सध्या दोन ते तीन मेसेजिंग अॅप कापरणाऱयांची संख्या अधिक आहे. वेगवेगळी अॅप ओपन करून त्यात जाऊन आपल्याला मेसेज काचावे लागतात. आता मात्र या कटकटीपासून सुटका होणार आहे. बीपर या ऍपच्या मदतीने एक, दोन नव्हे तर तब्बल 15 मेसेजिंग ऍपमधील मेसेज तुम्हाला एकाच ठिकाणी बघता येतील.
‘बीपर’ सेंट्रल हबप्रमाणे काम करणार असून हे ऍप अँड्रॉईड, विंडोज आणि लिनक्सवर काम करते. हे अॅप युझर्सना मोफत मिळणार नाही त्यासाठी त्यांना दर महिन्याला 10 डॉलर्स म्हणजेच जकळपास 750 रुपये द्याके लागणार आहेत. याच्या माध्यमातून युझर्सना सर्कच ऍप्स एकाच प्लॅटफॉर्मकर कापरता येतील. यावर गुगल हँगआऊट, आयमेसेज, इन्स्टाग्राम, आयआरसी. मॅट्रिक्स, फेसबुक मेसेंजर. सिग्नल, स्काईप, व्हाॅट्सअॅप, टेलिग्राम, ट्विटर, स्लॅक अशा अनेक ऍप्सचा सपोर्ट आहे. यापूर्वी हे अॅप नोकाचॅट या नावाने ओळखले जात होते.