• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून!

- संतोष देशपांडे (देशकाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
April 13, 2023
in कारण राजकारण
0

जगात चमत्कार घडतात, यावर विश्वास बसवणारी एक घटना नुकतीच कर्नाटकात घडली…
…गेल्या नऊ वर्षांत भारतवर्षाला सवय काय झाली आहे की कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षातला एखादा महत्त्वाचा नेता एक दिवस उठून थेट भारतीय जनता पक्षात दाखल होतो… बहुतेक वेळा त्याआधी तो काही अडचणीत सापडलेला असतो आणि त्या अडचणीचं निवारण फक्त विश्वगुरूंच्या चरणी माथा टेकल्यानंतरच होईल, याची त्याला स्पष्ट कल्पना काही घडामोडींमुळे येते आणि तो हा उपक्रम करून मोकळा होतो… असेही बुडत्या बोटीतून उंदीर उड्या मारतातच… भाजप नावाची सतत युद्धाच्याच पवित्र्यात असलेली अजस्त्र नौका शेजारून जात असेल, तर सगळ्या बोटी छोट्या वाटू लागतात आणि उंदीर इकडून तिकडे उड्या मारतातच…
या पार्श्वभूमीवर बाबुराव चिंचनसूर यांच्या राजीनाम्यामुळे फारच मोठा धक्का बसतो. या गृहस्थांनी नुकताच कर्नाटक विधान परिषदेतील आमदारकीचा राजीनामा दिला आहे आणि ते चक्क भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले आहेत…. बसला ना चमत्कारांवर विश्वास?
चिंचनसूर कोण आहेत, असा प्रश्न बाहेरच्यांना पडणं स्वाभाविक आहे. पण, हे गुलबर्गा जिल्ह्यातील एक मोठे राजकीय प्रस्थ आहे. किती मोठं प्रस्थ आहे, याचा वानोळा पाहा. १९७२पासून प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवून कायम अपराजित राहिलेले कर्नाटकातले काँग्रेसचे बलाढ्य नेते आणि विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना २०१९ साली निवडणुकीतील प्रथम पराभव चाखायची वेळ बाबुराव चिंचनसूर यांच्यामुळेच आली होती. येत्या १० मे रोजी कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यामुळेच तिथे राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने होत आहेत. याआधी पुट्टण्णा यांनी देखील विधान परिषदेतील आमदारकीचा राजीनामा देत भाजपा सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राणेबेन्नूरमधून भाजपाने तिकीट दिले नाही तर पक्ष आणि आमदारकी सोडण्याची तयारी केल्याचे अयानूर मंजुनाथ यांनी जाहीर केले आहे. ७५ सदस्य असलेल्या कर्नाटक विधान परिषदेत भाजपाची संख्या ३९वरून ३७ अशी कमी झाल्याने भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच विधान परिषदेतील बहुमत गमावले आहे. यावरून विधानसभा निवडणुकीत वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, ते स्पष्ट होत चालले आहे.
