• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कॅरेबियन क्रिकेट संस्कृतीची शोकांतिका!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 13, 2023
in फ्री हिट
0

दोन वेळा विश्वविजेता राहिलेला वेस्ट इंडिजचा संघ भारतातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथमच पात्र ठरू शकलेला नाही. दिशाहीन गोलंदाजी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण हे मुद्दे पात्रता फेरीत विंडीजच्या वाटचालीसाठी हानीकारक ठरले. सध्या विंडीज क्रिकेटमध्ये नावे घेण्यासारख्या क्रिकेटपटूंची वानवा जाणवते आहे. कॅरेबियन क्रिकेट संस्कृतीची ही शोकांतिका का झाली? यातून वेस्ट इंडिजचे क्रिकेट सावरेल का?
– – –

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा संघ नसणार हे आता स्पष्ट झाले आहे. ‘‘आम्ही संपूर्ण स्पर्धेत आमची प्रतिष्ठा राखणारा खेळ दाखवू शकलो नाही,’’ अशी प्रतिक्रिया वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होपने यासंदर्भात व्यक्त केली. एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषकाच्या गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाला तो १९७५मध्ये. सुरुवातीच्या तीन पर्वांमध्ये ६० षटकांचे सामने व्हायचे. यापैकी पहिल्या दोन विश्वचषकांवर वर्चस्व विंडीजचेच होते. मग भारताने १९८३च्या अंतिम सामन्यात विंडीजची मक्तेदारी संपुष्टात आणत विजेतेपद पटकावले होते. एकदिवसीय क्रिकेटमधील तो रूबाब वेस्ट इंडिजला पुन्हा कधीच दाखवता आला नाही. पण विंडीज क्रिकेटची सध्याची वाताहत पाहून क्रिकेटमध्ये एके काळी अधिराज्य गाजवणारा हाच का तो संघ, हा प्रश्न पडतो.
गॅरी सोबर्स, विवियन रिचर्ड्स, लान्स गिब्स, गॉर्डन ग्रिनिज, जॉर्ज हेडली, ब्रायन लारा, क्लाइव्ह लॉइड, माल्कम मार्शल, अँडी रॉबर्ट्स, आल्विन कालिचरण, रोहन कन्हाय, सर फ्रँक वॉरेल, क्लाइड वॉलकॉट, मायकेल होल्डिंग, कोर्टनी वॉल्श, जोएल गार्नर अशा एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटूंची नावे वेस्ट इंडिजच्या क्रिकेटशी नाते सांगतात. मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांचे फलंदाज विशेष ओळखले जायचे, तर जगातील सर्वोत्तम अशा त्यांच्या वेगवान मार्‍याला ‘वेस्ट इंडिजचा तोफखाना’ असे अभिमानाने म्हटले जायचे. एके काळी आग ओकणार्‍या त्यांच्या वेगवान गोलंदाजांच्या चौकडीसमोर मातब्बर फलंदाजांची भंबेरी उडायची. अगदी एकदिवसीय प्रकारातील पहिले दोन्ही विश्वचषकही वेस्ट इंडिजच्या प्रभुत्वाची ग्वाही देणारे ठरले. मात्र आता या संघाची जागतिक क्रिकेटमध्ये कोणतीच भीती उरलेली नाही. सोबर्स, लॉइड, रिचर्ड्ससारखे महान संघनायकसुद्धा गेल्या काही वर्षांत त्यांना लाभले नाहीत.
विविध प्रकारच्या क्रिकेट क्रमवारींचा वेध घेतल्यास विंडीजचे कसोटीमध्ये आठवे, एकदिवसीय प्रकारात १०वे आणि ट्वेन्टी-२० प्रकारात आठवे स्थान आहे. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत एकदिवसीय क्रिकेटमधील अग्रस्थान विंडीजने टिकवले होते. त्याला आता ४२ वर्षे लोटली. १९८३च्या उपविजेतेपदानंतर विंडीजने १९८७ आणि १९९२च्या विश्वचषकांमध्ये पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळला. मग १९९६मध्ये हा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. पण त्यानंतर १९९९ आणि २००३च्या विश्वचषकांमध्ये त्यांचे आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले. त्यानंतर कॅरेबियन बेटांवर २००७मध्ये विंडीजला ‘सुपर-८’मध्ये स्थान मिळवता आले. २०११ आणि २०१५मध्ये विंडीजने कात टाकत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. पण २०१९मध्ये विंडीजची ‘रडकथा’ अधोरेखित झाली. त्यांची वाटचाल गटसाखळीपर्यंत मर्यादित राहिली.
२०२३च्या विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या गटसाखळीत वेस्ट इंडिजने अमेरिका आणि नेपाळ या दोन दुबळ्या संघांवर मात केली. पण झिम्बाब्वे आणि सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड्सकडून पत्करलेल्या पराभवांमुळे त्यांचे स्थान डळमळीत झाले. त्यानंतर ‘सुपर सिक्स’ फेरीमध्ये स्कॉटलंडकडून पराभव आणि ओमानवर विजय याचा कोणताही परिणाम झाला नाही. दिशाहीन गोलंदाजीचा मारा आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण यामुळे दोन वेळा विश्वविजेत्या विंडीजवर विश्वचषकाची पात्रता फेरी न गाठण्याची नामुष्की ओढवली. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये झगडणारा हा संघ ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये मात्र थोडीफार इभ्रत टिकवून होता. २०१२ आणि २०१६मध्ये त्यांनी या प्रकारातील विश्वचषकही जिंकले होते. वेस्ट इंडिजच्या क्रिकेटमधील गेल्या दोन दशकांमधील हेच दोन ऐतिहासिक क्षण म्हणता येतील.
