची खटपट प्रभावीपणे दाखवली आहे. दिब्येंदू भट्टाचार्यने या गुन्ह्याची उकल करण्याच्या कामात वाहून घेतलेला पण वैयक्तिक आयुष्यात खचलेला नील बॅनर्जी प्रामाणिकपणे उभा केला आहे. कनी कुस्रुती ‘दिना’च्या लहानशा भूमिकेतही प्रेक्षकांच्या लक्षात राहाते. मुकेश छाब्रा यांच्या कास्टिंग कंपनीने लहान भूमिकांसाठीही अनेक उत्तम अभिनेते एकत्र आणले आहेत. खासकरून केरळमधील अनेक व्यक्तिरेखा उत्तम कास्टिंगमुळे अस्सल झाल्या आहेत.
तांत्रिकदृष्ट्या ‘पोचर’ची कामगिरी अव्वल दर्जाची आहे. छायाचित्रण, ध्वनि, प्रॉडक्शन डिझाईन, व्हीएफएक्स, संकलन अशा सर्वच विभागांतील तंत्रज्ञांची मेहनत जाणवून येते. सुरुवातीला शिकार होणार्‍या हत्तीच्या धुडाचे कुजत जाण्याचे टप्पे, त्याच्या आसपास घुटमळणारे इतर प्राणी-पक्षी, तपास करत असताना पेरलेले वन्यजीव अशा सर्व घटकांची रचना कल्पकतेने केली गेली आहे. योहान ऐड्ट यांचा कॅमेरा सतत पात्रांच्या आगेमागे वावरत प्रेक्षकांना तपासाची लगबग जाणवून देतो. प्रकाशयोजनेत निळा, पिवळा, लाल अशा रंगांचा प्रभावी वापर केलेला आढळतो. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांची तपासाबद्दलची गहन चर्चा सुरू असताना प्रâेमिंग, प्रकाशयोजना आणि कॅमेर्‍याची हालचाल वातावरणातील तणाव स्पष्ट करतात. संशयितांची उलटतपासणी करत असताना, माला जोगी आणि नील बॅनर्जी यांची पहिली भेट होताना, अरुकूचा तस्करांसोबतचा हातभट्टीच्या अड्ड्यावरील प्रसंग अशा अनेक ठिकाणी योजलेली रंगसंगती परिणामकारक झाली आहे.
या सिरीजमधील ध्वनिआरेखन आणि पार्श्वसंगीताचं कामही उल्लेखनीय झालं आहे. जंगल आणि शहरातील प्रसंगांमधील फरक प्रभावी ध्वनिआरेखनातून लक्षात येतो. जंगलातील विविध प्राणी-पक्ष्यांचे आवाज, वारा, पाणी, झाडे. पाऊस यांचा नैसर्गिक आवाज यांच्या मदतीने वातावरणनिर्मिती केली जाते. शहरातील प्रसंगांत तिथल्या ट्रॅफिकचा, माणसांच्या गर्दीचा, रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा असे विविध आवाज वापरून तिथला कल्लोळ प्रस्थापित केला जातो. खासकरून दिल्लीतील अखेरच्या प्रसंगातील अनागोंदी दाखवताना ध्वनी महत्वाचा ठरतो.
बेवर्ले मिल्स, सुजन शिप्टन आणि जस्टीन ली यांनी सिरीजचं संकलन केलं आहे. पहिल्याच भागातील जंगल, वनविभागाचं ऑफिस, त्रिवेंद्रम, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणचे प्रसंग दाखवताना कुठेही दृश्यसाखळीची लय खंडित होत नाही. खासकरून सिरीजच्या सहाव्या भागात अरुकू जंगलातील हत्तींची शिकार केलेली ठिकाणे दाखवत असतानाच त्याच्या तस्करांबरोबरच्या प्रवासातील दृश्यांची केलेली सरमिसळ वाखाणण्याजोगी आहे. एका भागात अ‍ॅलनचं आपल्या पत्नीला त्याच्या कामाचं महत्व पटवून देणे आणि त्याच वेळी या कामामुळे आपल्या जिवाचं बरंवाईट होऊ शकतं या जाणीवेने हादरलेल्या मालाने भावनाविवश होऊन आईची माफी मागणे असे टोकाचे प्रसंग संकलनातील कौशल्यामुळे प्रभावी झाले आहेत.
‘दिल्ली क्राइम’नंतर रिची मेहता यांनी सिरीजसाठी हा विषय निवडताना आणि त्यासंबंधीचे तपशील गोळा करताना केलेलं संशोधन प्रशंसनीय आहे. माला जोगी ही व्यक्तिरेखा लिहिताना त्यांनी ‘ऑपरेशन शिकार’मध्ये काम केलेल्या मनू सत्यन या अधिकार्‍याबरोबरच इतरही अनेक अधिकार्‍यांचे अनुभव वापरले आहेत. जोस लुई यांच्यावरून प्रेरित असणारा अ‍ॅलन जोसेफ आणि अमित मलिक यांच्यावर आधारलेला नील बॅनर्जी या व्यक्तिरेखाही त्यांचे अनेक संदर्भ वापरून लिहिल्या गेल्या आहेत. जंगलांचं महत्व, वन्यजीवांचं अस्तित्व, पर्यावरणाचा समतोल यांचं महत्व पटवून देतानाच मानवाच्या राक्षसी लालसेवर सिरीज प्रकाश टाकते. ‘दोन-चार जनावरं मेली तर काय फरक पडणार आहे?’ या उद्दाम प्रश्नाला सिरीजमधून चोख प्रत्युत्तर देण्यात येतं.
एकूणच हस्तिदंत तस्करीच्या गुन्हेगारांना जेरबंद करण्याची थरारक कथा सांगणारी ही सिरीज भारतातील वेबसिरीजच्या इतिहासातील सर्वोत्तम सिरीजपैकी एक आहे आणि त्यामुळे अजिबातच चुकवू नये अशी आहे.

Previous Post

मामाच्या गावाला जाऊ या!

Next Post

बाल कलाकार ते प्रमुख नायिका बेबी शकुंतला

Related Posts

मनोरंजन

दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

May 15, 2025
पडद्यावरचा खरा नायक
मनोरंजन

पडद्यावरचा खरा नायक

May 15, 2025
मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
Next Post

बाल कलाकार ते प्रमुख नायिका बेबी शकुंतला

होळी रे होळी... पुरणाची पोळी...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.