भाजपला २०१८ साली विधानसभा निवडणुकीत ३६.३५ टक्के मते मिळाली होती आणि त्यानंतर झालेल्या २०१९च्या निवडणुकीत पुलवामाचं गूढ हत्याकांड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा मोठ्या प्रमाणात काम करून गेला. भाजपला लोकसभेत तब्बल ५१.७५ टक्के मते मिळाली आणि २८ पैकी २६ जागा मिळाल्या. याचा अर्थ विधानसभेच्या १७७ मतदारसंघांमध्ये भाजपाला स्पष्ट आघाडी होती. त्या निवडणुकीत काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांची युती असून देखील त्यांना भाजपाला रोखता आलं नाही. इतकंच काय तर मल्लिकार्जुन खरगे आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेसुद्धा स्वतःचे मजबूत गड राखू शकले नाहीत. ३२.११ टक्के मते मिळवून देखील बेंगळूरू ग्रामीण ही लोकसभेची एकमेव जागाच काँग्रेसच्या हातात लागली. जनता दल सेक्युलरला एक जागा मिळाली. संपूर्ण दक्षिण भारतात भाजपाला असे मोठे यश आजवर कधी लाभले नव्हते. उत्तर भारताचा पक्ष असे लेबल चिकटलेला भाजप आता या विजयानंतर दक्षिण भारतात देखील मुसंडी मारणार, असे वाटत होते पण तसे होताना दिसत नाही. सर्व ओपिनियन पोल कर्नाटकात भाजपला शंभरचा आकडा देखील गाठता येणार नाही, असे ठामपणे सांगत आहेत. अर्थात, काँग्रेसलाही स्वबळावर ११३चा आकडा गाठणे सहजसाध्य वाटत नाही. समजा तो जादुई आकडा काँग्रेसने गाठला तरी भाजपाच्या खरेदी विक्री संघापासून आमदार सुरक्षित ठेवणे हे सरकार चालवण्यापेक्षा कठिण काम होऊन बसले आहे.
काँग्रेसने कर्नाटक विधानसभेसाठी सर्वस्व पणाला लावले आहे हे देशातील लोकशाहीसाठी अत्यंत आशादायक चित्र आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा मार्ग कर्नाटक राज्यातून जात होता आणि या यात्रेचा पुरेपूर फायदा कर्नाटकातील प्रदेश काँग्रेसने उचलला. याचा थेट परिणाम मोदींचा करिश्मा संपूर्णपणे संपवण्यात झालेला आहे. मोदींच्या सभेत फारशी गर्दी जमत नाही. त्यांचे भपकेबाज रोड शो पहायला लोक मोठ्या संख्येने जातात, पण त्यात सवंग करमणुकीचा भाग अधिक असतो. त्या रोड शोमध्ये आता मतपेटीत मते जमा करायची ताकद शिल्लक राहिलेली नाही.
कर्नाटक राज्यात आजवर निवडणुकीत जातीय समीकरण महत्वपूर्ण ठरत आले आहे. लिंगायत आणि वोक्कालिगा या दोन मोठ्या पंथ आणि जातीसमूहाच्या हातातच सत्तेच्या चाव्या कायमस्वरूपी असतात. लिंगायत समाजातील नेतृत्वात आजवरचे सर्वात मोठे नाव म्हणजे बी. एस. येडीयुरप्पा. भाजपा हा गायपट्ट्यातील पक्ष महाराष्ट्रात वाढला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवावर आणि कर्नाटकात तो वाढला येडीयुरप्पा यांच्या एकट्याच्या ताकदीवर. भाजपाच्या अंतर्गत राजकारणात पंतप्रधान मोदींना थेट आव्हान देण्याची ताकद असलेली व्यक्ती म्हणजेच येडीयुरप्पा. त्यामुळेच पंतप्रधान मोदी त्यांना कायम पाण्यातच पाहायचे. संधी मिळताच येडीयुरप्पांना ख्ाड्यासारखे बाजूला करायचे आधीच ठरले होते. त्यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र व जवळच्या सहकारी शोभा करंजदाळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप छापून येऊ लागले ते आपोआप होत नव्हते. आर्थिक भ्रष्टाचाराच्या मामल्यात अडकवायचे आणि ईडीमार्फत यशस्वी मांडवळ करून काटा काढायचा हा खेळ पक्षाच्या अंतर्गत राजकारणात खेळला गेला. कोविडकाळात येडीयुरप्पा यांची पुरेपूर नाकेबंदी केली गेली. शेवटी २६ जुलै २०२१ला येडीयुरप्पा यांना अत्यंत