म्हणजे
राजाला तीन खून माफ
आणि
कवीला मात्र
दोनच संग्रह
हा अन्याय आहे म्हणून तक्रार केली तर त्यांनी शिवी दिली
दिली तर दिली
ती देखील बायकोवरून
मग मी पण सोडतो काय
मी पण दिली एक ठेवून
नंतर एनसी, पोलीस स्टेशन वगैरे
सगळं आलंच
तर ते म्हणाले
पुरावा कुठाय?
मी खरंतर
डायलॉग म्हणून
‘पुरावा हृदयात असतो’ वगैरे
म्हणणार होतो
पण जाऊ या झालं
कशाचा कशाशी काही संबंध नाही
तसं तर गझलेत सुद्धा
एका शेराचा दुसर्या शेराशी
काय संबंध असतो?
तरीपण किराणा दुकानात
लेंडी पिंपळी आणि गव्हला कचुरा डबे
शेजारी शेजारी असतातच ना? तेवढ्यात प्रेयसी गेल्याची बातमी आली,
आता मला तरी काय कल्पना
प्रेयसी गेल्यावर
किती दिवस सुतक असतं
म्हणून गुरुजींना विचारलं
तर ते म्हणाले
दुसरी प्रेयसी मिळेपर्यंत पाळावंच लागणार
कशातच लक्ष लागेना
म्हणताना
शेवटी घरचे
म्हणायला लागले
एकदा डॉक्टरना तरी दाखवा
म्हणून गेलो
तर त्यांनी स्टेथोस्कोप खिशालाच लावत काय होतंय विचारल्यावर
‘सारखं सारखं भाजपमधे जावसं वाटतंय’ सांगितलं.