• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

अजब नात्यांचा गजब गुंता!

- आशा कबरे-मटाले

Nitin Phanse by Nitin Phanse
March 14, 2024
in मनोरंजन
0

‘शीना बोरा मर्डर’ प्रकरण २०१५ साली पहिल्यांदा बातम्यांमध्ये झळकलं, तेव्हाही या प्रकरणाने देशभरातील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. मीडिया जगतातल्या तेव्हाच्या बड्या नावांपैकी एक असलेल्या पीटर मुखर्जी यांची (दुसरी) पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला स्वत:च्याच २५ वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी अटक झाली. या कामात तिनं ड्रायव्हर व आपल्या दुसर्‍या पतीची मदत घेतल्याचंही सांगितलं गेलं. इंद्राणीला एकूण तीन नवरे व त्यातल्या दोघांपासून झालेली तीन मुलं असल्याचंही जगजाहीर झालं. हे सगळंच सर्वसामान्यांकरीता धक्कादायक आणि या केसविषयी उत्कंठा निर्माण करणारं होतं. ‘इंद्राणी मुखर्जी स्टोरी : अ बरीड ट्रुथ’ या डॉक्यु-सिरीजमधून त्यांची ही उत्कंठा काही प्रमाणात शमू शकेल.
तुम्ही अगदी सवयीने, आवडीने नेहमीच ‘मर्डर मिस्ट्री’ पाहणारे असलात वा नसलात तरीही तुम्हाला ‘इंद्राणी मुखर्जी स्टोरी : अ बरीड ट्रुथ’ ही डॉक्यु-सिरीज (माहिती-मालिका) पाहावीशी वाटू शकेल. कुठल्याही चित्रपट-सीरीजचा बाबतीत ‘बंदी’ वा तत्सम चर्चा झाली की पब्लिकचं कुतूहल थोडं अधिकच चाळवतं.
‘इंद्राणी मुखर्जी स्टोरी…’ ही डॉक्यु-सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होण्याच्या बरोबर आठवडाभर आधी सीबीआयने ‘अद्याप न्यायालयात केसची सुनावणी सुरू असल्यामुळे ही सिरीज रिलीज करू देऊ नये’ अशी मागणी केली. पण लगेचच सर्व संबंधितांसाठी स्पेशल स्क्रीनिंग वगैरे पार पडून, मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची मागणी फेटाळून लावत सिरीजच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला.
एव्हाना अनेकांनी ही सिरीज पाहिली असेल किंवा किमान ‘हे बघायला हवं’ अशी नोंद तरी मनात केली असेल. २९ फेब्रुवारीला ही डॉक्यु-सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर आठवडाभरात तब्बल १८ देशांमध्ये ती ट्रेंडिंग झाल्याचा व नेटफ्लिक्सच्या पहिल्या दहा इंग्लीश शोजमध्ये तिचा समावेश झाल्याचं सांगितलं जातंय.
‘शीना बोरा मर्डर केस’ची ब्रेकिंग न्यूज २०१५ साली आली तेव्हा सुरुवातीला शीना ही इंद्राणीची बहीण आहे की मुलगी याविषयी संभ्रम होता. इंद्राणी आज नऊ वर्षांनंतरही तो संभ्रम कायम ठेवण्याच्या प्रयत्नात दिसते.
बातम्या नीट पाहणार्‍यांना इंद्राणी आणि ही केस स्मरणात असेलच. कारण २०१५ साली ही केस उजेडात आल्यापासून अधूनमधून या न त्या कारणाने इंद्राणी पुन्हा पुन्हा बातमीत येत राहिली आहे. केस अजूनही न्यायप्रविष्ट आहे, पण या प्रकरणातील चारही आरोपी एव्हाना जामिनावर बाहेर आले आहेत. यात इंद्राणी, तिचा दुसरा नवरा संजीव खन्ना, तिसरा नवरा पीटर मुखर्जी आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांचा समावेश आहे.