अपमानकारक पद्धतीने मुख्यमंत्रीपदावरून बाजूला केले गेले. पण भाजपाकडे कर्नाटकात त्या तोलामोलाचा दुसरा नेता कधीच नव्हता. लिंगायत समाजाला नाराज देखील करायचे नव्हते, म्हणून कोणतेच वलय अथवा क्षमता नसलेल्या बसवराज बोम्मईना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. काँग्रेस, जनता दल अथवा भाजपा यांनी तोवर कधीच दिल्लीचा होयबा कर्नाटकात बसवलेला नव्हता. बोम्मई यांना नेमून भाजपने नेमकी तीच घोडचूक केली, जी काँग्रेसने केली होती. राज्याराज्यात दमदार नेतृत्त्व असल्यावरच पक्ष सत्तेत पोहोचू शकतो, हा धडा ते विसरले आहेत. राज्यातील नेतृत्वाला सतत दिल्लीतून हैराण आणि अस्थिर करण्याच्या राजकारणापायी काँग्रेसने स्वतःची वाताहात करून घेतली, त्याच मार्गावर भाजपची वाटचाल सुरू आहे. त्याची सुरुवात कर्नाटकातून होते आहे. (महाराष्ट्रात देखील नितीन गडकरी यांना बाजूला ठेवून पक्षाने काय फडतूसपणा करून ठेवला आहे ते पाहण्यासारखे आहे.)
कर्नाटक हे भाषेचा कट्टर अभिमान बाळगणारे राज्य आहे आणि दिल्लीऐवजी स्थानिक नेतृत्वाला मानणारे हे एक प्रखर प्रादेशिक राज्य आहे. त्यामुळेच येडीयुरप्पा यांना अपमानकारक पद्धतीने हटवणे हे जनतेला व विशेषकरून लिंगायत पंथाला आवडलेले नाही. नंतर मुख्यमंत्रीपदावर बसलेल्यांनी दिवसा उजेडी दिवे लावल्याने हा राग वाढतच गेला. बसवराज बोम्मईंसारख्या एखाद्या मिंध्याला मुख्यमंत्री केले जाते तेव्हा तो आधी वरिष्ठांची चमचेगिरी करतो. येडीयुरप्पा यांनी भाजपचा कर्नाटकात विस्तार करताना रा. स्व. संघाच्या विद्वेषी विखारी भोंदुत्वाचा आधार घेतला नव्हता. ते मुख्यत्वेकरून जनतेच्या प्रश्नावर राजकारण करत पुढे आले. मुळात लिंगायत पंथाचे सच्चे अनुयायी आहेत. जगज्योती श्री बसवेश्वर यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी आणि चालीरीतींपासून फारकत घेत या पंथाची स्थापना केली होती (अलीकडे या पंथाचा हा इतिहासच ‘अदृश्य’ करण्याचा उद्योग महाराष्ट्रात एका मठाधिपतीला हाताशी धरून सुरू आहे). लिंगायत समाजाला भाजपाचे शेंडीजानव्याचे हिंदुत्व कधीच भावणार नाही, शिवलिंगावर श्रद्धा असणारे रातोरात जय श्रीराम म्हणणार नाहीत, हे येडीयुरप्पा नीट ओळखून होते. पण मिंधे मुख्यमंत्री बोम्मई यांनी हे राजकीय शहाणपण बाजूला ठेवून पदावर येताच योगी आदित्यनाथांना देखील मागे टाकायचे ठरवले. अल्पसंख्याक समाजाची धार्मिक भावना दुखावणारे आणि नकली हिंदुत्वाची राजकीय पोळी भाजणारे एकापाठोपाठ एक निर्णय त्यांनी घेतले. (फक्त) मशिदींवरील भोंगे बंद केले, शाळेतून हिजाबबंदी आणली, हलाल मटण-चिकनचा मुद्दा तापवला; इतकेच काय, मुस्लीम समाजाचे आरक्षणही रद्द केले. त्याचवेळी त्यांनी ख्रिश्चनांविरोधातल्या हिंसेकडे डोळेझाक केली, ख्रिसमस कॅरोलसारख्या परंपरांवर बंदी आणली.