ट्वेन्टी-२० प्रकारातील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू झाल्यापासून जागतिक क्रिकेटचे आर्थिक संदर्भ बदलले. वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे, बांगलादेश यांच्यासारख्या आर्थिक समस्या असलेल्या देशांमधील क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक विकासाला या लीगने मोठा आधार दिला. वेगवान क्रिकेटला अनुरूप ‘पॉवर हिटर’ फटक्यांची निसर्गदत्त देणगी लाभलेले वेस्ट इंडिजचे शिलेदार ‘आयपीएल’ गाजवू लागले. गेल्या दोन-चार वर्षांत तर आयपीएलच्या सूत्रावर आधारित बिग बॅश, नॅटवेस्ट टी-२० ब्लास्ट, पाकिस्तान सुपर लीग यांच्यासारख्या अनेक लीगचे पीक देशोदेशी आले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंना देशासाठी खेळण्यापेक्षा या लीगमध्ये खेळण्यातच अधिक धन्यता वाटू लागली. त्यामुळे खेळाडू आपल्या आर्थिक गणितानुसार उपलब्धता कळवू लागले. म्हणूनच कॅरेबियन संघाची रया हरवली. गेल्या काही वर्षांत टेन-१० लीग, १०० चेंडूंचा सामना हे आणखी दोन प्रकार क्रिकेटमध्ये रूढ होत आहेत. या छोटेखानी सामन्यांच्या मनोरंजनातून भरघोस मानधन खेळाडूंना मिळू शकते. राष्ट्रीय क्रिकेटपेक्षा लीग क्रिकेटमध्ये पैसा आहे, हे वास्तव स्वीकारून ताज्या दमाचे क्रिकेटपटू विंडीज संघाकडे पाठ फिरवण्याचे प्रकार सुरूच आहेत. विंडीजच्या संघाच्या जागतिक स्तरावरील अधोगतीला हे प्रमुख कारण ठरले आहे.
सध्या वेस्ट इंडिजमधून गुणी क्रिकेटपटू घडतच नाहीत, असा शिक्का मारला जाऊ लागला आहे. जगातील सर्वोत्तम स्फोटक फलंदाज ख्रिस गेल, जादूई फिरकी गोलंदाज सुनील नारायण, अष्टपैलू कायरेन पोलार्ड, डॅरेन सॅमी, लेंडल सिमन्स, आंद्रे रसेल हे विंडीज क्रिकेटच्या अखेरच्या सुवर्णकाळाचे शिलेदार. पण यापैकी अनेकांनी देशापेक्षा लीग क्रिकेटला प्राधान्य दिले. पण विंडीजच्या सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये हा दर्जा पाहायला मिळत नाही. त्यामुळे लीग क्रिकेटमधील त्यांची पतसुद्धा घसरली आहे. आता लीगच्या लिलावांमध्ये विंडीजच्या क्रिकेटपटूंना मोठे भाव मिळत नाहीत. कारण धडाकेबाज फलंदाज आणि तेजतर्रार गोलंदाजीचे त्यांचे संस्थान केव्हाच खालसा झाले आहे.
आर्थिक चणचण आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचा अनागोंदी कारभार ही त्याची आणखी दोन प्रमुख कारणे आहेत. क्रिकेटपटूंचे मानधन आणि संघनिवड या दोन गोष्टी हाताळतानाचे मंडळाचे धोरण गेल्या काही वर्षांत नेहमीच वादग्रस्त ठरत आलेले आहे. या वादाला २००३मध्ये प्रारंभ झाला. मात्र २००५मध्ये हा वाद अधिक चिघळला. कराराच्या वादावरून वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने दक्षिण आप्रिâका दौर्‍यासाठी सात महत्त्वाच्या खेळाडूंना वगळले होते. २०१४मध्ये मानधनाच्या मुद्द्यावरून विंडीजच्या संघाला दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र अजूनही वेस्ट इंडिज क्रिकेट या बाबतीत झगडतेच आहे.
तूर्तास, वेस्ट इंडिजचा संघ समस्यांच्या चक्रव्यूहात अडकला आहे. कॅरेबियन बेटांवर क्रिकेटपेक्षाही बास्केटबॉल, अ‍ॅथलेटिक्स, फुटबॉल या खेळांकडे तरूण अधिक प्रमाणात वळू लागले आहेत. अमेरिकेचे स्वप्न त्यांना साद घालते आहे. पण वेस्ट इंडिज क्रिकेट संघटनेला याचे कोणतेच सोयरसुतक नाही. याचे गांभीर्य वेळीच लक्षात घेतले नाही, तर कॅरेबियन क्रिकेट संस्कृती इतिहासजमा होईल.

[email protected]

Previous Post

सुभेदार पंतोजी बनला रामा गडी!

Next Post

घोंगडं भिजवायचं किती?

Related Posts

फ्री हिट

संधीचा चेंडू त्यांच्या दिशेने वळलाच नाही…

March 16, 2025
फ्री हिट

मिश्कील, उमदा, खेळकर सुनील!

July 19, 2024
फ्री हिट

त्यांचं काय चुकलं?

May 10, 2024
फ्री हिट

‘ते’ सध्या काय करतायत?

February 16, 2024
Next Post

घोंगडं भिजवायचं किती?

‘लव्हस्टोरी’: पुराणातून कॉलेजपर्यंत!

‘लव्हस्टोरी': पुराणातून कॉलेजपर्यंत!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.