तपशीलांनी गोंधळून जाण्याची काहीच गरज नाही. तुम्ही बरंच काही विसरला असलात वा तुम्हाला यातल्या कशाचाच काही अता-पता नसला तरी बिघडत नाही, कारण डॉक्यु-सिरीजमध्ये सारं काही सुरुवातीपासून नीट सांगितलेलं आहे.
बातम्यांमधून जे-जे काही जसं-जसं चव्हाट्यावर आलं, त्या बातम्यांच्या ओरिजिनल फुटेजसह, कालांतराने त्यासंदर्भात उजेडात आलेली नवी माहिती वा सर्व संबंधितांचे दावे-प्रतिदावे या सार्‍याची उत्तम सांगड घालत डॉक्यु-सिरीज ही केस पुन्हा आपल्यासमोर ठेवते. डॉक्यु-सिरीजचं विशेष आकर्षण म्हणजे हे सगळं ज्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात घडलं, ती स्वत: इंद्राणी, तिचा पहिल्या नवर्‍यापासून झालेला मुलगा (आणि शीनाचा सख्खा भाऊ) मिखाइल आणि इंद्राणीची दुसर्‍या नवर्‍यापासून झालेली, पण तिसर्‍या नवर्‍यासोबत (अर्थात पीटर मुखर्जीसोबत) वाढलेली मुलगी विधी हे तिघं या सिरीजमध्ये तपशीलवार मुलाखतींमधून पुन्हा-पुन्हा आपल्यासमोर येत राहतात व अनेक नवे-जुने तपशील त्यांच्या-त्यांच्या दृष्टिकोनातून सांगतात. या तिघांचंही बोलणं वेगवेगळ्या कारणांनी आपल्याला खिळवून ठेवतं. प्रत्येकाचे डोळे, हसणं-रडणं, बोलण्याच्या-हातवार्‍यांच्या लकबी त्याहीपलीकडचं खूप काही सांगत राहतात.
अटकेपूर्वीच्या निरनिराळ्या फुटेजमधून दिसणारी तरूण, देखणी, यशस्वी मीडिया पर्सनॅलिटी इंद्राणी आणि आताची सुरकुतल्या चेहर्‍याची, विचित्र वटारल्या डोळ्यांनी आपलं कथित सत्य ठासून सांगणारी इंद्राणी… दोघीही भेटतात इथे. ‘कोलकात्यात संजीव खन्नासोबत ही आमच्या क्लबमध्ये येऊ लागली तेव्हा कुणीही चटकन आकर्षित व्हावं अशी देखणी व ‘सेक्सी’ होती’, तिथल्या उच्चभ्रू वर्तुळातलाच कुणीतरी डोळे मिचकावत सांगतो. ते सेक्सी रुपडं एव्हाना बर्‍यापैकी हरपलेलं दिसतं. आता नजरेला पडतात ती आपला मुद्दा ठासून सांगताना मोठाली होणारी इंद्राणीची बुबुळं, तिच्या डोळ्यांतली विचित्र चमक, अनपेक्षितपणे नको तिथे उमटणारं तिचं फिस्कारणारं हसू, हट्टी आत्मविश्वास आणि या सार्‍याच्या पलीकडेही लपून न राहणारा तिचा शार्पनेस.
२०१५ ते २०२२ अशी सात वर्षं तुरुंगात राहून आल्यानंतर आजही त्या पूर्वीच्या महत्त्वाकांक्षी वाटचालीबद्दल बोलताना इंद्राणी खुशालते. ‘आय हॅड दॅट फायर इन माय बेली’ (होय, होता मला आयुष्यात खूप मोठ्ठं होण्याचा सोस), ती हसत सांगते. ‘स्त्रीने महत्त्वाकांक्षी असणं पाप आहे का?’ असा काहीसा रागीट सवालही करते.
डॉक्यु-सिरीज सुरुवातीलाच आपल्याला आसाममधील गुवाहाटीला इंद्राणीच्या मूळ घरी घेऊन जाते. तिच्या जगण्याच्या वेगळेपणाची सुरुवात तिथूनच झाली असावी का? इंद्राणी तरी तसं आपल्या मनावर ठसवू पहाते, स्वत:च्याच वडिलांना बलात्कारी ठरवत.