दक्षिण भारतातील या नव्या भगव्या प्रयोगशाळेत जोरदार काम होते आहे, याने संघ आणि भाजपमध्ये आनंद पसरला होता. लोहियावादी वडिलांचे हे कुपुत्र विचारधारा बाटून बोगस हिंदुत्ववादी झाल्याने त्यांची बांग अधिक मोठी होती. पण हा कच्च्या हिंदुत्वाचा एककलमी कार्यक्रम राबवताना राज्यातील कारभारचे बारा वाजले. भ्रष्टाचार इतका बोकाळला की चाळीस टक्के कमिशन खाणारे सरकार ही यांची ओळख बनली. भाजपाच्या आमदाराच्या घरी कोट्यवधीचे घबाड सापडले. एका लाचखोर मंत्र्याच्या जाचाला कंटाळून, तशी चिठ्ठी लिहून सीमाभागातील एका कंत्राटदाराने आत्महत्या केली. शेतकरी नाराज, लहान उद्योजक नाराज, बेरोजगारीमुळे तरूण नाराज, त्यात मरणाची महागाई यातून बघता बघता हा खरा जनआक्रोश वाढू लागला. हिंदुत्वाच्या जिवावर यश मिळतेच या भ्रमात असलेल्या भाजपला आपल्या विरोधाची त्सुनामी कधी आली आणि त्यात हे बनावट हिंदुत्वाचं राजकारण कधी वाहून गेले ते कळलंच नाही. भ्रष्ट आणि भोंगळ कारभारावर नाराज झालेले हिंदू भाजपाकडे आलेच नाहीत, शिवाय अन्यधर्मीय पराकोटीचे दुखावले गेले.
अवसानघातकी काँग्रेस अशा संधी बरेचदा कर्माने हातच्या घालवते, पण नेमके याचवेळी कर्नाटकाचे राजकीय भीष्माचार्य मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांनी संधी हेरली आणि ते कामाला लागले. ते दलितांचे नेते आहेत. त्यामुळेच दलित काँग्रेस पक्षासोबत भावनात्मक निर्णय घेत जातीलच. वोक्कालीगा समाजाचे अनभिषिक्त नेते माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा हेच आहेत. पण त्यांचे वय झाले आहे आणि आता त्यांच्या पक्षाची सर्व मदार माजी मुख्यमंत्री डॉ. कुमारस्वामी यांच्यावर आहे. काँग्रेसला या पक्षाचा आजवर तोटा होत होता, हे ओळखून यंदा काँग्रेसने डी. शिवकुमार या वोक्कालीगा नेतृत्वाला राज्याचे नेतृत्व म्हणून पुढे केले आहे आणि त्याचा थेट फायदा काँग्रेसला होणार आहे. वोक्कालीगा समाज एकगठ्ठा मतदान यावेळी करणार नसल्याने मागच्या वेळेइतके काँग्रेसचे नुकसान होणार नाही. इतर जातींपैकी कुरूबा (धनगर) समाजाचे एक नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील एकदिलाने पक्षाचे काम करत आहेत. दलित, वोक्कालिगा, कुरूबा यांच्यासह मुस्लीम समाज असा मोठा बेरजेचा खेळ काँग्रेसने आखला आहे आणि ही अभेद्य व्यूहरचना पाहून आता भाजपचा आधार असलेल्या लिंगायत समाजातील बरेच नेते काँग्रेसकडे तिकीटासाठी पोहोचले आहेत.
त्याचवेळी भारतीय जनता पक्षाला मात्र कुमारस्वामींच्या पक्षाने जुन्या मैसूर प्रांतातील जागांवर तगडे आव्हान उभे केले आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या भागात सतत सभा घेत आहेत. भरीस भर म्हणून बळ्ळारीचे खाणसम्राट बाहुबली जनार्दन रेड्डी यांनी वेगळा पक्ष काढत वेगळीच चूल मांडल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांची थेट युती नसली तरी ते एकमेकांना पूरक भूमिकेत राहतील. भाजपाला एकहाती बहुमत मिळू देणे दोघांना परवडणारे नाही. कुमारस्वामींना ते बहुमत काँग्रेसला देखील मिळू द्यायचे नाही, कारण त्रिशंकू विधानसभा असणेच त्यांच्या पक्षाला सत्तेत पोहोचवू शकते. पण, आज तरी सर्वच ओपिनियन पोलचा रोख पाहिला तर भाजपा कर्नाटक विधानसभेतील बहुमत गमावेल आणि थोड्याफार फरकाने काँग्रेस बहुमत प्राप्त करेल, अशीच शक्यता वर्तवली जात आहे.