‘शीना हे या बलात्कारातून झालेलं अपत्य आहे’ असा दावा इंद्राणी करते. हे कुभांड आहे की वास्तव? इंद्राणीच्या या दाव्याला तिचा पहिला पती सिद्धार्थ दास वा मुलगा मिखाइल दुजोरा देत नाहीत. घराच्या बाल्कनीतून मुलाखतकर्त्यांशी बोलणारा, तिचा म्हातारा बाप तर या विकृत दाव्याची सुतराम कल्पना नसल्यासारखा साधी सरळ उत्तरं देतो. सिरीजमधला सगळ्यात आश्चर्यकारक क्षण म्हणजे बोलण्याच्या ओघात इंद्राणीचे वकील रणजित सांगळेसुद्धा सहज ‘सिद्धार्थ दास म्हणजे शीनाचे बायोलॉजिकल वडील…’ असं बोलून जातात! जवळच बसलेली इंद्राणी त्यांना लागलीच रोखून पाहाते. पण सांगळे ‘चिल, इंद्राणी चिल…’ म्हणत तिला गप्प करतात आणि कॅमेरा कसनुशा गोंधळलेल्या चेहर्‍याने गप्प बसणार्‍या इंद्राणीवर स्थिरावतो!
हा भाग कसा बुवा ठेवू दिला यांनी सिरीजमध्ये, असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात नक्कीच रेंगाळत राहतो.
इंद्राणी तरीही आपली ‘बलात्काराची कहाणी’ सोडत नाहीच. पहिल्या गर्भारपणाच्या त्या अवस्थेतच आपल्या आयुष्यात सिद्धार्थ दास (पहिला नवरा) आला, असं तिचं म्हणणं.
इतरांकडून, स्वत: सिद्धार्थ दास व मिखाइलकडून मिळालेले तपशील मात्र वेगळीच कहाणी सांगतात. तारुण्याच्या प्रारंभीच झालेली शीना व मिखाइल ही दोन मुलं अगदी लहानगी असतानाच, गुवाहाटीला म्हातार्‍या आईवडिलांकडे सोडून, पहिल्यावहिल्या नात्यातल्या अति-सामान्य निघालेल्या नवर्‍याकडे पाठ फिरवून, इंद्राणी कोलकात्याला निघून जाते. प्रगतीच्या वाटा धुंडाळणार्‍या इंद्राणीला तिथे उच्चभ्रू वर्तुळात वावर असलेला संजीव खन्ना नामक इसम भेटतो आणि तिचं दुसरं लग्न होतं. त्याच्यापासून एक मुलगी (विधी) झाल्यानंतर अल्पावधीतच आयुष्यात आणखी उंची गाठण्यासाठी इंद्राणी मुंबईला येऊन पोहोचते. मुंबईत पीटर मुखर्जी नामक मीडियातील बड्या प्रस्थाशी तिची ओळख होते. पीटरसोबत सुरुवातीच्या दिवसांत झालेलं संभाषण सांगताना इंद्राणी गत आयुष्यातल्या रम्य आठवणींनी आजही हरखताना दिसते. ‘पीटरने तेव्हा मला विचारलं होतं, यू वॉन्ट टू बी अ बिग फिश इन अ स्मॉल पॉन्ड, ऑर अ स्मॉल फिश इन अ बिग पॉन्ड? त्यावर मी त्याला, आय वॉन्ट टू बी द बिग फिश इन द बिग पॉन्ड’ असं उत्तर दिलं होतं’ हे सांगताना स्वत:च्या हुशारीची शेखी मिरवणार्‍या इंद्राणीला, महत्त्वाकांक्षेचा अवघा सोस तिच्या आयुष्याला कुठली-कुठली भीषण वळणं देऊन गेलाय याची पुसटशीही खंत दिसत नाही.
‘मी का पश्चाताप करू? मी काही केलेलंच नसताना…’, ती बेधडक प्रतिप्रश्न करते.
स्वत:च्या वडिलांवर बलात्काराचा (खरा-खोटा?) आरोप करणारी इंद्राणी, त्याच आईवडिलांच्या घरी आपण आपल्या दोन लहानग्या मुलांना सोडून अनेक वर्षं पूर्णपणे दूर का राहिलो, याचं शांतपणे समर्थन करते, ‘त्यांना सांभाळणं मला शक्यच नव्हतं. मी स्वत:च लहान होते.’
तिला त्यात काही वावगं वाटत नसलं तरी, मुलगा मिखाइलच्या आवाजातली, डोळ्यांतली आईविना वाढल्याची वेदना लपत नाही. या वेदनेनं शीनाला लहानपणापासून (कदाचित मरेपर्यंतही) आपल्यापेक्षा कितीतरी अधिक छळलं याचे तपशील तो आणि इतरही काहीजण देतात.
इंद्राणीची तिच्यासोबत वाढलेली मुलगी विधी ही डॉक्यु-सिरीजमध्ये कमालीच्या तयारीनं बोलते. २०१५मध्ये ही केस उजेडात आली तेव्हा शाळकरी वयाची असलेली विधी आता एक देखणी, आकर्षक तरुणी आहे. अजिबात न गडबडता-गोंधळता, डोळ्याची पापणीही लवू न देता विधी सगळा घटनाक्रम व या मंडळींची आपापसांतली विचित्र नाती आपल्यासमोर ठेवते. विधीने या प्रकरणावर एक पुस्तकही लिहिल्याचा उल्लेख होतो. इंद्राणीनेही एक पुस्तक लिहिलं आहे असं समजतं. विधी खोटं बोलतेय असं वाटत नाही. पण अनेक मोक्याच्या ठिकाणी ती ‘कुणी का हे करावं कळत नाही’ असं थंडपणाने खांदे उडवत सांगते.
बायोलॉजिकल वडील नसतानाही, तिचं आणि पीटरचं नातं कसं छान होतं हे ती रंगवून सांगते… इंद्राणी आणि पीटरचा घटस्फोट झाल्यानंतर आपण इंद्राणीला भरकोर्टात वाट्टेल तसं बोललो, आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण त्यातून बचावल्यावर मात्र आपल्याला आपण आईच्या पाठीशी राहिलं पाहिजे याची जाणीव झाली, असं विधी सांगते. मग ‘आई खुनी असो वा नसो’ अशी पुस्तीही ती नि:संदिग्धपणे जोडते. सुखवस्तू आयुष्य तसंच पुढे सुरू ठेवायचं तर तिच्यापुढे याखेरीज अन्य काही पर्यायही आपल्याला दिसत नाही.
विधीकडे एका सुखी कुटुंबाच्या आठवणी आहेत, तर मिखाइलकडे निष्ठूरपणे त्यांना दूर लोटणार्‍या आईच्या. या आईशी आपलं नातं ‘पैसे घेण्यापुरतंच’ आहे हे दुखावलेल्या स्वरात सांगणार्‍या मिखाइलला मुलाखतकार काही अडचणीत आणणारे प्रश्न विचारतात आणि तो गडबडतोही.
शीना व मिखाइल यांच्या विधीसोबतच्या परदेशातील सुट्यांचे, तिथल्या मौजमजेचे फोटो इंद्राणी पुरावे म्हणून समोर ठेवते. हे हसरे, आनंदी चेहरे तुम्हाला माझा दु:स्वास करणारे वाटतात का, इंद्राणी विचारते.
या जगावेगळ्या विचित्र कुटुंबात सारं काही सुखनैव सुरू असताना पीटरचा आधीच्या लग्नातला मुलगा ‘राहुल’ त्यांच्या आयुष्यात आला आणि शीना व राहुलमध्ये निर्माण झालेल्या जवळीकीने काय-काय आणि कसं-कसं बदललं याची कहाणी विधी स्ाांगते…शीनाशी तिचं नातं अखेरपर्यंत छान होतं. ती गायब होण्यापूर्वीच्या काळात इंद्राणी आणि शीना यांच्यात अतिशय गलिच्छ भाषेत भांडणं झाली होती आणि शीना अचानक नाहिशी झाल्यानंतर जणू काही ती कधी अस्तित्वातच नव्हती असेच सारे वागत होते, हेही.
इंद्राणी, विधी, मिखाइल सिरीजभर इतकं काही बोलतात, सांगतात. पण शीनाचा तपास लावण्यासाठी जंग-जंग पछाडणारा राहुल मात्र कॅमेरासमोर येत नाही.