२०२४ सालातील लोकसभेची निवडणुक परत एकदा आरामात जिंकू असे घमेंडखोर विधान भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी केले. पण त्याआधी त्यांना कर्नाटक राज्य जिंकावेच लागेल हे ते सोयीस्करपणे विसरले असावेत. २०१९ला तब्बल २६ खासदार व त्याआधी २०१८ला १०४ विधानसभेचे आमदार असे घवघवीत यश भाजपाच्या पदरात घालणारे कर्नाटकाचे मतदार यावेळी फिरले तर ते मोदींना २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मतांसाठी दारोदार फिरायला भाग पाडू शकतात. आता जे जिल्ह्याच्या ठिकाणी मोदींचे रोड शो होतात, ते मग तालुका आणि गाव पातळीवर घ्यावे लागतील. कर्नाटक घालवणे भाजपाला अजिबात परवडणारे नाही, पण सध्यातरी त्याना हा मोठा धक्का बसणार हे दिसते आहे. २०१९ला ५० टक्के मते मिळवणारा पक्ष त्या राज्यात बहुमतासाठी आज धडपडतो आहे हे ते देखील देशातील वातावरण निष्पक्ष नसताना! मोदी लाट संपली याचे तरी हे संकेत नाहीत ना?
आणखी एक मुद्दा इथे लक्षात घ्यायला हवा. कर्नाटकात २०१८च्या निवडणुकीत २२४ सदस्यीय विधानसभेत ३६.३५ टक्के मतांच्या बळावर भाजपने १०४ जागा जिंकल्या होत्या. पण, त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे ३८.१४ टक्के मते घेऊनही काँग्रेसला फक्त ८० जागा जिंकता आल्या होत्या. ११३च्या बहुमतापर्यंत दोन्ही पक्ष पोहोचले नव्हते. पण सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले गेले. येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदी आले आणि ऑपरेशन लोटस २.० या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटून बहुमत मिळवले गेले. १७ काँग्रेस आमदारांना काँग्रेसमधून राजीनामे द्यावे लागले. हे १७ जण अपात्र ठरले पण त्यांना पोटनिवडणुकीत उभे राहता आले. भाजपाच्या तिकिटावर धनशक्तीच्या जोरावर ते परत निवडून आले. भाजपने तिथे अत्यंत खालच्या स्तरावरचे राजकारण केले. जनता या गलिच्छ राजकारणाला पाच वर्षांत विसरते, हा फाजील आत्मविश्वास त्यात असतो.
कर्नाटकात या सत्तापिपासू पक्षाला हरवण्याचा निर्धार करत जनतेनेच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. लोकशाहीत जनता सार्वभौम असते, याचा पडताळा भाजपला या निवडणुकीत येईल, अशीच सगळी चिन्हे आहेत. ती भारतीय लोकशाहीसाठी सुचिन्हे आहेत.

Previous Post

सर्चलाईट विझला!

Next Post

आयपीएलला टफ फाइट देणारं ‘फँटसी गेमिंग’

Related Posts

कारण राजकारण

जातगणना : एक चुनावी जुमला!

May 15, 2025
कारण राजकारण

मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

May 15, 2025
कारण राजकारण

टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

May 15, 2025
कारण राजकारण

पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

May 8, 2025
Next Post

आयपीएलला टफ फाइट देणारं ‘फँटसी गेमिंग’

टपल्या आणि टिचक्या

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.