राहुल आणि शीना आपल्याला काल्पनिक चित्रणातून भेटतात. अधून मधून पार्श्वभूमीवर वाजत राहतात राहुलने केलेली इंद्राणी आणि पीटरसोबतच्या मोबाइलवरील संभाषणांची नीटशी ऐकू न येणारी रेकॉर्डिग्ज. हे सगळे कॉल्स त्याने शीना गायब झाल्यावर केलेले आहेत.
कुटुंबाच्या बाहेरून, पण तरीही जवळून ही केस पाहिलेले काही पत्रकार आणि पोलिस अधिकारीही अनेक संदर्भात त्यांच्या नजरेला काय दिसलं ते सांगतात. यात क्राइम आणि कोर्टबीटचे अनुभवी रिपोर्टर्स, केसवर तपशीलवार लिखाण करणारी सदरलेखिका आणि ज्येष्ठ टीव्ही पत्रकार राजदीप सरदेसाई दिसतात.
एकंदरीत या केसमध्ये हे ‘असं’ आपल्याला यापूर्वी सांगितलं गेलं आहे याची आठवण करून दिली जाते व त्याचीच अधिक तपशीलवार वा ‘दुसरी’ बाजू दाखवत, काहीसं ‘बॅलन्स’ करण्याचा, पण त्याचवेळी कुणाचीही बाजू न घेण्याचा प्रयत्न करत ही अवघी कहाणी ही मालिका पुन्हा उलगडून आपल्यासमोर ठेवते.
२०१२मध्ये घडलेलं हे हत्या प्रकरण उजेडात येण्यासाठी २०१५ साल का उजाडावं लागलं? कुणाच्या इच्छेखातर व मदतीने मधल्या तीन वर्षांच्या काळात ते दडपलं गेलं, या महत्त्वाच्या प्रश्नांकडे ही सीरीज आपलं लक्ष वेधते.
अनेक लहान-मोठी सत्यं, असत्यं आणि अर्धसत्यं यांच्या जंजाळात या कहाणीतून निखळ सत्य शोधणं महाकठीण काम आहे, असं राजदीप सरदेसाई समारोप करताना सांगतात.
या डॉक्यु-सिरीजसाठी केसमधील चारही आरोपींशी बोलण्याचा प्रयत्न केला गेला, पण कॅमेरासमोर येऊन बोलण्यास फक्त इंद्राणीच तयार झाली, हे सिरीजच्या शेवटी नमूद केलं आहे.
पैसा आणि प्रॉपर्टीसाठी नेमकं कुणी कुणी, काय काय केलं, सांगणं कठीण आहे असं या सगळ्यांमध्ये वयाने बरीच लहान असलेली, पण आता सज्ञान झालेली विधी सांगते.
इंद्राणीच्या अखेरच्या स्वगतात चक्क ‘माझ्या कुटुंबाने मला दगा दिला’, ‘…पण मी आता मुक्त आहे…’ ही वाक्यं येतात.
पैसा आणि प्रॉपर्टी आणि त्यासाठी संबंधित प्रत्येकाने चालवलेला बेमालूम बनावाचा खेळ यांचा या केसमध्ये इतका गुंता आहे की अशी केस मी माझ्या पंधरा-वीस वर्षांच्या कारकीर्दीत पाहिलेली नाही, असे उद्गार इंद्राणीचे वकील काढतात.
कुणी आणि कशासाठी नेमकं काय काय केलं असेल याचा काहीच थांगपत्ता न लागता प्रेक्षक या सिरीजमधून बाहेर पडतो…

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

मामाच्या गावाला जाऊ या!

Related Posts

मनोरंजन

दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

May 15, 2025
पडद्यावरचा खरा नायक
मनोरंजन

पडद्यावरचा खरा नायक

May 15, 2025
मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
Next Post

मामाच्या गावाला जाऊ या!

हस्तिदंत तस्करीच्या पर्दाफाशाचा थरार...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.